सर्वच कार्यालयात उशीरा उपस्थित राहण्याचे प्रमाण बरेच आहे. त्यासाठी कार्यालयात लेट मस्टर ठेवण्यात येते. अशावेळी त्यात उशीराने उपस्थितीची कारणे व वेळ लिहावी लागातात. त्यात बरेच जण डु --- do----- असे लिहुन मोकळे होतात. एकदा एका महिला कर्मचार्यास कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला. सदर महिला गर्भवती असल्याने तीने लेट मस्टरमधे गर्भवती असल्याने पोटात दुखत होते असे लिहीले. त्यानंर एक पुरुष कर्मचारी आला सवईमे त्याने --- do----- असे--- do----- असे लिहुन मोकळा झाला. साहेबानी मस्टर पाहीले आणि त्याला बोलावले, म्हणाले तुम्हालाही डिलीव्हरीचा त्रास केव्हा पासुन होतोय. तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
२. बरेच जण उशीर झाला की शेजार्याला मयत करुन मोकळे होतात. एकदा साहेब आणि लेट कर्मचारी हे एकाच गल्लीत राहणारे होते. त्याला उशीर झाल्याने त्याने ठोकुन दिली शेजारी मयत झाल्याने उशीर झाला. साहेबानी त्याला विचारले तुम्ही माझ्या घरापासुन किती दुर राहता.
असे अनेक किस्से आहेत. जसे ट्रॅफिक जाम झाल्यामुळे, गाडी ना दुरुस्त झाल्यामुळे, घरी वेळेवर पाहुणे आल्यामुळे. मुलाच्या शाळेत गेल्यामुळे उशीर झाला.
(No subject)
मी ऑफिसला केव्हाही उशीरा गेलो
मी ऑफिसला केव्हाही उशीरा गेलो तरी एकच कारण सांगतो,
आळस आला, झोप उडालीच नाही, उठावेसेच नाही वाटले म्हणून अलार्म पुढे करून झोपलो आणखी तासभर ... सगळे धन्य आहेस म्हणून हसतात आणि सोडून देतात.
एकदा का तू धन्य आहेस रे बाबा अशी इमेज बनवली की काहीही चालून जाते
यावर एक चावट विनोद
यावर एक चावट विनोद व्हॉट्सअॅप वर वाचला.
एक मुलगी: कल ऑफीसमे बॉस मुझपर चX गया.
मैत्रिणः क्यो? क्या हुवा?
मुलगी: मै 'लेट' गयी थी ना.