Submitted by सुलेखा on 9 February, 2012 - 01:56
व्हिजीटर व्हिसा बाबत काही प्रश्न आहेत्..जाणकारांकडुन माहिती अपेक्षीत आहे..
एका खेपेस जास्तीत जास्त किती महिने रहाता येते?
पुन्हा अमेरिका जायचे असेल तर त्यासाठी किमान किती महिने भारतात रहाणे जरुरी असते.
जितके महिने अमेरिकेत तितके महिने भारतात रहावे लागते असे ही ऐकले आहे त्याबाबत खुलासा करावा..
इथे एक नमुद करायचे आहे कि ज्याच्याकडे जायचे आहे त्यांचे एच १ बी .आहे ग्रीन कार्ड नाही..
१० वर्षाच्या व्हिसाअवधीत आपण एकुण कितीवेळा जाणे -येणे करु शकतो.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विजीटर व्हीसा वर एका वेळी १८०
विजीटर व्हीसा वर एका वेळी १८० दिवस रहाता येते. ज्याच्याकडे जाणार त्याच्याकडे कुठलाही व्हीसा असल्याने काही फरक पडत नाही. त्याचे उत्पन्न नॉर्मल असले की पुरे. मला वाटत नाही परत जाताना भारतात किती दिवस असावे असा काही नियम आहे पण हे एकदा कन्फर्म करा एखाद्या एजन्सी मधे जिथे पासपोर्ट व्हीसा ची कामं होतात तिथे.
बाकी कोणतीही बंधने आहेत असे
बाकी कोणतीही बंधने आहेत असे वाटत नाही, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमानतळावर इमिग्रेशनमधे जे I-94 कार्ड पासपोर्टला लावून देतात त्यावर दिलेल्या तारखेपेक्षा जास्त राहू नका. म्हणजे पुढच्या वेळेस अडचण येत नाही.
फारएण्ड ,वरदा हो १८० दिवस
फारएण्ड ,वरदा हो १८० दिवस एकावेळी रहाता येते..व इ-९४ वर त्या मुदतीचीच तारीख लिहीली होती..त्याप्रमाणे मी राहुन आले आहे.पण एकदा जाउन आल्यावर लगेच पुन्हा जायचे असेल तर ते किती दिवसानी जाता येते त्यासाठी काही मुदत्[किमान्]आहे का?
असे वारंवार केले तर तिथे काही अडवणुक होउ शकते का?
अजुन एक कि इथला पासपोर्ट्,व्हिसा आहे[१० वर्षाचा] तेव्हा इथेच परत यावे लागते का कि युएस बाहेर केनडा वगेरे १५ दिवस जाउन तिथुनच पुन्हा युएस जाता येते..
माझ्या ओळखीत एक दोन लोकांना
माझ्या ओळखीत एक दोन लोकांना अमेरिकेतून निघाल्यानंतर ६ महिन्याच्या आत का परत आलात असे विचारून जरा अडवणूक केलीय. एका केसमधे खरे तर ८ महिने झाले होते ( म्हणून सोडून दिले,) तर एका केस मधे अडिच महिनेच झाले होते म्हणून त्यांना विमानतळावरूनच परत पाठवले व व्हिसा कॅन्सल केला होता.
आई इथे असताना आम्ही पॅरिस, लंडन , कॅनडा इत्यादी ठिकाणी गेलो आहोत. कॅनडाहून येताना नवे आय ९४ मिळत नाही, त्यामुळे इथे रहायच्या मुदतीत काही फरक पडत नाही. पण पॅरिस किंवा लंडनहून येताना परत ६ महिन्याच्या मुदतीचा आय ९४ मिळाला होता.
सहा महिन्याच्या मुदतीचे सुद्धा अजून सहा महिने एक्स्टेंशन घेता येत असे. आईसाठी दोन वेळा तसे एक्स्टेंशन घेतले आहे .
इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या वेबसाईटवर व्यवस्थित माहिती आहे .
एका खेपेस जास्तीत जास्त किती
एका खेपेस जास्तीत जास्त किती महिने रहाता येते?>>>>
इमिग्रेशन ऑफिसर जितका कालावधी आय-९४ वर देइल तितके दिवस.
(जास्तीत जास्त १८० दिवस मिळतात).
पुन्हा अमेरिका जायचे असेल तर त्यासाठी किमान किती महिने भारतात रहाणे जरुरी असते.
जितके महिने अमेरिकेत तितके महिने भारतात रहावे लागते असे ही ऐकले आहे त्याबाबत खुलासा करावा..
१० वर्षाच्या व्हिसाअवधीत आपण एकुण कितीवेळा जाणे -येणे करु शकतो.
>>>>>>>>>
ही लिंक पहा:
http://www.immihelp.com/visas/visa-stamp-arrival-departure-record.html
खासकरुन शेवटचा टिप्स विभाग
इथे एक नमुद करायचे आहे कि ज्याच्याकडे जायचे आहे त्यांचे एच १ बी .आहे ग्रीन कार्ड नाही..>>>>
त्याने काही फरक पडत नाही.
"परदेशी वास्तव्य" यात अमेरीका
"परदेशी वास्तव्य" यात अमेरीका व्यतिरीक्त बाकिचे देश नसावेत असा अर्थ लावतो..
अमेरीकेत सहा महिने राहून
अमेरीकेत सहा महिने राहून पुन्हा कमीतकमी सहा महिन्याच्या गॅपने जात येते, म्हणजे कसे ते असे,
मे २०१२ - नोंव्हेबर २०१२
मे २०१३ - नोंव्हेबर २०१३
वरच्या पद्ध्तीने बर्याच वेळा साबने केलेय ६ वर्षे मग तिची सिटिझनशिप घेतली. पण कुठलाच प्रॉबलेम झाला नाही त्या आधी ६ महिने गॅपने येवून.
आता इतरांचे अनुभव एकलेले खाली लिहिते,
माझ्या ओळखीत कमीत कमी ३ महिन्यासाठी एकाची आई परत भारतात जायची ६ महिने अमेरीकेत राहून पण असे ४ वेळा केल्यावर ५ व्या वेळेला तिला नाकारले.
६ महिन्याची मुदत वाढवली तरी सारखी सारखी वाढवली तरी काही भरोसा नाही INS चा , कोणाला पाठवतात कधी तर कोणाला नाही. तेव्हा रीस्की आहे.
चंबु,
चंबु,
visitor visa असेल तर जास्तीत
visitor visa असेल तर जास्तीत जास्त ६ महिन्यांची परवानगी देतात. अधिक काळ रहायचे असेल तर रितसर अर्ज करावा लागतो. त्यात तुम्ही व्हिजिटर असुन पण अजुन का रहायचे याचे सविस्तर कारण द्यावे लागते. अधिकार्यांना कारण पटले तर एक-दोन वेळा अर्ज मंजुर होतो.
सहा महिने राहुन गेल्यावर परत भारतात किती दिवस राहता येते याचा असा लिखित नियम नसावा पण प्रत्येक वेळी तुम्ही आलात की विमानतळावरील अधिकारी तुमचे येण्याचे कारण आणि किती दिवस राहणार हे विचारतातच. त्यांना कारण पटले नाही तर तुमच्या कडे १० वर्षाचा विसा असेल तरी त्याचा उपयोग नाही. सारखे सारखे आलात तर त्यांना शंका येउ शकते की तुम्ही एक तर पैसे मिळवायला येत आहात किंवा व्हिजिटर विसावर येउन इथेच स्थायिक व्हाल म्हणुन तुम्हाला एन्ट्री नाकारु शकतात. आजकाल टेरेरिझम मुळे तर प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर असते. म्हणुन बहुतेक वेळा असे सांगितले जाते की किमान वर्षभर तरी येउ नये.
मला australian visitor visa
मला australian visitor visa बाबत विचारायचे होते... माझे in laws १ वर्षा साठि आले आहेत्...आता परत जातिल... तर त्यांना किति दिवसांनि परत येता येइल?
माझ्या प्रश्नाचे उत्तर देता
माझ्या प्रश्नाचे उत्तर देता का?