sheru
एक आटपाट नगर होत . तेथे एक सावकार राहायचा . त्या सावकाराच त्याच्या कुत्र्यावर खूप प्रेम होत. त्याचे नाव होते शेरू . सावकाराची सकाळच मुळी शेरू बरोबर सुरु व्हायची . मग दिवसभर शेरू मालकाच्या अवती भवती रेंगाळत राहायचा. सावकाराचे हे शेरू प्रेम जग जाहीर होते .
एके दिवशी अचानक सावकाराच्या पोटात जोरात दुखू लागले . सावकाराच्या बायकोने , घरातल्या वडील धारयांनी सगळे घरगुती उपाय केले , पण काहीच फरक पडेना. दुपार पर्यंत सावकार पोट धरून इतका वाकला कि त्याला सरळच होता येईना . आता काय करावे ? तो पर्यंत वैदू आले . त्यांनी काही जडी बुट्टी आणून त्याचा काढा करून सावकाराला पाजला . तरी सावकाराच्या पोटात दुखणे चालूच होते.
असे करता करता दोन दिवस झाले , पण सावकार काही बराच होईना . सर्व जन चिंतातूर झाले. तिसऱ्या दिवशी वैदू पहाटे लवकर आला . आल्या आल्याच त्याने सावकाराला समोर बसवले व त्याच्या कानात काहीतरी सांगितले. आणि काय आश्चर्य , ताडकन सावकार जो दुखण्यामुळे वाकडा झाला होता तो पटकन सरळ झाला व काही बोलणार तेव्हाच त्यांच्या लक्षात आले कि पोटात दुखायचे थांबलेले आहे .
सगळे जण अगदी आश्चर्य चकित झाले. सर्वांना आनंद हि झाला सावकार बरा झाला म्हणून . पण सावकाराच्या पत्नीला कळेच ना कि असे काय त्या वैदुने सावकाराच्या कानात सांगितले कि जेणे करून औषध न देताही सावकार बरा कसा झाला. तिने वैद्याला विचारताच वैद्याने सांगितले कि सावकाराच्या पोटातील आतड्यांना केसांचा पीळ बसला होता. काल रात्री हे माझ्या लक्षात आले . जेव्हा मी सावकाराला बरे करण्याच्या बदल्यात त्यांचा लाडका शेरू मागितला तेव्हा तो धक्का सहन न झाल्यामुळे सावकाराला झटका बसला व तेव्हाच पीळ बसलेला केस तुटला .
अश्या तर्हेने शेरू वरच्या अति प्रेमाने सावकाराचे दुखणे पळाले.
शेरू
Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 07:09
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा