युएसमध्ये मोबाईलसेवा

Submitted by HH on 1 April, 2013 - 14:27

युएस मध्ये प्रवाशांसाठी मोबाईलसेवेबद्दल कुणाला माहिती असल्यास सांगा.
३ ते ४ आठवडे हा प्रवास अवधी, पुर्व व पश्चिम दोन्ही भागात प्रवास असेल.

युएसमध्ये देशांतर्गत फोन कॉल्स करण्यासाठी.
भारतात फोन करण्यासाठी.
भारतातून युएसमधे इनकमींग कॉल्स फ्री असल्यास उत्तम!
इंटरनेट मेल्स वगैरे पाहण्यासाठी.

कुठल्या कंपनीची सेवा घ्यावी? साधारण सिमकार्ड रेट व कॉलरेट माहित असल्यास इथे सांगावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

युएसमध्ये देशांतर्गत फोन कॉल्स करण्यासाठी.>> AT&T Go phone. पण SSN नसताना ते देतात की नाही माहिती नाही.
आजकाल भारतातच युएसए चे सीम कार्ड मिळते. www.matrix.in
भारतात फोन करण्यासाठी.>> कॉलिंग कार्ड मिळतात किंवा रिलायन्स चा प्लॅन पण वापरता येईल

भारतातून युएसमधे इनकमींग कॉल्स फ्री असल्यास उत्तम!>> असा कुठलाही प्लॅन माझ्या माहिती प्रमाणे नाही.

इंटरनेट मेल्स वगैरे पाहण्यासाठी.>> AT&T चा स्मार्टफोन साठीचा प्रीपेड प्लॅन $५० प्रति महिना आहे त्यात unlimited voice & data included आहे.

धन्यवाद महागुरू.
मेट्रीक्सची पोस्टपेड सेवा(च) असते असे वाटते. ज्यांना हवे आहे त्यांना शक्यतो प्रीपेड सिमकार्डची माहिती हवी आहे.
AT&T $50 वाला प्लॅनची माहिती कुठे मिळेल. एअरपोर्ट्वर त्यांचे काऊंटर्स असतात का?

AT&T च्या दुकानातच जावे लागेल. SF airport वर तरी त्यांचे दुकान पाहिले नाही.
SF airport वर इमिग्रेशन मधुन बाहेर आले की एक फोन चे दुकान आहे. ते ट्रॅव्हलर्स साठी सीम कार्ड विकतात. पण त्यांचे प्लॅन भलते महाग आहेत. www.triptel.com

AT & T चा $50 वाला प्लॅन : http://www.att.com/shop/wireless/plans/voice/sku5240223.html#fbid=eofq4r...

matrix ची प्रिपेड सेवा आहे. http://www.matrix.in/International-SIM-cards/Prepaid-SIM-Cards/Prepaid-C...

अरे हो मघाशी बघितले Matrix...पण इथे लक्ष गेले नाही. धन्यवाद.
खूपच टॉप सिक्रेट प्लॅन दिसतोय त्यांचा request info form भरुन पाठवला तरच माहिती देणार आहेत Happy

HH check this out
http://prepaid-phones.t-mobile.com/prepaid-plans
For India calling I would suggest Skype. To call (within) all over US you can use Gmail/gtalk in US which is free, call option will appear once you log in. It allows you to dial any number (mobile or landline or toll free)

रुपॉ +१
मेट्रो पिसीएस (आता टी मोबाईल) सर्वात स्वस्त वाटते (कारण डेटा/कॉलिंग अन्लिमिटेड आहे) . इंडिया कॉलिंग करता स्काईप शिवाय कॉलिंग कार्ड ही वापरता येतील. Happy

ह्ह बरेच जण देशात फोन करायला reliance calling card वापरतात. ते देशात भरता येते नि इथेहि तेच वापरून domestic and international calls करता येतात असे काहितरी आहे. चेक करून पहा.

हह, देशात फोन करण्यासाठी मी, https://www.dial91.com/ ही प्रीपेड सर्वीस वापरते. कधीच काही प्रॉब्लेम आला नाही. त्याचा अमेरिकेत डोमेस्टिक साठी वापर करता येतो का , माहित नाही. विचारुन बघ.

हह मी रिलायन्स कॉलींग कार्ड वापरले आहे व अतिचशय उत्तम आहे. Happy नेटवरुन रिचार्ज पण करता येते. आत्तापर्यंत जेव्हढ्या वेळा गेलो आहे तेव्हा तेव्हा तेच वापरले आहे.

भारतातून युएसमधे इनकमींग कॉल्स फ्री असल्यास उत्तम!
>>> भारत --> युएस फ्री कॉल फक्त स्काईपद्वारे आहे. पण MTNL च्या कोणत्याही फोनवरून १३ आकडा नंबरच्या आधी फिरवल्यास भारतातील लोकल दरात युएस लँडलाईनला फोन करता येतो.
१३-००१-बाकीचा दहा आकडी नंबर.

सर्वांना धन्यवाद. रिलायन्सची माहिती काढल्यावर इथे लिहिन.
मॅट्रीक्सचे दर बर्‍यापैकी आहेत असे कळले. साधारण २५ रु. प्रती मिनीट. (नको म्हटल्यावर कॉर्पोरेट पॅक मधून काही चांगले डील मिळतय का बघून सांगू असं सांगण्यात आले.)

T-Mobile has option for Prepaid. $50.00 Unlimited Talk+Txt+Data and additional $10 for International calling feature which gives unlimited Lanline (Not Mobile) calling and Unlimited TXT (SMS) to mobile in in India