Submitted by आनंदयात्री on 5 December, 2011 - 01:22
त्याच पात्रांचे तमाशे रोज येथे...
एक होता, त्यात हा दुसरा उघडला!
**********************
पावसावर आज माझा जीव जडला
भावना समजून माझ्या तोच रडला
पटकथा एकाच नात्याची बदलली
आज अंकाचा नव्या पडदा उघडला
लाघवी हास्यास मी उत्तर समजलो
प्रश्न मग ओठांवरी कायम रखडला
चार घटका लाज सैलावून निजली
दंश चारित्र्यास ओघानेच घडला
मी जरी पत्रामध्ये नव्हतो कुठेही
अक्षरावरती तुझ्या हा जीव जडला
स्पर्श कवितेने कधी केलाच नाही
ढीग शब्दांचा मनामध्येच सडला
सावलीही शेवटी सोडून गेली
भाबडा विश्वास माझा फार नडला
- नचिकेत जोशी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
त्याच पात्रांचे तमाशे रोज
त्याच पात्रांचे तमाशे रोज येथे...
एक होता, त्यात हा दुसरा उघडला!>>> लई भारी....
गझल आवडली. मतला, रखडला आणि
गझल आवडली.
मतला, रखडला आणि सडला हे शेर विशेष आवडले.
सुंदर....... !!
सुंदर....... !!
सुटे मिसरे आवडले
सुटे मिसरे आवडले नचिकेत.
पटकथा एकाच नात्याची बदलली>> मस्त!
चार घटका लाज सैलावून निजली>> फारच आवडलं..
प्रश्न मग ओठांवरी कायम रखडला>> सोप्पं, साधं!
भाबडा विश्वास माझा फार नडला>> क ह र...
पावसावर आज माझा जीव
पावसावर आज माझा जीव जडला

भावना समजून माझ्या तोच रडला >> मस्तंच!!
अ प्र ति म !!!! ____/\____
अ प्र ति म !!!!
____/\____
अत्यंत सुरेख, आणि
अत्यंत सुरेख, आणि अर्थपुर्ण...

मुख्य म्हणजे आमच्या सारख्या सामान्य माणसांना सहज समजेल अशी आहे.
प्रचंड आवडली..!!
प्रचंड आवडली..!!
सुंदर गझल, नचिकेत ! लाघवी
सुंदर गझल, नचिकेत !
लाघवी हास्याचा शेर फार आवडला.
"चार घटका लाज सैलावून निजली" या ओळीने ज्या अपेक्षा वाढतात, त्यांना सानी मिसरा न्याय देत नाही असे मला वाटले.
स्पर्श कवितेने कधी केलाच नाही
ढीग शब्दांचा मनामध्येच सडला
सावलीही शेवटी सोडून गेली
भाबडा विश्वास माझा फार नडला
सु रे ख !
(मतल्याआधीच एक शेर वेगळा लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही.)
आवडली गझल.
आवडली गझल.
सर्वांचे आभार! दक्षिणा,
सर्वांचे आभार!

दक्षिणा, बागेश्री,
"चार घटका लाज सैलावून निजली" या ओळीने ज्या अपेक्षा वाढतात, त्यांना सानी मिसरा न्याय देत नाही असे मला वाटले.
हम्म्म... आत्ता वाचताना मलाही तसं वाटतंय..
मतल्याआधीच एक शेर वेगळा लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही.
प्रयोजन असं नाही काही, डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं, त्यातून तो शेर सेपरेट वर आला..
मुख्य म्हणजे आमच्या सारख्या
मुख्य म्हणजे आमच्या सारख्या सामान्य माणसांना सहज समजेल अशी आहे. >>> + १०० दक्षिणाला
छान..
छान..
कसं काय जमत बुवा...? हेवा
कसं काय जमत बुवा...?
हेवा वाटतो तुमच्या प्रतिभेचा...
(नतमस्तक)
-सुप्रिया.
अप्रतिम!! लाघवी हास्यास मी
अप्रतिम!!
लाघवी हास्यास मी उत्तर समजलो
प्रश्न मग ओठांवरी कायम रखडला
चार घटका लाज सैलावून निजली
दंश चारित्र्यास ओघानेच घडला
सावलीही शेवटी सोडून गेली
भाबडा विश्वास माझा फार नडला
हे शेर म्हणजे कहर आहेत!
सावलीही शेवटी सोडून
सावलीही शेवटी सोडून गेली
भाबडा विश्वास माझा फार नडला>>>>>
जीवघेणा....... असे तुम्हीच लिहू शकता!
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
दक्षिणा +१
दक्षिणा +१
मुख्य म्हणजे आमच्या सारख्या
मुख्य म्हणजे आमच्या सारख्या सामान्य माणसांना सहज समजेल अशी आहे.
चला, गझल जमायला लागली म्हणायची!
सर्वांचे आभार!
झकास!! प्रत्येक ओळ अर्थगर्भ!
झकास!! प्रत्येक ओळ अर्थगर्भ!
सुंदर!
सुंदर!
आर्यातै ठांकू! परेश लिमये!!!!
आर्यातै ठांकू!
परेश लिमये!!!! (कस्काय?? ;))
- धन्यवाद हो!!
पत्रामधील अक्षरावर जीव
पत्रामधील अक्षरावर जीव जडला... आवडला
बाकी नेहमीप्रमाणेच तूफान गझल 
मस्त गझल नचिकेत.. लाघवी
मस्त गझल नचिकेत..
लाघवी हास्यास मी उत्तर समजलो
प्रश्न मग ओठांवरी कायम रखडला >>> मस्तच
सडला नडला ही आवडले...
लाज शेराबाबत ज्ञानेशशी सहमत
क्या बात है.... सगळेच शेर
क्या बात है.... सगळेच शेर आवडले ...
त्याच पात्रांचे तमाशे रोज येथे...
!!!
एक होता, त्यात हा दुसरा उघडला!----------------!!!
हर्षल, मिल्या, गिरीशभौ,
हर्षल, मिल्या, गिरीशभौ, धन्यवाद!
मिल्या, हम्म्म...
मस्त..... दक्षिणाला
मस्त.....
दक्षिणाला अनुमोदन...
मी जरी पत्रामध्ये नव्हतो
मी जरी पत्रामध्ये नव्हतो कुठेही
अक्षरावरती तुझ्या हा जीव जडला
---- क्या बात है! जनाब शायर, सलाम कुबूल हो!
-- जयन्ता५२
धन्यवाद
धन्यवाद
क्या बात है..! मस्त गझल
क्या बात है..!
मस्त गझल