चीजी पराठा साठी साहित्यः-
१ वाटी कणिक,
प्रत्येकी १/२ टी स्पून मिक्स हर्ब , मीठ व चिली फ्लेक्स.,दालचिनी पुड
१ चमचा साय--मोहनासाठी.
१ चमचा टोमॅटो केचप.
१ चीज स्लाईस किंवा १ चमचाभर चीजस्प्रेड.
१ टोमॅटो
चवीपुरते मीठ.
१ टेबलस्पून तूप/बटर/तेल पराठयाला वरुन लावायला.
रायता साहित्य :--
२ कमी तिखट असणार्या हिरव्या मिरच्या,
१ चमचा भाजलेले तीळ,
१ चमचा साय,
१/२ चमचा मोहोरीची डाळ ,चवीनुसार मीठ.
१ कप दही.,
चीजी पराठा :--
टोमॅटो चिरुन त्यात २-३ चमचे पाणी घालुन मावेत ३० सेकंद ठेवा.थंड झाले कि मिक्सरमधे फिरवुन वाटुन घ्या.
आता कणकेमधे इतर सर्व साहित्य घालुन एकत्र करा आणि लागेल तितकी टाँमॅटॉ प्युरी घालुन पोळ्यांसारखी भिजवुन घ्या.इथे मोहनासाठी तेला/तूपाचा वापर न करता साय वापरली आहे.जर मिक्स हर्ब्स नसले तर ड्राय बेसील किंवा ७-८पुदीना पाने हाताने तोडुन घालावी.दालचिनी पुड मात्र घालायलाच हवी.कणकेच्या गोळ्याला वरुन तेलाचा हात फिरवुन ५ मिनिटे झाकुन ठेवा.
आता मोठया पुरीच्या आकाराचे थोडेसे जाडसर लाटुन तव्यावर मंद आचेवर थोडेसे तेल/तूप/बटर लावुन छान खरपुस भाजुन घ्या.हे पराठे थंड झाल्यावर ही मऊ/खुसखुशीत रहातात..त्यामुळे डब्याला किंवा प्रवासासाठी योग्य.आहेंत.
रायता :--
हिरव्या मिरच्या गॅसच्या आचेवर भाजुन घ्या.त्यातील बिया काढुन चिरा.
ही मिरची,तीळ,मोहोरीची डाळ व साय एकत्र करुन मिक्सरमधे वाटा.
चमच्याने दही फेटुन घ्या त्यात हे वाटलेले मिश्रण घाला.चवीनुसार मीठ घाला.कोथिंबीर घाला.
जर रायते घट्ट वाटले तर थोडेसे पाणी घाला.
वा, छान रेसिपी! धागा फक्त
वा, छान रेसिपी!
धागा फक्त ग्रूप सभासदांसाठी झाला आहे.
छान प्रकार. चीज अमूलचे वापरले
छान प्रकार. चीज अमूलचे वापरले होते का ?
दिनेशदा, इथे मी ब्रिटानीया चे
दिनेशदा, इथे मी ब्रिटानीया चे चीज स्लाईस वापरले आहे. या आधी ,मी चीज स्लाईस/स्प्रेड अमुल चे वापरले आहे.
प्रमाण -१ वाटी कणिक असेल तर १ चमचा चीज स्प्रेड किंवा चीज स्लाईस.
फोटो पाहून भूक खवळली.
फोटो पाहून भूक खवळली.
हे मस्त लागणार.
हे मस्त लागणार. पिझ्झासारखे.
चीज व टोमॅटोचे एकत्रित मस्तच लागते. पिझ्झा म्हणूनच आवडतो
माझे थोडेसे कन्फ्युजन झाले
माझे थोडेसे कन्फ्युजन झाले आहे. चिजचे स्लाइस कणिक मळतानाच टाकायचे का? अख्खेच्या अख्खे कि बारिक तुकडे करुन?
पेरु, कणिक मळताना त्यात इतर
पेरु, कणिक मळताना त्यात इतर सर्व जिन्नस घालायचे .नंतर चीजचे स्लाईस हाताने कुसकरुन टाकायचे त्यानंतर लागेल तितकी टोमॅटो प्युरी घालुन कणिक भिजवायची .त्यावर थोडेसे तेल लावुन मळुन घ्यायची.
झंपी-होय,पिझ्झा च्या जवळपासची चव लागते.
मंजुडी,धन्यवाद.
मस्त.. तोपासु...
मस्त.. तोपासु...
सुलेखा, साय न घालता पराठा
सुलेखा, साय न घालता पराठा करायचा झाल्यास कसा करता येईल?
अरुंधती, मोहनासाठी सायी ऐवजी
अरुंधती, मोहनासाठी सायी ऐवजी तेल/तूप,काहीही घालता येईल...
सुलेखाताई, रायत्यासाठी तु वर
सुलेखाताई,
रायत्यासाठी तु वर साहित्यमधे मोहोरीची पूड असे दिले आहे आणि कृतीमधे मोहोरीची डाळ
यापैकी नक्की काय वापरायचे?
काल मेथीचे पराठे केले होते
काल मेथीचे पराठे केले होते त्यात चमचाभर साय आणि एक चीज क्युब टाकला. मस्त खुसखुशीत झाले होते पराठे.
सही दिसतंय. मंजूडी, मेथी
सही दिसतंय.
मंजूडी, मेथी पराठ्यात साय आणि चीज ची आयडीया मस्त आहे, ट्राय करेन लगेच. चीज किसून टाकलेस का कणकेतच ?
मवा, GO चं क्रिम चीज होतं
मवा, GO चं क्रिम चीज होतं घरी... ती एक क्युब घातली. कणिक भिजवताना आपोआप कुस्करली गेली. आणि दुधाचं पातेलं खरवडलं ती साय चमचाभर होती.
सारीका ,मोहोरीची डाळ च
सारीका ,मोहोरीची डाळ च वापरायची आहे.मोहोरीची डाळ ,तीळ व इतर जिन्नस मिक्सरमधे वाटले कि पुड होते ना !लिखाणात बदल केला आहे.
वाव! सहीच लागत असणार!
वाव! सहीच लागत असणार!
आभारी आहे. अगदी दिल्याबरहुकुम
आभारी आहे.
अगदी दिल्याबरहुकुम नाही पण हाताशी असलेले साहित्य वापरुन तुमच्या कृतीनुसार पराठे आणि रायते केले.
मस्त झाले होते.
तुम्ही दिलेली पाककृती मला पहिल्यांदा सोपी वाटली सुलेखाताई. नेहमी इतकी उस्तवार वाटते की कधी केले नव्हते.
छान पा कृ. मस्त दिसताहेत
छान पा कृ. मस्त दिसताहेत पराठे.