नवर्याच्या नोकरीच्या निमित्ताने दोन महिन्याने प्रथम नवरा आणि त्यानंतर महिन्याने मी अमेरिकेला जाणार आहोत. आमचे वास्तव्य न्यू जर्सी राज्यात साधारण 3 वर्षासाठी असेल. पॅकिंग करतांना बरेच प्रश्न माझ्या मनात येत आहेत. माझे काही प्रश्न अगदीच बाळबोध वाटू शकतील पण नेटवर उपलब्ध माहिती माझ्या गोंधळात जास्तच भर घालते आहे. मायबोलीकर मंडळी मदत करतील अशी अपेक्षा करते.
तिकडे जाताच सगळे सामान खरेदी करणे थोडे अवघड आणि खर्चीक होईल असे वाटते. त्यामुळे येथून काही वस्तू नेता येतील का?
• खालील वस्तू बरोबर नेण्याची परवानगी आहे का?
१. देवाच्या चांदीच्या मूर्ती आणि पूजेचे सामान
२. दागिने( खरे आणि खोटे)
खरेदीचे बिल न्यावे लागते का?
• बर्याच ठिकाणी प्रेशर कूकर, कढई, तवा आणि frying पॅन नेण्याबद्दल सुचवले आहे. अमेरिकेत हिटिंग Coil असतात का? की फ्लेम असते? आणि असे असल्यास भारतातील कोणती भांडी उपयोगी पडतील? मी Futura चे Hard Ionized नेण्याच्या विचारात आहे.
• पोळपाट लाटणे, मोदकाचा साचा, आप्पे पात्र, इडली स्टँड, चकलीचा सोर्या, किसणी हे तिथे मिळते का?
• सुरवातीच्या काही कालावधीसाठी इन्स्टंट पीठे म्हणजे भाजणी, MTR चे इडली/ डोसा/ ढोकला पीठ, कोरड्या चटण्या, लोणचे नेता येईल का?
• खडा मसाला : वेलची, दालचीनी, बडीशेफ गोडा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग नेता येते का?
• वेस्टर्न कपडे भारतातून खरेदी करून न्यावे की अमेरिकेत खरेदी करावेत? इथे (दिल्ली) थंडीत वापरात येणारे गरम कपडे (Monte Carlo, Woodland) देखील तेथील थंडीत निकामी आहेत का?
• कुठली औषधे नेण्याची परवानगी आहे? सगळ्या औषधांसाठी prescription लागेल का? आयुर्वेदीक औषधांसाठी देखील prescription लागते का?
• Prescription कोणाचे चालू शकते? डॉक्टर सरकारी हॉस्पिटलचे असण्याची अट तर नाही ना?
• Thyronorm सारख्या औषधाचा साधारण 6 महिन्याचा डोस नेता येऊ शकतो का?
• मला चित्रकलेची आवड आहे. त्यासाठी लागणारे सामान येथून न्यावे की तेथेही मिळू शकते?
• या व्यतिरिक्त MUST CARRY अश्या काही वस्तू आहेत का?
नॉर्मल फ्लॅट बॉटम
नॉर्मल फ्लॅट बॉटम चालतात.
थोडी जाड बॉटम घ्यायची म्हणजे कॉईल वर पण करपत नाही.
तिन वर्षांसाठी एवढी तयारी?
तिन वर्षांसाठी एवढी तयारी?
माझ्या एक मित्र गेल्या वर्षी स.कुटूण्ब एन्जेला गेला. आधी तो एकटा गेला तेव्हा पॅकबंद असे थोडे मसाले नेलेले. नंतर कुटूंब जाताना फक्त कुकर आणि इतर सटर फटर लहान भांडी घेऊन गेली ती मंडळी. एवढी तयारी अजिबात केली नव्हती. आता तिथे मस्त राहात आहेत. जे घर घेतले भाड्याने त्यात गॅस, फ्रिज सगळे काही आहे. काही फर्निचर तर म्हणे चक्क नको म्हणुन काही घरांच्या बाहेर ठेवलेले ते यांनी उचलुन आणले. हे असे करतात हे मी फक्त वाचलेले, त्याने प्रत्यक्षात केले.
थंडी पडायला लागली तेव्हा थंडीचे कपडेही तिकडेच घेतले. इथुन फक्त घरी/बाहेर वापरायचे कपडे, साड्या इ. नेलेले. दागिने (एक लहानसा हार, मंगळसुत्र आणि चार बांगड्या इतकेच) घेऊन गेले पण रिसिट व. काही नेले नव्हते. तिन वर्षांच्या मुलासाठी औषधाचे प्रिस्किप्शन आणि त्यासोबत थोडी औषधे नेलेली. बाकी खायचे पदार्थ वगैरे अजिबात नेले नव्हते.
मराठी कुडी, अनुश्री
मराठी कुडी, अनुश्री थॅंक्स.
साधना, दुसर्यांनी वापरलेल्या आणि टाकून दिलेल्या वस्तु मी किंवा नवरा तरी वापरू शकणार नाहीत एवढे निश्चित... बाकी अंदाज अपना अपना..दुसरे काय ?
पण भांडी आणताना flat bottom
पण भांडी आणताना flat bottom वालीच आणा नाहीतर coil, electric gas वर खूप त्रास होईल.>>>> काही नाही होत त्रास वगैरे... मी दरवेळी नेहमीची साधी कढई / पातेलं, कुकर वगैरे आणलं होतं.. काहीच फरक पडला नाही कॉईल मुळे..
काही नाही होत त्रास वगैरे...
काही नाही होत त्रास वगैरे... मी दरवेळी नेहमीची साधी कढई / पातेलं, कुकर वगैरे आणलं होतं >>> पगोबा पण गोल बॉटमची भांडी असली तर व्य्वस्थीत हीट पण होत नाही आणि डोल डोलतय वार्यावरी पण होतं की .
अरे मी खरच कधी फ्लॅट बॉटमची
अरे मी खरच कधी फ्लॅट बॉटमची भांडी आणली नाहीत (चहाचं भांडं वगळता) पण कधीच काही फरक पडल्याचं वाटलं नाही त्याच्यामुळे..
दुसर्यांनी वापरलेल्या आणि
दुसर्यांनी वापरलेल्या आणि टाकून दिलेल्या वस्तु मी किंवा नवरा तरी वापरू शकणार नाहीत एवढे निश्चित... बाकी अंदाज अपना अपना..दुसरे काय ?
स्नू : तुम्ही कधीच होटेल मधे राहिला नाहीत काय ?
>>स्नू : तुम्ही कधीच होटेल
>>स्नू : तुम्ही कधीच होटेल मधे राहिला नाहीत काय ?<<
हॉटेलात तीन वर्षे नाही ना रहात पण....
त्यांनी म्हटलय ना, अंदाज अपना अपना. मग.
स्नू,
१) तुम्ही काही रोजची औषधे जसे की क्रोसिन, इमोडियम घेवून जा त्याची एक्क्स्पायरी डेट वगैरे बघून.
तुम्ही थंडीत येताहात. इथली औषधे सवय व्हायला वेळ लागतोच. गाडीहि नसेल, मेडिकल ईन्शुरान्स वगैरे सुरु होइलच पण तरी बरी काही औषशे असणं.
इकडची डॉक कडे लगेच पळायला नको. आणि तुमचे बस्तान बसे पर्यंत आणि थंडीची सवय होईतोवर बरं पडेल. लहान मुलाची काही औषधे सुद्धा घ्या तीन चार महिन्याचा डोस.
२)वरती म्हटलयाप्रमाणे शिक्षणाचा विचार असेल तर तुमची सर्टीफिकेटस घ्या.
३) अगदी दुसर्या दिवशी मॉलमध्ये पळायचे नसेल तर एक दोन सोलापुरी चादरी, दिललीचे स्वटर्स, शाली बर्या.
४) लाडाचं घेता घेता बॅग भरेल तेव्हा फक्त "अति लाडाचंच" घ्या सामान.
५) अगदी "जरूरीचं आणि जड असलेले" सामान नवर्याकडे द्या. तुम्हाला येताना मुलं सांभाळायची आहेत. त्यात ते बॅगा उचला, मुलं उचला गडबड होइल. एखादी बॅग ज्यास्ती लागलीच तर तीही नवर्याकडे द्या. विमानतळावर एकट्याला पळपळ बरी पैसे भरा ज्यास्ती बॅगेचे वगैरे.
आपण येताना पोरं जीव खातात नुसता. सतरांदा बाथरूमं(पोरांबरोबर),त्यांच्या बॅगा, त्यांचे पासपोर्ट काढा , घाला खूपच काम असते.
एक किस्सा आठवला,
माझी आजी इथे आलेली पहिलयांदा तेव्हा तिचा एक खास पेला होता चहाचा, ती विसरली नेमकी( विमानतळावर निघेपर्यंत घरी चहा पीत होती मग राहिला का काय असे झाले) आणि इथे तिचा गोंधळ.
आता त्याच साईजचा स्टीलचा 'पेलाच" कसा मिळणार? घातली समजूत आणि दिला चहा ग्लासात ओतून. तेव्हा तिला म्हटलं की, हॉटेलात काय केले असतेस? तर मला म्हणाली, मेले हॉटेलात घेवूनच गेले असते ना पेला माझा. तुमच्यावर अवलंबून राहिले बॅग भरायला आणि घोळ केलात.
तीन वर्षे काही कमी नाहित. रहा
तीन वर्षे काही कमी नाहित. रहा हो मजेत तुमच्या मनाप्रमाणे.
एक मैत्रीण सुरुवातीला वेलचीचा बत्ता घेवून आलेली. तुम्ही आणा सांगत नाही पण तो बत्ता लाडाचा होता तिचा (इति ती )
दुसर्यांनी वापरलेल्या आणि
दुसर्यांनी वापरलेल्या आणि टाकून दिलेल्या वस्तु मी किंवा नवरा तरी वापरू शकणार नाहीत एवढे निश्चित... बाकी अंदाज अपना अपना..दुसरे काय ? >>>> अस सगळेच जण सुरुवातीला म्हणतात...असो,गम्मत केली,हलके घ्या
वापरणे न वापरणे हा तुमचा प्रश्न आहे पण इथे त्यात कमीपणा नाहि मानत..आपल वापरून झालय आता दुसरे कुणाला हवे असल्यास वापरूदेत ह्या उद्देशान बाहेर ठेवल जात किवा कमी पैशात विकतात...
भारतातल्या स्वेटर आणी कोट्स ना इथली थंडी जुमानत नाहि तेव्हा,विमानात आणी खाली उतरल्यावर थोड्या वेळापुरते (१-२ दिवस) घ्या..तुम्ही ऐन थंडीतच येत आहात इथे.
Macy's, Target,Walmart,Burlington Coat Factory,Kohls.Toys R Us,Costco,Dillards,IKEA(USA) etc
ही काहि दुकांनांचि नावे...वेबसाईट वगरे बघून ठेवून घ्या म्हण्जे इथे आल्यावर काय आणी कुठे घयाचे ह्याची तारांबळ नाही उडणार...
तारतम्याने रिसेलच्या चांगल्या
तारतम्याने रिसेलच्या चांगल्या वस्तू वापरायला हरकत नाही. उदा: गाडी.
तुमचा नवरा ज्या प्रोजेक्टसाठी
तुमचा नवरा ज्या प्रोजेक्टसाठी चालला आहे तिथे त्याच्या आधी गेलेल्या मंडळींचे सल्लेही घ्या. तो पहिलाच असेल तर मग त्याला सगळंच फिगर आउट करावं लागेल पण कुणी आधी तिकडे असेल त्यांना साधारण राहायची जागा, जवळ खरेदीचे पर्याय आहेत की पहिल्या दिवसापासून गाडी लागणार इ., शिवाय जवळचं देशी दुकान आणि मग त्या अनुषंगाने तुमचं बॅगेतलं कमी होऊ शकणारं (खान्)सामान वगैरे सल्ले कलिग्ज कडूनही घ्या.
बाकी इकडे सर्वांनी जवळजवळ सगळंच कव्हर केलंय. शुभेच्छा
अंदाज चांगला आहे. घर भाड्याने
अंदाज चांगला आहे. घर भाड्याने घेण्याआधी फ्रिज, कुकिंग रेन्ज नको आहे अस आधीच सांगाव लागेल बहुतेक. ते वापरलेल असत.
थांबा, थांबा! त्यांना आधी
थांबा, थांबा! त्यांना आधी इथे येऊतर द्या. कुठल्या वस्तू सेकंड हँड वापरता येतील, कुठल्या नाहीत, (इतरांच्या) कुठल्या वस्तू वापरण्यावाचून गत्यंतरच नाही हे हळूहळू लक्षात येईल.
"शी! आम्ही नाही असल्या सेकंड हँड, कर्बसाइडला ठेवलेल्या वस्तू वापरत!" असा इथे येणार्या बर्याच भारतीयांचा सुरुवातीच्या दिवसांमधला अॅटिट्यूड असतो. तो कालांतरानं पुसला जातो. गराजसेल, कम्युनिटी थ्रिफ्टसेलमधली मजा कळायला लागते.
मला वाटते भारतात सेकंड हॅंड
मला वाटते भारतात सेकंड हॅंड फर्निचर थोड्याच प्रमाणात चांगले मिळते, शिवाय अस्वच्छ करून मग ते विकायला काढले जाण्याची टेन्डन्सी असल्याने तशी आपली वृत्ती बनते. मी पुण्यात जुन्या बाजारात अनेकदा चक्कर मारते पण घ्यावे वाटेल अशी एकही गोष्ट नजरेस पडत नाही. मागे २० वर्षांपूर्वी एकदा घेतलेले पुस्तकांचे कपाट सुदैवाने अतिशय चांगले लागले. ते अजून वापरते आहे. पण नंतर काहीही मिळालेले नाही.
@मृण्मयी +१ आणखी फ्ली मारकेट
@मृण्मयी +१
आणखी फ्ली मारकेट + याड्र सेल पण..
इथे दातांचा इन्शुरन्स बराच
इथे दातांचा इन्शुरन्स बराच महाग असतो तेव्हा इथे येण्यापुर्वी दाताची सगळी कामे जसे रुट्कॅनल, फीलींग, कॅप बसवणे इ.इ. करून या. काही त्रास नसेल तरीही एक्दा डेन्टीस्ट्कडे चक्कर मारुन सगळे नीट असल्याची खात्री करून घ्या.
तसेच चष्मा अथवा लेन्स वापरत असाल तर एक जोडी एक्ट्रा सोबत ठेवा. इथे चष्मे जरा महाग मिळतात.
रुनी + १
रुनी + १
रूनी+१. सेम टॉन्सिल्सलाही
रूनी+१. सेम टॉन्सिल्सलाही लागु.
श्री, माझ्या भारतातल्या गॅसवर
श्री, माझ्या भारतातल्या गॅसवर देखील कधी कधी डोल डोलतय वार्यावरी होतं ... फिदीफिदी..
झंपी, अजून तरी मुले नसल्यामुळे जास्त काळजी नाहीये....स्वत:चच सामान आहे सगळं...
तुमच्या आजीचा किस्सा मस्त आहे.. माझी आई पहिल्यांदा जेव्हा दिल्लीला माझ्या घरी आली तेव्हा सगळी पीठं घेऊन आली होती. अगदी गव्हाचं देखील. गव्हाचं कशाला आणलस ग आई, मी स्वयंपाक बनवत नाही की काय रोज ? म्हणते की मला वाटलं ऐनवेळी तुझ्याकडे असेल नसेल..केव्हडा तो विश्वास तिला माझ्या असंसारिकपणाबद्दल...
गोपिका, wallmart सोडलं तर
गोपिका, wallmart सोडलं तर एकही नाव मला माहीत नव्हतं. थॅंक्स. शोधते आता.
सीमंतीनी, जेम्स, अदिति, मृण्मयी, डीविनिता, मधु मलुष्टे, वहा आकेही देखेंगे अमेरिकाके रंगढंग !!
रुनी, हे खूप जणांनी सुचवलं आहे,अमेरिकेत ( डॉक्टरला) बत्तीशी दाखवणं महाग आहे म्हणून..
इथे चालणारे क्रेडिट कार्ड
इथे चालणारे क्रेडिट कार्ड लगेच मिळाले तर पाहा. ते जर असेल तर गूगल शॉपिंग (की एक्सप्रेस लक्षात नाही), वॉलमार्टची तशीच सर्विस घरी लागणार्या अनेक गोष्टी घरपोच देइल (शिपिंग चार्जेस न घेता - निदान सुरूवातीला काही वेळा). तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल पण जवळ कोणी ओळखीचे असेल तर त्यांचे वापरून याचा उपयोग करा व त्यांना चेक्/कॅश द्या.
खाण्यापिण्याच्या बाबतीत जितकी फ्लेक्झिबिलीटी (म्हणजे भारतीय जेवण नसले तरी चालेल अशी) लौकरात लौकर आणाल तितके येथे खाणे सोपे होईल, नुसते एवढेच नव्हे तर येथे उपलब्ध असलेल्या प्रचंड विविधतेची मजाही घेऊ शकाल.
तुमच्या दोघांपैकी किमान एक जण कार चालवू शकलात, खर्च करायला थोडेफार डॉलर्स मिळाले/जमा झाले, मेडिकल्/डेंटल इन्श्युरन्स कव्हर असेल, एखाद्या दिवशी भारतीय जेवण बनवता नाही आले तर पिझा, पास्ता, बर्गर, थाई कशावरही चालवून घ्यायची तयारी झाली, तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होत जातील. निदान न्यू जर्सी, बे एरियात तरी काहीच प्रश्न नाही. तुम्हाला इमोशनली महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी - देवांच्या मुर्ती वगैरे आणा. बाकी सगळे मिळेल.
शुभेच्छा, आणि welcome to the US, in advance
कूकर >>>>> सगळे इकडून कूकर
कूकर >>>>> सगळे इकडून कूकर घेऊन जा म्हणत आहेत म्हणजे तिकडे मिळत नसावा किंवा फार कमी ठिकाणी मिळत असावा. इकडचा कूकर तिकडे नेल्यावर त्याचा व्हॉल्व उडाला तर कोण बसवून देतं? की इकडूनच एक्स्ट्राचे व्हॉल्व नेता एखाद दोन? मुळात व्हॉल्व उडवायचाच नाही म्हणा!
इकडचा कूकर तिकडे नेल्यावर
इकडचा कूकर तिकडे नेल्यावर त्याचा व्हॉल्व उडाला तर कोण बसवून देतं? >> कुणीही नाही. स्वतःला किंवा आपल्या ठळक दुसऱ्याला (सिग्निफिकंट अदर=पार्टनर याचे भाषांतर) येत असले तर ठीक. चीन मध्ये बनवलेल्या अमेरिकन प्रेशर कुकरची किंमत साधारण $२००-३०० असते. त्याला सेफ्टी व्हाल्व नसतो तर एक प्रकारची "फिरकी" असते. ते कुकरही चांगले असतात पण सुरुवातीला एकदम २००-३०० डॉलर खर्च करणे नको वाटते. शिवाय कुकरला "डबे" (भात-वरण साठी भांडी) मिळत नाहीत.
वचते आहे.. मस्त करमणुक
वचते आहे..
मस्त करमणुक आहे.....
स्नू....
सगळं मिळतं तिकडे... उलट बर्याच गोष्टी आपल्या पेक्षा उत्तम मिळतात..... कपडे, भांडी, क्रोकरी, क्रीम, लोशन्स, खाण्याचे पदार्थ, पिठे, ....ह्यात अनंत व्हरायटी मिळते. बघुन उलट डोळे फिरतात. परत संपुर्ण भारतातले प्रॉडक्ट्स मिळतात त्या मुळे खुप व्हरायटी असते. बकी काही न्या नाहितर नाही पण वेस्टर्न कपडे मात्र तिकडे च घ्या.... सॉलिड व्हरायटी आणि स्वस्त....( मी आणलेले कपडे गेले १ वर्ष वापरते आहे ..एकदम झक्कास)
बाकी वरचे काही सल्ले एकदम नामी.....
सगळं मिळतं तिकडे... >>
सगळं मिळतं तिकडे... >> एक्सेप्ट कवठ आणि खरवस. बाकी गोष्टी महाग मिळतील पण निदान मिळतील. भारतात असताना "कवठ आणि खरवस शिवाय जीव जातो का काय?" अस वाटत; पण नंतर कळत त्यात आपला जीव किती अडकलेला होता.
एक्सेप्ट कवठ आणि खरवस. भारतात
एक्सेप्ट कवठ आणि खरवस.
भारतात असताना "कवठ आणि खरवस शिवाय जीव जातो का काय?" अस वाटत; पण नंतर कळत त्यात आपला जीव किती अडकलेला होता.
मग काही जणांचा जीव शाळेबाहेर मिळणा-या लाल चिंचेत आणि सुक्या बोरातही अडकला असेल.... अशी मंडळी काय करतात तिकडॅ? तेही लिहा, तेवढीच आम्हाला इथे करमणुक
पुढील काही बाफः एच फोर्र वर
पुढील काही बाफः
एच फोर्र वर आलेल्या बायकांनी काय करावे?
अमेरिकेत कुरीअर्ने फराळ मिळेल का?
एकट्याने विमान प्रवास/ ज्येनांना सोबत घेउन विमान प्रवास
लहानांना घेउन विमान प्रवास
अमेरिकेतील डे केअर,
परतोनी पाहे.
ताई मी विनोदाने लिहीत नाही. जसजसे इश्यूज क्रॉप अप होती तसतसे येथील बाफ शोध घेउन बघा. खूप चांगली माहिती आहे.
तिथल्या व्होल्टेज वर चालणारी इलेक्ट्रिकल उपकरणे शक्यतो तिथेच घेतली तर बरी जसे मिक्सर फूड प्रोसेसर शेव्हर हेअर ड्रायर इत्यादी. तुमचा स्टे खूप छान होणार. तिथल्या घरी गणपती बसवल्याचे दिवाळी हॅलोवीन फॉल पहिला हिमवर्शाव इत्यादीचे फोटो नक्की टाका. बबन ला हावडी. शुभेच्छा
अमा , पर ये बब्बन कौन है ?
अमा , पर ये बब्बन कौन है ?
अमा , पर ये बब्बन कौन है >>
अमा , पर ये बब्बन कौन है >> मुक्तपीठावर बागडत असतो. तो.
अमा. ते बबनला हावडी वाचुन खुप
अमा. ते बबनला हावडी वाचुन खुप हसले.
अमा, ताई मत कहो ना... ...वरचे
अमा, ताई मत कहो ना... ...वरचे बाफ मी पूर्वीच वाचले आहेत..
आणि तुमचा रीप्लाय वाचून मला वाटले मुक्तपीठ उघडले की काय चुकून ...तुमच्या बबनचा पत्ता द्या.. शुभेछा पोहोचवते
सगळे जर एवढे कुकर कुकर करत
सगळे जर एवढे कुकर कुकर करत आहेतच तर जाताना कुकरच्या ४/५ रिंगा, ४/५ सेफ्टी वॉल्व आणी एक शिटी एक्स्ट्रा घेवुन जा.
हो, हो. चार गोष्टी कमी भरा,
हो, हो. चार गोष्टी कमी भरा, पण सगळे म्हणताहेत तसा कुकर, प्रेशरपॅन आणाच.
कुकरदेवतांचा अनुग्रह म्हणायचा की काय? आजवर एकदाही गास्केट, सेफ्टीव्हाल्व बदलावं लागलं नाही. एक्स्ट्रा आणलेले तसेच पडून आहेत.
शूज, स्नीकर्सपण इथे जास्त चांगले मिळतात. बावळटासारखे बरेच जोड आणले. बर्फात काही कामाचे नाहीत. बर्यापैकी पायी चालणं होणार असेल तर इथे स्नोशूज/बूट्स नक्की घ्या.
आल्याआल्या कॉलिंगकार्ड्स घेतलीतर भारतात फोन करण्याची सोय होते. नंतर एखादा लाँग टर्म प्लॅन घेता येतो. उदा: रिलायन्स.
मला तरी अमेरिकेत चांगला mixer
मला तरी अमेरिकेत चांगला mixer grinder मिळालेला नाहि आतापर्यंत. माझ्या काहि मैत्रीणिचा हि हाच अनुभव आहे. grinder घेउनचं या. इथल्या grinders मध्ये ईडली दोस्याचे पीठ नीट दळल्या जात नाही. आणि कुकरही न्यावा.
न्यू जर्सीत इडली पीठ आंबते
न्यू जर्सीत इडली पीठ आंबते का? का ओव्हन झिंदाबाद?
>>कुकरदेवतांचा अनुग्रह
>>कुकरदेवतांचा अनुग्रह म्हणायचा की काय? आजवर एकदाही गास्केट, सेफ्टीव्हाल्व बदलावं लागलं नाही. एक्स्ट्रा आणलेले तसेच पडून आहेत.>> इकडेही. १२ वर्ष झाली आत्ताच्या कुकरला.
>>एक्सेप्ट कवठ आणि खरवस.
>>एक्सेप्ट कवठ आणि खरवस. <<
बोवाइन कलॉस्ट्रम? मिळत नाहि??
मला तरी अमेरिकेत चांगला mixer
मला तरी अमेरिकेत चांगला mixer grinder मिळालेला नाहि आतापर्यंत.>>>>>>>>..Target मधे प्रयत्न करून बघा.... माझ्या साउथ इन्डीयन रूममेटने तिथून १५ डॉल्ररला आणलाय.......... तिचे डोसे चान्गले होतात.......
बोवाइन कलॉस्ट्रम >>
बोवाइन कलॉस्ट्रम >> साल्मोनेला मुळे विकायला बंदी आहे.
लाल चिंच श्रीलंकन मिळते. चवीला शाळेइतकी चांगली नसते पण मिळते. बोर ऐवजी बोरकुट मिळते. ते अधून मधूनच मिळते पण का माहित नाही बोरे फारशी होमसिक करत नाहीत. फ्रोझन जांभळे मिळतात.
>>बोवाइन कलॉस्ट्रम >>
>>बोवाइन कलॉस्ट्रम >> साल्मोनेला मुळे विकायला बंदी आहे <<
दॅट्स बीएस; लोकल डेरीत मिळते. बॅक्टेरियल एपिडमिक असेल तर समजु शकतो अथवा नो इश्यु.
Dairy Ends Sales of Raw
Dairy Ends Sales of Raw Colostrum : http://www.foodsafetynews.com/2012/01/dairy-ends-sales-of-raw-colostrum/
>>दॅट्स बीएस; लोकल डेरीत मिळते. बॅक्टेरियल एपिडमिक असेल तर समजु शकतो अथवा नो इश्यु.
अजीबात बीएस नाही. इ कोलाय आणि सॉल्मोनेला कंटॅमिनेशनसाठी कुठल्याही एपिडेमिकची गरज नाही. हँडलिंग, स्टोरेज कंडिशन्स योग्य नसल्या तर कधीही होऊ शकतं.
बातमीची तारीख तपासा...
बातमीची तारीख तपासा...
होतकरू अमेरिकन वारकर्यासाठी
होतकरू अमेरिकन वारकर्यासाठी चांगला बाफ आहे
स्नू , शुभेच्छा !
कुकर वर बरीच चर्चा चालु
कुकर वर बरीच चर्चा चालु आहे. आम्ही मागच्या वर्षी अमेरिकेत शिफ्ट झालो आणी ३ दिवसात सेफ्टीव्हाल्व खराब झाला. मग amazon वरुन Presto 01264 6-Quart Aluminum Pressure Cooker मागवला.
आजुन पर्यन्त तो उत्तम चालु आहे. शिट्टी आहे पण वाजत नाही. ( It is only for safety) . टायमर लाउन गॅस बंद करवा लागतो. भारतिय कुकर पेक्षा निम्मा वेळ कमी लागतो.
कुकरची भांडी मिळत नाहीत. खराब झालेल्या कुकरची भाडी ह्या कुकर मध्ये कामी आली.
कुकर/मिक्सर इथल्या भारतिय
कुकर/मिक्सर इथल्या भारतिय दुकानात रिपैर करुन मिळतो.
मिक्सर ग्राइण्डर आणण्यापेक्षा
मिक्सर ग्राइण्डर आणण्यापेक्षा इकडे मॅजिक बुलेट घ्या.
मुख्य म्हणजे सवयीचे मसाले किंवा थालिपिठाची भाजणी इत्यादी गोष्टी आणा. इकडे मिळतात, पण मी अजुनही या गोष्टी मागवते घरून. पुरवून पुरवून वापरायला छान वाटते.
मिक्सर ग्राइण्डर आणण्यापेक्षा
मिक्सर ग्राइण्डर आणण्यापेक्षा इकडे मॅजिक बुलेट घ्या.
मुख्य म्हणजे सवयीचे मसाले किंवा थालिपिठाची भाजणी इत्यादी गोष्टी आणा. इकडे मिळतात, पण मी अजुनही या गोष्टी मागवते घरून. पुरवून पुरवून वापरायला छान वाटते.
सायो आणि मृण्मयी, तुमचे सगळे
सायो आणि मृण्मयी, तुमचे सगळे व्हॉल्व्ह इकडे पाठवून द्या बरं. कुकरदेवता माझ्यावर येता जाता कोपत असते. काय तिचं न माझं वाकडं आहे काय माहित. मी शिट्ट्या करत नाही म्हणून जास्त प्रेशर होत असावं तिला..मी भारतातले पण ठेवते पण वेळी अवेळी इंग्रो. मध्ये पण मिळतात व्हॉल्व्ह. वरण शिजवणे सोडून आजकाल कुकर वापरणं कमीच केलंय मी या भानगडीत. तर मध्येच राइस कुकरने आत्महत्याच केली (पडला) त्यामुळे आता तो नवीन घेतला की झालं. पण मला सरळ झाकणं लावून भाज्या शिजवायला आवडतात आणि आजकाल मध्येमध्ये स्लो कुकरला पण कामाला लावते. नुस्त्या कुकरचेच केवढे प्रकार झालेत म्हणायचं.
एकंदरित या धाग्यावर (आधी चुकून धाब्यावर टाइप झालं होतं) करमणूकही होतेय ते बरंय
अमा तु(म्हा)ला साष्टांग दंडवत. काय अभ्यास आहे. बरं ते एच वन खोडून एच-फोर करा बरं
calling card ऐवजी जमल्यास
calling card ऐवजी जमल्यास आल्या आल्या LYCA चे कार्ड घ्या.. आणि आपला भारतात ला GSM मोबाइल बरोबर आना. LYCA महीना ३५ डाँलर मध्ये जगात सगलिकडे फ्री अनलिमीटेड सर्व्हीस देते (internatinal free) + USA unlimited + 1 GB DATA 4g/3g/2g
Pages