नवशिक्यांचे व्हेजिटेबल सुप

Submitted by अनिश्का. on 20 December, 2013 - 01:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

व्हेजिटेबल सुप काही नवीन पदार्थ नाहीये पण मी तो नव्यानेच बनवायला शिकले आहे....
झालं काय की नवीन घराची वास्तुशांत केली तेव्हा आहेरात मस्त फिलिप्स चा बीटर मिळालाय...तेव्हा पासुन जुस, सुप, मिल्क शेक्स, लस्सी, मसाला ताक यांचा धडाकाच लावलाय......
सुप मधे टोमॅटो सुपच येत होतं अजुन पर्यंत ( माहेरी घरी कामात मदत न केल्याचे दुष्परिणाम )
नवर्याने वेज सुप ची फर्माईश केल्यावर थोडं गडबडायला झालं....
पण म्हटलं काय हरकत आहे करुन बघायला....नाहीतरी किती तरी पदार्थ ( खरंतर चुकलेले ) मी छान नवीन नावं शोधुन त्याच्या पोटात ढकल्लेत.....:)
पण सुप बनवल्यावर नुसतं व्यवस्थित झालय न म्हणता लव्हली हा कॉमेंट ऐकुन माझे कान आणि सुप धन्य झाले.....आणि डोळ्यातुन आनंदाश्रु नव्हे सुपाश्रु टपटपायला लागले....

२ माणसांसाठी
घरात आपण फळभाज्या आणतो त्यातुन रोज २-२ तुकडे बाजुला ठेउन द्यावेत... फ्रिजमधे....

१. २ तुरे कॉलीफ्लॉवर
२. अर्धं गाजर
३. एक मिडियम कोबी च पान...
४. एक छोट्टुसा टोमॅटो
५. अर्धा बटाटा
६. २ पकळ्या लसुण
७. १ तुकडा बीट
८. ४ मीरी दाणे
९. २-३ लवंगा
१०. मीठ
११. साखर चिमुटभर
१२. बटर ( हव तर तेल ही वापरु शकतो पण बटर ने चव मस्त येते )
१३. पाणी
------------------------------------------------------------------------------------------

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम कुकरच्या एका टोपात स्वच्छ धुतलेल्या भाज्या, पाणी टाकुन ६-७ शिट्या काढाव्यात
२. कुकर गार झाला की भाज्या बाहेर काढाव्यात...आणि थंड कराव्यात ( भाज्यांचे पार १२ वाजलेले असतात..पण बीटर चालवणे सुसह्य होते)
३. आता त्या बीटर ने मस्त स्मूथ करुन घ्या..मिक्सर चालेल पण मग २ भांडी जास्त धुवावी लागतील Wink
४. मीरी, लसुण, लवंग खलबत्त्यात मस्त कुटुन अगदी बार्रिक करुन घ्या.
५. आता एका पॅन मधे बटर मेल्ट करुन घ्या थोडा फेस यायला चालु झाला की ते तापले असे समजावे...
६. तापलेल्या बटर मधे कुटलेले मीरी, लसुण, लवंग टाकुन जरा फ्राय करा.....
७. मग त्यात भाज्यांची ग्रेवी टाकुन ढवळा. जितके पातळ हवे तितके पाणी अ‍ॅड करा
८. मीठ , साखर घालुन उकळु द्या

सोप्पे सुप तय्यार.....गरम गरम थोडे फुंकर मारत मारत पिउन टाका.....
हॉटेल चा फील आणायला वरुन थोडं क्रीम टाका.. Happy

असच मी भोपळ्याचे सुप पण बनवले होते....मेथड तीच पण मिक्स भाज्यांऐवजी भोपळा....

अधिक टिपा: 

अधिक टिपा काहीच नाही सोप्पय अगदी....

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

हेच सूप्सचे प्रकार आमच्याकडेही असतात रोज कारण साहेबांना बर्‍यापैकी दात येऊनही चावायचा कंटाळा भाज्या अशाच ढकलाव्या लागतात. फक्त मी मिरे लवंग वापरत नाही. धणे, जिरे पावडर (किंवा खडबडीत वाटून ते फोडणीला), आले लसूण खडवडीत वाटून, दालचिनी तुकडा अख्खा, ही ग्रेव्ही आणि वरून भरपूर कोथींबीर बारीक चिरून. मस्त लागतं आणि पोटभरीचं होतं.

अजून १ टीप. याच भाज्या न उकडता (बटाटा सोडून) कच्च्याच मिक्सरला फिरवून त्याचा थपथपीत गोळा घेऊन गव्हाचं पीठ, थोडं बेसन, थोडं ज्वारी, बाजरी, सोया पीठ, हळद, मीठ, जिरे, ओवा, (आलं लसूण पेस्ट ऑप्शनल), थोडे बिनपॉलीशचे तीळ, थोडा मसाला (मिरची पूडही चालेल), बारीक चिरलेली भरपूर कोथींबीर यात तो गोळा मिक्स करावा. थोडं तेलाचं मोहन, गरज असल्यास थोडं दूध घालून पीठ मळावं. याचे लाटून मध्यम जाडसर पराठे करावेत. फार खुसखुशीत आणि खमंग लागतात. आमचा संध्याकाळचा नाश्ता (आणि अर्णवचा बेबीसिटींगचा खाऊ)

करून बघ खरंच मस्त खमंग प्रकार आहे आणि हेल्दीही Happy सोबत सायीचं दही असेल तो फिर क्या कहना... मला तोंडी लावायला सायीचं दही घोटून त्यात चिमूटभर मीठ, चिमूटभर साखर आणि चिमूटभर जीरापावडर घालून आवडतं ऑस्सम लागतं Happy

स्वप्ना मी केलेले पराठे...मस्त झाले होते....पण फोटो नाही काढ्ला....थँक्यु नवीन रेसिपी साठी.....

अनिष्का,
मस्त फटाफट सुप ची पाकृ....

नाहीतरी किती तरी पदार्थ ( खरंतर चुकलेले ) मी छान नवीन नावं शोधुन त्याच्या पोटात ढकल्लेत<<<हो हो हे मात्र मी पण करते....:)

ane tuza matra fayada zala bagh ya bronmule Wink
ata kayam war thevanar ka te ya recipe la?

Pages