T-20 विश्वचषक २०१४

Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये Happy
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ? Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या ५ ही मॅच जिंकताना हे लोकांना वाटलं होतं का?>>>>>>>>>> मागच्या सगळ्या मॅच मधे युवीची कामगीरी इतर फलंदाजांमुळे लपुन राहिली होती.. आठवा रैनाने ७ बॉल मधे २१ रन्स ठोकुन काढले .. तसेच युवी आउट झाल्यवर लगेच चौकार मारुन विजय मिळावला ..

मांजरेकर ला मात्र खरच विटीदांडु सामन्याकडे पाठवा. आपल्याला तो धार्जीण नाहीये. >> LOL, खरय. मांजरेकर ल मुंबईच्या भाषेमधे "नरकुंडी" म्हणतात तसा आहे भारतासाठी. जेव्हढे विश्लेषण कोहलीचे त्याने नि वॉर्न ने केले ते फारच विचित्र वाटत होते, felts like they are rooting more for him to fail. कोहलीचा प्रभावी खेळ बघता ते तसे केले असेल असे म्ह्णायला थोडा वाव आहे पण ते अजिबात balanced वाटले नाही, कारण त्याच वेळी लंकेची बॉलिंग कशी counteract करायची ह्याबद्दल एक चकार शब्दही नव्हता. एव्हढी paartiality तर रमिझ राजा किंवा फर्नांडो पण दाखवत नाही. (ह्याउलट गांगूली नि भोगले चे समालोचन ऐकले कि मुद्दा स्पष्ट होईल.)

कोहलीकडेसुद्धां - उत्तर नव्हतं >>>> भाउ .......तो एकटाच खेळत होता .. उभे आडवे शॉट मारुन आउट झाला असता तर जो स्कोर होणार होता तो सुध्दा झाला नसता म्हणुन त्याने तसे शॉट मारले नाही.. दडपण तर येतेच ना..१ रन काढुन युवी ला स्ट्राईक दिली तर तो अक्खी ओव्हर रन्स न करता खे़ळुन काढतो त्यापेक्षा उभा राहुन चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करावे हाच त्याचा पॉईंट असेल >> मलाही असेच वाटले. त्याचे frustration बघता त्याला काही फारसा चॉईस नव्हता. सेनानायके ची ओव्हर कोहलीला मिळाली असती तर बराच फरक पडला असता. लंकेने चांगली बॉलिंग टाकली (They did homework, had the plan and stuck to it) हे मान्य आहे पण कोहलीचा हात अडकला होता असे वाटले.

मला नाही वाटत तसं. धोनीला लगेच शिव्या द्यायची गरज्ञ नाही. मागच्या ५ ही मॅच जिंकताना हे लोकांना वाटलं होतं का? >> +१. पण रैनाला पाठी ठेवण्याचा निर्णय अनाकलनिय होता. त्याच्या मुलाखतीमधे त्याने म्हटलय कि रैना हा एकमेव फलंदाज होता जो गेल्या गेल्या मारू शकतो ह्याउलट बाकी सगळ्यांना थोडा वेळ लागतो. तसेच आम्हला left-right combo maintain करायचे होते. ह्या logic ने गेला बाजार धोनीच्या ऐवजी रैना यायला हवा होता. युवीचा नि रैनाचा फॉर्म बघता युवराजच्या जागी रैना किंवा किमान धोनीने यायला हवे होते.

प्रश्न परत वाच ! गडबड करू नको अशी उत्तर द्यायची.

युवी हा ११ मधील १ आहे. उरलेल्या १० जनांना धोणी मॅनेज करत नव्हता असे म्हणायचे आहे की काय? हवे तेंव्हा बॉलिंग मधील बदल, फिल्डिंग मधील बदल लोक स्वतःच करत होते की काय?

शिवाय युवी जेंव्हा खेळत होता तेंव्हा युवीची जबाबदारी असते. ए कॅप्टन इज अ‍ॅज गुड अ‍ॅज हिज टिम इज.

युवीने वल्डकप आणून दिला, बिग मॅच प्लेअर असल्यामुळे त्याला घेतले तेंव्हा चुकले नाही, पण वि केप्ट ऑन बॅंकिंग हिम, तिथे चुक झाली, आणि ती चूक फक्त धोणीचीच आहे असे नाही.

धोणी सुद्धा बिग हिटर आहे रे. रैना पेक्षा जास्त चांगला. >> T-20 Worl Cup मधे तरी रैनाचा strike rate चांगला आहे, परत तो in-form आहे नि धोनीपेक्षा त्याने अधिक वेळ घालवला आहे पिचवर बांग्लादेशी पिचवर त्यामूळे ....

<< त्याचे frustration बघता त्याला काही फारसा चॉईस नव्हता >> कोहलीला त्यावेळीं एक चॉईस होता - कदाचित एकमेवच चॉईस होता- युवीला धांवचित करणं !!!! Wink

युवीला धांवचित करणं !!! >> LOL. युवीने declare करणे वगैरे शक्य नव्हते का ? कि ते फारच demoralizing होईल.
पण कोहलीने कुलसेकराची ज्या तर्‍हेने पिसे काढायला सुरूवात केली होती ती बघता खरच मजा आली असती जर त्याला enough strike मिळाला असता तर.

केदार माझे उत्तर नीट वाचा
त्याची कामगिरी लपलेली कारण इतर जण कवर केले पण काल च्या मँच मधे तो नको तिथे हळूू खेळला आणि दडपण वाढवले

केदार माझे उत्तर नीट वाचा >>. विषय युवराज नाही धोणी आहे, मी धोणी बद्दल लिहिलंय. ( मागच्या ५ ही मॅच जिंकताना हे लोकांना वाटलं होतं का ) युवी बद्दल नाही. तू युवीबद्दल लिहितो आहेस.

असो. हारलो हेच सत्य !

तेच रे केदार
त्या मँचेस मधे धोणी त्या सारखा वर पाठवत होता आणी एक मँच सोडून सगळ्या मँच मधे तसाच खेळला
पण रैना कोहली च्या अफलातून खेळीने युवी चा स्ट्राईकरेट लक्षात नाही घ्यायचो पण तरी धोणीने अंतिम सामन्यात तिच चुक केली आणि युवी नेहमी पेक्षाही हळू खेळला त्याचा दबाव विराट वर पडला आणि १५ ओवर नंतर देखील वेग वाढला नाही.. रैना असता तर कोहली वरचा दबाव कमी तरी केला असता

भारतीय क्रिकेटची एक पारंपारिक खोड आहे - एखादा असामान्य फलंदाज मिळाला कीं त्याच्यावरच सगळं सोपवून , इतराना दुय्यम, सहाय्यक लेखून क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हेंच विसरून जायचं. कोहलीच्या बाबतीतही आपण त्याच दिशेने जात आहोत... हेवा वाटावा असे भरपूर प्रतिभावान तरूण फलंदाज सध्या हिरहीरीने पुढे येत असूनही !!! असो !
माझ्यासारख्या आडव्या तिडव्या बॅट फिरवणार्‍याना घेवूनही ह्या धाग्यावर ३१२ हा स्कोअर कांही अगदींच वाईट नाही.... टी -२०साठी तरी !!! Wink

Pages