अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोव्यातील विजेच्या दरांबद्दल वाचलं. तिथे मुळातच कंपन्या कमी दर लावताहेत की सरकार सबसिडी देतंय? गोव्याचं बजेट रेव्हेन्यु सरप्लस असतं. गोव्यासारख्या राज्याची तुलना इतरांबरोबर करता येईल का हा प्रश्नही आहे.
शेवटी या बातम्या पहा : (मार्च /एप्रिल २०१३)
http://timesofindia.indiatimes.com/city/goa/Govt-to-stop-buying-power-fr...

http://profit.ndtv.com/news/industries/article-goa-renegotiates-power-ta...

Reliance Infrastructure Limited has agreed to rework the power tariff with the Goa government, following the latter's decision to stop power purchase due to high cost.

State Power Minister Milind Naik told the legislative assembly yesterday that the company, which has a power generating plant at Sancoale industrial estate, has offered power supply at Rs. 8.58 per unit instead of the existing average rate of Rs. 13.53 per unit.

<<तेवढ १० वर्षाची विज बिल बाकी का माफ़ केली ते कारण ही लिहा.>>

हे कुठे ऐकलंत तुम्ही? १० वर्षांची बिलं माफ केल्याचं मला माहीत नाही. लिंक द्याल का?

बिजली-आंदोलनात सहभागी झालेल्यांची १० महिन्यांची बिलं माफ केल्याचं ऐकलं होतं.
एकूण १० लाख लोकांनी पेटिशनवर सह्या केल्या होत्या, पण प्रत्यक्षात २४,००० लोकांनी बिलं भरायचं बंद केलं होतं. सिव्हिल डिसोबेडियन्स - सत्याग्रहामध्ये भाग घेतल्याबद्दल, अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल प्रोत्साहन म्हणून असं केलं होतं.

सिव्हिल डिसोबेडियन्स - सत्याग्रहामध्ये भाग घेतल्याबद्दल, अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल प्रोत्साहन म्हणून असं केलं होतं.>>>>>>>>>>

मिर्चीताई हे अत्यंत चुकिचे आहे, नैतिक दृष्ट्या सुद्धा.
तुम्हाला जर विज कंपनी फसवते असे जर वाटत असेल तर वापरलेल्या वीजेचे बील न भरणे म्हणजे पाप ( फक्त गुन्हा नाही ) आहे. कंपनी कडुन वीज घेत होतात तेंव्हा काय रेट ने मिळते आहे ते माहीती नव्हते का?

सिव्हिल डिसोबेडियन्स : जस खरेच हे करायचे असेल तर लोकांनी वीज वापरणे बंद करावे. कंपनीला सांगावे, रेट कमी करत असाल तर वापरू. नाहीतर तुमची वीज नको. आधी वीज वापरायची आणि नंतर बीले द्यायची नाहीत ह्याला फुकटे पणा म्हणतात "सिव्हिल डिसोबेडियन्स"" नाही.

मला एक सांगा कुणीतरी.
प्रायव्हेट सिटीझन, अर्थात कुणी एकट्या नागरिकाने, स्वतःपुरती, किंवा समजा एका बिल्डिंगपुरती वीज तयार करतो अन विकतो, (म्हणजे बिल्डीगमधेच, प्रायव्हेट सर्कुलेशन ओन्ली) म्हटले, तर चालते का?
माझ्या माहितीप्रमाणे हे अलाऊड नाहिये.
साधा जनरेटर लावायचा म्हटला तरी हापिशल परवानगी घ्यायला लागते.

मुद्दा असा, की विद्युतनिर्मिती व पारेषण, हे सरकारी अखत्यारीतले विषय आहेत, हे बरोबर आहे का?

http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/AAP-govt-rewards-protester...

http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Delhi-HC-stays-AAP-govts-d...

http://news.oneindia.in/india/plea-against-aaps-power-bills-waiver-dispo...

आंदोलनाचा भाग म्हणून थकबाकी माफ करणं हे चूकच आहे. पण इतर अनेक कारणांनी अनेक राज्ये अशी थकबाकी माफ करत असतात.

<<सिव्हिल डिसोबेडियन्स : जस खरेच हे करायचे असेल तर लोकांनी वीज वापरणे बंद करावे. कंपनीला सांगावे, रेट कमी करत असाल तर वापरू. नाहीतर तुमची वीज नको.>>

कोण सांगणार हे? नागरिक? की सरकार? कुठलं सरकार?

कॉंग्रेसचं सरकार असताना भाजपा काय म्हणत होतं बघा -
BJP accuses Sheila Dikshit of nexus with discoms, DERC for power tariff hike

"He alleged that the government has formed an unholy nexus with discoms and DERC and announced that his party will launch an agitation on the issue on June 18.
Goel said that the people of Delhi "are aghast at the fact that here was a chief minister who instead of controlling the DISCOMS free run, throws up her hand in air and says 'What can I do?' when people confront her on the issue of power tariff and power outages".

आता दिल्लीत अप्रत्यक्षरित्या भाजपाचं सरकार आहे तर काँग्रेस काय करतंय बघा -
Congress workers protest outside BJP headquarters against power and water crisis in Delhi
"Since the BJP government has come into power, the people are not getting proper water and electricity supply. The poor can't afford inverter or generator. Narendra Modi is responsible for it so we want the BJP to fall."

वीजकंपन्यांना सरळ करायला ज्यांना सगळ्या व्यवहारातून स्वतः मलई खायची नाहीये अशी केजरीवालांसारखी व्यक्तीच हवी.

वीजदर वाढवायच्या आधी लोडशेडिंग करून लोकांना हैराण करायचं ही नेहमीची खेळी वीजकंपन्यांनी आपच्या काळातही केली.Brace yourself for 10-hour power cuts, says BSES Yamuna
केजरीवालांनी परवाने रद्द करायची धमकी दिल्यावर लोडशेडिंग रद्द झालं.

"The discoms Thursday said they would be forced to resort to load shedding in the national capital because of "cash constraints".
However, the chief minister dismissed media reports over power cuts and said: "The power companies are trying to create panic among the people. But I want to warn them, if they try to create panic, action will be taken against them."
Kejriwal said that, if needed, new power companies will be brought in to supply electricity in Delhi.
"There are not only Tata and Ambanis in the country. If needed, we will bring new power companies to Delhi,"
he said."

<<मिर्चीताई हे अत्यंत चुकिचे आहे, नैतिक दृष्ट्या सुद्धा.>>

अशी वीजबिलं माफ करणं योग्य की अयोग्य ह्यावर दुमत असणार. मला स्वतःला पण एक बाजू घेता येत नाहीये.
'We can either live and eat or pay the electricity bill' असे किस्से ऐकले की निर्णय योग्य वाटतो. कंपन्यांच्या लबाडीचा त्रास अशा लोकांनी का सोसायचा असं वाटतं.
पण ज्यांनी दुप्पट बिल येऊनही नियमित भरलंय अशा लोकांवर अन्याय झाल्याची भावनाही बरोबर वाटते.

भरत मयेकर,

गोव्याची तुलना मोठ्या राज्याशी नाही करु शकत पण दिल्लीशी नक्कीच करु शकतो. ( दोन्ही राज्यात शेती कमी किवा नाहीच. मोठ्या राज्यात शेतिला कमी दरात विज दिल्यामुळे थोडा ताण पडतो ) गोव्याचे वित्तिय surplus मध्ये आहे तर विज मंडळाला २०१३-१४ साठी ११४ कोटीचे अनुदान मिळाले . (३% of total spending, हे नसते तर युनिट ला ३.३० द्यावे लागतिल ) २०१२३-१३ ला २१३ कोटीचे अनुदान मिळाले. अनुदान दर वर्षी कमी होत चालले आहे. (http://www.electricity.goa.gov.in/index_files/TARIFF%20DATED%2030%20Marc... पान २८५ ).

ह्याच रिपोर्ट मधे आहे की गोवा peak power रिलायन्स कडुन घेते. त्याचा दर १३ वरुन ९ वर आणला आहे. तसेच मोठ्या कंपन्यना संध्याकाळी २० % जास्त दर तर पहाटे १०% कमी दर लावतात. त्यामुळे peak power कमी लागते आणी मडंळाचा खर्च कमी होतो.

पर्रिकर खरच चांगले काम करत आहेत. त्याना जर महाराष्ट्रा सारख्या मोठ्या राज्यात आणले तर काय improvement होईल ते पहायला आवडेल. ( ते शक्य वाटत नाही !)

मिर्ची,

समजा तुम्हाला LCD TV घ्यायचा असेल आणि तो chorme सारख्या chain store मध्ये जर २५% स्वस्त मिळत असेल तर तुम्ही तिकडेच घेणार ना. जरी त्या कंपनीचा CEO त्याचा Board of Director ला परदेशी vacation ला पाठवत असले तरी. ( we don't care what company does. As long as they are ethical , no cheating, we go to them again & again. If they sell at higher price then we go to other shop)

तसेच राज्याचा मुख्यमंत्री हा CEO असतो तर राज्याचा मंत्री हे Board of Director असतात. फरक येवढाच की जर ह्या नी ५ वर्ष चांगले काम नाही केले तर लोक त्याना त्याची जागा दाखवतात . जर त्यानी चांगले काम केले तर त्याना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. देश चालवंणे हा काही charitable trust चालवण्यासारखे नाही.
आणी त्यात उच्चशिक्शित लोक आले पाहिजेत. They are stakeholder of whole population. We need people from all discipline IIT engineers, MBA, Doctors who can perform & increase quality of life. आणि त्यासाठी they must get paid well if they perform. All peoples will not be like Modi, Ak Anthony , Pruthviraj Chavan, or Perrikar who can serve nation without taking big compensation. (AK Anthony is very honest person but may not be suitable because he is too slow to take decision) . Paying good to minister will reduce corruption.

Otherwise no good people will join politics. All major countries & states pay their minister's vacation. I do not see anything wrong with Goa government. People can throw them out in next election (for sending ministers to football match) but they may not able to get efficient government & in end they will pay more for electricity , petrol & all commodities.

तुमच्या बाकी मुद्यावर वेळ मिळेल तेव्हा लिहिन.

सहिल शहा, मी दिलेल्या बातमीतले हे वाक्य पहा. has offered power supply at Rs. 8.58 per unit instead of the existing average rate of Rs. 13.53 per unit. दर दोन तृतीयांशाच्या खाली आणायला रिलायन्स इन्फ्रा तयार झाली म्हणजे त्यांचं प्रॉफिट मार्जिन किती असावं याची कल्पना येते. वीजदरनिश्चितीसाठी (म्हणजे भाववाढीला मान्यता देण्यासाठी) प्रत्येक राज्यात एक प्राधिकरणही असते तरी हा प्रकार.
यावरून पॉवर कंपन्यांचे सीएजी ऑडिट करायचा आपचा निर्णय योग्य होता हेच लक्षात येते आहे.

lcd tv च्या उदाहरणाबाबत : जरी त्या कंपनीचा CEO त्याचा Board of Director ला परदेशी vacation ला पाठवत असले तरी : This may not matter to conusmers with deep pockets, but it should matter to the shareholders. The people of a state are not just customers, they are shareholders.

भारताने मिक्स्ड इकॉनॉमी आणि वेल्फेअर स्टेटची कल्पना स्वीकारलेली आहे. (मोदीही वेगळे काही म्हणणार नाहीत). तेव्हा राज्य चालवणे हे एक कंपनी चालवण्याबरोबरच चॅरिटेबल ट्रस्ट चालवण्यासारखे सुद्धा आहे.

७००

"All major countries & states pay their minister's vacation. I do not see anything wrong with Goa government"

They are not saying it is a vacation. If you say so, they themselves may not agree with you.

You have been comparing the state with a pvt. lit. company again and again. Which itself is not acceptable.

कोण सांगणार हे? नागरिक? की सरकार? कुठलं सरकार? >>>>> ज्या नागरीकांना सिव्हिल डिसोबेडियन्स करायचा आहे त्यांनी करावा कोणी अडवले आहे? सरकार नी कशाला सांगावे. सिव्हिल डिसोबेडियन्स म्हणजे फुकटेपणा नाही.

आप नी NGO Style वागणे सोडावे. सर्व मुक्त अर्थव्यवस्थांमधे Regulator ही योजना असते. आप ने फक्त इतके बघावे की Regulator व्यवस्थोत काम करतो आहे. इतके जरी केले तरी सर्व ठीक होइल.
Regulator जर नीट काम करत नसेल तर न्यायालये आहेतच.

<<देश चालवंणे हा काही charitable trust चालवण्यासारखे नाही.
आणी त्यात उच्चशिक्शित लोक आले पाहिजेत. They are stakeholder of whole population. We need people from all discipline IIT engineers, MBA, Doctors who can perform & increase quality of life.>>

वाचकांना गृहपाठ. आपापल्या विभागात उभ्या राहिलेल्या उमेदवारांमध्ये जास्त शिक्षित, स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार कुठल्या पक्षाचे होते ते एकदा पाहून घ्या. Happy
आपण मीरा संन्यालला डावलतो आणि अर्थव्यवस्था सुधारण्याची आशा बाळगतो. आपण राष्ट्रपतीपदक विजेते सुरेश खोपडेंना डावलतो आणि कायदा-सुव्यवस्थेची अपेक्षा करतो.
दुटप्पी समाज आहोत आपण. Sad

<who can serve nation without taking big compensation>>

ह्या वाक्यातील मोदींच्या नावाशी १०१% असहमत Proud असं का, ह्यासाठी ढीगाने उदाहरणं देता येतील, पण तो ह्या धाग्याचा विषय नाही.
तुमच्या बाकी मुद्द्यांना मयेकरांनी दिलेल्या उत्तरांना अनुमोदन.

<<ज्या नागरीकांना सिव्हिल डिसोबेडियन्स करायचा आहे त्यांनी करावा कोणी अडवले आहे? सरकार नी कशाला सांगावे. सिव्हिल डिसोबेडियन्स म्हणजे फुकटेपणा नाही.>>

सरकार कशासाठी असतं मग? लोकांच्या पैशातून स्वतःची आणि कंपन्यांची तिजोरी भरायला?
रच्याकने, मीठाच्या सत्याग्रहाबद्दल काय मत आहे तुमचं? तोही एक सिव्हिल डिसोबेडियन्सच होता ना.

<<आप नी NGO Style वागणे सोडावे. सर्व मुक्त अर्थव्यवस्थांमधे Regulator ही योजना असते. आप ने फक्त इतके बघावे की Regulator व्यवस्थोत काम करतो आहे. इतके जरी केले तरी सर्व ठीक होइल.Regulator जर नीट काम करत नसेल तर न्यायालये आहेतच.>>

न्यायालयांचं ऐकतात का ह्या कंपन्या? वाचा - Delhi Discoms not cooperating despite HC order: CAG

आतातर नवीन कॅगच्या नेमणूकीबद्दलच शंका आहे. त्यामुळे इथून पुढे कॅगचे रिपोर्ट्स तरी विश्वासार्ह मानायचे की नाही हा प्रश्न येणार. न्यायव्यवस्थेची आतली काळी बाजू काल जस्टिस काटजूंनी मांडलीच आहे.

"लश्कर भी तुम्हारा,सरदार भी तुम्हारा
तुम झूठ को सच लिख दो,अखबार भी तुम्हारा
इसकी शिकायत करते तो कहाँ करते
सरकार तुम्हारी,दरबार भी तुम्हारा" Happy

उदयन +१
गुजरातची प्रगती झाली असं म्हणणार्‍या किंवा मानणार्‍या (आमयासारख्या रिकामटेकड्यांपैकी) कोणीही व्यवस्थित मुद्दे मांडून, दाखले देऊन आम्हाला पटवून द्यावं ही विनंती (आव्हान :डोमा:)आहे.

मीठाच्या सत्याग्रहाबद्दल काय मत आहे तुमचं? तोही एक सिव्हिल डिसोबेडियन्सच होता ना.>>>>>>>

मिर्चीताई, गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रहाबद्दल तुम्हाला जास्त माहिती असल्यास नक्कीच आम्हाला त्याबद्दल सांगा, तेव्हढीच आमच्या ज्ञानात भर पडेल.

मिठ हे समुद्राच्या पाण्यापासुन नैसर्गिकरित्या बनवु शकत असताना त्यावर नागरिकांनी कर का द्यावा हा महत्वाचा मुद्दा होता. तुम्हाला जर नागरिकांना फुकट वीज उपलब्ध करून द्यायची असेल तर निसर्गात जी वीज पडते तीचा वापर करण्याबद्दल एखादं तंत्रज्ञान उपलब्ध करून द्या. वीजनिर्मिती करणार्‍या कंपन्या काहीही न करता वीज निर्माण करतात असं तुम्हाला वाटते का?

निदान एखाद उदाहरण देताना विचार करण्याची तसदी घ्याल का?

अरे बहुमत है भाय....... गुजरात मे भी ऐसाच हो रैला था ... अधिवेशन के आखरी दिन मे कॅग का रिपोर्ट मांडणे का .. और बिनाचर्चा किये अधिवेशन गुंडाळणे का....

Biggrin

मीठाच्या सत्याग्रहाबद्दल काय मत आहे तुमचं? तोही एक सिव्हिल डिसोबेडियन्सच होता ना.>>>>>>

काय बोलताय तुम्ही मिर्ची ताई? काय तुलना आहे का?

मीठाचा सत्याग्रह हा एकतर परकीय सरकार विरुद्ध होता.
दुसरे म्हणजे आधी मीठ विकत घेउन मग मी त्याचे पैसे देणार नाही असा प्रकार नव्हता.
तो सत्याग्रह लाक्षणीक होता, चिमुटभर मीठ उचलुन केलेला. मीठाची गोदामे लुटली नव्हती.

<<मिर्चीताई, गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रहाबद्दल तुम्हाला जास्त माहिती असल्यास नक्कीच आम्हाला त्याबद्दल सांगा, तेव्हढीच आमच्या ज्ञानात भर पडेल.>>

मला एवढं माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मीठाच्या सत्याग्रहाचं महत्वाचं स्थान आहे.

<<मिठ हे समुद्राच्या पाण्यापासुन नैसर्गिकरित्या बनवु शकत असताना त्यावर नागरिकांनी कर का द्यावा हा महत्वाचा मुद्दा होता. तुम्हाला जर नागरिकांना फुकट वीज उपलब्ध करून द्यायची असेल तर निसर्गात जी वीज पडते तीचा वापर करण्याबद्दल एखादं तंत्रज्ञान उपलब्ध करून द्या. वीजनिर्मिती करणार्‍या कंपन्या काहीही न करता वीज निर्माण करतात असं तुम्हाला वाटते का?
निदान एखाद उदाहरण देताना विचार करण्याची तसदी घ्याल का?>>

वीजकंपन्या कच्चा माल कुठून आणतात? आपलाच आहे ना? वीज बनवण्यासाठी जो खर्च येतो तो अधिक योग्य नफा वसूल होण्याची काळजी करार करताना कंपन्यांनी घेतली नसेल का?
दिल्लीतील वीजकंपन्या कुठून वीज आणतात आणि तिथलं उत्पादन का कमी आहे हे वाचा. Delhi has no gas for its power plants
"The biggest of these, the 1,500 MW Bawana power plant, able to produce only up to 320 MW when fully functional, is in "shutdown" mode due to non-availability of gas."
आता मागच्या पानांवर केजीबेसिन घोटाळ्याबद्दल सविस्तर लिहिलं होतं ते पुन्हा एकदा वाचून घ्या. काही संबंध वाटतोय का?

भरत मयेकर,

>> तेव्हा राज्य चालवणे हे एक कंपनी चालवण्याबरोबरच चॅरिटेबल ट्रस्ट चालवण्यासारखे सुद्धा आहे.

आपला फुल्टू पाठिंबा. राजा म्हणजे राज्याचा उपभोगशून्य स्वामी. शिवाजीमहाराज असेच होते. आज राजाच्या जागी राज्यकर्ता म्हणावं लागेल एव्हढंच.

आ.न.,
-गा.पै.

<<मीठाचा सत्याग्रह हा एकतर दुसर्‍या देशाच्या सरकार विरुद्ध होता.
दुसरे म्हणजे आधी मीठ विकत घेउन मग मी त्याचे पैसे देणार नाही असा प्रकार नव्हता.
तो सत्याग्रह लाक्षणीक होता, चिमुटभर मीठ उचलुन केलेला. मीठाची गोदामे लुटली नव्हती.>>

लाक्षणिक होता ह्या वाक्याशी असहमत.
दुसर्‍या देशाच्या सरकारविरुद्ध होता हे मान्य. पण आत्ताचं सरकार तरी कुठे आपलं सरकार आहे? भांडवलदारांचं सरकार आहे.
दिल्लीचा विषय चालू आहे म्हणून - कंपन्या कॅग ऑडिट होऊ देत नाहीत,तरी परवाच सरकारने पुन्हा वीजदर वाढवले, मग केंद्रसरकारकडून सबसिडी घेतली. म्हणजे पुन्हा करदात्यांच्या पैशातून फायदा कंपन्यांनाच.
आपने दिलेल्या सबसिडीबद्दल आधी इतका हिरीरीने विरोध, दुष्प्रचार केला, स्वतः काय केलं?
No new tax in Delhi Budget, Rs 260 crore for power subsidy - दिल्ली केंद्रसरकारच्या अखत्यारीत असताना नवीन टॅक्स लावताच येत नाहीत. पण त्याचंही क्रेडिट घेतलं Lol

गापै +१
कुठेतरी वाचलं होतं - "Politics should not be a lucrative career. It's an honour given by people to be chosen as their representative !"
आपल्याकडे उलटं आहे.

आपलं सरकार आहे? भांडवलदारांचं सरकार आहे.>>>>

तुम्हाला कीतीही पटले नाही तरी ते भांडवलदार, मंत्री, सरकारी नोकर, वीज कंपनी मधे काम करणारे लोक, त्यांचे ऑडेटर, Regulator, न्यायाधीश, वकील ही सर्व मंडळी भारतीयच आहेत. त्यामुळे ते तुमचेच सरकार आहे.

ते चोर आणि आम्ही साव हा अभिनवेश जेंव्हा सोडाल तेंव्हाच काही होउ शकते.

खरे तर तुम्ही असे म्हणा की, आपण सर्व चोर असल्यामुळे आमच्यातुन जे सरकार, भांडवलदार तयार झाले ते पण चोर निघाले

<<तुम्हाला कीतीही पटले नाही तरी ते भांडवलदार, मंत्री, सरकारी नोकर, वीज कंपनी मधे काम करणारे लोक, त्यांचे ऑडेटर, Regulator, न्यायाधीश, वकील ही सर्व मंडळी भारतीयच आहेत. त्यामुळे ते तुमचेच सरकार आहे.
ते चोर आणि आम्ही साव हा अभिनवेश जेंव्हा सोडाल तेंव्हाच काही होउ शकते.
खरे तर तुम्ही असे म्हणा की, आम्ही चोर असल्यामुळे आमच्यातुन जे सरकार, भांडवलदार तयार झाले ते पण चोर निघाले>>

शेवटच्या वाक्याबद्दल मानहानीचा दावा करू का ? Wink
बहुतांश भारतीय चोर नाहीत. प्रामाणिकपणे काम करून पैसा मिळवण्याच्या पक्षात असलेले जास्त आहेत.
सरकारी अधिकार्‍यांमध्येही सगळे चोर नाहीत. पण जे आहेत त्यांना निवडून शिक्षा व्हायलाच पाहिजे.
जे साव आहेत त्यांनी "आम्ही साव आहोत" हे म्हणण्यात कसलाही अभिनिवेश नाही.

मिर्ची,

>> वीज बनवण्यासाठी जो खर्च येतो तो अधिक योग्य नफा वसूल होण्याची काळजी करार करताना कंपन्यांनी
>> घेतली नसेल का?

योग्य नफा हा कळीचा शब्दप्रयोग आहे इथे. आस्थापने वीजदर अवास्तवपणे वाढवून नफेखोरी करतात. त्यास चाप लागायला हवा.

इथे इंग्लंडमध्ये वीज आणि पाणी आस्थापनांवर कडक लक्ष ठेवलेलं असतं. गॉर्डन ब्राऊन पंप्र होता तेव्हा त्याने ऊर्जा (वीज व वायू) आस्थापनांना थेट धमकी दिली की एकतर दर कमी करा किंवा कचकचीत पांढऱ्या उखळीचा कर (विंडफॉल टॅक्स) भरा. आस्थापनांनी निमूटपणे दर कमी केले.

यासंबंधी राशी (डेटा) येथे आहेत : http://www.uswitch.com/gas-electricity/guides/gas-electricity-prices/
ऑगस्ट २००८ पर्यंत किमती चढ्या होत्या. गॉर्डन ब्राऊनचं ३१ जुलै २००८ ची धमकीचं भाषण ऐकल्यावर सप्टेंबर २००८ नंतर दर खाली उतरू लागले.

आ.न.,
-गा.पै.

वीजकंपन्या कच्चा माल कुठून आणतात? आपलाच आहे ना?>>>>>>>

मिर्चीताई, तुम्ही जे प्रश्न विचारलेत ते मुळात हास्यास्पद आहेत. वीजकंपन्याना जो कच्चा माल लागतो तो सुध्दा त्यांना बाजारभावाने विकत घ्याव लागतो. त्यांना तो जरी देशातंर्गत उपलब्ध असेल तरी कोणीही फु़कट देत नाही. त्याशिवाय वीज वितरण व्यवस्था, त्याची देखभाल, कर्मचार्‍यांचे पगार इत्यादी अनेक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी त्यांना खर्च येतोच. यूरो यांनी त्यांच्या एका प्रतिसादात ही गोष्ट अधिक स्पष्ट मांडली आहे.

हे मी तुम्हाला सांगतोय त्याचे कारण आहे तुम्ही मिठाच्या सत्याग्रहाचे उदाहरण दिल्लीतील जनतेने वीजेची बिले न भरण्याच्या आंदोलनासाठी दिले होते म्हणुन जे मला रूचले नाही. कारण त्याला तुम्ही सिव्हिल डिसोबेडियन्स म्हणत आहात हे ध्यानात घ्या.

बाकी तुमच्या कोणत्याही मुद्यांवर मला आक्षेप नाही आहे.

टोचाभौ,
'आम्ही' चं 'आपण' केलंत होय? घाबरू नका, नाही करणार मानहानीचा दावा Proud

<<गॉर्डन ब्राऊन पंप्र होता तेव्हा त्याने ऊर्जा (वीज व वायू) आस्थापनांना थेट धमकी दिली की एकतर दर कमी करा किंवा कचकचीत पांढऱ्या उखळीचा कर (विंडफॉल टॅक्स) भरा. आस्थापनांनी निमूटपणे दर कमी केले. >>

हेच केजरीवालांनी केलं. पण इंग्लंडच्या पंप्रचं कौतुक आणि आपल्या मुमंचं मुळी कौतुकच नाही तुम्हाला Wink

ओके बाय. आता उद्या.

गुजरातची प्रगती झाली असं म्हणणार्‍या किंवा मानणार्‍या (आमयासारख्या रिकामटेकड्यांपैकी) कोणीही व्यवस्थित मुद्दे मांडून, दाखले देऊन आम्हाला पटवून द्यावं ही विनंती (आव्हान डोळा मारा)आहे.>>>

निव्वळ वीज दर हाच निकष मानला तर दिल्ली आणि गुजरातची तुलना होउ शकत नाही. दिल्लीच्या समस्या वेगळ्या आहेत, गुजरातच्या वेगळ्या. दिल्लीची भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे, गुजरातची भिन्न. गुजरातमध्ये अर्बन, सेमीअर्बन, रूरल हे सर्व भाग आहेत तर दिल्ली "मुख्यत्वे" अर्बन भाग आहे. विजेच्या वापराची परिस्थितीदेखील भिन्न आहे.

लाक्षणिक होता ह्या वाक्याशी असहमत.<<< मिठाचा सत्याग्रह लाक्षणिकच होता. असहकाराची चळवळ लाक्षणिक नव्हती. इतिहास वाचा.

Pages