बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सालेभात >> Lol
वर एक बदल कर. मी तडका दाल न आणता गाजराची चटणी आणतेय. दोन पानं मागे असं बोलणं झालंय.

अजय एक मुलगी आणि आरती व्रंदाताई सिम ह्यांची नाव वरच्या यादीत नाहित.सगळे धरुन २५ च्या वर होतील. Happy

नताशा एक फुल माहित होते, ह्या अजय एक मुलगी कोण?

भाई, तुम्ही बाफं उघडला म्हणून नाव नोंदवणी करता नाही असं काही असतं का?

मेन्यू बदलः >> हे म्हणजे उभ्या उभ्या मेन्यू बदल असे झाले Happy

जंगी बेत दिसतोय ... गटगसाठी शुभेच्छा!

देसाई, ब व रद्द का केलेत? अजून बटाटे आणायला वेळ आहे हातात.
लिंबू, बीबीच्या डोक्यावर तुला हवी असलेली माहिती मिळेल? बायदवे, आमच्या गटगची पत्रिका बघणारेस का? Wink

.

.

पनीर भुर्जी (अ‍ॅपेटायझर म्हणून खायची नसेल तर :P) वरच्या मेनूत विसंगत ठरेल अशी मला भीती वाटते आहे.

कुठला मेनू ? आधी मेनू तर फायनल होऊ दे, Lol पण seriously गाडीतून न सांडता घेऊन येण्यासारखी convenient गोष्ट हवी ग

मग कोथिंबीर वड्या / अळूवड्या (या फ्रोझनही चांगल्या मिळतात) अशा टाइप काहीतरी आणू शकाल.

पनीर भुर्जीचंच माध्यम प्रायोजकत्व बोस्टनवासीय घेणार असतील तर आपण '(मेनूचा) परस्पर संबंध ओळखा' असा खेळ घेऊ शकतो. Proud

असामी, नावनोंदणी लिंक वापरुन करायची. नुसते पोस्ट नव्हे. तशी वर जेवढी नावे दिसतात तेवढी मी घेतली (मेघा सोडून)

ब वडे नाहीत म्हणजे अ‍ॅपेटायजर कमी झाले...

दैत्य ऑनसाईट कुकिंगला मदत करणार आहेत तेव्हा तयारी करुन आणली तर त्यांना म्हणता येईल.. "तू तळ आम्ही खाणार आहोत.."

आता बाकी राहिलेल्यांनी अपेटायजर्स आणा मग Happy
असाम्या भुर्जी वगैरे बनवून इथवर कॅरी करण्यापेक्षा काहीतरी रेडीमेड बरे ना, केक उचला नाहीतर!

मै, ती भरली वांगी रद्द कर (किंवा त्याशिवायही) आणि एखादे अ‍ॅपेटायजर कर म्हणजे आमच्यासारख्या लवकर पोचणार्‍यांना आल्याआल्या काहीतरी मिळेल. Proud धन्यवाद.

Pages