झटपट चिरोटे

Submitted by प्रभा on 1 July, 2014 - 13:12
zatpat chirote
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेकरीत मिळते ती खारी २०० ग्रॅम , साखर २५० ग्रॅम, ,जायफळ- विलायची पावडर, केशर, तुप.

खारी २०० ग्रॅम, साखर २५० ग्रॅम, जायफळ - विलायची पावडर , केशर , तुप

क्रमवार पाककृती: 

प्रथम साखरेचा पक्का पाक बनवुन घ्यावा .त्यात जा - वि पावडर , केशर व २ - ३ चमचे तुप घालावे .
नंतर त्या पाकात १- १ खारी टाकावी. याप्रमाणे सर्व खारी पाकात टाकल्यावर हलक्या हाताने खाली-वर कराव्या. सगळ्या खारींना चांगला पाक लागायला हवा. १-२ मिनिटांनी गॅस बंद करावा. त्यानंतर एका ताटाला तुप लावुन घ्यावे. व त्यात १-१ खारी थोड्या- थोड्या अंतरावर काढुन ठेवावी. थंड झाल्यावर
डब्यात भरुन ठेवावी. तयार झटपट चिरोटे अगदी कुरकुरीत.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी.
अधिक टिपा: 

कुठल्याहि बेकरीत खारी मिळते. आमच्या येथे पालेकर बेकरीत मिळते. त्यामुळे नेहमीच केल्या जात. छान कुरकुरीत होतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉट इज चिरोटे? >> गोड खाऱ्या >>> !!! नाय ग. महत्त्वाचा फरक म्हणजे चिरोटा तळतात, खारी भाजतात. आता हल्ली ज्यातत्यात Low Fat लागत म्हणून करंजी सुद्धा बेक करतात. सगळ्या पुल्लिंगी फराळामध्ये करंजी आणि चकली तशा दासी-बटकीच. त्यांना कसहि वागवा मी काय म्हणणार नाही बघ. पण चिरोटा आणि चिवडा कसे - जरा मानाने वागवावे असे.

>>>पण चिरोटा आणि चिवडा कसे - जरा मानाने वागवावे असे.
सिमन्तिनी, म्हणजे आता केलॉग्ज कॉर्न फ्लेक्स वापरुन केलेला मक्याचा चिवडा ह्याला कशी वागणूक द्यावी ? Proud

मक्याचा चिवडा परवडला. राइस क्रिस्पी सिरीयलचा केलेला चिवडा कुणी तरी 'स्नेही' दगडी पोह्याचा नाशिक चिवडा म्हणून मला खाऊ घालत होत Sad चांगल लागत पण तरी... Sad

Pages