चांगला चकना कृती सुचवा

Submitted by कटप्पा on 13 June, 2019 - 18:15

मित्रांनो, शुक्रवार आलाय आणि विकांत देखील।
ग्लेनफिडीच १८ भेट मिळालेली आहे आणि कॉलेजातील जुने मित्र देखील येत आहेत भेटायला।
चांगल्या चकना कृती सांगू शकाल का।

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

शाली तुमचा ब्रँड कोणता?

बाकी सिंगल malt घेतली तरी मी सोबतीला काही न काही खातो.. किमान चीज cube तरी असतोच, उकडलेले दाणे वगैरे. मसालेदार नको तरी

@अजिंक्यराव पाटील, मला त्यातले काही समजत नाही. कोणतीही दारु मला कडूच लागते. (नारळपाण्याच्या चवीची का बनवत नाहीत?)
आवडते म्हणून नाही तर सवयीने मी Smirnoff आणतो.
व्होडका महत्वाची नाही, सोबत महत्वाची. जीवलग मित्र सोबत असेल, पौर्णिमेचा चंद्र आणि समोर समुद्र असेल, पार्श्वभूमीवर मेहदी हसन किंवा किशोरीताई असतील तर मला काहीही चालते. Happy Happy

(नारळपाण्याच्या चवीची का बनवत नाहीत?)>>
बनवतात की. Malibu white/dark rum.
माझे एक काका जे शास्त्रीय संगीत ऐकतात पिताना, त्यांना आवडते ही.
डिस्क्लेमर: कन्झंप्शन ऑफ अल्कोहोल इज इंजुरिअस टू हेल्थ.

माझे सर्वात आवडत ठिकाण .
डोंगराच्या पायथ्याशी असलेले शेतातील घर.
चहू बाजूंनी अंधाराचे साम्राज्य .
घराच्या समोर ट्यूब लाईट चा प्रकाश.
थंड हवेची झुळूक.
बरोबर बालमित्र ( ह्या मित्रां समोर आपण कोणताच आड पडदा ठेवत नाही )
आणि सोबत मदिरा ,उत्तम चकणा
Wa wa काय मज्जा येते .
वर्षा मधून ३/४ वेळा तरी आम्ही मित्र अशी मैफिल जमवतो

@मानव पृथ्वीकर, Malibu मला माहीत नव्हती.

डिस्क्लेमर: कन्झंप्शन ऑफ अल्कोहोल इज इंजुरिअस टू हेल्थ>>>
कुछ तो तलफ पैदा कर जींदगी के वास्ते
युं ही सेहत से जींदगी नही कटती। Wink

अहा शेर!

आज gentleman जॅक उघडली,

सोबतीला- खारे दाणे, चीज, तिखट मीठ काकडी, आणि aroma's हैदराबाद हाऊसचं लेमन चिकन (पिंपळे सौदागर शाखा.. हिंजवडी शाखेतला एकही पदार्थ आवडलेला नाही आजवर..)
ता.क. जास्त मसालेदार किंवा जिभेवर फार चव टिकणारे काही नको असेल तर लेमन चिकन बेस्ट आहे!

मानव - योग्य निर्णय !!!

पण खऱ्या दिलखुलास गप्पा दारू पितानाच होतात. बाकी वेळी पोकर फेस असतो आपला - मनातल्या गोष्टी विचार करून बाहेर काढल्या जातात. मॅनिप्युलेट करून.
दारुपार्टी मध्ये होनेस्ट गप्पा असतात.

आमची महिना दोन महिन्यातून एकदा महफिल जमते, बाकी इतर दिवस नो दारू. सोशल ड्रिंकिंग हेच असावे असे समजतो.
एकट्याने अजून एकदाही पिली नाहीय.

Pages