T-20 विश्वचषक २०१४

Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये Happy
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ? Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिचचा प्रभाव. >> अर्थातच पिच. अरे उपखंडातील पिच वर शॉर्टपिच खेळता येतो. पण मग सा अ , ऑस्ट्रेलिया, एन झी किंवा विंडिज ला गेले की तंतरते.

विंडिज महान आहेत. च्यायला १५० पर्यंत न्या म्हणावं.

पण वे.इंडीज ठरवून आक्रमक खेळ करताहेत, हें निश्चित. एखादाही फलंदाज टिकला तरीही अशादायक स्कोअर होऊं शकतो. पाक क्षेत्ररक्षण आज मजबूत.

५ चा रनरेट आहे भाउ...

यात आक्रमक काय ? Uhoh

मधे मधे सिक्स फोर मारत आहेत पण बाकीचे बॉल तर वायच घालवत आहे

रैना बरोबर म्हणाला स्ट्राईक रोटेशन येत नाही त्यांना

५ चा रनरेट आहे भाउ... >> किती घाई रे तुला भाउ. थोडा धीर धरत जा कि Happy

सॅमी रामदिनच्य नंतर का येतो ? त्याचा current form बघता he should bat higher up. भोगले ला सुद्धा हा प्रश्न पडला होता सकाळी.

१६६ ......... शेवटच्या ५ ओवर्स मधे ८२ रन्स काढले याचा अर्थ फक्त ८४ रन्स त्यांनी १५ ओवर्स मधे काढलेले..

नशिब साथ देते पण दर वेळेला नाही... हे लक्षात घेतले पाहिजे ...

हेच जर १५ ओवर्स मधे १०० - १२० पर्यंत काढले असते तर आज टोटल १८५ च्या वर गेला असता..

असामी घाई नाही हो...

कॅल्युलेशन होते.. सामी आणि कधी नाही ते ब्राहो.. खेळुन गेला ..

जुगार दर वेळेला जिंकला जात नाही

<< जुगार दर वेळेला जिंकला जात नाही >> मला वाटतं यात जुगारापेक्षां योजनाबद्धता होती. वे.इंडीजकडे बेफाम फटकेबाजी करणारे अनेक फलंदाज आहेत. [ रामादीनला वर पाठवण्यातही त्याच्या ताकदीच्या फटकेबाजीने पाकच्या गोलंदाजांची लय बिघडवण्याचाच हेतू असावा.] जर वरच्या फलंदाजानी गोलंदाजांची लय नाही बिघडवली तरीही फटकेबाजीची कांस न सोडणं हा वे.इंडीजसाठी एकमेव मार्ग होता; न पेक्षां पाकच्या फिरकीने वरचढ होऊन त्याना एवी तेवी गुंडाळलंच असतं. [ शिखर धवननेही अजमल विरुद्ध याच आक्रमक धोरणाचा अवलंब केला होता व तो बर्‍याच अंशीं यशस्वीही झाला होता ].
आपण वे. इंडीजला ही धडाडी दाखवल्याचं श्रेय नाकारणं बरोबर नाही.

स्थितप्रज्ञाची लक्षणं काय असं कुणी मला विचारलं तर मीं सरळ बोट दाखवीन सुनील नरैनकडे. तो धडाधड विकेटस घेतो, सगळे सहकारी बेभान होवून कॅलिप्सो करतात आणि हा पठ्या मात्र निर्विकार चेहर्‍याने हातांत चेंडू घेवून शांतपणे पुढचा चेंडू टाकायच्या तयारीत !! आत्तां शेवटच्या विकेटसाठी त्याच्या हातून झेल सुटला पण ह्याच्या चेहर्‍यावर ना खेद , ना हंसू !! फलंदाजांसाठी त्याच्या फसव्या गोलंदाजीला त्याचा हा निर्विकार चेहरा अधिकच धार चढवत असावा . आजचा त्याचा पराक्रम -१६ -४ !!!
अभिनंदन वे. इंडीज. श्रीलंका, जरा बचके रेहना !!!

स्थितप्रज्ञाची लक्षणं काय असं कुणी मला विचारलं तर मीं सरळ बोट दाखवीन सुनील नरैनकडे. >> त्याची बॉलिंग नीट सुरु आहे तोवर ती स्थितप्रज्ञता, नाहितर कोडगेपणा Wink

<<.......नाहितर कोडगेपणा >>कारकीर्दीच्या सुरवातीच्या दिवसात सचिनची विकेट मिळवल्यावरही जो निर्विकार रहातो, त्याची स्थितप्रज्ञता इतकी तकलादू नसावी !! Wink

<< बद्रीने सुरवात केली हें विसरून चालणार नाही >>बद्रीला, यष्टिरक्षणाला [ ४ अप्रतिम स्टंप-आऊट ] सॅमीला व इतरानाही श्रेय आहेच; मीं फक्त नरैनचं एक खास वैशिष्ठ्य सांगितलं ,इतकंच.
<<.......नाहितर कोडगेपणा >>कारकीर्दीच्या सुरवातीच्या दिवसात सचिनची विकेट मिळवल्यावरही जो निर्विकार रहातो, त्याची स्थितप्रज्ञता इतकी तकलादू नसावी !! Wink

बद्रीला नरेन एव्हढे glorification मिळत नाहि हे आश्चर्य आहे. IPL मधेही त्याला फारसे वापरले नव्हते. गेल्या World CUp मधेही तो चांगला खेळला होता.

बाकी सॅमी काहिही बोलो, strike rotate न करणे हे कधी ना कधी तरी अंगाशी येणार आहे.

भारतासोबत आले होतेच की. आता परत बहुदा फायनलला भेट होईन असे दिसतेय. (हे जरा जास्तच गृहित धरणे झाले पण चलता है)

199

200

"Run out by Kamran Akmal." Something usually only experienced by his batting partners! #WIvPAK

Afridi was seething that Maqsood played an aggressive shot and got stumped. How do you say "irony" in Urdu?

You know things are bad when Afridi is your most CONSISTENT batsman of a tournament.

In hindsight, that was a supremely entertaining but utterly pointless partnership between Bravo and Sammy in the first innings. #WIvsPak

Lol

दुसर्‍या इनिंग मध्ये बॉल जास्त वळाला.

अश्विन / मिश्राजी ट्रम्प कार्ड ठरावेत. पण एबी नक्की कसा मारतोय ते कोणालाही माहिती नाही असे दिसते.

वे. इंडीज संघ हा स्वच्छंदी व लहरी खेळ करणाराच संघ आहे, हें मत बहुतेक इतकं रूढ झालं आहे कीं वे.इंडीजचे खेळाडू योजनाबद्ध असं कांहीं करत असतील हें स्विकारणंच आपल्याला कठीण जात असावं.
काल पाकविरुद्ध त्यानी जें धोरण वापरलं, तेंच ते इतर संघांविरुद्ध वापरतील असं आपण कां गृहीत धरावं ?आणि, टी-२०मधे इतर फॉर्मॅटसारखं प्रत्येक सामन्यात 'स्ट्राईक रोटेट' करणं याला खरंच इतकं आत्यंतिक महत्व आहे का ? प्रत्येक संघाला आपलीं बलस्थानं ओळखून तसा खेळ करण्याचं व त्याचे बरे-वाईट परिणाम जोखून स्विकारण्याचं स्वातंत्र्य आहेच ना. किंबहुना, त्यां वैविध्यातच खेळाची खरी गंमत आहे, असं मला वाटतं.

गेल आणि टीम विरुध्द हेरंथ आणि टीम असा सामना आहे....

पाकिस्तान सारख्या फिरकी अतिउत्तम खेळणार्या संघाविरुध्द वेस्टींचे फिरकी गोलंदाज चालणे हेच आश्चर्यजनक आहे

<< वेस्टींचे फिरकी गोलंदाज चालणे हेच आश्चर्यजनक आहे >> अत्यंत भेदक म्हणून नांवाजलेल्या पाकच्या जबरदस्त फिरकी गोलंदाजीची उपखंडातल्या खेळपट्टीवर वेस्टीनी धुलाई करणं [ अजमलच्या एका षटकात १४ धांवा !], हें त्याहूनही आश्चर्यजनक !!! Wink

You know things are bad when Afridi is your most CONSISTENT batsman of a tournament.
Lol

आफ्रिदीने ओपन करायचा जमाना आता कालबाह्य झालाय का? २०-२० आणि खास करून भारतीय उपखंडात असताना त्याची ओपनिंग पहिल्या ६ ओवर तो टिकला तरी घातक ठरू शकते. किमान जुगार म्हणतच या स्पर्धेत हा डावपेच वापरायचा होता, कारण हल्ली स्पिनरसने सुरुवात करायची जी फॅशन आली आहे त्यावर कदाचित हा काटशह ठरला असता.
जाऊदे, बाहेर पडलेल्यांबद्दल काय बोलायचे, बाकी आता वेस्ट्-ईंडिज लंका म्हणजे फिरकीचा मुकाबला आहे तर....

आफ्रिदीने ओपन करायचा जमाना आता कालबाह्य झालाय का >>>> अभि.. फॉर्म आणि वय नावाचे काही चीज असते की रे.. आता आफ्रिदी जेव्हा २२ चा होता तेव्हा १७ सांगत होता .. ते १७ पण आता ३० च्यावर ओलांडले असेल Wink
वर फॉर्म देखील असावा लागतो..

ऑस्ट्रेलिया च्या मॅच मधे मॅक्सवेल जाडेजाला धुत होता परंतु अश्विन आल्यावर त्याने लगेच स्टँड बदलला तरी त्याच्या बॉलिंग वर वाकडा शॉट मारतानाच आउट झाला .. याचा अर्थ असा होतो की सारखे हवेत मारणे देखील योग्य नाहीच

उदयन, सचिन चाळीशीत पण ओपनर यायचा की रे, तसेही मी वर त्याने २०-२० मध्येच ओपनर यावे असे म्हटलेय, ५०-५० मध्ये नाही .. त्यातही रेग्युलर ओपनर म्हणून नाही तर सिच्युएशन डिमांड करेल तेव्हा .. ओपनर वा वन डाऊन, काहीतरी ट्राय करून वापरा त्याची फटकेबाजी.. मॅक्सवेलशी केलेली तुलना मात्र नाही फारशी पटली, फटकेबाज असले तरी भिन्न शैली असतेच की.. तसेच असे घातक आणि सणकी फलंदाज खेळपट्टीवर असताना प्रतिस्पर्धी कॅप्टनला गोलंदाज फिरवताना बरेच विचार करावे लागतात.. २०-२० चा खेळ आहे, एक ओवर फुटली की त्यातून मिळणारे मोमेंटम पुढच्या सामन्यालाही पालटून जाते..

असो, मी फक्त एक पर्याय चाचपून बघा एवढेच बोल्लेलो, इन्शाल्लाह मी पाक कर्णधार असतो तर नकीच हा ट्राय मारला असता. Wink

Pages