नमस्कार मायबोलीकर,
कासे आहात सगळे? मजेतच असाल. गणपतीमध्ये खुपच धम्माल केली असेल. कोतोबो वगैरे वाचुन मजा आली असेल नाही? पण कसं असतं शिंप्याचेच कपडे फाटके असतात ते काही खोटं नाही. खुप दिवस झाले मीही बोलावं म्हणत होतो, पण राहुनच जायचे. आज सरते शेवटी धीर करुन बोलतोय. आता म्हणु नका की Adm!nही बोलायला लागले म्हणुन. संपादकांना चालेल की नाही माहीत नाही, पण त्यांना सांगु नका की मी बोललोय म्हणुन...
तर मंडळी मला काय बोलायचे आहे ते मुद्देसुदपणे मी खाली माडलेत, कृपया नीट वाचा आणि इतरांना तसंच वाचु द्या. (उगाच गुपीत अर्थ वगैरे काढुन प्रतीसाद नका हो देऊ.)
१. सर्वात पहीला मुद्दा म्हणजे तो ड्यु आयड्यांचा. आता काय मला स्वप्न पडनारे कि कोण ड्यु आहे... म्हणजे ड्यु आयडी आहे वगैरे. ऊट-सुट ड्यु मला वि.पु. करतात लोकं. हा ड्यु वाटतोय, तो ड्यु वाटतोय. :राग:, याला ब्लॉक करा त्याला ब्लॉक करा. हे म्हणजे दोन भाडेकरुंचं भांडण सोडवण्यासाठी घर मालकाला फासावर लटकवायचं. शो ना हे.
२. दुसरं म्हणजे पोस्ट. एवढ्या मोठ्या मायबोलीवर, एवढे धागे त्यात एवेढे मायबोलीकर... एवढ्या मोठ्या विस्तारात मला एक छोटीसी वि.पु.
"अहो Adm!n
अलाना_फलाना ची
1 July, 2013 - 11:31
ची पोस्ट अजुनही उडवली गेलेली नाहीये. तुमच्या नियमांमध्ये हे कसं बसतं?"
दुसरी एक छोटीसी वि.पु.
"हे पाहीलत का?" (आणि यात लिंक मिसींग...)
मला वि.पु. करणार्याला सुद्धा दुसर्या दिवशी विचारलं तर त्यालाही आठवणार नाही की त्याने कोणत्या पोस्टी बद्दल मला वि.पु केलेली. तेव्हा मला समजेल असं कसं गृहीत धरतात ही लोकं.
जेवण करुन थोडावेळ माबो चाळावं म्हंटलं की ही अशी भली मोठी विपुंची लिस्ट, त्याने याला हे म्हंटले, याने त्याला ते म्हंटले, अम्क्या ठिकाणी आग लागली, तम्क्या ठिकाणी भुकंप्.... अरे काय हे... काय चाल्लंय काय?
३. तिसरा मुद्दा म्हणजे तो पुराव्यांचा. मला तर आठवुनच काय लिहावं सुचत नाही. तुम्ही लोकं पुरावे म्हणुन मला प्रिंट्स्क्रिन, मेसेज कॉपी पेस्त करुन पाठवता. काय करावं मी त्याचं? हो... हो.. काय करावं मी त्याचं? तेव्हा मला राहुन राहुन वाटतं माझ्या सोबतसुद्धा 'दया' नावाचं कोणी तरी असावं. म्हणजे मलाही म्हणता आलं असता... 'दया...., तोड दो वो दरवाजा.... आय मीन डिलीट कर दो वो धागा'. पण नाही, तसं नाही चालत. सगळी आपलीच माणसं असं म्हणुन उपयुक्त पर्याय वापरुन प्रश्न सोडवतो.
४. पुढचा मुद्दा म्हणजे माझ्या वि.पु. मधली भांडणं. काय एक एक लोक असतात म्हणुन सांगु. हे म्हणजे कसं भांडण दोघांचं असतं, पण भांडतात तिसर्याच्या घरात जाऊन. तेही त्याच्या घरी, ज्याला दोघांनब्द्दलही पुर्ण माहीती नसते. त्यावेळेस माझं टेबल टेनीस पहायला गेलेल्या प्रेक्षकांसारखं होतं. डावीकडे-उजवीकडे, डावीकडे-उजवीकडे असं पाहुन पाहुन जसं प्रेक्षकांची मान दुखते ना, तसं यांच्या माझ्या वि.पुत्ल्या पोस्टी वाचुन डोकं दुखतं. छ्या...!!! एवढी पब्लीक फोरम, वाहते धागे, वैयक्तीक कम्युनिकेशन चॅनेल, त्यात्ल्या त्यात स्वतःची वि.पु. सोडुन माझ्या विपुत भांडायची काय हौस असते हे आजवर न उकलेलं कोडं आहे मला.
५. काही वि.पु खरंच कौतुकास्पत आणि आनंद देणारी असतात. एवढ्या सगळ्या उपद्व्यापाच्या दिवसात "धन्यवाद", "आभारी" अशी कौतुक करणारी वि.पु किती सुखावह असतात हे शब्दात नाही मांडता येणार. त्या आयडींचा मी खरंच आभारी आहे.
पण काही आयडींना 'शोधा म्हणजे सापडेल' या तत्वावर मला सुख शोधायला लावायची सवय आहे. ते येतील आणि माझ्या विपु मध्ये नुस्तं 'धन्यवाद', 'छान वाटलं', 'आभारी आहे', 'अनुमोदन' असं एवढंच पोस्टुन जातील. आणि ते सुखकर शब्द कशाबद्दल आहे ते माझं मिच शोधायचं असं काहीसं सागुन जातील.
६. हा शेवटचा नी महत्वाचा मुद्दा. एवढा सगळा उपद्व्या पाहुन, एवढा सगळा ताण आणि कटकट पाहुन मनात येतं की कशाला बायकोचं ऐकलं नी मायबोली काढली. पण त्याचं उत्तरही तेवढंच समाधानकारक मिळतं. ही मायबोली नसती तर एवढा मित्र परिवार नस्ता, हा एवढा मोठा मायबोली कुटूंब उभाराहीला नसता. एकमेकांना प्रत्यक्ष न पाहीलेले, न भेटलेले असुनही एकमेकांसाठी सदैवे तत्पर असलेले मदतीचे हात भेटले नसते. मायबोलीचा ववी, गणेशोत्सव, दिवाळीअंकासारखे कार्यक्रम पाह्ता, एकमेकांसाठीची- मायबोलीसाठींची प्रत्येकाची ओढ, तळमळ मला पाहता आली नसती. भांडताना एकमेकांवर तुटुन पडनारे, पण गरजेच्यावेळी एकमेकांसाठी तुटुन पडनारे मायबोलीकर भेटले नसते.
सध्याला एवढेच मुद्दे माडतोय. बाकीचे मुद्दे मायबोली प्रशासकांशी चर्चा करुन वेळोवेळी मायबोलीवर प्रकाशीत केली जातील .
जाता जाता एकचं सांगावसं वाटतोय, प्रत्येक घरात भांडणं होतातच. प्रश्न त्याचा नाही. प्रश्न याचा आहे की कोणाशी भांडताय. भांडायचच असेल तर व्यक्तीच्या विचारांशी, त्याच्या मतांशी भांडा, व्यक्तीशी नव्हे. रोगी व्यक्तीला मारण्यापेक्षा रोगाला मारा.
- Adm!n...
मल्ल्या कडक
मल्ल्या कडक
अहो अॅडमिन, लक्ष द्या जरा
अहो अॅडमिन, लक्ष द्या जरा इथे
मस्तच
मस्तच
मस्त मल्ल्या!
मस्त मल्ल्या!
अहो अॅडमिन, लक्ष द्या जरा
अहो अॅडमिन, लक्ष द्या जरा इथे +१
रोगी व्यक्तीला मारण्यापेक्षा
रोगी व्यक्तीला मारण्यापेक्षा रोगाला मारा. >>>> +११११११
खुप मस्त मल्ली.. प्रभावी लेखन..
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मस्त!
मस्त!
मस्त लिहिलयसं मल्ली !
मस्त लिहिलयसं मल्ली !
नियमाप्रमाणे काल्पनिक
नियमाप्रमाणे काल्पनिक व्यक्तिमत्वावर लिहायचे असल्याने बहुधा सर्वाधिक योग्य व्यक्तीमत्वावर आपलाच लेख असावा असे वाटते.
(एक तुम्हाला आणि एक माननीय प्रशासकांना)
मस्त लिहीलय
मस्त लिहीलय
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
आवडलं.
आवडलं.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
अभिनंदन MallinathK
अभिनंदन MallinathK
मल्ली, अभिनंदन!!!
मल्ली, अभिनंदन!!!
आय्ल्ला....!!! असं कसं झालं ?
आय्ल्ला....!!! असं कसं झालं ?
अॅडमीन साहेब, इकडे लक्ष द्या. चुकुन काहीतरी चुकलं असनार नक्कीच...
झकास्स बे मल्ल्या अभिनंदन !
झकास्स बे मल्ल्या
अभिनंदन !
अभिनंदन....
अभिनंदन....
मल्ल्या राखलस हो नाव
मल्ल्या राखलस हो नाव
हाबिनंदन
तुम्च्यामुळे हो स्गळं तुमचेच
तुम्च्यामुळे हो स्गळं
तुमचेच आभार मानायला हवे
मनःपुर्वक आभार सर्वांचे...!!!
अभिनंदन....
अभिनंदन....
अभिनंदन.!!!
अभिनंदन.!!!
धन्यवाद कामीनीजी आणि
धन्यवाद कामीनीजी आणि स्पार्टाकसजी
अभिनंदन.....
अभिनंदन.....
अभिनंदन.!!!
अभिनंदन.!!!
मल्लीण्णा, मस्त लिहिलय.
मल्लीण्णा, मस्त लिहिलय. अभिनंदन.