माझं नाव 'शाल्मली' !

Submitted by Yo.Rocks on 2 April, 2012 - 14:33

प्रचि ०१:

प्रचि ०२:

प्रचि ०३:

प्रचि ०४:

प्रचि ०५:

गुलमोहर: 

एकदम मस्त आमच्याकडे खूप झाडे आहेत सावरीची पण अस लक्ष कधी गेलच नाही (झाडे खूप उंच असल्यामुळे फुले खूप उंचावर येतात )

काटेसावर नाव कुठून आलं बरं >>> बहुदा झाड्याच्या खोडावर असणाऱ्या मोठ्या काट्यामुळे आलं असावं आमच्या कडे होळीसाठी हेच झाडं वापरतात

सुंदर काढलेत प्रचि....
नावही तितकच छान आहे ... पण मी आतापर्यंत याला काटेसावर किंवा पांगारा म्हणुनच ओळखायचे...
फुलांना फारसा वास नसला ,नाजूक रूप नसलं तरिही फुलांनी डवरलेलं झाड खूपच छान दिसतं.... माझ्या आवडत्या फुलांपैकी एक ......

मस्त Happy

यो हे बघायचे राहीलेच की ,
मस्त आहेत प्रचि Happy प्रचि ३ रा ते केसर फेर धरुन नाचताहेत का कि मला भास होतोय Wink

काय विलक्षण योगायोग आहे हा योगेश.

मी दिनांक २१ जून २०१२ रोजी एका सोनुलीचा 'आजोबा' झालो. नातीचे नाव काय ठेवावे यासाठी माझ्याकडे सर्वांनी विचारणा केली, पण मी तो अधिकार सूनबाईला आणि तिच्या धाकट्या बहिणीला दिला. त्या दोघींनी नाव अगोदरच पक्के केले होते, तरीही माझ्या होकाराची त्याना आवश्यकता होती...जी मी लागलीच दिली.

त्यानी मुलीचे नाव निवडले "शाल्मली".

या नावाचा अर्थ एक विशिष्ट फूल इतपतच मला माहीत होता, पण आता इथे त्याची प्रकाशचित्रे पाहिल्यावर मी किती हरखून गेलो असेन याची तू नक्कीच कल्पना करू शकशील. थॅन्क्स

(अवांतर : "शाल्मली" चे बोटॅनिकल नाव कुणाला माहीत आहे का ?)

अशोक पाटील

साधना.....

खूपच सुंदर आहे तो तुमचा अभ्यासपूर्ण लेख. अजुनी वाचतोच आहे. "सावरी" हे नावही तितकेच लोभसवाणे आहे शाल्मलीसाठी.

तुम्हाला थोडा त्रास देतो. तुमच्या त्या लेखाला 'भवतालचा निसर्ग-१' असे नाव आहे. याचा अर्थ तुम्ही त्यापुढील भाग इथे वा तुमच्या ब्लॉगवर लिहिले आहेत ? असल्यास कृपया त्याच्या लिंक्स मला इथे द्याल ? हा विषय माझ्या आवडीचा आहे, जरी मला त्यात विशेष गती नसली तरी.

अशोक पाटील

तुम्हाला थोडा त्रास देतो. तुमच्या त्या लेखाला 'भवतालचा निसर्ग-१' असे नाव आहे. याचा अर्थ तुम्ही त्यापुढील भाग इथे वा तुमच्या ब्लॉगवर लिहिले आहेत

भाग २ लिहिला पण अजुन प्रकाशित केला नाही.. Happy

सुरेख.. एक फोटो थोडा लांबून घेतला असता तर झाड पहाता आलं असतं सगळ्यांना. होतं काय कि फोटो मधे क्लोज अप पाहातो आपण पण प्रत्यक्षात झाड पाहिलं तर ओळखता येत नाही

Pages