Submitted by पुरंदरे शशांक on 22 July, 2013 - 00:45
रुसुबाई रुसू ...
नाकाचा शेंडा लालेलाल
फुगले आहेत कुणाचे गाल
घेतलीये कट्टी सगळ्यांशी
खेळणार नाहीये कोणाशी
खाऊ नको नि नको तो खेळ
कुण्णाला नाहीये जरासा वेळ
कोपर्यात बसली सोनू रुसून
एकटीच आपली डोळे मिटून
बाबाने घेतला कागद मोठा
रंगवले मग चित्र पटापटा
सोनूजवळ उडी पडे धपकन
माकडऽ बघून उडाली गाळण
माकडाचे नुसतेच तोंड बघून
सोनूचे रुसू गेले लांऽब पळून
बाबाबरोबर रंगला खेळ
छाऽन जमला दोघांचा मेळ ...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाहवा ! मस्त !
वाहवा ! मस्त !
(No subject)
मस्त आवडल
मस्त आवडल
मस्त.. गोड आहे. साभिनय कविता
मस्त.. गोड आहे. साभिनय कविता सादर केल्यास लहानग्यांना मजा येईल.