नवर्याच्या नोकरीच्या निमित्ताने दोन महिन्याने प्रथम नवरा आणि त्यानंतर महिन्याने मी अमेरिकेला जाणार आहोत. आमचे वास्तव्य न्यू जर्सी राज्यात साधारण 3 वर्षासाठी असेल. पॅकिंग करतांना बरेच प्रश्न माझ्या मनात येत आहेत. माझे काही प्रश्न अगदीच बाळबोध वाटू शकतील पण नेटवर उपलब्ध माहिती माझ्या गोंधळात जास्तच भर घालते आहे. मायबोलीकर मंडळी मदत करतील अशी अपेक्षा करते.
तिकडे जाताच सगळे सामान खरेदी करणे थोडे अवघड आणि खर्चीक होईल असे वाटते. त्यामुळे येथून काही वस्तू नेता येतील का?
• खालील वस्तू बरोबर नेण्याची परवानगी आहे का?
१. देवाच्या चांदीच्या मूर्ती आणि पूजेचे सामान
२. दागिने( खरे आणि खोटे)
खरेदीचे बिल न्यावे लागते का?
• बर्याच ठिकाणी प्रेशर कूकर, कढई, तवा आणि frying पॅन नेण्याबद्दल सुचवले आहे. अमेरिकेत हिटिंग Coil असतात का? की फ्लेम असते? आणि असे असल्यास भारतातील कोणती भांडी उपयोगी पडतील? मी Futura चे Hard Ionized नेण्याच्या विचारात आहे.
• पोळपाट लाटणे, मोदकाचा साचा, आप्पे पात्र, इडली स्टँड, चकलीचा सोर्या, किसणी हे तिथे मिळते का?
• सुरवातीच्या काही कालावधीसाठी इन्स्टंट पीठे म्हणजे भाजणी, MTR चे इडली/ डोसा/ ढोकला पीठ, कोरड्या चटण्या, लोणचे नेता येईल का?
• खडा मसाला : वेलची, दालचीनी, बडीशेफ गोडा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग नेता येते का?
• वेस्टर्न कपडे भारतातून खरेदी करून न्यावे की अमेरिकेत खरेदी करावेत? इथे (दिल्ली) थंडीत वापरात येणारे गरम कपडे (Monte Carlo, Woodland) देखील तेथील थंडीत निकामी आहेत का?
• कुठली औषधे नेण्याची परवानगी आहे? सगळ्या औषधांसाठी prescription लागेल का? आयुर्वेदीक औषधांसाठी देखील prescription लागते का?
• Prescription कोणाचे चालू शकते? डॉक्टर सरकारी हॉस्पिटलचे असण्याची अट तर नाही ना?
• Thyronorm सारख्या औषधाचा साधारण 6 महिन्याचा डोस नेता येऊ शकतो का?
• मला चित्रकलेची आवड आहे. त्यासाठी लागणारे सामान येथून न्यावे की तेथेही मिळू शकते?
• या व्यतिरिक्त MUST CARRY अश्या काही वस्तू आहेत का?
़ खूप छान माहिती मिलाली. मी
़ खूप छान माहिती मिलाली. मी कालच अमेरिकेला आले पण आपण योग्य तेवढे सामान आणले की फार फापट पसारा आणले हे क्रोसचेक झाले
ईकडे युज्ड फरनिचर कुठे मिलेल? सध्या गाडी नसल्याने घरपोच मिळाले तर बरे. Thanks giving ला सेल मध्ये मिळू शकेल कआ?
>>बातमीची तारीख तपासा... काय
>>बातमीची तारीख तपासा...
काय संबंध? तारीख कुठलीही असो, त्यामुळे तुमचं 'बॅक्टेरियल एपिडेमिक' विधान काही खरं ठरत नाही.
धानी१, तुमच्या शहराच्या
धानी१, तुमच्या शहराच्या craigslist (इथलं OLX)च्या वेबसाईट वर used furniture मिळेल. विकणारे कधीकधी होम डिलिव्हरी देतात. Thanksgiving च्या सेलमध्ये पण चांगली डिल्स मिळतात. स्वस्त आणि मस्त फर्निचर साठी ikea हा एक चांगला पर्याय आहे.
Pages