Submitted by सत्यजित... on 29 March, 2018 - 21:24
सांधते मिसऱ्यास मिसरा,ही गझल जंजीर नाही
राबत्याचा प्रश्न अपुल्या, तेवढा गंभीर नाही!
काळजाला भेदणारा एकसुद्धा तीर नाही??
ही तुझी नाही नजर की ही तुझी तसवीर नाही!
या तुझ्या बागेत माळ्या,फेरफटका मारल्यावर
पाहिली झाडे नि कळले,ही तुझी जागीर नाही!
एवढ्यासाठीच जमते चांगले त्याचे नि माझे
मी कुणी नाही पुजारी अन् कुणी तो पीर नाही!
लेखणी त्याची असो वा,लेखणी माझी असेना
मी कुणी गालीब नाही,अन् कुणी तो मीर नाही!
बांधले नाही कधी मी,एकही घरटे स्वतःचे
कोणत्याही ईश्वराने बांधले मंदीर नाही!
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
वाह!
वाह!
अरे व्वा ! कसली गझल आहे..
अरे व्वा ! कसली गझल आहे..
सुंदर रचना.
एवढ्यासाठीच जमते चांगले
एवढ्यासाठीच जमते चांगले त्याचे नि माझे
मी कुणी नाही पुजारी अन् कुणी तो पीर नाही!
सुंदरच ...
छान मस्त जमलीये
छान मस्त जमलीये
वाह! सुंदर
वाह! सुंदर
क्या बात है !!
क्या बात है !!
छान मस्त जमलीये....
छान मस्त जमलीये....
पण..
बांधले नाही कधी मी,एकही घरटे स्वतःचे
कोणत्याही ईश्वराने बांधले मंदीर नाही!
समजवा
वाह अप्रतिमच
वाह अप्रतिमच