देवा, श्री गणराया
देवा, श्री गणराया, नमन तुज प्राणप्रिया
श्रद्धा दे जगाया, गणपती बाप्पा मोरया
लंबोदरा तव भक्षणा
का तुज नवस दक्षिणा
उगाच का धर्मरक्षणा
भोळ्या भक्तांच्या प्रदक्षिणा
बसून बघशी सिद्धीप्रिया
देवा, श्री गणराया, नमन तुज प्राणप्रिया
भक्ती दे पूजाया, गणपती बाप्पा मोरया
मानवतेची हो उपासमार
माजली यादवी अपरंपार
जगती पेटला वणवा आज
का ना त्याची तुजला आच ?
दुःखहर्ता तू मोरया
देवा, श्री गणराया, नमन तुज प्राणप्रिया
बुद्धी दे सुधाराया, गणपती बाप्पा मोरया
दीन दुबळ्या लढण्यासाठी
हो त्यांच्या हाती काठी
अन्याय जाच मिटण्यासाठी
रहा उभा त्यांच्या पाठी
सुखकर्ता तू मोरया
देवा, श्री गणराया, नमन तुज प्राणप्रिया
शक्ती दे लढाया, गणपती बाप्पा मोरया
- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita