Submitted by TABLA on 24 January, 2012 - 08:39
what is the best method for calculating maintainace charges in a society with unequal flat area? Is their any government rule about it? because my society members forcing me to pay equal maintainance charges. i.e. member with 250 sqf area is paying equal charges that of a member with 800 sqf flat area. Is this a correct way of calculating maintainance? Because, according my knowledge this Flat Monthly Fee method is applicable to only those societies where apartments are of the same size (Sq. ft).please give me direction
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपली सोसायटी टेनंट को
आपली सोसायटी टेनंट को ऑपरेटीव्ह सोसायटी म्हणुन रजिस्टर्ड असते. कायद्यात मेंटेनंन्स चार्ज घ्यावा इतकीच तरतुद असते. तो किती असावा हे सभासदांनी ठरवायच असत.
जर स्क्वेअर फुटावर मेंटेनंन्स चार्ज ठरवला तर इतर सदस्य घरातले मेंबर्स किती यावरुन मुद्दा काढतील कारण घरातल्या सदस्यांच्या संख्येवरुन पाण्याचा वापर ठरतो आणि पाण्याचे बील सहसा ( मल्टी स्टोरेड बिल्डींग असताना ) सोसयटीच भरते.
२५० स्क्वेअर फुटात सहा माणसांचे कुटुंब राहु शकेल या उलट ७५० स्क्वेअर दोनच माणसाचे कुटुंब राहु शकेल.
यावर सर्वमान्य असा तोडगा नाही. दुकाने असलेले सदस्य वेगळा आक्षेप घेउ शकतात.
सबब सर्वांना समान मेंटेनंन्स चार्ज हा तोडगा रास्त ठरतो.
http://www.commonfloor.com/ar
http://www.commonfloor.com/articles/popular-methods-to-calculate-mainten...
आमच्याकडे फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स आकारला जातो.
सर्वांना समान मेंटेनंन्स
सर्वांना समान मेंटेनंन्स चार्ज हा तोडगा रास्त ठरतो. >> +१. जर जागेचा व्यावसायिक वापर होत असेल (कन्सल्टन्सी, दुकान, ऑफिस, दवाखाना, बँक, होस्टेल इ.) तर हा मेन्टेनन्स नेहमीच्या मेन्टेनन्सच्या दुप्पट घेतला जाऊ शकतो. अर्थात हे सर्व सभासदांनी सोसायटीच्या सभेत, लिखित स्वरूपात मान्य करण्यावर आहे.
तसेच जरी आपल्या सदनिकेचे क्षेत्रफळ कमी-जास्त असले व त्यावरून मेन्टेनन्स ठरविला तरी कॉमन पॅसेज / जिने/ पार्किंग/लिफ्ट/ पाण्याचा वापर/ लॉन इत्यादींच्या वापरा/न वापरावरूनही मेन्टेनन्स ठरवा असेही काही वेळा सभासदांचे म्हणणे असते. त्यामुळे सदनिकेचे क्षेत्रफळ कमी-जास्त असले तरी सर्वांना एकच मेन्टेनन्स चार्ज ठरविणे हे सोसायटीसाठी जास्त सोयीचे ठरते.