माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद डॅफोडिल्स, दिनेशदा.
मी प्रखर आचेवर तळल्या होत्या, काम लवकर उरकण्यासाठि. Sad आता मावेत किती वेळ ठेऊ? खायला घेताना प्रत्येक वेळि मावेत ठेवाव्या लागणार का ? ( अगदिच अडाणी आहे मी :अरेरे:)

हा तांदूळ शिजायला बराच वेळ लागतो. थोडा वेळ भिजवून मग शिजवून बघता येईल. नाहीतर तो इडली डोश्यासाठी वापरता येईल.

आता मावेत किती वेळ ठेऊ? खायला घेताना प्रत्येक वेळि मावेत ठेवाव्या लागणार का ? ( अगदिच अडाणी आहे मी )>>>
वाईट वाटून घेउ नकोस Happy
शंकरपाळे आणि चकल्या दोन्ही गोष्टी प्रखर आचेवर तळल्या की वरून तळल्या जातात पण आतून कच्च्या राहिल्याने थोड्या वेळाने मउ पडतात.
सगळ्या एकदम मावे मध्य ठेवण्यापेक्षा थोड्या ट्राय करून बघ. तुझ्या मावे ची हाय्पॉवर किती आहे ?आणि चकल्या कितपत मउ आहेत हे तुलाच जास्त चांगले माहित आहे. त्यानुसार वेळ अ‍ॅडजस्ट कर. Happy
नेक्स्ट टाईम साठी ऑल दि बेस्ट Wink

मी पनीर करण्यासाठी गरम दुधात विनेगर घलुन ते अजुन थोडं गरम केलं. पाणी आणि दुधाचा पांढरा भाग वेगळा दिसल्यावर थंड केलं आणि मग कापडात बांधून ठेवलं. पण पनीर गोळा जमलंच नाही. २० तासानंतरही ते असं सेमी सॉलीड स्वरुपातच आहे. फ्रीज मध्ये ठेवून गोळा जमुन येइल असं वाटलं म्हणून तेही करून पाहिलं. पण उपयोग झाला नाही. काय चुकलं असेल ह्यात? मी नेहमी पनीर असंच करते घरी.

ते परत फडक्यात बांधून त्यावर साधारण तीन किलोचे वजन ठेवा, ते एखाद्या कलत्या ट्रेमधे ठेवा. पाणी निघून जाईल.
फडके जर घट्ट विणीचे असेल किंवा त्यातली छिद्रे बूजली असतील, तरी पाणी निघून जाणार नाही.

परवा भिजवून, कुकरला शिजवुन त्याचे फलाफल केले. तळताना एक घाणा व्यवस्थित निघाला. पुढच्या घाण्याला फलाफल तेलातच फुट्ले आनि तेल नंतरचे २- ३ तास गढूळ दिसत होते. कशामुळे झाले असेल?
फलाफलाच्या मिश्रणात छोले भरडून वर मिरची-लसूण, कोथिंबीर आणि २ चमचे तांदळाचे पीठ होते. तेल नीट तापलेले होते.

सुरुवातीला तेल नीट तापवून घेतले तरी एक घाणा झाला की त्याचे टेम्परेचर कमी झालेले असते. दुसरा टाकण्यापूर्वी पुन्हा ते नीट तापले का बघावे लागते. असे झाले असेल का?

लालु, धन्यवाद. बहुतेक असेच झाले असेल पण मला हे नाही कळले, त्यावर गढुळपणा कशाने आला? सोडा तर नव्हता. तांदळाचे पीठच असेल का? छोले साठवताना त्याला सोडा किंवा कसल्या पावडरी लावत नाहीत ना?

फलाफल तेलात फुटल्यामुळे त्यातला कोणतातरी घटक पदार्थ तेलात मिसळला म्हणून गढूळ झाले. तेल दाट असल्यामुळे ते खाली बसायला वेळ लागतो त्यामुळे पुढे बराच वेळ गढूळ दिसत असेल. नंतर कढईत खाली गाळ साचला असेल.

मी पण परवा पनीरचे तुकडे तांदळाच्या पिठीत घोळवून तळले तर सर्व पिठी खाली. तेल वाया. पनीर लॉस्ट ऑल इट्स ब्युटी. स्टुपीड प्रयोग झाला. पनीर मैद्यातच घोळवायला हवे होते.
काल मक्याचे दाणे मिक्सर मधून वाटून त्यात रवा मैदा दही घालून धिरडी केली. वर झाकण ठेवले तर ते धिरडे न होता गिच्च गोळा झाला. मग सुधारणा करून झाकण न ठेवता केले. चौथ्या ट्रायला नीट झाले. यम्मी लागत होते पण. बरोबर व्हाइट बटर हवे.

अश्विनी, पनीर घोळवावे का लागते ? मी तर अगदी अर्धा टिस्पुन तेल टाकून, नॉन स्टीक पॅनमधे शेकतो. मंद गॅसवर मस्त सोनेरी रंग येतो. कालच केले होते. (मग फोटो टाकीन)
धिरडे पण असेच तेल तूप न टाकता नॉन स्टीक पॅनवरच होते. माझे असगळेच पदार्थ असे मंद आचेवर होतात. मधल्या वेळात बरीच कामे चाललेली असतात..

दिनेश अगदी अगदी पण मला ब्रेकफास्ट खायला ९.३० ते ९.४० एवढाच वेळ मिळतो सकाळी मग काय करावे? Happy पनीरास मैदा, मीठ, तिखट आमचूर मध्ये घोळवून तळ­­ल्यास मस्त लागते. एक व्हेजी स्नॅक. मी पूर्वी सर्व करत असे. सध्या ओम चिकनाय नमः Happy

अश्विनी, गॅस अगदी मंद ठेवला ना, तर नाही लक्ष द्यावे लागत. अगदी ९ वाजता ठेवलस, आणि दहा पंधरा मिनिटांनी परतलं तर ९.२५ ला तूझी डिश तयार असेल. मंद गॅस म्हणजे तपमान १५० से. च्या वर जाता कामा नये. या तपमानाला मस्त मायलार्ड प्रक्रिया होऊन, पदार्थाला सोनेरी रंग येतो.

आणि एकदा रात्री टोमेटॉ भाजून कुस्करुन फ्रिजमधे ठेव. त्यात हवा तसा चाट मसाला, हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे टाक. आणि सकाळी त्यात पनीर नुसतेच कुस्करुन टाक. (न तळता ) एक मस्त चटपटीत डिश होते. शिवाय थंड असल्याने, उन्हाळ्यात पण चालेल.

काल मी भाकरी केली होती. पण तिला भेगा पडल्या शिवाय आतुन ओलसर लागत होति. काय चुकले असेल ? मी भाकरी करयला गरम पाणी टाकले पण मला पीठ भीजवायला त्रास झाला. हात भाजत होते. काही सोपी युक्ती आहे का ?

१. पीठ जूनं आहे का २. भाकरी अगदी मोठ्या आचेवर भाजली का? ३ भाकरीला तव्यावर पाणी अगदी कमी लावले का?

रात्री टोमेटॉ भाजून कुस्करुन फ्रिजमधे ठेव. त्यात हवा तसा चाट मसाला, हिरवी मिरची, कोथिंबीर >>

हेच सेम मी कॉटेज चीज घालून करते. छान लागते. मुलाना पण हा चटपटीत प्रकार आवडतो.

मला एक प्रश्न विचारला होता, त्याचे उत्तर.

काळे तीळ पाण्यात घातल्यास पाणी काळे होणे अनैसर्गिक आहे. बहुतेक त्याला रंग लावलेला असणार.
तीळ पॉलिश केलेले नसतील, तर पाणी मातकट होईल. पण काळे नाही.
मी एकदा अख्खे उडीद आणले होते. धुतल्यावर असेच त्याचा रंग गेला आणि मग मूग उरले !!

मी एकदा अख्खे उडीद आणले होते. धुतल्यावर असेच त्याचा रंग गेला आणि मग मूग उरले !!

असे पण होते काय?? मुग चक्क उडीद म्हणुन्खपवले???

दिनेश, धन्यवाद. अहो ते तीळ पाण्यात मी इतर बरेच जिन्नस घालून्(कोथींबीर्,लसूण, धणे) घालून ओले वाटण करत होते. आता हे सर्व फेकावं काय? अरेरे....

पाणी चक्क जांभळत्/काळे झाले... देशी दुकानात काय भेसळ करून वस्तु विकतील ह्याचा नेम नाही समजायचा?

ध्वनी, तो खाद्यरंग नसणारच. फेकलेलेच बरे.
अश्विनी कॉटेज चीज आणि पनीर सेम नाही, पण चालतं.
शर्मिला. टोमॅटो मायक्रोवेव्ह मधे भाजले तर छोटासा स्फोट होईल.
ते गॅसवरच भाजायचे, पण त्याची साल पातळ असल्याने ती लवकर फाटते तेव्हा झरझर फिरवत भाजायचे. त्यासाठी देठाकडुन एक काडी खुपसायची.
अर्धे कापून ग्रील केले तर चांगले.
मावेमधे हवे तसे करपणार नाहीत. कन्व्हेंशनमधे कापून ठेवले तरी चालतील.

मी काल ओटमील कुकीज केल्या, पण त्या थोड्या फसफसल्या. कुकीज झाल्या बरोबर नंतर पण त्याला चिरा पडल्या. माझं काय चुकलं?

एक साधा प्रश्न" कुकीज करताना तुप, साखर वगैरे हातानी फेटायची की हँन्ड ब्लेंडर नी? मी हँन्ड ब्लेंडर नी फेटलं होतं म्हणुन तर अस झालं नाही ना?

रचु , हॅन्ड ब्लेंडर ने तूप साखर फेटले तर काही प्रॉब्लेम होत नाही, कदाचित तूप थोडं जास्तं झाले असावे.

पियापेटी, पुरी नीट तळली जात नाहि बहुतेक. पुरी टम्म फुगून तरंगायला लागली आणि बुडबुड्यांचे प्रमाण कमी झाले म्हणजे त्यातले बहुतेक तेल बाहेर पडले असे समजायचे. मग ती झार्‍यावर घेऊन जरा वेळ तेलाबाहेर काढून खालीवर करायची. (आमच्याकडे दुसर्‍या पुर्‍या तेलात सोडेपर्यंत, तो झारा कढईवरच ठेवतात ) मग एखाद्या स्वच्छ कागदावर काढतात आणि मग ताटात.
पण तरी पुरी थंड झाली कि जरा तेलकटच होते. उत्तर प्रदेशात जरा तेलकटच पुर्‍या आवडीने खाल्ल्या जातात.
पुरीचे पिठ घट्ट भिजवावे लागते. ते सैल झाले तरी पुर्‍या तेलकट होतील.

Pages