अशीच येशील तु जेव्हा..

Submitted by आठवणीतला मी.... on 27 February, 2012 - 04:30

अशीच येशील तु जेव्हा
माझीच फक्त होऊन ये
प्रेम करताना माझ्यावर
विसर जगाचा तुला होऊ दे.

अशीच येशील तु जेव्हा
मनात तुझ्या माझं प्रेम राहु दे,
येशील जेव्हा मजजवळ तु
मिठीत तुझ्या मला सामावुन घे.

अशीच येशील तु जेव्हा
अश्रुनां घरी ठेऊन ये,
बरोबर आणायचेच असेल तर
माझ्यावरील प्रेमाला बरोबर घेऊन ये.

अशीच येशील तु जेव्हा
जगाला सगळ्या कळु दे,
माझ्यावर प्रेम करतेस तु
जगातील प्रत्येकाला समजु दे.

नसताना या जगात मी
अशीच सये येशील का तु ??..
एकांत क्षणी तुझ्या माझ्यासाठी
सये सांग दोन अश्रु ढाळशील का तु ??....

(२७-०२-२०१२)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अनिल भाऊ धन्यवाद.
**
सुसुकु
येईल मी घेऊनी कविता फक्त तुम्ही वचत रहा. Wink