निर्णय

Submitted by VB on 22 May, 2019 - 14:33

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी असते जी आपल्या खूप जवळची असते, आपली असते, जिच्या सोबत असताना कुठलाही संकोच नसतो की कसलेही वागण्या बोलण्याचे बंधन नसते. अगदी असाच होता तिचा अमित. तिचा जोडीदार जो कधीच तिचा होऊ शकला नाही.

अमित अन प्रियाचे जीवापाड प्रेम होते एकमेकांवर, पण नियतीला त्यांचे एकत्र येणे मान्य नव्हते. एका अपघातात अमित प्रियाला कायमची एकटी सोडून गेला . अन त्याच्या अश्या जाण्याने कोलमडलेली प्रिया, कितीही दुःख झाले तरी जगणे सोडून देता येत नाही म्हणून जगत होती . क्षणाक्षणाला तिला अमितची आठवण येई. त्याच्या आठवणीत रोज जिवंतपणी मरण यातना भोगत होती ती. अमितशिवाय प्रियाला दुसरे जगच नव्हते. अन त्याच्या अश्या अकाली जाण्याने तर तिचे संपूर्ण जग हरवून गेले होते.

बघता बघता एक तप लोटले, पण तरी ती अमितला विसरू नाही शकली. कसे विसरणार न तो तर तिच्या श्वासात होता. प्रियाचे असे एकटे राहणे पाहून तिच्या आप्तांना खूप दुःख होत होते. तिचा एकटेपणा दूर करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून त्यांनी प्रियाला लग्नासाठी तयार केले. स्थळांचीही काही कमी नव्हती सो घरच्यांच्या इच्छेनुसार ती राजीवला भेटायला तयार झाली. राजीव, लग्नाच्या दृष्टीने एक परफेक्ट स्थळ. दिसायला बरा, सुशिक्षित, चांगली नोकरी -घरदार असलेला.
प्रियाने जरी घरच्या दबावामुळे त्याला भेटायला होकार दिला असला तरी एक गोष्ट चांगली होती की शेवटचा निर्णय तिच्या हाती होता. दोघेही एकदोनदा भेटले, नाही म्हणायला प्रिया वरचा ताण राजीवला जाणवत होता. पण त्याने समजूतपणा दाखवत तिला तिची वेळ दिली, तिच्या भावना समजून घेतल्या. राजीवचा हा समजूतदार पणा बघून प्रियाला बरे वाटले, अन मुख्य म्हणजे त्याला अमितविषयी सगळे माहीत होते म्हणून ती थोडी रिलॅक्स होती.

जरी वरवर सगळे ठीक चालू होते, तरी घाईघाईने निर्णय नको म्हणून प्रियाने थोडा वेळ मागितला. शेवटी ज्याच्यासोबत उर्वरित आयुष्य घालवायचेय त्याला नीट समजून घेणे गरजेचे होते. अन त्यासाठी वेळ मिळेल तसे भेटणे, बोलणे चालू झाले राजीव अन प्रियाचे. जस जसे वेळ जाऊ लागला, प्रियाच्या लक्षात आले की राजीव असा नाहीये जसे तो दाखवतोय. सुरुवातीचा समजूतदार पणा, सालस पणाचा बुरखा हळूहळू उतरू लागला होता त्याचा. त्याला प्रियाने त्याच्या इच्छेनुसार वागले पाहिजे होते. जरा काही मनाविरुद्ध झाले की टोचून अन अपमानास्पद बोलू लागला होता तो. वरवर कितीही सुशिक्षित होता पण जरा काही मनाविरुद्ध झाले की त्याचा स्वतःवरचा ताबा सुटायचा. आधी बोलताना जी काळजी घेतली जाई तीचा तर आता लवलेशही नव्हता. अन मुख्य म्हणजे त्याच्या लेखी ते योग्य होते. प्रियाने एकदोनदा समजवायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. म्हणतात न की झोपलेल्याला उठविता येते, झोपेचे सोंग घेणाऱ्याला नाही.
राजीवच्या अश्या वागण्याने प्रिया अस्वस्थ झाली. आधीच तिचे मन तयार नव्हते, त्यात हे असे. तिच्याही नकळत तिचे मन भूतकाळात रमले. अन पुन्हा एकदा तिला रडवून गेले. आज अमित असता तर. किती वेळ, किती दिवस एकत्र होतो आपण, किती काळजी घेई तो तिची. तिच्या बद्दल कुणी गैरशब्द उच्चरणे तर दूर, कोणी तिच्याशी मोठया आवाजात बोलत सुद्धा नव्हते. तो नेहमीच सर्वांशी प्रेमाने वागे, सर्वांची काळजी घेई.

आता तो या जगात नव्हता, पण त्याच्या आठवणी तिचा आयुष्य भराचा ठेवा होत्या. शेवटी प्रियाने खूप विचार करून निर्णय घेतला, आयुष्यात कधीच लग्न न करण्याचा अन मुख्य म्हणजे कुणाच्याही दडपणाखाली न येण्याचा.
राजीव अन अमितची तुलना अशी नव्हती, पण अमितचे संस्कार, सगळ्यांना समजून घेण्याची लकब, अमितचे पारडे भारी करत होते. अन मुख्य म्हणजे जे प्रेम तिच्या मनात अमित विषयी होते, ते प्रेम तिला इतर कुणाविषयी वाटत नव्हते. अन म्हणूनच कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला तिने.

प्रियाचा निर्णय आधी कुणालाही मान्य नव्हता पण हळूहळू तो तिने समजवला सगळ्यांना. कुणाला पटो न पटो, आवडो न आवडो, प्रियाची निवड झाली होती, तिचा जोडीदार, तिचा सोबती होता तिचा अमित अन त्याच्या आठवणी, अन त्या पुरेशा होत्या तिच्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Amit Cha nasana wedana deta pan tyachya aathawaniwar thampane nirnay gheu shaknari Priya aawadali.. majhya eka ashyach maitrinichi aathwan karun geli ji aaj kankhar pane ekti pudhe netey doghanchi swapne ektine