राझी - उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता

Submitted by माधव on 20 July, 2018 - 00:01

बहुतेक भारतीयांना भगवद्गीतेबद्दल महिती असते - कुणाला ती तोंडपाठ असते, कुणी नीत्यनेमाने वाचतात तर कुणी त्यावर चर्चा करतात. पण फार थोड्या जणांना गीता खर्‍या अर्थाने समजलेली असते. गीता जऊद्या, ते खूप मोठे प्रकरण आहे (खरं तर गीतेत अनेक प्रकरणे (अध्याय) आहेत) पण ती ज्या प्रसंगात सांगितली गेली तसा प्रसंग आपल्यापैकी खूप कमी जणांच्या आयुष्यात येतो. कारण सोपं आहे - आपण पळपुटे असतो! युद्ध आणि आपण यांची सांगड प्रत्यक्ष आयुष्यात तर दूरच, आपण स्वप्नात देखील घालत नही. आपण ज्या काही तथाकथीत लढाया लढतो त्या स्वहीत आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाचे भले येवढ्याच मर्यादीत हेतूने केलेल्या असतात. आता युद्धच करायचे नाही म्हटल्यावर आपल्या प्रियजनांशी युद्ध करायचा प्रश्नच उद्भवत नाही. मग जर का कोणी आपल्याला सांगितले की आधी प्रेमाची नाती तयार करा अणि मग त्या जीवलगांशी युद्ध करा तर ?

"येडंच आहे! मी काय कोळी वाटलो का ? आधी जाळे विणायला आणि मग त्यात न अडकायला? अरे इथे गणपती गेल्यानंतर आरास काढायला जीवावर येते. इतक्या चटकन् निर्जीव गोष्टीत जीव अडकतो माझा आणि म्हणे जीवलगांशी युद्ध!"

पण काही जण हे करू शकतात आणि त्यातलीच एक म्हणजे सेहमत - आपल्या सिनेमाची नायिका! नाही नाही! ती कोणी लष्करातली अधिकारी नाहीये ना कोणी प्रशिक्षीत हेर. ती एक कॉलेजात शिकणारी साधी मुलगी आहे. एक तुरुतुरु पळणारी खार एका गाडीखाली येणार असते आणि तिला आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवताना सेहमत पहिल्यांदा भेटते आपल्याला. आपल्या मनातही येत नाही की हा प्रसंग सिनेमात पुढे खूप महत्वाचा ठरणार आहे.

तर अशी ही सेहमत भारतासाठी हेरगीरी करायला तयार होते ते केवळ आपल्या वडलांच्या शब्दाखातर. देशाबद्दल प्रेम प्रत्येकालाच असते. पण त्याकरता प्राण द्यायला फार कमी जण तयार असतात आणि केवळ वडलांचा इच्छेखातर देशासाठी प्राण द्यायला तयार होणारे अगदीच विरळा. पण सेहमत तयार होते - राझी होते.

सेहमतच्या वडलांना पकिस्तान भारताविरुद्ध काहीतरी कारस्थान रचतोय आणि नजीकच्या काळात काही तरी घडणार आहे याची कुणकुण लागते. ते भारतासाठी हेरगीरी करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून पकिस्तानी सैन्यातल्या अधिकार्‍यांच्या घरी त्यांची उठबस असते. कारस्थानाची माहिती काढणे त्यांना शक्य असते पण त्यांच्याकडे वेळ आणि शक्ती दोन्ही नसते. त्यांचे अफेअर सुरू असते - कॅन्सरशी! आणि त्यापासून अलिप्त राहणे त्यांना आता अशक्य असते. दुसर्‍या कोणाला त्यांची जागा घेता आली असती पण इतक्या कमी वेळात विश्वास संपादून इतक्या आतल्या गोटात पोहचणे निव्वळ अशक्य असते. त्यांचा डोक्यात एक अतर्क्य प्लॅन तयार होतो - आपल्या पोटच्या मुलीला पाकिस्तानी अधिकार्‍याची सून करून पुढची माहिती काढायची. तो प्लॅन अतर्क्य आपल्याकरता असतो पण त्यांच्याकरता तो अगदी सहज असतो कारण त्यांची हेरगीरीची कारकिर्द सुरू झाली असते अशाच एका शब्दाखातर! सेहमतच्या कानावर ते आपला प्लॅन घालतात आणि ती वेडी तयार होते.
सेहमत राझी होते पण ती कशाला तयार झाली आहे ते ना तिला कळत ना आपल्याला. तिचे हेरगीरीचे प्रशिक्षण सुरू होते आणि आपण हेरगीरीवरचा सिनेमा आहे असे समजून सिनेमा पहायला लागतो. सिनेमाच्या प्रोमोजमध्ये पण तेच सांगितले होते. आपणही तेच ग्राह्य धरतो.

ट्रेनींग सुरु होते आणि आपल्याला भेटतो मीर - सेहमतचा प्रशिक्षक आणि तिच्या वडलांचा सुहृद! तिच्याविषयी वाटणारे कौतुक आणि माया तो कडक शिस्तीच्या बुरख्यात लपवून ठेवतो. तिला कसलीही उसंत न देता, 'छोटीशी चूकही तुझ्या जिवावर उठू शकते' हे तिच्या मनावर बिंबवत तो तिचे ट्रेनींग पूर्ण करतो. पूर्ण करतो म्हणण्यापेक्षा जेवढे शक्य असते तेवढे तो तिला शिकवतो. सेहमत पुरती तयार झाली नाहिये हे त्याला माहित असते पण नाईलाज असतो, सगळे यथासांग करण्याइतका वेळ नसतो. तो एक मात्र करतो - परक्या मुलखात सेहमतसाठी अनेक पळवाटा बनवून ठेवतो.

मग वेळ येते ती बिदाईची आणि पडद्यावर येते ते एक अप्रतिम गाणे - दिलबरो. लग्न, आपला जोडीदार याबद्दल कधी फारसा विचारच केलेला नाहीये, ज्याला भेटणे तर दूरच कधी पाहिले पण नाहीये अशा शत्रू देशातल्या माणसाबरोबर लग्न झालय, वडलांना परत कधीच भेटू शकणार नाही हे पण कळलंय आणि मग घराचाच नाही तर देशाचाच उंबरठा ओलांडायची वेळ येते. सेहमतची मनस्थीती ते गाणे अगदी तंतोतंत मांडते. गाणी हा आपल्या सिनेमाचा अविभाज्य भाग आहे आणि मी हिंदी सिनेसंगीताचा प्रचंड चाहता आहे. पण बर्‍याचदा हे गाणे आत्ता का आहे हा प्रश्न मला पडतोच. प्रसंगाला अनुसरूनच नाही तर तो प्रसंग अधीक गहीरा करणारी गाणी आपल्या सिनेमात फार कमी असतील. दिलबरो त्यातलेच एक. गाणे सुरू झाल्यावर अंगावर काटा आला होता माझ्या. गाणं ऐकताना हे पण जाणवलं की समोर चालू आहे ती हेरकथा नाहीये, एक वेगळंच रसायन आहे. खूप वेगळं आणि गहीरं!

लग्नाबरोबर सेहमतच्या आयुष्यात इक्बाल येतो. "आपलं लग्न केवळ आपल्या वडलांच्या निर्णयावरून झालेय पण आपण मात्र एकमेकांना अनोळखीच आहोत." पहिल्या दिवशीच इतका समजूतदारपणा दाखवणार्‍या नवर्‍याच्या प्रेमात न पडणे कठीण आहे पण तरीही सेहमत स्वतःला सावरते. पण ते सावरणे तात्पुरते ठरते. त्याच्या समजुतदारपणापुढे आणि प्रेमापुढे ती हतबल होते. आत्तापर्यंत मला तीन उमदे माहित होते - पहिला उमदा हा एक व वनस्पती तूपाचा ब्रँड होता, दुसरा गोष्टीतला राजकुमार (राजा किंवा इतर पुरुष कधीच उमदे नसायचे) आणि तिसरा उमदा म्हणजे घोडा. राझीत चौथा आणि खराखुरा उमदा बघायला मिळाला - इक्बाल.

घरात सगळ्यांना तिचे कौतुक असते - फक्त अब्दुल सोडून. त्याला तिच्यावर कायम संशय असतो. हळूहळू ती नविन घरात रुळू लागते आणि कामातही. पण ती काही सराईत हेर नसते, हातून लहान सहान चुका होतच असतात. आणि अशीच एक चूक अब्दुलच्या लक्षात येते. काही पर्यायच उरत नाही तिच्यापुढे. एके काळी गाडीखाली येणार्‍या खारीला वाचवणारी सेहमत आता....

प्रवास पुढे चालूच राहतो - यशाच्या दिशेने. पण त्या वाटेवरचे प्रत्येक पाउल तिला उध्वस्त करत जाते. योद्ध्याला युद्धात विजय मिळाला तर तो काही अंशी तरी उपभोगता येतो. पण इथे सेहमतला विजय मिळूनही ती सर्व काही हरते. सिनेमा संपतो तेंव्हा रेहमत एका अतिशय साध्या (पडक्या म्हणाव्या अशाच) घरात एकटी असते. घरी लाडाकोडात वाढलेली, सासरीही ऐश्वर्य उपभोगलेली ती, आता अर्थ शोधत असते विजय, नाती, आयुष्य यांचा. त्यांच्यापुढे ऐश्वर्याची काय किंमत? त्या सीनमध्ये तिच्या बाजूला एक माठ दाखवला आहे. तिचे आयुष्यही आता त्या माठातल्या पाण्यासारखे आहे - शांत, थंड! पण एके काळी त्या पाण्याने त्सुनामी आणली होती.

आणि या सगळ्याला सुरुवात झालेली असते - तिच्या राझी होण्यापासून!

आलिया - काय लिहू तिच्याबद्दल? आजच्या घडीला तिच्यासारखी हरहुन्नरी अभिनेत्री दुसरी नसावी. सेहमत तीने अगदी सहज उभी केलीये आणि ही सहजता खूप गरजेची होती. हेरगीरीचे बेअरींग थोडे जरी जास्त झाले असते तरी सिनेमाचे गणित साफ कोसळले असते.

विकी कौशल - प्रत्येक चित्रामध्ये बॅकग्राऊंडला खूप महत्व असते. कुठल्याही सिनेमाचेही अगदी तसेच असते. महत्वाची भूमीका खुलून दिसण्याकरता बाकीच्या अभिनेत्यांची साथ खूप महत्वाची असते. इक्बालच्या भूमीकेत अभिनयाला फारसा वाव नव्हता पण त्याने त्याचे काम अगदी चोख केलय.

रजीत कपूर - बाप आणि सच्चा देशभक्त यांच्यातले द्वंद्व खूप सुरेख दाखवलय. व्योमकेश बक्षीनंतर तो पहिल्यांदाच इतका लक्षात राहिला.

मेघना गुलझार - सिनेमात फक्त आणि फक्त सेहमतची कामगीरी दाखवली आहे. आणि शेवटचा एक सीन, जो अनेक वर्षांनी घडतो. पण त्या एका सीनच्या जोरावर मेघना हेरकथेचे रुप पूर्ण पालटून टाकते. आणि मग ती होते सेहमतची कथा, तिच्या विजयाची, तिच्या अपरीमीत दु:खाची! गुलझारचे अनेक चित्रपट पडद्यावर अडीच तासात संपतात पण मनात मात्र वर्षानुवर्ष चालूच असतात. हा सिनेमा अगदी त्याच पठडीतला आहे. मेघना असली तरी शेवटी ती गुलझार पण आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अजून एक वाटलं ते म्हणजे, ती ट्रान्सरिसीव्हर्स साहीत्यवाली पिशवी सेहेमत दुसरीकडे (घरापासून लांब इ.) ठिकाणी सहज नेऊन नंतर डिस्ट्रॉय करू शकली असती की? इतक्या वेळेला ती बाजारात आणि इतर ठिकाणी जाताना दाखवलीय...

तसे घोळ बरेच आहेत. ती घरात नोकर कायम वॉच वर असताना सहज त्या सासर्‍याच्या स्टडीमधे जाउन कागदपत्रे पाहते वगैरे ते जरा "टू इझी" दाखवले आहे. तसेच एका देशाच्या मिलीटरी प्लॅनिंग ची आणि त्यातून युद्धाला कलाटणी मिळेल इतकी महत्त्वाची कागदपत्रे त्यातील एका अधिकार्‍याच्या घरी असतात - इतकी की तो प्लॅनच कळेल - हे ही खूप सिम्प्लिफाइड वाटते. मूळ पुस्तकात कसे आहे पाहायला हवे.

पण पिक्चर तरीही ग्रिपिंग आहे.

बरोबर फा. ती स्पाईंग अतिशय सहजतेने करताना दाखवली आहे. सासर्‍याच्या स्टडीत जाऊन डॉक्युमेंट्स बघणं, घरातून फोन लावणं वगैरे.

घोळ आहेत, नाही असं नाही, पण सगळे प्लॅन स्पेल आउट केलेत असे नाही दाखवलेय. उलट तिला ते गाझी डोल्फिन वगैरे बरेच से कळत नाही पण काहीतरी सबमरीन रिलेटेड आहे ते आणि बाकी तिला जे शब्द कळले ते ती फक्त पास ऑन करते त्यावरून मीर आणि टीम फिगर आउट करायचा प्रयत्न करतात असे दाखवलेय. घरातून फोन पण डायरेक्ट करत नसते. त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे फक्त डाय्ल करून फोन डिस्कनेक्ट केल्यावर तिला तो माणूस सिक्युअर लाइन वरून कॉल बॅक करत असतो.

>>राज, राझी मधे सुद्धा प्रेमकहाणी सुरेख गुंफली आहे.<<
शायनिंग थ्रु मध्ये मेलनी ग्रिफिथ, माय्कल डग्लसच्या प्रेमाखातर ती असायन्मेंट घेते; राझी मध्ये त्या प्रकारची प्रेमकहाणी नाहि, हे म्हणायचं आहे मला... Happy

आर्मी वर मोठ्या पोस्ट वर असलेल्या घरी इतकी कमी सिक्युरिटी हे देखील पटत नाही, ती खुशाल घराबाहेर धावत जाते ते बघायला एक वोचमन देखील नसावा हे अगदीच न पटण्या सारखे

ही कथा भूतकाळातील आहत, ५० वर्षे जुनी. भारत- पाक सीमाही किती खुल्या आहेत बघा! इतक्या सिक्युरिटीची तेव्हा गरज भासत असेल का? सगळ्यांची जबानी घेताना काही ना काही कारणं दिली ना सगळ्यांनी.
अनेक गोष्टी स्पेल आउट केलेल्या नाहीत हा समज करुन घ्यायला आवडलं मला. Happy

१९७१ किंवा कधीही पाकीस्तानात "क्रश इन्डिया" किंवा काउन्टरपार्ट म्हणून भारतात तशा प्रकारच्या घोषणा असायच्या का?

म्हणजे आपण क्रिकेट मॅच मध्ये तशा भावना बाळगून असायचो किंवा मग काश्मीर मिलीटन्सी मुळे (लेट एटीज् पासून - हे फक्त माझ्या बाबतीत) काही काळ तशा भावना बाळगून होतो. पण अशा विखारी भावना जेन्युईनली कोणाच्या मनात होत्या/ असत असतील का? की ते सर्व लोक मिलीटरी वाले दाखवले आहेत तेव्हा त्या लोकांत अशा भावना प्रेव्हॅलन्ट असतील ?

अमित, तुझा सिक्युरिटी बाबत सॉफिस्टिकेशन चा मुद्दा ग्राह्य धरला तर दुसर्‍या एका सीन मध्ये किती पटकन इन्टेलिजन्स चे लोक त्या बाकीच्या सपोर्ट सिस्टीम मधल्या लोकांनां अ‍ॅरेस्ट करताना दाखवले आहेत.

>>> किती पटकन इन्टेलिजन्स चे लोक त्या बाकीच्या सपोर्ट सिस्टीम मधल्या लोकांनां अ‍ॅरेस्ट करताना दाखवले आहेत. >> किती पटकन कुठे? सेहेमतची हेरगिरी कित्येक दिवस चालू असते... त्याचा सुगावा लागायला त्यांना वेळ लागतो. तो कसा लागला हे महत्त्वाचं नाहीच आहे. आणि एकदा लागला की साखळीतल्या लोकांना उचलतीलच ना लगेच!

>> नाही तो तिला जाऊ देणार नसतोच पण ती कर्नल सिद्दिकी च्या मुलाचे कवर वापरून पळते तिथून. इक्बाल म्हणतो पण तेव्हा, "वो छोटा बच्चा है"
मै, एकंदर त्या दुसर्‍या ऑफीसर च्या घरी ती जाते (मुनीरा बद्दल रिक्वेस्ट करायला आणि त्या निमीत्ताने गाडी व ड्रायव्हर ची सोय करायला) तेव्हा घरी परतच का येते, ते ही त्या पोराला घेऊन? केवळ इक्बाल बरोबरचा सीन दाखवायचा म्हणून ते जुळवून आणल्यासारखं वाटतं. जरी त्या दुसर्‍या ऑफीसरच्या बायकोच्या एका फोन मुळे इन्टेलिजन्स एजन्सी वाल्यांचं मॉनिटरींग बंद होणार असतं तरी इतक्या पटकन (दोन तासात तिला मॉल मध्ये पोचायचं असतं) ते लोक निघून जातात हे ही खरंतर पटण्यासारखं नाही.

पण वर अनेकांनीं म्हंटल्याप्रमाणे खुसपटं काढायची तर नक्कीच निघतील. मात्र त्याने अजिभात रसभंग होत नाही. सुरेख जमून आला आहे पिक्चर.

मै, एकंदर त्या दुसर्‍या ऑफीसर च्या घरी ती जाते (मुनीरा बद्दल रिक्वेस्ट करायला आणि त्या निमीत्ताने गाडी व ड्रायव्हर ची सोय करायला) तेव्हा घरी परतच का येते, ते ही त्या पोराला घेऊन? केवळ इक्बाल बरोबरचा सीन दाखवायचा म्हणून ते जुळवून आणल्यासारखं वाटतं. >> घरी येऊन नवर्‍याच्या पाकिटात पैंजणाचा घुंगरू पाहीपर्यंत आपला पर्दाफाश झाला आहे असं तिला वाटत नसतं

जरी त्या दुसर्‍या ऑफीसरच्या बायकोच्या एका फोन मुळे इन्टेलिजन्स एजन्सी वाल्यांचं मॉनिटरींग बंद होणार असतं तरी इतक्या पटकन (दोन तासात तिला मॉल मध्ये पोचायचं असतं) ते लोक निघून जातात हे ही खरंतर पटण्यासारखं नाही. >> माझ्या मते तिथे ती फक्त मीर ला भेटायला जाणार असते . देशातून निघून जाण्याचा तिचा ईरादा असतो का? तसे मला वाटले नाही. कारण मांजर मेल्यानंतर अब्दुलचं ईन्वेस्टिगेशन रेटणारं कोणी नसतं.

हो. ती परत कशाला आली वरुन माझी ही चिडचिड झालेली Biggrin
देशातून निघून जाण्याचा तिचा ईरादा असतो का? >> हो मीर स्पष्ट सांगतो ना 'उसको निकालने के लिये दुसरी टीम इकठ्ठा करो' म्हणून ?

हायजेनबर्ग, तिला ट्रेन केलेलं असतं ना की तुला संशय आला की पर्दाफाश होणार आहे तर तो ऑलरेडी झालेला आहे असं समज. मीर थेट त्यांच्या घरी येतो ते तिला तिथून काढायलाच की.

आणि बिल्ली मरेपर्यंत एजन्सी ने घरी सर्व्हेलन्स सुरू केलेला असतो. मुनीरा ला घेऊन जातात क्वेश्चनींग ला. नेक्स्ट तिचा नंबर. म्हणून पळण्याची तयारी.

आधी मीर येतो की आधी ती बेगच्या बायकोकडे जाते? तर मीर आधी येतो. तो तिला देशातून बाहेर काढायला आला असता तर तिला बेगच्या बायकोकडे मुनीराला आणि पर्यायाने आपल्याला चौकशीतून वाचवण्यासाठी शब्द टाकायला जाण्याची गरजच का पडावी? तेही अब्दूलचे कारण पुढे करून जे अजून कुणालाच माहित नाहीये. त्यामुळे बेगच्या घरी जाण्यापर्यंत आणि मुलाला घेऊन घरी येण्यापर्यंत तिचा पळून जाण्याचा काही प्लॅन नसतो असे मला वाटते. आणि आता एन्क्वायरी होणार नाहीये हेही तिला बेगच्या घरी कळते मग तर ती निवांतच होणार. तसेही तिचे नाव तिच्या सासर्‍यांकडच्या फाईलमध्ये (ज्यात ईतर हेरांची माहिती असते) कुठेही नसते त्यामुळे तिचा पर्दाफाश झालेला नसतो.
मध्येच ते लोक येऊन अब्दूल ची रूम चेक करतात आणि त्यासाठी ईक्बाल घाई घाईत घरी येतो. तिथे त्याला घुंगरू सापडते आणि ईक्बालने घुंगरू बघितल्यावर सगळे बदलते.

ती त्या तिच्या सपोर्ट नेटवर्क मधल्या कोणाला तरी फोनवरून सांगते ना छाता, बिल्ली, बारीश, छत टपकना वगैरे कोडवर्ड्स वापरून.
बिल्ली = मेहेबूब; तोच अब्दुल च्या अन एक्स्प्लेन्ड मरण्याचा छडा लावत असतो आणि तिलाही सांगतो की अब्दुल तुझंही नाव घेत होता असं मला वाटलं.

(सगळे स्पॉयलर्स आणले का आपण इकडे Biggrin )

>> तो तिला देशातून बाहेर काढायला आला असता तर तिला बेगच्या बायकोकडे मुनीराला आणि पर्यायाने आपल्याला चौकशीतून वाचवण्यासाठी शब्द टाकायला जाण्याची गरजच का पडावी? तेही अब्दूलचे कारण पुढे करून जे अजून कुणालाच माहित नाहीये. त्यामुळे बेगच्या घरी जाण्यापर्यंत आणि मुलाला घेऊन घरी येण्यापर्यंत तिचा पळून जाण्याचा काही प्लॅन नसतो असे मला वाटते.

मीर येतो घरी आणि तिला सांगतो की नवाझे के लिये खिलोना लेना है , क्राऊन प्लाझा में मिलेगा? तीने हो म्हंटल्यावर दोन तासांत मी तिकडे जाईन अशी हिन्ट देतो. घराबाहेर एजन्सी चे लोक असतात सतत सर्व्हेलन्स करता. त्या आधीच्या रात्री ती बाथरूम चा दिवा चालू ठेवते सिग्नल द्यायला. मीर आल्यानंतर आता सटकायचं हे नक्की ठरतं म्हणून मुनीरा चं निमीत्त करून गाडी/ड्रायव्हर इत्यादी सोय करते ती.

तोपर्यंत, अब्दुल ला मिळालेला तो मोर्स कोड चा तुकडा, इतर लोकांचे पकडले जाणे आणि त्यावरून सासरे बुवांनीं केलेला आक्रोश, दीराचा खून करायला लागणे, तीने इन्स्टॉल केलेलं इक्विपमेन्ट डिस्मॅन्टल करून अब्दुल च्या खोलीत लपवणे आणि एजन्सी चे लोक येऊन तपास चालू करणे इत्यादी घटना घडलेल्या असतात. ऑफ कोर्स तिला तिथून काढता पाय घ्यायचा असतो जो सर्व्हेलन्स मुळे कठीण होऊन बसतो म्हणून त्या बेग (बेगच का?) च्या बायकोकडे जायचं निमीत्त दोन तासांनीं क्राऊन प्लाझा त पोचण्यासाठी.

>> मध्येच ते लोक येऊन अब्दूल ची रूम चेक करतात आणि त्यासाठी ईक्बाल घाई घाईत घरी येतो. तिथे त्याला घुंगरू सापडते आणि ईक्बालने घुंगरू बघितल्यावर सगळे बदलते.
तोपर्यंत अब्दुल ला पूर्ण माहित झालेले असते आणि मेहेबूब ला शंका येण्याची शक्यता निर्माण झालेली असते. मेहेबूब ला जरी मारलं तरी बाकीची लूज एण्ड्ज् असतातच.

त्या आधीच्या रात्री ती बाथरूम चा दिवा चालू ठेवते सिग्नल द्यायला. >>> ती मुद्दाम नाही करत ते.
तिला तो दिवा चालू ठेव म्हणाजे आम्हाला इशारा मिळेल असे सांगितलेलेल असते पण बिल्लीला मारल्याच्या दु: खात ती चुकून तो बाथरूम चा दिवा चालू ठेवते. सकाळी उठल्यावर तिच्या लक्षात येते तेव्हा ती ओह नो असे काहीतरी म्हणुन पटकन दिवा बंद पण करते.

अगं तू टाईमलाईनची सगळी सरमिसळ केलीस ... मी अब्दूल, महबूब चे काम तमाम झाल्यावर शेवटच्या दिवसाचा हिशोब सांगतो आहे.

मुनीरा माहेरी जाण्यासाठी सासर्‍या बरोबर निघून जाते -> ईक्बाल आता कुणाला बाहेर जाता येणार नाही वगैरे सांगतो -> मग मीर येतो, तो तिला मार्केट मध्ये ये भेटायला म्हणून सांगतो. -> ती गाडी मागवून बेग की सिद्दिकी जी कोणी सुपिरिअर ची बायको असते तिच्या घरी जाते आणि अब्दूल फितुर होता म्हणून आता बेवा मुनीराची चौकशी होणार ती तुम्ही टाळा वगैरे ईमोशनल गेम खेळते -> ईकडे ईक्बाल पुन्हा घरी येतो आणि अब्दूलच्या रूमची तपासणी होते जिथे ट्रान्स्मीटर वायर वगैरे सापडते. -> आणि ईक्बाल ला घुंगरू सापडतो.

त्या आधीच्या रात्री ती बाथरूम चा दिवा चालू ठेवते सिग्नल द्यायला. >>> ती मुद्दाम नाही करत ते. >> ईक्बाल रात्री ऊशीरा येऊन दिवा चालू ठेऊन झोपून जातो असे मला वाटते आणि म्हणूनच मीर घरी येतो जे तिला आजिबात एक्स्पेक्टेड नसते.
मीरची असली तरी तिची स्वतःची पळून जाण्याची योजना नसते असे मला वाटते. ती ईक्बालला ला सोडून जाणे कसे शक्य होते (हिरॉईन आहे ती सिनेमाची, अशी पळून जाणारी हिरॉईन कोणाला तरी आवडेल का? Proud ) तिला तिथेच रहायचे होते म्हणून ती 'चौकशी' टाळ्ण्यासाठी प्रयत्न करते... घुंगरू सापडल्याने तिचा सगळा खेळ विस्कटतो.

>> सकाळी उठल्यावर तिच्या लक्षात येते तेव्हा ती ओह नो असे काहीतरी म्हणुन पटकन दिवा बंद पण करते.
मे बी. पण मीर घरी येतो आणि क्लियर हिन्ट देऊन जातो क्राऊन प्लाझा बद्दल.
ती घरी आलीच नसती तर कदाचित तिला मॉल मध्ये स्पॉट करणंही कठीण होऊ शकलं असतं की. कारण तो लहान मुलगा आणि ती गाडी यामुळे ते सोपं होतं.

असो, आता मी थांबते Lol
(किंवा तिसर्‍यांदा बघते आणि मग येऊन लिहीते Wink )

>> मुनीरा माहेरी जाण्यासाठी सासर्‍या बरोबर निघून जाते -> ईक्बाल आता कुणाला बाहेर जाता येणार नाही वगैरे सांगतो -> मग मीर येतो, तो तिला मार्केट मध्ये ये भेटायला म्हणून सांगतो. -> ती गाडी मागवून बेग की सिद्दिकी जी कोणी सुपिरिअर ची बायको असते तिच्या घरी जाते आणि अब्दूल फितुर होता म्हणून आता बेवा मुनीराची चौकशी होणार ती तुम्ही टाळा वगैरे ईमोशनल गेम खेळते -> ईकडे ईक्बाल पुन्हा घरी येतो आणि अब्दूलच्या रूमची तपासणी होते जिथे ट्रान्स्मीटर वायर वगैरे सापडते. -> आणि ईक्बाल ला घुंगरू सापडतो.
बरोबर. ह्यात माझा कुठेही गोंधळ झालेला नाही.
मी फक्त एव्हढंच म्हणतेय की तिला जाणीव झालेली असते की तिचा लवकरच पर्दाफाश होऊ शकतो आणि तिच्या ट्रेनींग प्रमाणे पर्दाफाश होण्याचा संशय येणे = पर्दाफाश ऑलरेडी झालेला आहे हे समजून चुकणे आणि मग मीर येऊन थेट क्लू देतो.

>> हिरॉईन आहे ती सिनेमाची, अशी पळून जाणारी हिरॉईन कोणाला तरी आवडेल का? Proud
Lol

हा हायजेनबर्ग आता स्वतःच्या हिरॉईन कडून असलेल्या अपेक्षा घुसडतो आहे मध्येच.

>> तिला तिथेच रहायचे होते म्हणून ती 'चौकशी' टाळ्ण्यासाठी प्रयत्न करते... घुंगरू सापडल्याने तिचा सगळा खेळ विस्कटतो.
गाडी/ड्रायव्हर चौकशी टाळण्यासाठी पेक्षा मीर च्या सूचनेप्रमाणे क्राऊन प्लाझा ला पोचण्यासाठीचा प्रयत्न असतो. नाहीतर आधी त्या लहान मुलाला आणतेच का ती बरोबर?

किंवा तिसर्‍यांदा बघते आणि मग येऊन लिहीते Wink ) >> माझंही काही तरी चुकत असेल.. त्यांनी घातलाच आहे जरा टाईमलाईनचा घोळ.
तू पुन्हा बघ आणि नव्याने टाईमलाईन लिही.

स्पॉइलर

हायझेनबर्ग +1
मलाही तसंच वाटलं. मीर तिला घेऊन जायच्या तयारीने आलेला असतो. पण आता कायमचं परत जायचं आहे हे तिला माहीत नसतं. ती त्याला फक्त भेटायला त्या प्लाझाला जाते.
रात्री बाथरूमचा लाईट चुकून सुरू राहिला असं वाटतं. कारण ती घाईघाईने जाऊन बंद करते. ( आणि खूप मोठा उछवास सोडते. ☺️)
शेवटी ती मीरला म्हणते की मला इथून घेऊन चला.
जर अब्दुलच्या रूममध्ये ईकबालला संशय आला नसता तर कदाचित मीरला भेटल्यानंतरच तिला कळलं असतं की कायमचं परत जायचं आहे.

Pages