दगडात देव आहे का?

Submitted by सदाफटिंग on 6 February, 2013 - 22:01

सौंदर्य म्हणून मुर्ती ठीक आहे. पण त्यात देवत्व हे विशिष्ट समाजाचे पोट पिढ्यानपिढ्या भरावे यासाठी आणले गेले. दगड हा दगडच असतो. दगडात देव आहे का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

>>आपण जपानी भाषेचे अभ्यासक आहात काय? Happy

>>बाकी महेश, यामाहा, यामासाकी मझॅक, टोकियो हे शब्द कोणत्या भाषेतले आहेत?
जपानी भाषेत य च्या बाराखडीत या, यु आणि यो एवढी तिनच अक्षरे आहेत.

इब्लिसराव, तुम्हाला माझी पोस्ट चुकीची वाटली म्हणून मी प्रश्न विचारला. मी कुठेही संयम सोडून पोस्ट लिहीलेली असल्यास तुम्ही दाखवा. मी तुमची इथेच जाहीर माफी मागेन.
मी प्रतिकात्मक गोष्टीचा उल्लेख केला त्यात कुणाच्या आईवडीलांबद्दल मला बोलायचं नव्हतं. मी त्या उल्लेखाच कारण वर दिलं आहे.
प्रतिक आणि भावना या गोष्टी तुम्ही मान्य केल्या आणि तोच माझा साधा, सरळ संबंध दाखवण्याचा प्रयत्न होता.
बाकी मी आणि माझे देव याबद्दल म्हणाल तर मी देवळात जात नाही किंवा पुर्जा अर्चा करत नाही. तरीही वर्षातून पाच-सहा दिवस मी घरी गणपती पुजतो. कारण परमेश्वर आहे ही संकल्पना मला मान्य आहे कारण या समस्त जगाचा गाडा चालवणारा जो कोणी आहे तोच माझ्यासाठी परमेश्वर आहे. मग त्याला कुणी काहीही नाव देऊ द्यात. कोणत्याही धर्माच्या श्रद्धेचा मी आदर करतो. हा बाफ खटकला म्हणून भावना व्यक्त केल्या.

जपानी भाषेत य च्या बाराखडीत या, यु आणि यो एवढी तिनच अक्षरे आहेत.<<< ओक्के. धन्यवाद. हे अर्थातच माहीत नव्हते.

मी कुठेही संयम सोडून पोस्ट लिहीलेली असल्यास तुम्ही दाखवा. मी तुमची इथेच जाहीर माफी मागेन.<<<

उल्टा कोतवाल चोरसे मार खावे Lol

कौतुकभाऊ,
त्या फोटोवर थुंकून बद्दल एकदा पूर्वी चर्चा झालेली आहे माझी. म्हणुन त्यातल्या विसंगती दाखवल्या होत्या फक्त. तुमची मते ठाऊक आहेत. व आदरही आहे.
आधीच्या पोस्टीतील Wink असे चिन्ह टाकून लिहिलेली ओळ तुमच्या साठी नसून ओवाळून टाकलेल्या आयडी करता आहे हे तुम्हाला लक्षात आले आहेच.
लोभ आहेच, तो वाढावा हे वि.

अजिबात लोभ नाहीये...... फक्त कुरापती काढल्यास तो ठेवावा लागेल Wink Light 1

बाकी लगे रहो कौतुकभाई
हाण तिच्या मारी.....>> अनुमोदन

दगडात देव आहे का?>>>> नाही, दगडात देव नसतो, दगडात बेडकी असते.
.
.
.
नाही पटत.हे बघा
समर्थ रामदासांचे हे वचन.त्यांच्याच शब्दात.
‘खडक फोडिता रोडकी।
निघे तयातून एक बेडकी॥
सिन्धू नसता तियेचे मुखी पाणी कोण घालितो।
तो राम आम्हाला देतो॥

तात्पर्य-दगडात फक्त बेडकी राहते, देव दुसरीकडेच कुठेतरी असतो.यापुढे देवभोळ्या संकल्पनांचा वापर करुन कुणी झोळी फिरवल्यास त्यात शहाण्याने पैसे टाकू नये.

>>>>> ३. तो देव उदा. ख्रिश्चनाचा/मुसलमानाचा/कुणा नरभक्षक आदीवास्याचा असेल, तर तुम्ही बिनदिक्कित थुंकू शकाल, <<<<<<
माफकरा इब्लिसराव, तुमचे गृहितकच चूक आहे. कोणताही हिन्दू, कोणत्याही धर्मस्थळावर जाऊन थुन्कणे वगैरे क्रिया करीत नाही. असे वागायची डोकी या देशाने गेल्या दोन हजार वर्षात परकीय अन परधर्मिय आक्रमकांकडेच बघितली आहेत, व त्याच्या साक्षी या संपूर्ण देशभर तुटक्या फुटक्या मूर्ति अन मंदिरान्च्या रूपाने जागोजाग आहेत. (आता इथे कृपया बाबरी नावाच्या वास्तूचा उल्लेख करू नका Wink )

>>>>>> उगा या लॉजिक मधे आईबाप आणले की भावनिक फाटाफूट सुरू होते. दगडात 'देव' आहे ही फक्त भावना आहे. दुसरे काहीही नाही. <<<<< Lol
अहो ही भावनीक फाटाफूट नव्हे तर "दगडात देव आहे" या भावनेने हिंदूमधे जी भावनीक एकजूट कायमच अस्ते ती असंख्य परधर्मिय, परकीय व स्वकीय फितुरांना सहन होत नाही, दुसरे काहीही नाही !

मूळातच तुमचे गृहितक चूक असल्याने पुढील क्रमवार मुद्दे दखल न घेण्यासारखेच आहेत.

>>>>>> तात्पर्यः
>>>>>>> धागाकर्ते जेंव्हा म्हणतात, 'दगडात देव आहे की नाही'? तेव्हा या प्रश्नाचे उत्तर 'नाही, तो मनात आहे, व दगडातही असेल अशी "श्रद्धा" आहे. फोटो वा मूर्ती हे प्रतिक.' इतकेच होते. <<<<
नाही, धागाकर्त्यानी केवळ दगडात देव आहे की नाही, इतकाच प्रश्न विचारला अस्ता तर इथल्या हिंदुन्नी त्यास समर्पक अध्यात्म, आधीदैविक बाबी समजावल्या असत्या, मात्र प्रश्न कर्ता "कुणा विशिष्ट समाजाच्या पोटापाण्यावर" घसरला, कारण त्यालाच ह्या प्रश्नाचे उत्तर नव्हे तर येथिल वाचकान्च्या मनात बुद्धिभेद उत्पन्न करावयाचा होता, तो नाही जमला तर जाता जाता असत्य पुन्हा पुन्हा थापल्यास सत्य भासू लागते या नियमाला धरून, त्या "विशिष्ट वर्गाच्या पोटापाण्याच्या सोईच्या निमित्ताने" त्या विशिष्ट वर्गावर दुगाण्या झाडून वाचकान्चे मनात द्वेषाचे बीज रोवायचे आहे.

>>>> लिंबाजीराव मधेच तुच्छतेने ख्रिश्चन धर्माचा उल्लेख करून गेलेतच की त्यांच्या पोस्टीत. <<<<
मी तुच्छतेने नव्हे तर रोखठोक उल्लेख केला आहे, कारण असली विश्लेषणे केवळ ख्रिस्ती लोकच करीत असतात हे सत्य मान्डले तर तो तुच्छतादर्शक उल्लेख कसा काय?

>>>>>> अन ज्या कावळ्या कुत्र्यांना वा गावात विमनस्क फिरणार्‍या वेड्यास देव फिव इ. कन्सेप्ट नसते ते बिनदिक्कीत शेंदूर फासलेल्या दगडांचाही वापर विजेच्या खांबाचा वा गांधीबाबाच्या पुतळ्याचा करावा, तितक्याच निर्विकारपणे करतातच की. <<<<<
करत असतीलही, अन तसेच शन्कराच्या पिन्डीवर कावळ्याकुत्र्यान्सारखाच एखादा विंचू आला तर त्यास बिनदिक्कत पणे चप्पलेने/वहाणेने ठोकून चिरडून मारावा, खाली पिन्डीला चप्पल लागेल याचा विचार करू नये असेही हिन्दून्चे सन्त सान्गून गेलेत, अन हिन्दू तस्सेच वागतात, तुम्हाला म्हैत नसाव म्हणून सान्गितल हो! Wink

कौतुक शिरोडकर, तुमच्या मजकुराशी सहमत Happy

येऊकामी,.................

नको नको नको युऊ तरीही येतोच !!

धन्यवाद येऊकामी...... तुम्हीच स्वता: उदाहरण दिलत !!

अरेरे

खडक फोडिता रोडकी।
निघे तयातून एक बेडकी॥
सिन्धू नसता तियेचे मुखी पाणी कोण घालितो।
तो राम आम्हाला देतो॥

तुम्ही ह्या उदाहरणात फक्त दगड बघीतलत ? त्या पुढे बघा...
त्याच उदाहरणात आहे. दगडात ती बेडकी जिवंत कशी राहीली ?

दगडात देव नसतो,... बेडकी असते,.... पण त्या बेडकीला कोण पोसतो ? राम पोसतो..... हेच देवाचे दर्शन....

Pages