खेळ मांडला

Submitted by श्री on 26 September, 2012 - 23:15

मराठी चित्रपट सृष्टीने अनेक गाजलेले चित्रपट आतापर्यंत दिले आहे पण हल्ली मराठी चित्रपट म्हटलं की सहसा टाळलं जातं आणि ते साहजिकच आहे, हल्लीचे ( काही अपवाद वगळता) मराठी सिनेमे पाहीले की वाटतं ' का आपण हा सिनेमा बघतोय ?'.
मी जेव्हा " खेळ मांडला" बघणार होतो तेव्हाही माझी अशीच काहीशी रिअ‍ॅक्शन होती, पण जस जसा " खेळ मांडला" बघत गेलो तस तसं त्यात गुंतत गेलो.
नुकताच " बर्फी" हा हिंदी सिनेमाही पाहीला होता म्हणुन तुलना क्रमप्राप्त होती , एकी कडे रणबीर आणि प्रियांका तर दुसरीकडे ६~७ वर्षांची चिमुरडी , खरतरं कसलीही तुलना शक्य नाही , पण जेव्हा त्या मुलीच्या चेहर्‍यावरचे निरागस भाव , शुन्यातली अंध नजर पाहीली की नकळत का होईना तुलना होतेच. आणि माझ्या मते ती चिमुरडी त्याबाबतीत अनेक पावले पुढे आहे असं वाटलं. तिचं हाताने चेहरा चाचपडणं , हवेत हात हलवणं , शुन्यात बघणं , तीचं ते बहीरपण अगदी अंगावर येतं. समोर माणुस बोलतोय पण चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स अजिबात न बदलता ते ऐकत राहण ही पण एक कलाच आहे.
मला वाटतं "श्वास" नंतर थेट मनाला भिडणारी हीच कलाकृती असावी.
चित्रपटाचा शेवट आघात करुन जातो.
बाकी सगळ्यांनी , मंगेश देसाई , उदय सबनीस , प्रसाद ओक , संतोष जुवेकर , उर्मिला कानेटकर , मानसी साळवी सगळ्यांची काम मस्त झाली आहेत.
मंगेश देसाईचा दासु मनात घर करुन जातो , मंगेश देसाईने खरचं मस्त काम केलयं.
लिहिण्यासारखं बरचं आहे पण प्रत्यक्ष बघण्यात काही औरच मजा आहे. अतिशय सुंदर आणि मनाला भिडणारा चित्रपट.
माझ्यातर्फे ह्या चित्रपटाला आणि कलाकारांना धा पैकी धा .

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला मंगेश आणि त्या छोट्या मुलीची अ‍ॅक्टींग आवडली.. पण प्रसाद ओक आणि मानसी साळवी अज्जिबात नाही. अजुन खूप वाव होता मानसी ला तिची भुमिका फुलवता आली असती.. संवाद पण असे तसेच.. नो दम !
दासू सही होता. शेवट नाहि आवडला. Uhoh

डॅफो , शेवट कदाचीत डॉ. ने दासुला सुचवलेल्या उपायामुळे घेतला असावा.
शुम्पी , शांता , पेढा नक्की बघा .
बादवे त्या बाहुलीचं नावं काय आहे.

फिल्म फेस्टिव्हलमध्ये बघितला होता.
डॅफो +१
वेगळा विषय अन त्याची हाताळणी जरा वेगळी म्हणून भावला होता.( कळसुत्री बाहुलीच्या गोष्टित आपण आणि आपल्या गोष्टीत कळसुत्री बाहुली... ) परंतु चित्रपटापेक्षा माहितीपटाकडे जाणारा होता का जर Uhoh बाहुलीचे काम मस्त. दासूही छानच. शेवट मात्र वेगळा काही कराता आला असता; अगदी रडका न करता जरा सकारात्मक.
रिलीज झाला का हा? पुण्या कुठे लाहलाय काही माहीती? आईला दाखवायचाय हा.