पुणे पासपोर्ट सेवा केन्द्रमध्ये पासपोर्टसाठी अपोइन्टमेन्ट घेणे.

Submitted by पेरु on 25 January, 2013 - 03:44

मला माझ्या आई वडिलांचा पासपोर्ट काढायचा आहे. त्यासाठी नविन प्रक्रियेनुसार मी ऑनलाइन फॉर्म भरला. आता पुढची पायरी म्हणजे जवळच्या PSK मध्ये पासपोर्ट सबमिशनसाठी appointment घेणे. मी एक महिना झाले, रोज प्रयत्न करत आहे, appointment घेण्याचा. पण ३० ते ४० सेकंदातच सर्व appointment बुक होतात. बरोबर ३ वाजता स्लोट सिलेक्ट केला, तरी पेज हँग होउन एक्स्पायर होते. कोणी यावर उपाय सुचवेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रयत्न करत राहणे एवढाच उपाय Happy माझ्या मैत्रीणीने अनेकदा प्रयत्न केल्यानंतर एकदाची मिळाली तिला अपॉईंटमेंट...

हाच अनुभव मला ठाण्याला आला. नंतर चेक केलं तर समजलं की १५ वर्षां खालील मुलांना व ६० वर्षां पुढील सीनीयर लोकांना अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. सरल वॉक इन करायचं.....

आर्थात प्रत्येक PSK चा रुल वेगळा आहे. तुम्ही जरा साईट वर उजव्या हाताला 'न्युज" सरकत असतात. तिकडे तुमच्या PSK ची न्युज पहा. किंवा सरळ फोन करा. १० ते १२.३० असा डायरेक्ट जाण्याची वेळ आहे.

मागच्या आठवड्यातला सुखद अनुभव सांगते. माझ्या मुलीचा ( वय १२) पासपोर्ट रीन्यु करायचा होता. पत्ता बदल वगैरे नव्हता...

आम्ही ऑनलाईन फॉर्म १२/१/२०१३ ला तात्काळ मधे भरला. मग ओनलाइन अपाँइंटमेंट च्या मागे लागलो. अचानक हे सापडले... मग १७/१/२०१३ ला तिकडे गेलो. मायनर तात्काळची आणि नॉर्मल ची लाइन वेगवेगळ्या होत्या. सरळ टोकन मिळालं आणि पुढ्ल्या प्रोसीजर भराभर करुन आम्ही दीड तासात घरी पण गेलो. आश्चर्य म्हणजे १९ तारखेला पासपोर्ट आला सुध्धा!!!!!

तुमच्या साठी = जर दोघांचे वय ६० च्या वर असेल, तर चेक करा ...पण ९९% डायरेक्ट जाता येतं.... पहिल्यांदाच पासपोर्ट काढत असाल तर तिकडे PSK मधे काही वेळ लागत नाही, फक्त पोलीस तपासणी होवुन पासपोर्ट ताब्यात मिळतो. त्यातही तात्काळ असेल तर शुल्क ३०००/- भरुन, पोलिस तपासणी होवुन १० दिवसात पापो येतोच घरी.... नॉर्मल असेल तर १ महिना....

पण मी खुप खुश आहे... उत्तम सर्व्हीस मिळाली.....

साइट वर सगळे एजंट आपली दुकानं उघडुन ३ वाजता लॉक करुन टाकतात... त्या मुळे आपल्याला टाईम मिळत नाही.....

आई ग !!! जस्ट मीस....

ऑनलाईन फॉर्म नॉर्मल मधे भरला की तात्काळ मधे ? कारण तिकडे ( ठाण्याला ) पापो सेवा केंद्रात तात्काळ वाले डायरेक्ट साधारण २५ जण घेतले .. जे पहिले आले त्यांना घेतले...

लक बघा.... नाहीतर आहेच मग ऑनलाईन करत रहाणं.....

मोकिमी ते ठाण्याचे केंद्र कुठे आहे? मद्त करा. मुलगी अजून १५ च्या आत आहे त्यामुळे काम करून टाकते. बरोबर काय डॉक्स नेलेलेत. ? मजकडे येथील रेशन कार्ड नाही अजून.

सिनियर सिटीझन असूनही फायदा नाही. माझ्या आईवडलांनाही शेवटी एजंटकरवी घ्यावी लागली भेटण्याची वेळ.
पेरु- तोच इश्यु आहे. ३ मिनिटांचा फंडा. Sad

सिनियर सिटीझन असूनही फायदा नाही>>>>

पुणे केंद्रात चालत नाही का ?

ठाण्यात मी गेले तेंव्हा तर काठी टेकत अनेक लोक आले होते. डायरेक्ट.... चटकन काम झालं....

अमा....

passportindia.gov.in ही साईट पहा. ठाण्याला वागळे इस्टेटला

Dosti Pinnacle,Unit No G1,Plot No E7,Road No 22,Wagle Industrial Estate,Thane West - 400604

ATM Facility with All Bank Cards Available.

जातानाच्या आधी

१. नीदान एक दिवस आधी पास्पोर्ट अ‍ॅप्लीकेशन भरुन नंबर जनरेट करा. त्याचं प्रिंट नक्की बरोबर घ्या.
२. जाताना सकाळी १० च्या ठोक्याला तिकडे जा.
३. बरोबर रेशनकार्ड किंवा आधारकार्ड, किंवा टेलीफोन बील ( यादी साईट वर दिलेली आहे) ती सगळी कागदपत्रे व त्यांच्या २ फोटो कॉपीज घेवुन जा
४. शाळेचे आयकार्ड बरोबर असु दे
५. साइट नीट बघा एक दोन अनेक्शर्स आहेत .. मायनर साठी.. ती लागली नाही तरी उगाचच भरुन घेवुन जा... ( माझ्या कडे आयत्या वेळी त्याने एक मागितलं... होतं म्हणुन नशीब)
६. दोन्ही पालकांचे पासपोर्ट बरोबर लागतात. एखादा पालक हयात नसेल तर डेथ सर्टिफिकेट
७. तीन ठीकाणी ओरीजनल तपासतात....
८. २ तासाचा वेळ काढुन जा....

अमा

अजुन एक...

आजकाल ठाणे केंद्रावर क्रेडिट कार्ड चालते. किंवा कॅश पण घेतात... डी.डी. न्यायची कटक्ट नाही... तात्काळ मधे अर्ज केला असेल तर ३०००/- पोलिस व्हेरीफिकेशन चा पण फॉर्म भरुन घेवुन जा.... तात्काळ मधे साधारण १५ दिवसात पापो हातात

नॉर्मल मधे अर्ज केला तर १ महिना... शुल्क रु.१०००/-

घाई नसेल तर नॉर्मल मधेच भरा... सेवा केंद्रात तेवढाच वेळ लागतो... १२ पर्यंत मोकळे.... कागद मात्र चोख पाहिजेत....

मोहन कि मीरा,
मला हि अगदी तुमच्यासारखाच अनुभव आला. मला आईचा passport काढायचा होता, पुणे psk मधे. पहिल्या वेळेस online appointment घेऊन घेलो होतो. २ ची वेळ मिळाली होती. पण आमचा नंबर यायला ३.३० वाजले. नंतर तिथल्या अधिकार्यांनी १-२ कागदपत्र नाहीयेत अस सांगून बोळवण केली. अख्खा दिवस वाया गेला.
जाताना तिथल्या 'enquiry encounter' वरच्या मुलानेच सांगितले कि तुमच्या आईचे वय ६१ आहे. त्यामुळे तुम्हाला appointment ची गरज नाही.
८ दिवसांनी परत गेलो (डिसें.च्या पहिल्या आठवड्यात)राहिलेली कागदपत्र घेऊन तेव्हा direct गेलो appointment न घेता. १० वाजता आत गेलो, कुपन मिळालं आणि सगळी प्रोसीजर होऊन आम्ही १ वाजता तिथून बाहेर पडलो.
आता पोलिस enquiry सुद्धा झाली. पासपोर्ट यायला हरकत नाही पुढच्या महिन्याभरात.
आईकडे marriage certificate नाहीये आणि तिचा लग्नानन्तर नाव change केलं होत. त्यामुळे ' name change affidavit' करून आणायला सांगितलं होत. शिवाय २०११-१२ दोन्ही वर्षांचे बँक passbooks बघायला मागितले.

हो कम्पल्सरी आहे. म्हणजे आम्ही फक्त २०१२ चं नेलं होतं, १ वर्षाच. २०११ चं नाही. म्हणून ते पण आणायला सांगितलं.

पेरू.. ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळणं हे जिकिरीचं आणि नशीबाचं काम आहे. अनेक ब्लॉग्स निघालेत या अनुभवावर Happy एका ब्लॉगनुसार तुम्ही जर ऑफिसमधून (किंवा इंटरनेट कॅफेतून) अपॉइंटमेंट घ्यायचा प्रयत्न करत असाल तर थोडं मुश्कील आहे कारण ते IP Address ट्रॅक करतात. एका दिवसात जास्तित जास्त ३ अपॉइंटमेंटस् एका IP Address वरून घेता येतात. तर एकदा घरुन ट्राय करून बघा.
मी स्वतः एजंटकडून काम करून घ्यायच्या विरोधात आहे पण जर तुम्हाला बाहेर जायची घाइ असेल तर एजंटला गाठून अपॉइंटमेंट घ्या. पुण्यात ५०० पासून १५०० रेट्स आहेत. हल्ली एजंट लागला तर फक्त अपॉइंटमेंट घेण्यासाठीच लागतो कारण प्रत्येकाला पासपोर्ट सेवा केंद्रात जावेच लागते.

पुण्यात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना नॉर्मल पासपोर्टसाठी walk-in चालतं (तात्काळसाठी walk-in नाही), अपॉइंटमेंटची गरज नाही. पण हे नेहमी बदलत असतं. त्यांच्या वेबसाइटवर अपडेटस् असतात काही बदल असतील तर

मला कलकत्त्यात अपॉइन्टमेन्टसाठी असाच प्रॉब्लेम आला. शेवटी रेग्युलर एजन्टकडून न करून घेता आमच्या नेहमीच्या ट्रॅव्हल एजन्टकडून हजार रुपये देऊन करून घेतलं (निदान नित्यसंपर्कातल्या वैयक्तिक संबंध असलेल्या माणसाला पैसे दिले एवढंच काय ते!!) Sad
तत्काळमधे काढला. पण बाकी अनुभव अतिशय सुखद. अतिशय मदततत्पर कर्मचारी, आदबशीर वागणूक, इ. ३ दिवसांत पापो हातात आला. पोलिस व्हेरिफिकेशनही त्यातच होऊन गेलं..

मीही एजंटाकडून अपॉईंटमेन्ट घेतली. माझा तत्काळ मध्ये नव्हता. सावकाश तीन महिन्यांनी मिळाला. सर्वात जास्त वेळ पोलिसांनी लावला Sad

सावकाश तीन महिन्यांनी मिळाला. सर्वात जास्त वेळ पोलिसांनी लावला >> आजच पेपरमध्ये पण आलंय. महाराष्ट्रात पासपोर्ट मिळायला सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि तो मेनली पोलिस व्हेरिफिकेशन वेळेवर होत नसल्यानं Happy

बाकी अनुभव अतिशय सुखद. अतिशय मदततत्पर कर्मचारी, आदबशीर वागणूक, इ. >> यासाठी वरदाला परत एकदा अनुमोदन Happy

पुण्याला पासपोर्ट सबमिशनसाठी appointment घेत आहात तर वेबसाईट अ‍ॅड्रेस कस्ट्मर सर्व्हिस वाल्यांना कॉल करुन confirm करुन घ्या. मी जून मधे आईच्या पासपोर्ट रिन्युअल चे काम केले त्यामुळे अनुभव आहे.
मी गुगल सर्च करुन पुण्याची वेबसाईट अ‍ॅक्सेस केलि आणि appointment घेतली पुण्याच्या सेनापती बापट रोड च्या ऑफिसमधे. सगळे रिन्युअल साठि चे पेपर नेले होते. पण तिथे गेल्यावर document चेक करणार्‍याने काहितरि अ‍ॅफिडेविट मागितले. मी म्हटले हे लिहिले नाहिये तुमच्या वेब्साईट वर, तिथला माणुन काहिहि सांगायला तयार नव्हता, म्हणे हे वर लिहिले ते वाचा, मग त्याच्या मागे लागुन आणि तिथेले वाचुन कळाले ति ब्रँच फक्त तात्काळ साठि आहे. मग तिथुन थोडि माहिति काढुन कोंढव्याच्या ऑफिस मधे गेले, तर तिथे कळाले ते लोक २ वेबसाईट मेंटेन करत आहेत, मी ज्या वेबसाईट वरुन फॉर्म घेतला तो कोंढव्याला चालणार नाहि. मग तिथल्या एका मुलिने मला वेबसाईट चा नीट पत्ता दिला, आणि मी मग सगळे पेपर चेक करुन घेतले कि हेच लागतिल ना रिन्युअल साठि म्हणुन. मग घरी जावुन नविन फॉर्म भरुन कोंढव्याला appointment घेतली आणि मग तिथे सगळे फॉर्म सबमीट केले. ३ आठवड्यात आईचा नविन पास्पोर्ट घरि आला होता.
कोंढव्याला अशी बरिच लोक होति जी माझ्यासारखा चुकिचा फॉर्म घेवुन आली होति. आता जर त्यांची एकच वेब्साईट असेल तर प्रोब्लेम नाहि येणार.
कोंढव्याला मला अतिशय चांगली cusromer service मिळालि, निट समजावुन सांगणारे लोक होते. I was shocked to see it. चांगला फीड्बॅक देवुन आले मी त्यांना. सेनापति बापट रोड वर तुम्हाला कुठल्याहि भारतिय सरकारी ऑफिसात मिळणारि service मिळाली.जमिन-आसमानाचा फरक आहे दोन्हि ठिकाणी.

मलाही हाच अनुभव येत होता आधी की कधीच स्लॉट रिकामे दिसत नव्हते. त्यानंतर माझ्या एका मित्राने सांगितले की रोज संध्याकाळी ७ वाजता पुढल्या १५व्या दिवसाची (की १४व्या दिवसाचे) स्लॉट उघडतात. बरोबर ७ वाजता मी लॉगिन करून स्लॉट घेतला तेव्हा मिळाला. ही गोष्ट साधारण २०१२ जुन-जुलै मधली आहे.

ओके. नेहेमीप्रमाणे आज पण ट्राय केले आणि स्लॉट सिलेक्ट केल्यावर पेज हँग झाले. मग क्लोज करण्याआधी परत अपॉइन्ट्मेंट वर जाउन बघितले तर मिळाली होती. ग्रेट. सर्वांना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

Aai-vaDeel thanyala asataat aaNi sasubai nashikla. tighanche passports august madhye expire hotahet. renewal che application sadharaN kitee divas aadhi karave lagel?
Tyasatheehee appointment ghyavee lagel ka?

मी ठाणे केंद्रात स्वत पासपोर्ट काढला होता. सगळी कागद पत्र निट असली कि लगेच काम होत हा माझा अनुभव,अर्ज दिल्यापासून १५ दिवसात पोलिस वेरिफ़िकेशन आल होत. परंतु पोलिसांचा अनुभव फार विचित्र होता.प्रत्येक वेळेस काहीतरी कागदपत्र, साक्षीदार,शेजारी कारण सांगून पुढच्या वेळी बोलवायचे जवळ जवळ ३ महिने खेपा घालत होतो.काहीच नाही तर साहेब आले नाहीत असा म्हणायचे.पैसे हवेत का?? हे तरी कस विचारणार ? शेवटी ३ महिन्यांनी तो सुवर्णक्षण आला. एका शनिवारी पोलिसांनी आम्हाला फोन करून बोलावलं. आम्ही गेलो तर तिथे एका खोलीसमोर मोठी रांग होती. माझे कागद देऊन त्यात उभा राहायला सांगितलं, आत गेले तर इक उग्र चेहर्याचा मिशावाला साहेब बसला होता. त्याने नाव विचारलं सही केली. तिथून बाहेर आले तर नेहमी आम्हाला परत परत बोलावणारे दोन पोलिस टेबल टाकून बसले होते. मी जाऊ लागताच म्हणाले ३०० रु द्या. नंतर सगळा प्रकार लक्षात आला कि ३ महिन्यात आलेल्या सगळ्या वेरीफिकेषन केसेस त्यांनी अडकवून ठेवल्या होत्या एका दिवशी सगळ्यांना बोलावून क्लिअर केल्या मी गेले होते तेव्हा साधारण पने १०० लोक तरी होते आणि आणखी येत होता.पासपोर्ट प्रकारानुसार कोणाकडून ३००,५०० असे पैसे घेत होते. माझा पासपोर्ट त्यानंतर १५ दिवसात आला. या हि गोष्ट ६ वर्षापूर्वीची आहे पण आठवली आणि शेअर करावीशी वाटली इतकेच.

मी पहिल्यांदा पासपोर्ट मुंबईत काढला होता १९९८ मध्ये... माझे पोलिस व्हेरिफिकेशन काळाचौकी पोलिस स्टेशन मध्ये होतं.. मी खूपदा ऐकले की पोलिस स्टेशन मध्ये टेबलखाली द्यावे लागते आणि काळाचौकी पोलिस स्टेशन हिंदी चित्रपटात खूप बदनाम होते.. म्हणून मी जरा सांशक होतो.. पण सगळे सोपस्कार नियमानुसार झाले... असाच अनुभव दुसर्यादा पासपोर्ट (घरचा पत्ता बदलला होता, २००६ ) काढताना आला - नेरुळ पोलिस स्टेशन मध्ये.. सर्वसाधारणपणे लहान मुंलाचा पासपोर्ट लवकर येतो.. बहुतेक पोलिस व्हेरिफिकेशन नसावे.. नंतर स्त्रीयांचा आणि नंतर पुरुषांचा पासपोर्ट (पुरुषांची लाईन स्त्रींयापेक्षा जास्त असावी) येतो..

ऑनलाइन अपाँटमेंटचा प्रकार नविन चालु झाला आहे का?
बाकी पुण्याच्या पासपोर्ट ऑफिसबाहेरचे एजंट लोक फक्त पैसे काढतात. क्षीरसागर म्हणजे मराठी नाव हे बघुन बघुन त्याला काम दिले. पठ्याने थापा मारण्यापलिकडे काहीच केले नाही. सगळी कामे मलाच करावी लागली. परत हा म्हणतो की आमचे आतुन कनेक्शन असतात आणि मी सांगितले म्हणुनच तुमचे काम झाले.
(एजंट कडे जाणार असलाच तर ह्या क्षीरसागर नावाच्या एजंट कडे बिलकुल जाउ नका)

पेरु, ऑनलाईन चेक कर ना. रेसिडेन्स प्रूफ म्हणून कुठली कागदपत्रं चालतात त्याची यादी आहे. पासबुक नसेल तर इतर कागदपत्रं आहेत का बघ.
आणखी एक. जर ग्रॅज्युएशन अ‍ॅण्ड अबव्ह असं शिक्षण नमूद केलं असेल तर डिग्री सर्टीफीकेट घेऊन जावं लागतं. दहावीच्या सर्टीफिकेटवर जन्मतारीख असते ते लागतंच लागतं.

पेरू... पासपोर्ट सेवा केंद्राच्या वेबसाइटवरती सगळी माहिती दिलेली आहे.
https://portal1.passportindia.gov.in/AppOnlineProject/welcomeLink
इकडं तिकडं जास्त विचारत बसण्यापेक्षा त्यांच्या वेबसाइटवर थोडा शोध घेतला तर तुम्हाला पाहिजे ती माहिती अचूक मिळेल. नसेल तर तुम्ही त्यांच्या कॉल सेंटरला कॉल करा ते तुम्हाला सांगतील. तुम्ही जर पत्त्यासाठी रेशन कार्ड देणार असाल तर त्याबरोबर अजून एक अ‍ॅड्रेस प्रूफ द्यावे लागेल ज्यात पासबूक आले. ही माहिती त्याच वेबसाइटवरून.

You are required to submit atleast 1 of the documents listed below.
1 Water Bill
2 Telephone (landline or post paid mobile bill)
3 Electricity bill
4 One year statement (with transactions)/ Passbook of running bank account (Scheduled Commercial bank excluding Regional Rural banks and local area banks)
5 Income Tax Assessment Order
6 Election Commission Photo ID card
7 Proof of Gas Connection
8 Certificate from Employer of reputed companies on letter head
9 Spouse's passport copy (First and last page including family details), (provided the applicant's present address matches the address mentioned in the spouses passport)
10 Applicant's current and valid ration card
11 Parent's passport copy, in case of minors(First and last page)
12 Aadhaar Card

Note (For Document No. 1, 2, and 3) : Atleast 2 bills are required - One bill should of be of last year and the other bill of current year.
Note (For Document No. 8) : Only public limited companies can give address proof on company letter head along with seal. Computerised print-outs shall not be entertained.
Note (For Document No. 10) : If any applicant submits only ration card as proof of address, it should be accompanied by one more proof of address out of the given categories.

पत्त्याशिवाय जन्मतारखेचे प्रूफ द्यावे लागेल.

You are required to submit atleast 1 of the documents listed below.
1 Birth certificate issued by a Municipal Authority or any office authorized to issue Birth and Death Certificate by the Registrar of Births & Deaths
2 School leaving certificate / Secondary School leaving certificate/ Certificate of Recognized Boards from the school last attended by the applicant or any other recognized educational institution
3 Affidavit sworn before a Magistrate/Notary stating date/place of birth as per the specimen in Annexure 'A' by illiterate or semi-illiterate applicants (Less than 5th class).

शिवाय Non-ECRसाठी एक प्रूफ द्यावे लागेल.

वत्सला, पासपोर्ट अवैध व्हायच्या साधारण ६ महिने आधी तुम्ही रिन्यूअल करू शकता. हल्ली रिन्यूअल म्हणजे पासपार्ट रि-इश्यूच असतो. नवीन पासपोर्टप्रमाणेच सर्व प्रोसेस असते. मी वर दिलेल्या लिंकवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल.

मनीष, धन्यवाद! लिंक बघते.

हल्ली रिन्यूअल म्हणजे पासपार्ट रि-इश्यूच असतो. नवीन पासपोर्टप्रमाणेच सर्व प्रोसेस असते>>>>>>> अरे बाप रे! ज्ये नां ना परत सगळे डॉक्युमेंटस गोळा करावे लागणार! पण त्यांना डायरेक्ट जाता येते हाच काय तो दिलासा!

लिंक बघितली. तीन ज्ये.ना. पैकी दोघांचा पत्त बदलला आहे त्यांनाच १-२ जास्तीचे डॉक्यु द्यावे लागतील. पण एकुणात सोपी प्रोसिजर वाटतेय. त्यांचे काम झाल्यानंतर काय अनुभव होता ते नक्की लिहीन.

एक थोडा वेगळा पण पासपोर्ट संबंधी अनुभव.
माझी मुलगी व मी दोघी पासपोर्ट ऑफिसमधे जावून तिचा पासपोर्ट प्रोसेस करून आलो. पोलीस एन्क्वायरी वगैरे पण पार पडली. (तिथेही आम्ही दोघीच गेलो होतो)व २ महिन्यांनी पोस्टमन पासपोर्ट घेवून घरी आला तेव्हा मी व मुलगी दोघीच घरी होतो. ती मायनर असल्यामुळे पासपोर्ट मला (आईला) मिळू शकणार नाही असे पोस्टमनने सांगितले पासपोर्टची डिलीव्हरी फक्त बाबांकडेच दिली जाते असा नियम आहे असे म्हणाला. मी तिची आई आहे. माझी सही पासपोर्ट पेपर्स वर आहे, मी तिच्याबरोबर पालक म्हणून गेले होते हे काहीही उपयोगी पडले नाही. पासपोर्ट वडिलांच्याच हातात दिला जाईल अन्यथा परत जाईल ह्यावर तो ठाम होता. तसा रुल आहे म्हणाला. वडिल बाहेरगावी होते त्यांना लगेच येता येणे शक्य नव्हते. फोनवर मी पोस्ट्मनशी बोलणेही करून दिले परंतु आलेला पासपोर्ट मला द्ययला तो तयार नव्हता. नियम पाळला नाही तर माझी नोकरी जाईल म्हणाला.

मी त्याला विचारले की वडील नसतेच तर? मी आणि नवरा सेपरेटेड असतो तर ?- उत्तर्...मग तुम्हाला मिळाला असता, कारण मग तुम्ही सिंगल पेरेंट असता व मग नियमाप्रमाणे तुम्हाला पासपोर्ट देणे शक्य होते.

मग त्यावेळी पासपोर्ट परत गेला व नंतर नवरा घरी आल्यानंतर पोस्टात जावून त्याने पासपोर्ट आणला.

मला राग ह्या गोष्टीचा येतोय, की आई पापो प्रोसेस करू शकते, पालक म्हणून बरोबर जावू शकते पण पासपोर्ट तिच्या हातात मात्र मिळत नाही. तिथे तो फक्त वडिलांच्याच हातात दिला जातो. हा कायदा असा विचित्र का आहे? काही कारण असेल का त्यासाठी ?

सुमेधाव्ही, मला नाही वाटत असा काही कायदा असेल म्हणून. पोस्टल रूल्स वेगळे असतील तर कल्पना नाही. तरी या लिंकला जाऊन बघा : http://passportindia.gov.in/AppOnlineProject/online/faqPostalDispatchTra...

सुमेधाव्ही,

>> हा कायदा असा विचित्र का आहे? काही कारण असेल का त्यासाठी ?

'''पितृसत्ताक' राज्यपद्धती' आपली'! किंवा 'पितृसत्ताक' 'राज्यपद्धती' 'आपली'!

घटनेतली लिंगनिरपेक्षतेची तरतूद उघडपणे धाब्यावर बसवली आहे.

आ.न.,
-गा.पै.

sumedhav;
what happened to you is not because of rule. Many times postman except some money for delivering passport, though not much. last week we got passport for our three month old son. Myself and my wife both were not at home but postman handed over passport to our mother w/0 any questions. So such experinces are very subjective.

ह्म्म्...तसेही असू शकेल परंतु त्या दिवशीचा पोस्ट्मन असे म्हणाला होता की वडिलांच्या हातीच सोपवायचा असा नियम आहे. मी त्याची काही दिवाळी वगैरे अशी अपेक्षा असावी अश्या अंदाजाने आडून चौकशी केली असता त्याने नियम न पाळल्यास माझी नोकरी जाईल असे सांगितल्याने माझी पंचाईत झाली. पोस्ट्मन वयस्कर होता त्यामुळे तो खरे बोलत असावा असे वाटते. खरंच असा काही नियम आहे का ते कसे चेक करणार?

ज्याचे नाव पाकिटावर आहे त्याच्याच हातात ते पाकिट द्या असे पासपोर्ट ज्या पाकिटातुन येतो त्यावर छापलेले असते. पण असे असले तरीही शेवटी कोणाच्या हातात द्यावा ते पोस्टमनवर अवलंबुन असते.

१ महिन्यापुर्वी एकाचा पासपोर्ट जो त्याने माझ्या पत्त्यावर बनवलेला, पोस्टाने आला. पोस्टमनने संबंधित माणुस घरात नाहीये हे ऐकल्यावर पुढे काही बोलाय्ची संधी न देता लगेच पावती फाडुन दिली आणि नंतर पोस्टऑफिसात दिडेक तास वाया घालवल्यावर पासपोर्ट हाती मिळाला. गेल्या आठवड्यात माझा पासपोर्ट मात्र मी घरी नसतानाही पोस्टमनने दिला. मी मुलीला विचारले की यावेळेस पासपोर्ट कसा काय तुझ्याकडे दिला तर ती म्हणाली गेल्या वेळचा पोस्टमन वेगळा होता, यावेळेस आपल्याकडे नेहमी येणारा पोस्टमन होता, त्याने काही न विचारता पासपोर्ट दिला.

साधना +१
माझ्या नवर्‍याचा रीइश्यूड पापो घरी आला तेव्हा मी घरी होते. माझ्या नावाने सही करून घेऊन (आडनाव वेगळं असतानाही) पोस्टमनने मला दिला. माझा पापो आला तेव्हा दार मी उघडलं नाही तर माझ्याशिवाय कुणाला देणार नाही असं पोस्टमन म्हणाला. मी होते म्हणून पोस्टाची चक्कर वाचली. दोन्ही वेळा वेगळा पोस्टमन होता. (त्यातला कुणीच नेहमीचा नव्हता).

पासपोर्ट अप्प्लाय करताना आईची सही लागते लहान मुलांसाठी.तसेच आई वडिलांशिवाय दुसर्या कोणाला तो अप्प्लाय करता येत नाही पण तो हातात बाबांच्याच द्यायचा असा काहीही नियम नाही. माझ्या मुलांचा पासपोर्ट ती ६ महिन्यांची असताना काढला तेव्हा त्यांचा बाबा परदेशी होता. त्यांचा पासपोर्ट आला मुंबईच्या आजोबांच्या पत्त्यावर आणि तेव्हा मी पुण्याला होते. म्हणजे आई बाबा नसतानाही पासपोर्ट दिलेल्या पत्त्यावर मिळाले. सुमेधाना पासपोर्ट न देण्यामागे पोस्टमन चा गैरसमज किंवा दुसर काहीतरी कारण असाव.

वरदा, मृण्मयी, साधना, गापै प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मी ह्या गोष्टीवरून एवढी चिडले होते ना त्या दिवशी, की मी खूप वाद घातला त्या पोस्ट्मनशी. मी त्याला विचारले होते की मी हा प्रकार तुमच्या वरिष्ठांकडे नेणार आहे. त्यावर त्याने मला त्यांचा फोन नं दिला व फोन करा असे सांगितले. तो पुढे जाऊन असेही म्हणाला होता..(शब्दशः आत्ता आठवत नाहीये) की कोणत्या तरी डिव्होर्स केस मधे आईकडे पापो आल्यामुळे ती मुलीला घेवून परदेशी निघून गेली व नंतर त्यावरून पण कोर्ट केस झाली. त्यामुळे मायनर व्यक्तीचा पापो वडिलांकडेच दिला पाहिजे असा नियम अहे.
मी जेव्हा पोस्ट्मन आलाय आणि वडिलांकडेच पापो देणार आहे असे म्हणतोय असे फोनवर नवर्‍याला सांगितले, तेव्हा तो काही महत्वाच्या कामात होता व बाहेरगावीही होता. त्याने त्यावेळेस माझ्यावरच चिडचिड केली व पोस्टाचा असला फालतुपणा असेल तर पापो नकोच आपल्याला, आपण नंतर एजंटकडून काढून घेवु वगैरे वक्तव्ये केली...त्यामुळे मला फारच हेल्प्लेस वाटत होते व रडायलाही हेत होते. कारण डोळ्यासमोर दिसत असलेला पापो मला मिळत नव्हता कारण मी मुलीची आई होते व वडिल नव्हते. हे सगळे म्हणजे मी केलेले सर्वच्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडणार होते. तेव्हा मी पोस्टमनला विचारले होते की लग्न व नवरा दोन्हीही आहे पण वडिल येणार नाहीत अशी कॅटेगरी नाही का तुमच्याकडे? त्यावर त्याने "नाही" असे सांगितले होते. ज्या लोकांना पापो मिळाला, त्यांचे पोस्ट्मन कदाचित नियम धाब्यावर बसवत असावेत ...मला खरंच असा नियम आहे का हे कळून घ्यायला आवडेल.

हो ... बदलता येतो . पुन्हा एकदा फॉर्म upload करा.

पण आठवणीने appointment घेताना नविन फॉर्म सिलेक्ट करा.

आजचा माझा पासपोर्ट सेवा केन्द्र, पुणे चा अनुभव खुप चान्गला होता. मोजून दोन तासात काम होवुन बाहेर पडता आले.

फॉर्म submit करून झालाय. Appoinment मिळालीय या महिना अखेर अन् आत्ता लक्षात येतेय की Birthplace भरताना जिल्हा कोल्हापूर न भरता चुकुन पुणे भरलाय. काय करता येईल आता. कृपया कोणी सांगू शकेल का ?

हो, ते वाचले मी पण त्यात लिहिलेय कि <<पण आठवणीने appointment घेताना नविन फॉर्म सिलेक्ट करा.

मी चूक असलेला फॉर्म सिलेक्ट करून appointment घेऊन झालीय.
त्यामुळे मला प्रश्न पडलाय कि आता काय करावे?

मग पासपोर्ट केन्द्राला फोन अथवा इमेल करुन विचारा की नवीन फॉर्म परत घेउन सबमिट करु द्याल का ते. असे होते की नाही मला माहीत नाही, पण पर्याय शोधुन बघा.

धन्यवाद रश्मी ,
प्रयत्न चालूच होता call center ला फोन करण्याचा.
आत्ताच माहिती मिळाली कि appoinment च्या दिवशी तिथे गेल्यावर तिथले लोक सांगतील कि काय करायचे ते.
मी सुधारित Form घेऊन जाईन , बघूया काय होते…

१)स्वतःचे व वडलांचे नाव नंतर आडनाव्,पुढे.
२)बाहेरून प्रिंट काढता येते.अकौंट लॉग इन करून.फॉर्म-प्रिंट लागत नाही.फक्त अ‍ॅपॉइनमेंट फॉर्मची प्रिंट पुरेशी आहे.
३)नातेवाईक्,कुटूंबातील सोडून कोणीही जे तुम्हाला एका वर्षापेक्षा जास्त ओळखतात आणि घराच्या आसपासचे शक्यतो किंवा तिथे राहणारे ज्यांना तुम्ही ओळखता.
४)रेफ. सिग्नेचर एकच असते.कुणाचीही चालते.पण ओळखीचा हवा.परत एक वर्षापेक्षा जास्त ओळख हवी.सोबत त्याचे ओळखपत्रही लागते.आपल्याला पो. फोन करतात तेव्हा तिथे जायचे.पोलिस घरी येत नाहीत.ती पद्धत बंड झाली आहे.

इतर काही प्रश्न असतील तरी तुमच्याकडूनच विचारा म्हणजे स्पेसिफीक उत्तरे देता येतील.

पत्ते योग्य टाकावेत.खरी माहीती भरावी.एवढे व्यवस्थित करा.