Submitted by हर्ट on 9 May, 2013 - 06:42
नमस्कार आम्हाला पुण्यामधे घर रहायसाठी घ्यायचे आहे पण पुढे चालून घराचे भाव वाढावे असेही वाटते. माझा एक अनुभव असा आहे की हल्ली पुण्यामधे घर दाखवा असे ब्रोकर्/अजेन्ट ह्यांना म्हटले की ही मंडळी टाऊनशिपचीच घरे दाखवतात. पुर्वी साध्या इमारतीमधे किती छान छान घरे दिसायची. आमच्या डोळ्यापुढे तेच स्वप्न आहे की चांगल्या सोसायटीमधे घर असावे.
बर आता बीबीच्या हेतूवर येतो: माझा एक मित्र मला आज सांगत होता की टाऊनशिप मधील घरापेक्षा अपार्टमेन्टमधील घराच्या किमती जलद गतीने वाढतात ईंग्रजीत 'अॅप्रीसिएट' होतात. हे खरे आहे का?
अजून एक, जुना फ्लॅट घेऊन त्याचे नूतनीकरण करुन तो आणखी चांगला कुणी केला आहे का? तुमची ही निवड तुम्हाला कशी वाटली? पैसे वाचले का? हल्ली चांगल्या भागात नवीन पेक्षा जुनी घरे जास्त मिळतात.
जरा विस्कळीत लिहिले असे जर वाटत असेल तर क्षमस्व.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यात... टाऊनशिप....? कुठे
पुण्यात... टाऊनशिप....? कुठे आहे...?
टाउनशिप म्हणजे शहराबाहेर असेल
टाउनशिप म्हणजे शहराबाहेर असेल बहुधा. फॉरेस्ट ट्रेल्स (परांजपे - भूगाव) सारखी. बी - तू कोणत्या भागात पाहात आहेस?
township. मगरपट्टा, नान्देड
township. मगरपट्टा, नान्देड सिटी, लाइफ रिपबलिक अशा अनेक आहेत. टाउनशिप मधला एक चान्गला भाग असा असू शकतो ही शाला, रुग्णालय, वाणसामानाची दुकान, jogging track वगैरे ही त्याच परिसरात म्हणजे २०० ते ७०० एकरानमध्य असतात. मगरपट्टा, नान्देड सिटी चा एक चान्गला भाग असा आहे की आय टी पार्क वगैरे देखील त्याच परिसरात आहेत. म्हणजे आगदी बोहोरी आळीत किन्वा सोन्याची खरेदी करायची असेल तरच तुम्हाला टाउनशिप च्या बाहेर पडायला लागेल. लाइफ रिपब्लिक, blue ridge वगैरे हिन्जवडीच्या जवळ असल्या मुळे तोच फायदा तिथे देकील. आतले ६० फुटी रस्ते, रस्त्या वरचे दिवे वगैरे या फार्च चान्गल्या गोष्टी आहेत.
त्याचा एक तोटा असा आहे की टाउनशिप मध्ये सोसायटीचे वगिरे नियम लागू होत नाहीत. (जाणकारान्नी या वर जास्ती प्रकाश टाकावा). महाराष्ट्र टाउनशिप अॅक्ट च्या नियमन्च्या खाली या टाउनशिप येतात.
मास प्रॉडक्षन असल्या मुळे मगरपट्ट्यात बान्धकामाची गुणवत्ता बेकार आहे (अस ऐकून आहे). ननदेड सिटीत काहिहि मनमानी पद्धतीने पाण्याचे वगिरे दर आहेत (२१ रुपये १००० लिटर ला, पुणे महनगरपालिकेत हाच दर काही पैशात आहे). या बद्दल फार तुम्ही काही करू शकत नाही फक्त अर्ज विनन्त्या करून या टाउनशिपचे चालक मालक पालक तुमच्या कडे लक्ष देतील आशी आशा करू शकता
अपार्टमेन्टात तुम्हाला या सुविधा मिळणार नाहीत. पण तिथे बिल्डर conveyence deed न करण, तुमच चटई क्शेत्र दुसर्या बिल्दिन्ग मध्ये वापरण हे प्रकार करू शकतो आणि करतो देखील. तिथे ही एन ओ सी साठी बिल्डरच्या नाकदुर्या पूर्वी लोक काढायची सध्या ती आवश्यकता नाही अस ऐकून आहे. पहिल्या मजल्यावरच्या लोकान्नी लिफ्ट साठी पैसे न देण वगैरे वगैरे करमणुकीच्या गोष्टी तिथे देखील घडत असतात.
aapreciation च म्हणाल तर पुण्यात ते काहीच्या काही वाढत आहेत आणि कधी पर्यन्त वाढणार आहेत हे कोणिही सान्गू शकणार नाही. अपार्टमेन्ट असो किन्वा टाउनशिप दोन्ही कडे हे भाव वाढणारच आहेत. हा फुगा फुटणार आहे किन्वा नाही याच उत्तर साक्षात नियती देखील देउ शकेल का नाही याची शन्काच आहे.
चान्गल्या परिसरात अनेक ठिकाणी redevelopment देखील चालल्या आहेत. त्याचे देखील भाव गगनाला भिडलेलेच आहेत. रीसेल चा फ्लॅट घेतला तरी किमतीत किती फरक पडेल हे विकणार्याची नड किती आहे त्या वर अवलम्बून आहे.
अमोल, माझी टाउनशिपची
अमोल,
माझी टाउनशिपची व्याख्या चुकली आहे असे वाटते. हल्ली परांजपे बील्डर्स जशी घरे बांधतात ना म्हणजे पोहायला पूल, २४ तास पाणी आणि वीज, खेळायला सोयी, लिफ्ट वगैरे वगैरे सुविधा त्याला मी टाऊनशीप म्हणत आहे.
सध्या तरी मी कोथरुड आणि आजूबाजूच्या परिसरात घरे शोधत आहे.
जुना फ्लॅट घेऊन त्याचे
जुना फ्लॅट घेऊन त्याचे नूतनीकरण करुन तो आणखी चांगला कुणी केला आहे का?
म्हणजे तुम्हाला flat च्या interior च्या दृष्टीने म्हणताय ना?
मी घेतला रिसेल चा flat १.५ वर्षापूर्वी धायरी गावाच्या टोकाला. २ bhk, ८३५ sq. ft. ,२४ लाखाला, ground floor, रोड टच,reserved पार्किंग नाहि. ऑफिस थोडं लांब पडतंय, पण एकतर बाणेर-बावधन, कोथरूड सगळं budget च्या बाहेर होतं. आणि आम्हाला club house, swimming pool वगैरे नको होतं. एकच बाथरूम होती तिथे आम्ही दूसरी पण बांधून घेतली. ओटा पूर्ण नवीन बांधला आणि L शेप केला. आधीचा फार कमी होता उंचीने. २ बेडरूमच्या मधल्या passage मध्ये W/M आणि बेसीन साठी जागा केली. कारण आधीचं बेसिन बाथरूम मध्ये होतं. ते काढून बाहेर बसवलं. electrical che points वाढवले. कारण इथे concealed wiring नाही. हा सगळा वरचा खर्च १. ५ ते २ लाखापर्यंत गेला. रंगकाम आणि इतर काही खर्च धरून. corporation चं पाणी सकाळ-संध्याकाळ २ तास येतं.
आता ह्या भागातही भाव २ bhk ३५ ते ४० लाख झाला आहे.
तुम्हला हेच अपेक्षित होतं न तुमच्या प्रश्नातून. नाहीतर प्रतिसाद उडवून टाकेन.
चैत्राली, हो हेच अपेक्षित होत
चैत्राली, हो हेच अपेक्षित होत मला. धायरीमधे बायपासला लागून नौले हॉस्पिटल, मानाजी नगर आहे. तिथे धायरी नाक्याजवळ माझ्या भाच्याचे घर आहे. तिथे हप्ताभर मुक्कामी होतो मागिल डिसेमधे मी.
झोटिंग, धन्यवाद. चांगली
झोटिंग, धन्यवाद. चांगली माहिती. मग परांजप्यांची फॉरेस्ट ट्रेल सुद्धा त्यातच येत असावी.
बी - हरकत नाही. म्हणजे तुला अशा बर्याच सोयीसुविधा असलेली सोसायटी हवी आहे. फ्लॅट्स चे रेट अशा सोसायट्यांमधे नक्कीच जास्त राहतील कायम (फक्त पोहोचायला फारसे पर्याय नसलेल्या सोसायट्या सोडून - जेथे रिक्षा यायचे वांदे, जवळपास दुकाने नाहीत अशी ठिकाणे)
टाउनशिप म्हणजे जर मोठ्या
टाउनशिप म्हणजे जर मोठ्या स्किम असे म्हणायचे असेल तर दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत.
मी आधी रहात होतो ती २०० का २२५ फ्लॅट्स ची स्किम होती. आणि आता एका ईमारती मधे सदनिका घेतली २२ वर्षे जुनी आणि नूतनीकरण करुन रहात आहे.
स्किम मधे सोसायटी चार्जेस १३०० रुपये होते. या मधे वॉचमन (दोन ईमारती साठी एक), जलतरण तलाव, व्यायामशाळा, बाग, ईतर खेळायचे साहित्य, ईमारतीची आणि परिसराची स्वच्छता, कचरा उचलणे, सामाजिक कार्यक्रम वगैरे होत.
आता राहतो ती १२ सदनिकांची एक ईमारत आहे. सोसायटिचे चार्जेस ८५० यात फक्त कचरा उचलणे, ईमारत आणि परिसराची स्वच्छता, लाईट बिल आणि वॉचमन ईतकेच आहे. सदस्य कमी असल्याने कॉन्ट्रि वाढते.
मोठ्या स्किम मधे सिक्युरिटि, क्लब हाऊस, सामाजिक कार्यक्रम, बाग, स्टेटस, हे फायदे आहेत. घरी लहान मुले, वृद्ध असतील तर हे खुप बरे पडते, त्यांना त्यांच्या वयाचे सोबती मिळतात. वर लिहिलेल्या स्किम, टाऊनशिप शहराबाहेरच्या आहेत. मध्यवर्ती भागात, जवळपास पण १०० ते २०० फ्लॅट्स च्या स्किम असतात. त्याचे पण बरेच फायदे आहेत.
स्किम पेक्षा ईमारतीचे दर कमी असतात ५०० ते १००० ने तरी. उगाच स्किममधे सदनिका घेउन भरमसाठ पैसे देउन तीन ते चार वर्षे ताबा घ्यायला थांबायचे, क्लब हाउस वगैरे वापरत नसताना त्या साठि पैसे मोजायचे, या सगळ्या साठी १० ते १५ लाख जास्त घालवायचे त्यापेक्षा त्याच भागात एखादा सिंगल ईमारती मधला ४ ते ५ वर्षे जुना फ्लॅट घेउन, मनासारखे रिनोव्हेशन करुन ईंटिरिअर ला खर्च करणे बरे असे मला वाटते.
अंतरंगी खूप छान मत व्यक्त
अंतरंगी खूप छान मत व्यक्त केलेस.
माझ्यामते सोसायटी बील स्किममधे आता खूप वाढले आहे. माझा भाचा म्हणाला ३ हजार सोसायटी बिल असत.
३०००?????? माझ्या मते फारच
३०००??????
माझ्या मते फारच जास्त आहे. कशासाठी ईतके पैसे मोजायचे?
काय value addition आहे नक्की यात ?
तेच तर मलाही इतके बील खूप
तेच तर मलाही इतके बील खूप जास्त वाटते. आज तुम्ही नोकरी करता उद्याला निवृत्तीनंतर इतके पैसे देणे होणार का?
कोथरुड मधे कॉम्प्लेक्स मधे
कोथरुड मधे कॉम्प्लेक्स मधे सध्या १००००/- प्रति चौ.फु च्या आसपास रेट आहे. सोसायटीचे वार्षिक मेंटेनन्स चार्जेस २० ते ३० हजाराच्या आसपास असतात.
घर घेताना वा विकताना माणुस गोंधळलेला असतो. विकणार्याला आपण स्वस्त विकला असे वाटत राहते तर घेणार्याला आपल्याला महाग लागला असे वाटत रहाते.
http://www.maayboli.com/node/18962 या ठिकाणी आपल्याला काही मार्गदर्शन मिळेल. घर घेण्यासाठी शुभेच्छा
कोथरुड मधे सिटी परेड जवळ
कोथरुड मधे सिटी परेड जवळ आत्ताच एक घर पाहिले १२ वर्ष जुने आहे पण छान आहे. एकूण क्षैत्रफळ ६०० आहे. एक बेड रूम हॉल किचन असे घर आहे. किंमत आहे ६० लाख. तडजोड करुन ५५ लाखाला मिळेल म्हणालेत. घरात आम्ही तिघे जण राहणार आहोत. घर सुंदर आहे. ही किंमत खूप जास्त होते आहे का? सध्यातरी आम्हाला मुलभुत सोयी खेरीज आणखी सोयी नको आहेत. शहरात मध्यवर्ती ठिकाणी घर हवे आहे.
चांदणी चौकाच्या थोडे पुढे परांजपेंचे एक घर पाहिले ११५० क्षैत्रफळ आहे. किंमत ७० लाख सांगत आहे. ब्रोकरची फी वेगळी. ती घराच्या २ टक्के असते.
मी फार फार संभ्रमात पडत चाललो आहे.
बी, टाऊनशिप, गृहसंकुल,
बी,
टाऊनशिप, गृहसंकुल, सोसायटी.... सगळाच गोंधळ करून ठेवला आहेस.. मुळात आपल्याला नक्की काय हवे आहे (सोयी, सुविधा, ई.) आणि किती खर्च परवडू शकतो हे स्पष्ट माहित असेल तर त्यानुसार निर्णय घेणे सोप्पे असते.
काठावरचे बजेट ज्यांचे असते
काठावरचे बजेट ज्यांचे असते त्यांचा सारखा संभ्रम होतो. दोन नम्बरचे पैसे असले की पटकन एका तासात खरेदी करून संध्याकाळी रहायलाही जातात.
पुण्यात कोणत्याही घराला व्हॅल्यू फॉर मनी नाही. किमान ४० टक्के तरी लूट आहेच. नव्यात तर आहेच आहे. पण त्यांच्याबरोबर जुनेही त्यांच्या जवळपास जाऊन पोचतात. कोणताही व्यवहार करताना आपण ४० टक्के अडवणूक चार्ज म्हणून भरत आहोत हे मान्य केल्यास मानसिक त्रास कमी होतो. १३ लाखाचा २००५ मधला फ्ल्ट्त तिसर्या सेलिंगला ८० लाखात गेला . उलट क्वालिटीच्या बाबतीत डेप्रिसिएशनच झाले ना? अगदी रुपयाचे डिस्काऊंटिंग जरी धरले तरी हे अनरीझनेबल आहे.बांधकामाची क्वालिटी इतकी भिकार की बस. आता तर एरियातही मारतात. ९०० चौ फू चा स्टॅन्दर्ड २ बीएच के ६५० चा कधी झाला ते लोकानाही कळले नाही. ओपन ग्यालरीचा चार्ज १०० टक्के.(पूर्वी ती फुकट मिळे) , सुपर बिल्ट अप नावाची हरामखोरी २५ टक्क्याहून जादा. पार्किंगचे पैसे घ्यायला कोर्टाने बन्दी केल्यावर पार्किंगला ३ लाख रु बिनपावतीचे द्यायचे. नाहीतर पार्किंगचा दर बांधकामात अॅड करून प्रति स्केअरफुटात वाढवायचा. घ्या लेको पार्किंग फुकट !! आताशा तक्रार कर्णार्या पर्चेसरच्या मागे गुंड लावण्याचाही प्रकार आहे. विशेषतः अमराठि बिल्डर जे राजकारण्यांचा काळा पैसा व्हाईट करण्यासाठी मध्यस्थ म्हणून बिल्डिंग व्यवसायात आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी आणि' शुचिर्भूत' बिल्डर्स विश्वासार्हतेच्या नावाखाली सुमारे दीड पट किमती लावतात. मग काय जातेय त्यांचे चोख व्यवहार ठेवायला?
६० लाखात सदाशिवात २ बीएचके
६० लाखात सदाशिवात २ बीएचके मिळतो आहे ८३६ चौफू, बाल्कनी नाही, कार पार्क नाही, टूव्हिलर कॉमन पार्क, २ रा मजला आहे बहुतेक..... मी सोमवारी पहायला जाणार आहे... येताय ?
समोरचा किती किंमत सांगतोय या वर जाऊ नका. तो फ्लॅट त्या किमतीयोग्य आहे का ? आणि मुळात आपल्याला तो परवडतो का हे पहायचे. लोक काय पहिजे त्या किमती सांगतात..... ५५ लाखात १ बीएचके कोथरुड सिटी प्राइड जवळ जरा जास्त आहे. ४८ वगैरे ठिक आहे. मी मागच्या आठवड्यात आयडीयल कॉलनी मधे १ बीएचके पाहिला होता ४७ मधे पण तो बहुतेक ४५० कि ५०० चौफू होता.
तुम्ही आधी ठरवा तुमचे बजेट किती, तुम्हाला सदनिका कोठे हवी आहे आणि सोयीसुविधा काय काय हव्या आहेत . पुण्यात जर असे पुर्वतयारी (होम वर्क ) न करता शोध घ्यायला गेलात तर वेड लागेल हो. मी जेव्हा माझा पहिला फ्लॅट घेतला तेव्हा मी रहायला होतो सांगवीला आणि धायरी पासुन ते वाकड पर्यंत आणि कोथरुड पासुन ते विमान नगर पर्यंत सगळं फिरलो होतो.... (तेव्हा माबो चा सभासद नव्हतो... नाही तर हि वेळ नसती आली )
एक फुकटचा सल्ला :- घर घ्यायला घाई करु नका. आपले बजेट, आपली गरज. आपल्याला हवा असलेला एरिया, लोन करणार आसाल तर त्याची कागदपत्रे, डाउनपेमेंट ची रक्कम, हव्या असलेल्या सुविधा, अजुन काही अटी असल्या तर (मी दक्षिणमूखी वास्तु घेत नाही, सदनिका पहायला जाताना आधीच विचारतो. दक्षिणमूखी असल्यास जायचा त्रास वाचतो) हे सगळे आधी ठरवा. मग फ्लॅट बघायला सुरुवात करा, नाही तर या उन्हातान्हात फुकट सगळीकडे हिंडत बसाल, ९०% वेळ वाया जाईल आणि हो पेट्रोल पण
बी, प्रत्येक बाबतीत फायदे
बी,
प्रत्येक बाबतीत फायदे तोटे आहेत.
१.चांगली सोसायटी (अमेनिटीज, क्लब हाउस, स्विमिंग पूल इ.)
किंमत जास्त
मंथली मेंटेनन्स जास्त
अप्रीसिएशनही जास्त
अमेनिटीज मुले खुप एंजॉय करतात.
२.स्टँडालोन अपार्टमेंट (फक्त जागा इतर काही अमेनिटीज नाहीत)
किंमत कमी
मेंटेनन्स कमी
अप्रीसिएअशनही कमी
शेवटी काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतःला विचारा..
१.मी या जागेत किती दिवस्/वर्षे राहणार आहे.
२.मी स्वतः ग्राहक असेन तर पुढे काही वर्षानी मी हा जागा खरेदी केली असती का?
योगने लिहिलेल्याशी सहमत.
शुभेच्छा.
खरे आहे रॉबीनहूड. घर घेणे
खरे आहे रॉबीनहूड. घर घेणे खूपच अवघड झाले आहे. खूप खूप विचार करावा लागतो आणि विचार करुन करुन थकवा .. ग्लानी येते अक्षरशः.
@बी आपण मी वर दिलेल्या
@बी
आपण मी वर दिलेल्या दुव्यानुसार माझ्या बायकोशी विनासंकोच संपर्क करा. ती कोथरुड एरियातच हे काम करते. मी सांगुन ठेवतो तिला. माबोवरील जागेविषयक छोट्या जाहिरातीत तिचा संपर्क क्र.आहे.
लोन करणार आसाल तर त्याची
लोन करणार आसाल तर त्याची कागदपत्रे>>
मी पन्नास टक्के रक्कम नगद देणार आहे आणि पन्नास टक्के लोन काढणार आहे. नक्की कागदपत्रे कुठली लागतात? मी सिंगापूरला काम करतो. सध्या ही घरे माझी बहिण, पुतणी, भाचा असे तिघे जण बघत आहेत.
मला एकदा कागदापत्रांविषयी सांगा प्लीज. मी पुढील आठवड्यात घर फायनल करायला देशात येतो आहे.
घाटपांडे मला ykakad@gmail.com war please tumachya sau cha contact number pathawal ka? mi sawistar tyanchyashich bolen.
कोठे घ्यायचा याचे मार्गदरशन
कोठे घ्यायचा याचे मार्गदरशन सगळे करतीलच , पण....
बी तु आत्ता जरी १ बेडरुम म्ह्णत असशील तरी मला वाटते घेतानाच २ बी एच के बघ. आधी ओक्के वाटले तरी पुढे जावुन अजुन एका रुम ची आवश्यकता वाटल्यास लगेच दुसरी कडे जाणे अथवा नुकताच घेतलेला प्लॅट विकणे शक्य होतेच असे नाही.
आत्ता जरी १ बेडरुम म्ह्णत
आत्ता जरी १ बेडरुम म्ह्णत असशील तरी मला वाटते घेतानाच २ बी एच के बघ............अगदी खरयं! २-३ वर्षांतच राहती जागा अपुरी पडते.मग रिमझिम म्हणते तसे होते.