आम्ही सध्या साधारण १.५ ते २ वर्षाच्या मुलाला घेऊन भारत भेटीस जाण्याचा बेत आखत आहोत. भारतात मुक्काम मुंबई व कोकण असा असेल. उन्हाळ्यात जाण्याची इच्छा होती म्हणजे मुलाला आंबे खात आले असते, पण सगळ्यांकडून असा सल्ला मिळत आहे कि उन्हाळ्यात त्याला फारच त्रास होईल. (मुलाचा जन्म अमेरिकेत झाला आहे आणि इकडचे हवामान साधारण थंडच असते, आम्ही वेस्ट coast/कॅलिफोर्निया मध्ये नाही आहोत). तर माझा प्रश्न असा आहे कि त्याला घेऊन खरेच उन्हाळ्यात जाऊ नये का? साधारण भारत भेटीसाठी सर्वात चांगला ऋतू कोणता? पावसाळ्यातही आजार होण्याची शक्यता जास्त असते. नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत थांबावे तर त्याला दिवाळी किंवा गणपतीची मजा अनुभवत येणार नाहि. एकूणच मला फार परस्पर विरुद्ध सल्ले मिळत आहेत म्हणून थोडा गोंधळ उडतो आहे. मदतीबद्दल तुमचे फार आभार!
ता. क. : लहान मुलाला भारत भेटीस घेऊन जाण्याबद्दल काही विशेष सूचना असल्यास त्या कळवल्या तरी मला खूप मदत होइल. उदा: विमान प्रवास, बरोबर न्यायाच्या खाऊ प्याऊ गोष्टी, इतर काळजी वगैरे.
तुमचे मुलाला घेऊन बाहेर फिरणे
तुमचे मुलाला घेऊन बाहेर फिरणे होणार असेल तर उन्हाळा टाळलेलाच बरा.... आतापासूनच तिकडे खूप गरम व्हातला लागले आहे
दिवाळीत जायला काहिच प्रोब्लेम नाही. घरात मुले असतील तर त्यानाही शाळेला सुट्टी असते.
कोणत्याही ऋतूत प्रवास केलात
कोणत्याही ऋतूत प्रवास केलात तरी प्रवासाची बेसिक दगदग आणि त्या अनुषंगाने घडणारे आजारपण हे काही टाळता येणार नाही, तसेच जागाबदल होणारच आहे. व्यवस्थित काळजी घेण्याला पर्याय नाही, तरिही आजारी पडू शकतोच. पण मग त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल, बाऊ करू नका. त्याने मजा करावी अशी इच्छा आहे त्याला मजा करू द्या. हॅव अ हॅपी जर्नी अहेड
तुम्ही एव्हढ्या लहान मुलाला
तुम्ही एव्हढ्या लहान मुलाला पहिल्याच भारत भेटीत सगळेच दाखवु/खाउ घालू इच्छित आहात! या वयात त्याने केलीली मजा त्याच्या कितीशी लक्षात राहिल असे तुम्हाला वाटते? त्यापेक्षा त्याचे आजी-आजोबां आणि मावशी-काका-मामा-आत्या, शाळेतली भावंडं यांच्या दृष्टीने विचार करा. ही सगळी मंडळी त्याच्या आसपास असली की तो खुश असेल आणि तुम्हीही रिलॅक्स असाल.
आत्तापर्यंतच्या प्रत्येक भारत भेटीत उकळून गार केलेले पाणीच वापरणे, हॉटेल मध्ये काहीही न खाऊ घालणे अशी जनरल पथ्ये पाळली आहेत. मुली अगदी लहान असताना कधी आजारी पडल्या नाहीत. अलिकडच्या ट्रीप मध्ये मात्र आजारी होत्या. एकदा निघण्याच्या आदल्या रात्री धाकटी खुप आजारी पडली होती. व्हायरल इन्फेक्शनने.
बाकी लहान मुलांबरोबर रेल्वे/विमान प्रवास, अमेरिकेहून भारतात विमानप्रवास असे अनेक बाफ आहेतच.
बिनधास्त प्लॅन करा कोणताही सीजन! शुभेच्छा!
बिनधास्त जा, काहीही होणार
बिनधास्त जा, काहीही होणार नाही. स्वतःची मात्र काळजी घ्या.
अनुभवाचे बोल !
डिसेंबर, जानेवारी,
डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी...
गोगांना अनुमोदन. बाळाला
गोगांना अनुमोदन. बाळाला पहिलून न्यायला नोव्हेंबर ते फेब्रुवारी बेस्ट महिने आहेत. छान वातावरण, फार उकाडा-पाऊस नाही, डास खूप कमी, सीझनल भाज्या आणि फळं भरपूर. एकूण हेल्दी महिने.
बाकी काय खायला घाला-काय नको, प्रवासाची तयारी या विषयांवर बरेच धागे आहेत. तसंच बाळाचे डॉक्टर कुठली औषधं न्यायला हवीत, कसल्या काळज्या घ्यायला हव्यात याबद्दल मदत करतात.
मी माझ्या इथे जन्मलेल्या
मी माझ्या इथे जन्मलेल्या मुलाला पहिल्यांदा तो वर्षाचा असताना भारतात नेलं होतं ते नोव्हेंबरमध्ये. हवा छान होती. नशिबाने आजारी वगैरे पडला नाही. पाणी उकळून द्यायचं पथ्य कटाक्षाने पाळलं. बाहेर्/नातेवाईंकाकडेही आपण नेलेलं पाणीच देणं हे पाळलं. दुधाचे टेट्रापॅक्स नेले होते भरपूर, तेच त्याच्या बाटलीत भरायचे. त्यामुळे ते ही बाधण्याचा प्रश्न आला नाही. ज्युस वगैरे पहिल्यापासून देत नव्हतेच विशेष. बाकी जेवण वगैरे नेहमीचंच होतं.
नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे सिझन बेस्ट आहेत.
वत्सला + १ थंडीचा सिझन जरी
वत्सला + १
थंडीचा सिझन जरी चांगला असला तरी योग्य काळजी घेतली की कधीही नेले तरी चालते. आम्ही आमच्या दीड वर्षाच्या मुलीला गेल्या वर्षी मे जून मध्ये नेले होते. रेल्वे/कार असा बर्यापैकी प्रवास पण केला होता. वर लिहिलेली सगळी बेसिक काळजी घेतली होती. दोन्ही मुलं (दीड/पाच) एकदाही आजारी पडली नाहीत.
प्रेमाचा ऋतू
प्रेमाचा ऋतू
सगळ्यांच्या प्रतिक्रियांसाठी
सगळ्यांच्या प्रतिक्रियांसाठी फार आभार! बाकीचे धागे चाळतेच आहे सध्या… पण मायबोलीवर खूप मदतीचे सल्ले मिळत आहेत. धन्यवाद.