मैत्री (भाग ३)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:30

जणू काही बंगल्याच्या आतून कोणीतरी त्यांना सुद्धा पहात आहे.  त्यांनी गेट उघडला.  रोज या जागी साफसफाई होत असावी कारण परीसर स्वच्छ होता.  बंगल्याच्या जवळ गेल्यानंतर मला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली.  तुम्ही कधी अस ऐकल आहे कि एक बंगला बोलतोय मला उघड.  मी ते ऐकल नाही प्रत्यक्षात पाहिलं त्या बंगल्याच्या दरवाज्याला जे कुलूप लावल होत ते आम्ही तिथे येत्या क्षणी फ्लोट झाल होत.  हा प्रकार भयानक होता.  आणि आपण लॉक करताना दरवाज्याची कडी प्रेस करून ठेवतो या उलट ती दरवाज्याची कडी उघडली जाण्यासाठी आतुर झाली होती.  कोणताही आवाज नाही पण दोन्ही गोष्टी फ्लोट करत होत्या.  त्यांनी खिशातून चाव्या काढल्या आणि  लॉक उघडला.  मात्र कडी स्वतःह न उघडली गेली. सगळीच काम जर आपोआप झाली तर आम्ही काय करायचं फक्त मजा बघायची.  दरवाजा आत लोटला आणि, घरातून एका स्त्री चा आवाज आला.  हा आवाज वरच्या खोलीतून येत होता.  शांत पण घाबरवणारा.  मी मामा कडेब घितल.  तो बोल्ला "नको घाबरूस मी आहेना."  ठिक आहे.  मी गेलो आतमध्ये त्यांच्या सोबत.  मामा च्या मित्राने मला सांगितल.  या बंगल्यात संपूर्ण दिवस राहायचं सकाळी ९ ते संध्याकाळी ६ हेच तुझ काम.  करणार?  मी त्यांच्या कडे एक टक बघितल आणि विचार केला.  हे मला काम देतायत कि माझ डेथ सर्टिफिकेट साईन करतायत.  इतक्यात माझ्या मनाला एक आवाज ऐकू आला, न घाबरता रहा इथे आणि मी बोलून गेलो हो.  मी हो बोल्लो कारण, माझ्या मनाला जो आवाज ऐकू आला तो तिचाच होता.  तीच बोल्ली होती नको घाबरूस राहा इथे.  आणि त्याच शब्दांवर वर विश्वास ठेवून मी तिथे राहण्याचा निर्णय घेतला.  मात्र माझा होकार मलाच महागात पडणार किंबहुना, माझ्या जीवावर बेतणार अशी भीती वाटून मामा ने माझ्या कडे पाहत, नाही असे उत्तर दे म्हणून खुणावले.  मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम होतो.  मी त्याला इतकच बोल्लो.  घाबरू नकोस मला काहीनाही होणार.  मात्र त्याला चिंता होतीच.  म्हणून त्याने मला एक vokitoki दिला आणि सांगितल गरज पडलीच तर वापर कर.  घाबरू नकोस मी आहेना.  घराच्या मालकांना बहुधा त्या घराचा वीट आला होता आणि म्हणूनच त्यांना ते घर विकायचे होते.  मात्र असले घर कोण विकत घेणार.  पण हे भूत इथे कसे आले.  म्हणजे एकूण कहाणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो.  मालकांना या गोष्टी चा अंदाज आला होता.  हे हेरूनच त्यांनी मला त्यांना माहिती असलेला किंवा त्यांना कोणीतरी रंगवून सांगितलेला भूतकाळ सांगितला.  हा भूतकाळ खरा नव्हता मात्र त्या क्षणी तो खरा आणि खूपच क्रूर वाटला.  कारण दरवेळचीच कहाणी.  कि त्या जागी तो बंगला बांधण्या पूर्वी काही वाईट इसमांनी एका निर्मळ मनावर अत्याचार करून जीव घेतला.  आणि त्याचाच बदला म्हणून तिची आत्मा आता लोकांना त्रास देते.  कितीही होम हवन, वास्तूशांती केल्या तरी ती जात नाही.  अनेक बुवा, भोंदू बाबा येवून गेले ह्यात जीव अडकलाय, त्यात जीव अडकलाय अस सांगून अक्षरशः लाखो रूपये खर्चून देखील फायदा काहीच नाही.  अखेर घर बंद ठेवावे लागले तेव्हा पण एक हिमालयातील बाबा आला.  त्याने म्हणे मंत्र जप करून त्या आतम्याला या घरात कोंडून ठेवले आहे.  घरात प्रवेश करताना ते जे भलेमोठे कुलूप दिसले होते ती घंटा त्याच मुर्खाने या भोक्याच्या गळ्यात बांधली होती किंमत रूपये ५०
हजार.  हा संपूर्ण इतिहास सांगून झाल्यावर घरमालकांनी घराच्या चाव्या माझ्या हातात दिल्या आणि घरात राहण्याचे काही नियम सांगितले.  हे नियम खरतर त्या घराचे नव्हते हे होते त्या मुर्खाने सांगितलेले.  तोच तो हिमालयातला.  त्या नियमांचा जन्म होण्यास देखील तोच जबादार होता.  कारण त्याने घरमालकांना मुर्ख बनवले होते जे भले मोठे कुलूप त्याने तिथे लावले होते त्याची एक चावी त्याने स्वतः जवळ ठेवून घेतली होती.  अस सांगून कि वर्ष भरानंतर तो हिमालयातून तपश्चर्या करून परत येऊन ते घर त्या भुताच्या तावडीतून सोडवणार.  तो परत आला देखील मात्र मालक मुंबई ला निघून गेले त्याच रात्री. 

http://www.maayboli.com/node/60751

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users