ऑनलाईन बिनलाईन - ऑनलाईन बिनलाईन

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 October, 2015 - 16:07

..............................
ऑनलाईन बिनलाईन

https://www.youtube.com/watch?v=4J79_Bn3lV4

हा चित्रपट काल वरील लिंकवर ऑनलाईनच पाहिला. चित्रपट यंग जनरेशनलाच डोळ्यासमोर ठेऊन बनवला असल्याने मलाही भावला. फेसबूक व्हॉटसप ट्विटर या सोशलसाईटस, एक सो एक अतरंगी वेबसाईटस, ऑनलाईन गेम्स आणि ऑनलाईन शॉपिंग या सर्वांनी आपल्याला ईतके घेरले आहे की ‘यार आता पहिल्यासारखे मित्रांचे कट्टे भरत नाहीत’ असले दर्दभरे मेसेज सुद्धा आपण ऑनलाईनच एंजॉय करतोय. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती असलेल्या आपल्या सर्वांसाठीच हा चित्रपट अगदी डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा नसला, तरी हलक्याफुलक्या पद्धतीने वर्मावर बोट ठेवणारा नक्कीच आहे.

आजपर्यंत अश्या पद्धतीचे कथानक बहुधा हाताळले गेले नसावे, पण तरी स्टोरी खूप सिंपल आहे.
तर एक असतो सिद .. की सिड, उर्फ सिद्दार्थ!
नाव जसे स्मार्ट आहे, तसेच हा बंदा देखील स्मार्ट दाखवलाय.
अर्थात, टेक्नोसॅव्ही यंग जनरेशनला रिप्रेजेंट करणारी व्यक्तीरेखा उभारताना तसेच स्मार्ट दिसणे गरजेचे होते आणि हि भुमिका आपल्यासाठीच बनवलीय असे वाटावे ईतक्या सहजपणे ती पेललीय सिद्धार्थ चांदेकर याने.
सिद्धार्थ चांदेकरला मी या आधी ‘क्लासमेट’ चित्रपटात पाहिले होते. बरेच द्रुष्यात मला त्याच्यात रणबीर कपूरची झलक दिसली होती. खास करून चेहर्‍यावर सहजपणे येणारे निरागस भाव, डिट्टो रणबीर! यावेळी अगदी पहिल्या द्रुष्यापासून त्यात रणबीर दिसू लागला. रणबीर आपल्या आवडीचा, त्यामुळे हा देखील आवडून गेला. ‘वेक अप सिड’ सारखेच या सिडलाही ‘वेक अप’ म्हणून सांगणारे कथानक प्रामुख्याने फिरते ते तीन कलाकारांभोवती.

किमया!
नाव जितके गोड आहे, तितकेच मुलगीही गोड आहे. चित्रपट पाहताना चार वेळा मलाच हिच्या प्रेमात पडावेसे वाटले. सिड न पडतो तर नवलच.
पण प्रेमात पडल्यानंतर पहिली आणि बरेचदा शेवटची, सर्वात मोठी पायरी असते ती प्रेम व्यक्त करण्याची. पण ऑनलाईन विश्वातच रमलेल्या सिडला ते कोण समजवणार. बस्स थोडासा उशीर होतो आणि किमयाचे दुसर्‍याशी जुळायला सुरुवात होते..

आयड्या!
आयडियाचे अपभ्रंश आयड्या,
नाव जितके भारी तितकेच कॅरेक्टरही भारी. आणि ते तितक्याच अतरंगी पद्धतीने पडद्यावर साकारलेय हेमंत धोमे याने..
टॅब, मोबाईल, लॅपटॉप आणि ईंटरनेटपासून चार हात दूर राहणारा, पण सदैव मित्रांच्या घोळक्यात रमणारा. जगदुनियेची पर्वा न करता आपले आयुष्य स्वच्छंदी पद्धतीने जगणारा. त्याच्या या गुणांमुळे त्याच्यातील गावरान तडक्याला नजरेआड करून किमया त्याच्या प्रेमात पडते याचेही फार नवल वाटू नये.. पण तरीही,

पण तरीही, ईंटरनेटच्या आभासी विश्वाचे व्यसन लागलेल्या सिद्धार्थने त्यातून बाहेर येत आपले प्रेम मिळवावे असे आपल्याला पुर्ण चित्रपटभर वाटत राहते. पण त्याचवेळी आयड्या आणि किमयाचे ब्रेक अप देखील आपल्याला बघवणारे नसते. त्यामुळेच सिद्धार्थने त्यांचे ब्रेक अप व्हावे यासाठी केलेले प्रयत्न पाहताना आपल्याला त्याची चीडही येते. तर सोबत तो हे जे काही करतोय ते आपल्या प्रेमासाठीच असा विचार करत त्याच्या परिस्थितीबद्दल वाईटही वाटते.

एकंदरीत, हा चित्रपट हसवतो, फार काही रडवत नाही, थोडासाच का होईना विचार करायला भाग पाडतो. त्यातील सिद्धार्थ आपल्याशी कितपत रिलेट होतेय याची चाचपणी करायला लावतो. ज्या ईंटरनेटच्या व्यसनामुळे तो आपले प्रेम गमावून बसलेला असतो, ते मिळवण्यासाठी तो ईंटरनेटचीच मदत घेतो. अर्थात, ते जग आणि हे जग वेगळे असल्याने त्याचा याला काही फायदा होत नाही. पण आपण सारेच ईंटरनेटच्या किती आहारी गेलो आहोत हे तो आपल्याला दाखवतो.

चित्रपटाचा शेवट त्याच्या जातकुळीला साजेशाच झाला आहे. तो पटतो. अर्थात, तो काय आहे हे मी सांगणार नाही. पण सिद्धार्थला किमया मिळते, की त्याचा ‘कभी हा कभी ना’ चा शाहरूख खान होतो. ज्याचे किमयावर जास्त प्रेम आहे त्याला ती मिळते, की किमयाचे ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी तिचे जुळते, या सर्व शक्यतांचा अंदाज लावतच चित्रपटाची मजा लुटा.

चित्रपटाचे संगीत यथातथाच आहे. पण एखादा दोन-अडीज तासांचा, बांधून ठेवणारा हलकाफुलका चित्रपट असेल, तर अशी गाणी छोट्याश्या ब्रेकचेच काम करतात, त्यामुळे चालून जावे.

तीन प्रमुख कलाकारांचा भुमिकेला साजेसा अभिनय आणि अनुरूप दिसणे ही या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. पण त्याचबरोबर कॉलेजग्रूप उभा करणार्‍या ईतर युवा कलाकारांमध्ये कोणीही चित्रविचित्र चाळे वा अंगविक्षेप करून टुक्कार विनोदनिर्मीती करायचा प्रयत्न करताना दाखवले नाहीये हे विशेष.

तर, आज आपल्या आजूबाजुला असे कित्येक दिसतात जे रात्री झोपताना व्हॉटसपवरचे सर्व मेसेज वाचून मगच झोपतात. तसेच सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेत रात्रभरात पडलेले मेसेज चेक करतात. कधी खाता खाता डाव्या हाताचा मोबाईलशी चाळा असतो. तर कधी चालता चालता चालणे हे काम फक्त पायांचे आहे म्हणत हात आणि डोके मोबाईलमध्ये बिजी असते. प्रत्येक जण इथे एखाद्या सोशलसाईटशी बांधला गेला आहे आणि आपल्या पाठी तिथे काय घडत असेल याची चिंता त्याला दिवसभर खात असते. कुठे ना कुठे आपण प्रत्यक्षात एक आणि विचारांत एक अश्या दोन जगात जगत असतो, आणि बरेचदा त्यातील आभासी जगातच जास्त रमू लागतो. कदाचित तुम्ही आणि मी सुद्धा याचा कमीअधिक प्रमाणात एक हिस्सा आहोत. त्यामुळे खरे तर हा काही प्रॉब्लेम आहे, असू शकतो, हे तुमच्या ध्यानीमनीही नसेल. कदाचित चित्रपट बघताना तसा तो वाटणारही नाही. पण त्याचबरोबर त्यात कुठलीही आतिशयोक्ती जाणवणार नाही. जर दहाबारा वर्षांपूर्वीचा काळ तुम्ही पाहिला असेल, जर आजकालचा काळ अनुभवत असाल, आणि उद्या काय होईल याची उत्सुकता कम चिंता तुम्हाला वाटत असेल, तर हा चित्रपट एकदा सहज बघून घ्या. कारण येत्या काळात अश्या सिद्धार्थची संख्या वाढणार आहे हे नक्की.

Online-Binline-Marathi-Movie.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिट्टो रणबीर! यावेळी अगदी पहिल्या द्रुष्यापासून त्यात रणबीर दिसू लागला. रणबीर आपल्या आवडीचा, त्यामुळे हा देखील आवडून गेला. ‘वेक अप सिड’ सारखेच या सिडलाही ‘वेक अप’ म्हणून सांगणारे कथानक >> +१
मराठी सिनेमा थिएटर ला पाहायची हौस म्हणून पाहिला होता. ओसाड थिएटर. पण चांगला वाटला सिनेमा.

असा काही सिनेमा येऊन गेला हे माहितच नव्हतं.
>>>
जाहीरातीत कमी पडलेला म्हणजे
हेमंत धोमे कश्यात आवडला नव्हता?

हेमंत धोमे कश्यात आवडला नव्हता?>>> एकंदरच.
कुठल्यातरी कॉमेडी शो मधे पाहिला होता. तेव्हा वाटलं होतं की त्याची ती ओढून ताणून - हेल काढून बोलायची स्टाईल त्या शो पुरती असेल, पण नंतर अनेक ठिकाणी तशीच दिसली. अर्थात हे.मा.वै.म. !

स्वरुप, वर्मा मर्मा ओके. बदलतो लगेच, आणि पुढच्यावेळी लक्षात राहील.

तरी बरे झाले पण व चा म झालेला सांगितलेत . नाहीतर एखाद्याला वरण द्या असा आदेश दिला असता आणि माझ्या माणसांनी त्याला मरण दिले असते. Happy

मित, ओके. मी त्याला फारसे पाहिले नव्हते या आधी. यात भुमिकेला ते चालून जात होते.

अशी फोनमधे हरवलेली मुले बघतो खरी, पण मला वाटतं पुर्वी हेडफोन लावून दिसत असत पण आता कमी झालीत, तसे हे वेडही कमी होईल... आणि दुसरे लागेल.

बघेन नक्की हा चित्रपट.

सिनेमा २ महिन्यापुर्वी पाहिला होता. हेमन्त धोमे चे काम चान्गले आहे . शेवटचे हरिहरन-लेझली लुईस चे रीमिक्स गाणे तुफान आवडले. खरे म्हणजे त्यासाठीच पिक्चर बघितला होता.. बरा होता ..

https://www.youtube.com/watch?v=9HNHOnb0m

Presenting "Oho Kai Zala" the latest Promotional song from the Marathi movie Online Binline, featuring Hariharan, Lesle Lewis, Siddharth Chandekar, Hemant Dhome, Rutuja Shinde & the cool rapper Shreyash Jadhav! Watch this video exclusively only on Rajshri Marathi!Wk