शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:
यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी
तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.
*एका टोकाला 'वी' असा आकार
*एका टोकाला 'वी' असा आकार असलेल्या फुले काढायच्या काठीला गोखली म्हणतात* - हीरा, आमच्या गांवी (सिंधुदुर्गात) 'गोखी' असा त्याचा सर्रास उल्लेख होतो.
*एका टोकाला 'वी' असा आकार
दक्षिण रायगड जिल्ह्यात तरी
दक्षिण रायगड जिल्ह्यात तरी आकडी म्हणतात बुवा त्या काठीला गोखली/ गोखी हे शब्द प्रथमच ऐकले. आकडा या शब्दावरून आकडी आलं असणार. चोरून वीज घेतात हूक टाकून त्यालाही आकडा टाकला असं म्हणतात
हीरा, मस्त माहिती!
*हीरा, मस्त माहिती! * - +1 !
*हीरा, मस्त माहिती! * - +1 !
फाणस हा शब्द अरबी वा फारसी
फाणस हा शब्द अरबी वा फारसी भाषेतून आलेला आहे. फानूस असा मूळ शब्द आहे. दिवा असा त्याचा अर्थ होतो.
मशाल हा शब्द अरबी आहे.
समई हा शब्ददेखील संस्कृत मूळ नसून फारसी आहे. शमा हा मूळ शब्द त्याचा अपभ्रंश समई आहे.
दक्षिण रायगड जिल्ह्यात तरी
दक्षिण रायगड जिल्ह्यात तरी आकडी म्हणतात बुवा त्या काठीला
<<
अगा बाबौ.
आकडी येणे म्हणजे मिरगीचे झटके (convulsion) येणे असा अर्थ आहे ब्वा आमच्या खानदेशात.
फणस
फणस
अननस. अख्खी दुनिया अननस म्हणते इन्क्लुडिंग आपण. फक्त इंग्रज, पाईन अॅपल!
आंबील म्हणजे काय? कशाच बनवतात
आंबील म्हणजे काय? कशाच बनवतात... अन वर लिहिलं आहे ते कुणी जास्त मागत नाहित.. का बरं?
आंबील ,सुक्या हरभरा अर्थात घुगऱ्या, मेथीची भाजी
हे पूर्वी घरोघरी समूहाने जाऊन मागून घेऊन खायची प्रथा होती..
आता कालौघात कमी होत गेलेली प्रथा.
आंबा काढायच्या झेला ला आम्ही
आंबा काढायच्या झेला ला आम्ही खुडी म्हणतो.
आमच्याकडे दोन होत्या. कुणीपण आंबा उतरवायला न्यायचं.
परत देताना खुडीच्या सॅक मध्ये बसतील त्याच्या दुप्पट आंबे द्यायचे मोबदला म्हणून अशी पद्धत होती
*हीरा, मस्त माहिती! * - +1>>>
*हीरा, मस्त माहिती! * - +1>>>> सहमत
भाऊकाका , तुम्ही पण मस्त माहिती देताय
आकडी येणे म्हणजे मिरगीचे झटके
आकडी येणे म्हणजे मिरगीचे झटके (convulsion) येणे असा अर्थ आहे ब्वा आमच्या खानदेशात.>> हो तो अर्थ पण आहेच. लिहिलंय वरती मी
*परत देताना खुडीच्या सॅक
*परत देताना खुडीच्या सॅक मध्ये बसतील त्याच्या दुप्पट आंबे द्यायचे मोबदला म्हणून अशी पद्धत होती* - मस्तच ! कलम लावायची, मशागतीची , राखण करायची कटकट नाही पण घरीं आंब्याचे ढीग !!
ईतर प्रांतातले बरेचसे शब्द
ईतर प्रांतातले बरेचसे शब्द माहीत होते पण कोकणातले अनेक शब्द नव्याने कळाले.
* अनेक शब्द नव्याने कळाले.* -
* अनेक शब्द नव्याने कळाले.* - आपापल्या प्रांतातले शब्द सांगतांना त्या शब्दांशी निगडीत प्रत्येकाच्या आठवणींमुळे इथं जी भावुकता ओसंडताना जाणवते , तीही या धाग्याची खासियतच !!
इथं जी भावुकता ओसंडताना
इथं जी भावुकता ओसंडताना जाणवते , तीही या धाग्याची खासियतच !!>>>+१.
शाळा /कॉलेजच्या दिवसात शंकर पाटलांच्या कथेत वाळूक शब्द पहिल्यांदा वाचला.ट्ञात नायक हिरविणीला हातातल्य वाळकाचे २ तुकडे करून देतो असा उल्लेख आहे.काकडी म्हणून अर्थही कळला.पण इथे माबोवर एका धाग्यावर वाळूक म्हणून शेंदरी रंगाच्या एकदीड फूटी मोठाड काकडीचा फोटो पाहिला.त्यामुळे नेमकं वाळूक म्हणजे काय असा प्रश्न पडला.
कोकणात मोठ्या काकड्या असतात त्यांना तवसं म्हणतात तसं का?
वाळुक म्हणजे मोठ्या आकाराची
वाळुक म्हणजे मोठ्या आकाराची काकडीच असते. तिच्या जुन होण्याबरोबर रंग बदलतो. वाळुकवरुन अजुन एक शब्द आठवला: वागूर-पक्षी पकडण्यासाठी वापरायची जाळी. या शब्दाचा उल्लेख ज्ञानेश्वरीतही आढळतो.
तंव पांगितु जाळाते। चिरितु वागुरेते।
शाली, तुम्ही आणि शशांक वगैरे
शाली, तुम्ही आणि शशांक वगैरे जे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत,त्यानी एकेक अध्याय घेऊन भाषांतर करण्याचे मनावर घ्या की.म्हणजे माझ्यासारख्या बरेचजणांची सोय होईल.
मस्तच ! कलम लावायची, मशागतीची
मस्तच ! कलम लावायची, मशागतीची , राखण करायची कटकट नाही पण घरीं आंब्याचे ढीग !!
ती तर वायलीच गंमत. आमची स्वतःची अशी फारशी आंब्याची झाडं नव्हती,जवळजवळ नाहीच. पण आमच्या आडनावाची गावात जेवढी घरं होती त्या सर्वांची सामाईक अशी बरीच आंब्याची झाडे होती. पुन्हा हिश्श्याचं म्हणाल तर- वन्शा आबा होता त्याचा एकट्याचा आठाने हिस्सा, आमचे आजोबा आणि चुलत चुलत आजोबा यांचा चाराने हिस्सा होता.बाकी सगळी घरं राहिलेल्या चारान्यात बेतावली जायची. या असल्या वाटणीने घरात खंडिच्या खंडी आंबे यायचे
उन्हाळ्यात गावी गेलं की पाटी पाटी आंबं यका बसनी संपवायचो आम्ही. अर्थात आमचे समदे रायवाळ आंबे.
अशी वाटणी कुठुन आली होती काय माहित. आजोबांना विचारायला पाहिजे होतं
वागूर-पक्षी पकडण्यासाठी
वागूर-पक्षी पकडण्यासाठी वापरायची जाळी.
वागुर्/वाघुर पहिल्यांदा ऐकल्यावर चक्रावलो होतो. हा शब्द कसा माहित नाही ते.
मित्रामित्रांच्या भांडणात त्यांची कुटुंबं इन्व्हॉल्व्ह झाली . वाद विकोपाला गेला. तेव्हा पहिल्यांदा ऐकला.
'एकेकाला वाघुर लावून नाय टिपला तं बापाचं नाव नाय सान्गनार'
*अशी वाटणी कुठुन आली होती काय
प्रचारक ,
*अशी वाटणी कुठुन आली होती काय माहित. आजोबांना विचारायला पाहिजे होतं * - आजोबानी आंब्याची झाडं इतरांना पण खुडी फक्त तुम्हाला दिली, यातच उत्तर आहे कीं आजोबांचं ! तिजोरी इतरांना, तिची चावी तुम्हाला!!
गडगा - कुंपणाची छोटी भिंत
गडगा - कुंपणाची छोटी भिंत
गावी - सांडशी
खोट - टाच
सोलं - आमसुल
तिजोरी इतरांना, तिची चावी
तिजोरी इतरांना, तिची चावी तुम्हाला!!
गडगा कित्ती दिवसांनी ऐकले. ही छोटी भिंत असायची. आता अजिबात दिसत नाही.
घरी काही कार्य असले की गडग्याच्या समोर केळीचे मोठे खुंट किंवा नारळाच्या झावळ्या लावायच्या. झावळ्या लावल्या असतिल तर प्रत्येक काट्याला एक झेंडुचे फुल टोचायचे. काय उत्सवी आणि उत्साही वातावरण तयार होई!
गडगा कित्ती दिवसांनी ऐकले. >>
गडगा कित्ती दिवसांनी ऐकले. >>> आता फेन्सिंग म्हणतो नाहीतर कॉमन वॉल!
'गडगा' = कुंपणाची छोटी भिंत,
'गडगा' = कुंपणाची छोटी भिंत, हें खरं असलं तरीही त्याची खरी ओळख म्हणजे साधारण गोलाकार दगड रचून, मातीने लिपून बांधलेली भिंत अशी आहे ( निदान, कोकणात तरी ). विटांच्या , चिरा दगड वापरून बांधलेल्या भिंतीना 'गडगा' शब्द वापरणं चूक नसलं तरी तो तिथं चपखलपणे लागू होत नसावा.
( माझं इथलंच एक पूर्वीचं चित्र . मला अभिप्रेत असलेला ' गडगा' )
कोकण भागात वापरात येणारे शब्द
कोकण भागात वापरात येणारे शब्द बरेच वर्षांनी परत वाचताना खूप छान वाटलं! बाकीचे शब्द वाचताना नवीन शब्द त्यांचे अर्थ -खूप मस्त वाटलं
आमच्याकडेही गडगा हा गोल
आमच्याकडेही गडगा हा गोल दगडांनी बांधला जाऊन तो मातीने लिंपला जायचा. ओबड धोबड आकार असायचा. तो महिन्यातुन एकदा मातीने सारवलाही जायचा.
एका आवाराचे २ भाग ( उदा. एका
एका आवाराचे २ भाग ( उदा. एका बाजूला बागायत आणि दुसऱ्या बाजूला आंब्याची कलमे) करण्यासाठी जी कुंपण घातली जाते, त्या कुंपणीतून ये-जा करण्यासाठी मधे ' बेजं' लावतात. बेजं म्हणजे इंग्रजी वाय अक्षराच्या आकाराची मजबूत जाड फांदी जमिनीत बसवलेली असते. त्यावर करवंद किंवा तत्सम काटेरी झुडपाची फांदी ( तिला शेवा म्हणतात) टाकून ठेवलेली असते. माणसांना ये-जा करायची असेल तेव्हा शेवा सहज उचलून बाजूला करता येतो. पलीकडे गेलं की परत जागेवर ठेवायचा. गुरंढोरं इकडून तिकडे जाऊ नयेत म्हणून ही सगळी व्यवस्था असते.
भाऊकाका , गडगाच चित्र भारी
भाऊकाका , गडगाच चित्र भारी
*गुरंढोरं इकडून तिकडे जाऊ
*गुरंढोरं इकडून तिकडे जाऊ नयेत म्हणून ही सगळी व्यवस्था असते.* - नवीन शब्दच नाहीत, तर वेगवेगळ्या प्रांतांत योजलेल्या वेगवेगळ्या कल्पनाही त्या शब्दांमुळे अशा लक्षात येतात.
वाळुक - आमच्याकडे उपवासाला
वाळुक - आमच्याकडे उपवासाला फराळाचे पदार्थ नसतील तर हे खायचे
वाघर - धनगर शेतात रात्री मेंढ्या कोंडण्यासाठी वापरतात ती जाळी. या जाळीच्या चौकोनी आकाराला वाडगे असे म्हणतात. या वाडग्या भोवती रात्री चार बाजूला चार गडी झोपत व मधे मेंढरे असायची.
Pages