दर शुक्रवारी- मराठी चित्रपट

Submitted by सुजा on 2 July, 2016 - 03:58

नागराजचा सिनेमा रिलीज झाला आणि मायबोलीवरचे सगळे सैराट झालेत. नागराजच्या सिनेमाला एवढी प्रसिद्धी मिळाली /तो अगदी धो धो चालला त्यात नागराजच्या दिग्दर्शनाच जितकं कौशल्य आहे ते आणि तितकंच त्या सिनेमाची जी काही प्रसिद्धी झाली ( झी मराठी ने केलेली) त्याच बरोबर अजय- अतुलने जे काही सैराट संगीत दिलंय /जी काही सैराट गाणी दिलेली आहेत त्याचा पण जबरदस्त वाटा आहे. गाण्याचे बोल पण अजय -अतुल यांचेच आहेत आणि सिनेमॅटोग्राफर रेडडी यांना कसं विसरून चालेल ?

सैराटचा इतका बोलबाला झाल्यावर "यु ट्यूब" वर या चित्रपटासंबंधी ज्या काही क्लिप्स बघितल्या./ चित्रपटाचा जो काही ट्रेलर बघितला त्यावरून लक्षात येतंय की चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी पण तितकीच जब्राट झाली होती . त्याच बरोबर असं ही लक्षात येतंय नागराजच्या सिनेमाच्या वाट्याला जे काही कौतुक आलं त्यातलं १% कौतुक तर सोडाच पण जे काही मराठी सिनेमा दर शुक्रवारी रिलीज होतात त्यांची साधी दखल सुद्धा घेतली गेलेली नाही . मग प्रश्न असा पडतो इतके ते सिनेमे वाईट होते का ? किव्वा वाईट होते का चांगले होते हे समजण्यासाठी ते कधी रिलीज झाले तेही आपल्याला समजलं नाही का ?.

सध्याच्या काळात " चला हवा येऊ द्या " या कार्यक्रमामध्ये जरी मराठी सिनेमांना ( आणि आत्ता हिंदी सुद्धा ) प्रसिद्धी मिळत असली तरी सुद्धा काही काही सिनेमे असेही असतात जे चांगले असूनही व्यवस्थित प्रसिद्धी न झाल्याने कधी येतात ( रिलीज होतात ) आणि कधी जातात ते समजत देखील नाही . मराठी वाचक वर्ग /प्रेक्षक वर्ग या नात्याने आपण प्रत्येक शुक्रवारी रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमासंबंधी या धाग्यावर बोलूयात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुजा, तुमच्याबद्दल मला प्रॉब्लेम असायला तुम्ही खरंच माझ्यासाठी इतक्या महत्वाच्या नाही आहात. प्लीज हे कटू सत्य नक्की लक्षात ठेवा.

'कमी पैशातल्या प्रिंट' हा आजच्या काळात विनोदच आहे. कुणीही जर ही गोष्ट माहितगारासारखी सांगत असेल तर हसूच येईल.
हल्ली कुठे असतात प्रिंटस?
सगळं डिजिटल असतं. बजेट कमी असण्याचा आणि डिसीपीची क्वालिटी कमीजास्त असण्याचा काहीच संबंध नसतो.
तुम्ही बघितलेल्या शो ला काय झालं असेल मला माहिती नाही पण त्याचा बजेटशी काडीचाही संबंध नाही.

आता अधिक माहितीसाठी.
डिजिटल डिस्ट्रिब्युशन खूप मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा करू शकते. ज्यामुळे शोमधे प्रॉब्लेम होतात. ते आम्ही फार घाणपणे सोसलेले आहे. पण त्याचा निर्मात्याकडे कमी बजेट असण्याशी काहीही संबंध नाहीये.
सिंगल प्रोड्यूसर असेल तेव्हा हा हलगर्जीपणा होण्याची शक्यता असते कारण सिंगल प्रोड्यूसरची जाब विचारण्याची क्षमता नसते. प्रोड्यूसरच्या डेटाला प्रोसेसिंगसाठी हात लावण्यापूर्वीच "आम्ही जबाबदार नाही." अश्या आशयाच्या अ‍ॅग्रीमेंटवर सही करावी लागते.
हिंदी किंवा बिग बजेट चित्रपटांना हलगर्जीपणा होत नाही कारण डिजिटल डिस्ट्रीब्युशन वाल्यांना इंडस्ट्रीत रहायचंय. अश्या सिनेमांना हलगर्जीपणा झाला तर त्यांना कायमचे दुकान बंद करावे लागेल.

ताकः तुम्ही बघत होतात त्या सिनेमाच्या त्या शो ला नक्की काय प्रॉब्लेम झाला हे मला माहिती नाही पण सध्या कुठेच प्रिंट चालत नाहीत हे एक सत्य आहे बघा.

वर नीरजानेडिजितटल डिस्ट्रिब्यूशनबद्दल लिहिलं आहेच. यूएफओ, किंवा क्यूब याबद्दल आंतरजालावर माहिती आहे, ती वाचल्यास थेटरात सिनेमा कसा दिसतो, हे कळेल.

बरेचदा थेटरात प्रोजेक्शनची समस्या असते. थेटरवाले याचं खापर 'प्रिंट खराब' यावर फोडतात कारण आता प्रिंट नाहीत, हे कोणाला माहीत असणार?

जेव्हा प्रिंट होत्या, त्या काळातही प्रभातला वाईट दिसणारी प्रिंट बर्लिनला उत्तम दिसल्याचे किस्से माहीत आहेत.

धागा सिनेमाचा आहे त्यामुळे क्षमा मागून एक नाटकाबाबतची शंका..
सविता दामोदर परांजपे मधे कुसुम चा उल्लेख आहे. बहुधा कुसुम लेले.
नंतर आलेलं कुसुम मनोहर लेले या नाटकाची आणि या नाटकाची कथा सारखीच आहे का ? कुणी पाहिले होते का ?

बरेचदा थेटरात प्रोजेक्शनची समस्या असते. थेटरवाले याचं खापर 'प्रिंट खराब' यावर फोडतात कारण आता प्रिंट नाहीत, हे कोणाला माहीत असणार?<< +१

क्यूब फॉर्मॅट आपल्याकडे फार कमी एक्झिबिटर्स वापरतात.
जास्त करून स्क्रॅबल आणि युएफओ हे दोन फॉर्मॅट आहेत. दोन्ही एकाच कंपनीचे. त्यातला युएफओ हा लो रिझोल्युशन आहे. सर्वसाधारणपणे जुन्या, सिंगल स्क्रीन थेट्रांना हा फॉर्मॅट लागतो. अपवाद आहेतच.
जी फिल्म एखाद्या (उदाहरणार्थ) पिव्हिआरला (स्क्रॅबल वर) जितकी सुंदर दिसते, ऐकू येते तितकीच वाईट (उदाहरणार्थ) प्रभातसारख्या (युएफओ वर) थिएटरला दिसते/ ऐकू येते. यामधे निर्मात्याचा काही संबंध नाही. त्या त्या थिएटरची प्रोजेक्शन सिस्टीम हा मुद्दा आहे.

नंतर आलेलं कुसुम मनोहर लेले या नाटकाची आणि या नाटकाची कथा सारखीच आहे का ? कुणी पाहिले होते का ?>>>नाही. पूर्ण वेगळ्या विषयावरची नाटके आहेत.
कुसुम मनोहर लेले...
https://www.youtube.com/watch?v=2AH8SgZ2qSI

सविता दामोदर परांजपे.....
https://www.youtube.com/watch?v=y2HF-B-_FeI

नीधप आणि चिनुक्स धन्यवाद जास्तीची माहिती दिल्याबद्दल . पण एकद्याच्या अज्ञानी किंवा खर तर जे काही आहे ते त्या व्यक्तीला माहित नाही त्याच्या विधानाला इतकं खो खो हसण्यासारखं आणि टाळ्या मागण्यासारखं काय आहे ते मात्र कळू शकलेल नाही . जस तुम्ही आता माझ्या कॉमेंट नंतर समजावून सांगितलंत तेच तुम्ही आधीही समजावून सांगू शकला असतात . त्यात खो खो हसण्यासारखं आणि टाळ्या मागण्यासारखं काहीच नव्हतं प्रोव्हायडेड मी तुमच्या करता महत्वाची नसेल तर. तसा हि माझा कुठलाच गैरसमज नाहीये तुम्ही सांगितलेल्या कटू सत्याबद्ल वगैरे
"तुम्हाला माहिती नाही असं दिसतंय तर तुमच्या माहिती साठी हि हि कारण असू शकतात " असंही तुम्ही म्हणू शकला असतात. असो . खो खो हसण्याने आणि टाळ्या मागण्याने तुम्ही एखाद्याची टर उडवत आहात याची तुम्हाला कल्पना नसेल असं वाटत नाही . परत एकदा माहितीसाठी धन्यवाद

Pages