जुने furniture चे काय करावे

Submitted by कनू on 16 October, 2017 - 00:33

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मला थोडी माहिती हवी आहे..
मला खालील वस्तूंची विल्हेवाट कशी लावावी त्याविषयी कोणी please सांगू शकेल का. मी कोथरूड मध्ये राहते..
१. वेताचा २ सीटर झोका
२. ३ सीटर पावडर coated सोफा

कोणता चॅरिटी सेन्टर आहे का जे हे नेऊ शकतात or मी नेऊन देऊ शकते.. please लवकर सुचवा .
धन्यवाद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. दारावर येणाऱ्या भंगार वल्यास विकले तर ४ पैसे मिळतील

२. स्वतःच्या/ आजूबाजूच्या कामवाल्या लोकांना विचारा

३. झोका सोसायटीच्या पार्किंग मध्ये टांगा. सोफा वॉचमनला द्या.

भंगारवाला वूडन घेत नाही म्हणाला.
कामवाली कडे सोफा or झोका लावायला जागा नाही .
झोका पार्किंग मध्ये लावायला allowed नाही

ओएलएक्सवर विकून टाका.
आम्ही घर बदलताना घरातले जुने ५-६ मोठे फर्निचर आइटम्स तिथे विकले. अगदी उत्तम अनुभव.

olx चा मलाही काही वेळा चांगला अनुभव आहे..
पण सोफ्याची ad बरेचदा टाकली.. जो अतिशय सुस्थितीत आहे.. price पण कमी लावली होती.. तरीही गेला नाही..
झोक्याची ad आज टाकते..
घरात ठिवायला जास्त जागा नाहीये

मी वेताचा झोका आईच्या बेडरूममध्ये नेऊन ठेवला. एक कामवाल्या ताईना दिला त्यांनी तो गावाला नेला. आधीचे बरेच फर्निचर कामवाल्या ताईना दिलं, त्यांनी ते थोडं इथे आणि थोडं त्यांच्या गावी नेलं. गाव जवळ आहे त्याचं नेरळ जवळ म्हणून शक्य झालं.

कनु, सुस्थितीत असेल तर परिचितांमध्ये एकांना हव्या आहेत या दोन्ही वस्तू. OLX वर जाहिरात टाकली असेल तर इथे जाहिरातीची लिंक द्याल का? किंवा मग संपर्क कसा करावा ते कळवा. मी परीचितांना तसं कळवेन.

कनु,
OLX वर जशी जाहिरात दिली तशी मायबोलीच्या जाहिरात विभागातही देऊ शकता किंवा तिथे OLX च्या जाहिरातीचीही लिंक देऊ शकता.