Submitted by कविता क्षीरसागर on 27 January, 2016 - 02:27
दुःख ...
तिचे राजवर्खी दुःख
जणू मेण्यात सजले
दुःख माझे पोरकेसे
वाटेवर पडलेले
तिची वेदनाही थोर
सा-या जगास कळते
मनातल्या मनामधे
माझा हुंदका गिळते
दुःख दुःखच असोनी
किती पदर त्यालाही
आज वाटते असूया
मला तिच्या दुःखाचीही
कविता क्षीरसागर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली...!! खास करून ही
आवडली...!!
खास करून ही ओळ...
<<आज वाटते असूया
मला तिच्या दुःखाचीही>>
धन्यवाद भाग्यश्री ...
धन्यवाद भाग्यश्री ...