Submitted by अदिति on 26 June, 2017 - 00:02
स्ट्डी अब्रॉड निमीत्याने यॉर्क व लंडन येथे जुलै/ऑगस्ट दिड महिन्याच्या वास्तव्यासाठी काही सल्ले/माहीती/टिप्स हव्या होत्या.
कॉलेजने बर्याच गोष्टी (राहाण्याची, ब्रेकफास्ट्ची, लन्च ची व्यवस्था) अरेंज केल्या आहेत. पण लोकल फिरण, डिनर, विकएन्ड चे प्रोग्राम्स, ई स्वत:च करायचे आहेत. सेल फोन प्लान्स, करन्सी कन्व्हर्जन ई बद्दल टिप्स मिळाल्यात तर बर पडेल प्रवास SFO/US to Heathrow airport to York असा आहे.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धागा वरती काढते. प्लिज मदत
धागा वरती काढते. प्लिज मदत करा....
अदिती,
अदिती,
मैत्रिण.कॉम वर ५-६ जणी तरी U.K त रहाणार्या आहेत. सभासत्व असेल तर तिकडे प्रश्न विचार.
माझ सभासत्व नाहीये तिकडे
माझ सभासत्व नाहीये तिकडे
सध्या करन्सी कन्व्हरजन बद्दल
सध्या करन्सी कन्व्हरजन बद्दल तरी कोणी तरी काही तरी टिप्स द्या ना प्लिज..
अदिती, मुलगी अमेरिकन
अदिती, मुलगी अमेरिकन युनिवर्सिटीत शिकत आहे ना? तसे असेल तर युनिवर्सिटीचे स्टडी अॅब्रॉडचे ऑफिस असते तिथे तुमच्या मुलीने चौकशी केल्यास सविस्तर माहिती मिळेल. तसेच त्या युनिवर्सिटीतून समर सेमिस्टर युकेत घालवणार्या विद्यार्थ्यांचे नेटवर्क असेल ना. तिथे सिनियर मंडळींना विचारल्यास व्यवस्थित अनुभवावर आधारित माहिती मिळेल.
करन्सी इथेच वेल्स फार्गो
करन्सी इथेच वेल्स फार्गो किंवा इतर बँकांमधून निदान पहिले ८-१० दिवस कमी पडणार नाही इतपत घेउन जा. बँकांच्या सगळ्या ब्रँचेस मधे फॉरीन करन्सी नसते, जेथे असते तेथेही पाहिजे तेवढी उपलब्ध असेल असे नाही. ४-५ दिवसांचा लीड टाइम असतो. त्यामुळे आधी फोन करून विचारून घ्या. पौण्ड्स मिळायला फार प्रॉब्लेम येणार नाही.
मग तिथल्या वास्तव्यात तेथील एटीएम मधून पैसे काढणे हेच बहुधा सर्वात सोपे आहे. फक्त ते ठराविक एटीम्स मधे तो सर्विस चार्ज पडणार नाही अशी काही सोय तुमच्या बँकेची आहे का ते चेक करा. वेल्स फार्गो ची आहे. ते लोगो असतात सिरस वगैरे टाइप - एटीएम कार्ड वर, त्या त्या एटीएम मधे चार्ज पडत नाही असे काहीतरी असते. बेस्ट उपाय म्हणजे फॉरीन करन्सी देतात त्या ब्रँच मधे जाउन काय काय पर्याय आहेत विचारून घ्या.
दुसरे म्हणजे करन्सी हे बॅकअप ला, पण शक्य तेथे अमेरिकन क्रेडिट कार्ड - हा पर्याय नाहीये का? व्हिसा ची अनेक कार्ड्स फॉरीन ट्रॅन्झॅक्शन्स वर चार्ज लावत नाही. कार्डच्या साइट वर माहिती मिळेल.
सिम कार्ड कुठल्याही स्टोर
सिम कार्ड कुठल्याही स्टोर मध्ये 1 पौंडला मिळेल, रिचार्ज पण करता येईल. Lyca , Libara चे इंटरनॅशनल प्लॅन चांगले आहेत.
लंडनमध्ये फिरायला oyster स्वस्त पडेल. मोठया स्टेशनवर लगेच मिळते. 5 पौंडला. काम झाले की oyster परत करायचे. ते 5 पौंड परत मिळतील. बहुतेक ऑनलाईनच परत करता येते. किंवा स्टेशनवर रोजचा पूर्ण दिवसाचा पास काढायचा. 12 पौंडला मिळेल. बस , ट्यूब सगळीकडे चालेल. ट्यूबचा मॅप ऑनलाईन मिळतो. https://tfl.gov.uk/plan-a-journey/ इथे बघा.
लंडन सिटी टूर बसेस (hop on- hop off) पण असतात.
बहुतेक सगळ्या टुरिस्ट प्लेस 6 ला बंद होतात. वीकेंडला गर्दी असते. त्यामुळे नीट प्लॅन करायला सांगा. काही टुरिस्ट प्लेसची तिकिटे ऑनलाईन जास्त स्वस्त पडतात किंवा पॅकेज मध्ये मिळतात.
Ex. https://www.madametussauds.com/london/en/tickets/
सेंट्रल लंडनमध्ये करन्सी कन्व्हर्ट करणारी बरीच दुकाने आहेत. रेट कंपेअर करुन पौंड घेता येतील. पण किती usd जवळ बाळगणार आणि किती वेळा कन्व्हर्ट करणार हे ठरावा. लंडनला इतर मोठ्या शहरांप्रमाणे चोरी/ हातचलाखी होते. त्यापेक्षा येताना एखादे कार्ड घेऊन येता येईल का ते बघा.
जेवायचा प्रॉब्लेम होणार नाही. तिथे सगळं काही मिळतं.
यॉर्कबद्दल मला माहिती नाही.
यू के मध्ये जुलै/ऑगस्ट बेस्ट काळ आहे. फक्त पाऊस कधीही पडू शकतो, त्यामुळे हूडवाले जॅकेट आणि छत्री बरोबर ठेवा. खूप वारा वाहतो तेव्हा छत्रीचा उपयोग होत नाही, म्हणून जॅकेटला हूड पाहिजे.
अजून काही शंका असतील तर विचारा.
नमस्कार अदिति, मी यूकेत बाथ
नमस्कार अदिति, मी यूकेत बाथ गावात राहते.
पुष्कळशी माहिती इथे मिळालेलीच आहे तुम्हाला. वाटल्यास मला mrudula.gore @ gmail . com इथे इमेल करा.
हीथ्रो ते यॉर्क प्रवासाची काय व्यवस्था केली आहे? बस किंवा ट्रेनचे आगाऊ तिकीट काढले तर बरे. नॅशनल एक्स्प्रेस (बस) व नॅशनल रेल (ट्रेन). (दुवे का बरे देता येत नाहीत नव्या मायबोलीत?!)
सगळ्यांना थॅन्क्स. चांगली
सगळ्यांना थॅन्क्स. चांगली माहिती मिळाली.
हीथ्रो ते यॉर्क << बस च तिकीट ऑनलाईन काढलेल. $४० लागलेत.
करंसी >> वेल्स मधुन $१०० कन्वर्ट केलेले. बाकी $ मधेच ठेवले. बॅन्केचे डेबीट कार्ड पण ईटर्नॅशनल करुन घेतल आहे. ते पण वेल्स फार्गोचच. पण त्यात प्र त्येक ट्रान्सॅक्शन ला चार्ज आहे त्यामुळे ईमर्जन्सी साठीच.
इन्टर्नेट अॅक्सेस >> कॉलेजच्या अकाउंट मधुन विकत घेतलाय. जाण्याआधी वॉट्स अॅप डाउन लोड करुन घेतलेल. वॉअॅ आणि आय मॅसेज ने रेगुलर कम्युनिकेशन करता येतेय. UK नंबरच सिम पण घेतल आहे.