इस्त्राईल पॅल्स्टाईन वाद काय आहे?

Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17

इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.

धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इस्रायल ला ऊगाच आयर्न डोम यंत्रणा बसवावी लागलीय बोर्डर वर हमासचे संतं फूलं फेकतात बोर्डर वरून.

२ मिनीटं ऊभं राहून इस्रायलचा निषेध करतो.>>> कुणा एकाचा का? आपण दोघांचाही निषेध करायला हवा आणि त्यासाठी पुरेशी आकडेवारी मिळत नसेल तर खालील तक्त्यावर एकदा नजर मारुन घ्या....नंतर आपण यथासांग निषेध करुयात.

images (15).png

हमास ला देशाचे ( कोणत्या ही देशाचे इथे नाव टाका)अधिकृत सरकार ही मान्यता आहे का?

सहज विचारले .

अधिकृत सरकार कायद्याला बांधील असतात.
हे तर सर्वांना माहीत असेल.

हमास ला देशाचे ( कोणत्या ही देशाचे इथे नाव टाका)अधिकृत सरकार ही मान्यता आहे का?

सहज विचारले .

अधिकृत सरकार कायद्याला बांधील असतात.
हे तर सर्वांना माहीत असेल.

हमास ला देशाचे ( कोणत्या ही देशाचे इथे नाव टाका)अधिकृत सरकार ही मान्यता आहे का?>> >> इंटरनॅशनल कम्युनिटी वेस्टबॅंक मधील इस्राएल च्या अस्तित्वाला अनधिकृतरित्या बळकावलेला प्रदेश मानते.

अधिकृत सरकार कायद्याला बांधील असतात.
हे तर सर्वांना माहीत असेल.>>> माझ्यामते इस्राएल मधे अधिकृत सरकार आहे, पण जर अधिकृत सरकारेच कोणतेही कायदे, ॲकॉर्ड्स जुमानत नसतील तर अनधिकृतपणे सरकारे बनवलेल्या दहशतवादी संघटनांकडून अपेक्षा ती काय बाळगावी?

images (16).png

जगातील कोणत्या ही देशातील अधिकृत सरकार असेल तर त्या देशाच्या राज्य घटनेशी बांधील असते.
जसा भारत सरकार भारतीय राज्य घटने ला बांधील आहे
त्याच्या विपरीत सरकार भूमिका घेवु शकत नाही .
आणि हे सर्व देशांना लागू आहे जिथे अधिकृत सरकार आहे

प्रतेक देशाची राज्य घटना असते.
पण दहशत वादी संघटनांना कोणताच कायदेशीर आधार असतो ना मान्यता

अधिकृत सरकार असेल तर त्या देशाच्या राज्य घटनेशी बांधील असते.>>> नॉर्थ कोरिया?? तालिबान??

माझ्या मते अधिकृत किंवा अनधिकृत सरकार हे जगातील इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना ठरवतात

भारत सरकार राज्य घटनेशी. विपरीत अंतर राष्ट्रीय विषयात भूमिका घेत असेल तर त्या वर आक्षेप घेण्याचा अधिकार फक्त भारतीय जनतेला आहे.
आणि सरकार असे वागत असेल तर सरकार वर कोर्टात न्याय पण मागता येईल .

पण फक्त भारतीय लोकांना च

माझ्या मते अधिकृत किंवा अनधिकृत सरकार हे जगातील इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना ठरवतात

अगदी योग्य आहे.
हमास ल अशी मान्यता आहे का?

> नॉर्थ कोरिया?? तालिबान??

तुम्हाला विनंती आहे .
.
मला अफगाणिस्तान आणि नॉर्थ कोरिया ची राज्य घटना काय आहे हे सांगावे?
त्या दोन्ही देशांनी राज्य घटना गुंडाळून ठेवून सत्ता हस्तगत केली आहे .
ह्या वर तुमचे मत काय आहे.
Pls सांगावे

Submitted by भरत. on 5 November, 2023 - 20:37 >>> यातिल किती नियमांची अंमलबजावणी अथवा कारवाई , इस्राएल, अमेरिका, रशिया आणि चिनवर झाली आणि किती ठिकाणी शेपूट घालून गप्प बसले हा संशोधनाचा विषय होईल.

ते आहेच. पण तरी ते नियम आहेत. प्रत्येक देश फक्त आपल्याच घटनेला बांधील आहे, या छातीठोक विधानाला ते करेक्शन.

मला अफगाणिस्तान आणि नॉर्थ कोरिया ची राज्य घटना काय आहे हे सांगावे?>> अफगाणिस्तान बद्दल सद्य परिस्थिती माहीत नाही आणि तिथल्या सरकारला आजून तरी कोणत्याही देशाने मान्यता दिली नसली तरी अनेक राष्ट्रांचे डेलीगेशन्स राजनैतिक संबंध स्थापून आहेत

नॉर्थ कोरिया ची राज्यघटना आहे... इंटरनेट वर संक्षिप्त गोशवारा मिळायला हरकत नाही... स्पून फिडींग करु इच्छित नाही, स्वतः मिळवावा.

त्या दोन्ही देशांनी राज्य घटना गुंडाळून ठेवून सत्ता हस्तगत केली आहे .
ह्या वर तुमचे मत काय आहे.
Pls सांगावे>>> असेलही पण राज्यघटना असलेले देशच आंतरराष्ट्रीय पातळीवर विवेकाने जबाबदारीपुर्वक वागतात असे मानणे चुकीचे आहे हा माझा मुद्दा होता. कित्येकदा अधिकृत घटना असलेली सरकारे देखील मानवी हक्कांची होळी करायला मागेपुढे पहात नाहीत हे वारंवार सिद्ध झाले आहे.

ते आहेच. पण तरी ते नियम आहेत. प्रत्येक देश फक्त आपल्याच घटनेला बांधील आहे, या छातीठोक विधानाला ते करेक्शन.>> तेच मी म्हणालो
सरकार अनधिकृत की अधिकृत हे इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना आपल्या पातळीवर ठरवतात

इस्रायल सध्या युद्धासंबंधीचे आंतरराष्ट्रीय नियम पाळत नाहीए. They are war criminals.>>> Undisputed fact... कुणालाही काही वाटो...म्हणणारे, आतंकवादी संघटना काहीही विधिनिषेध पाळत नाहीत मग अधिकृत सरकार, घटना आणि आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या देशांनीच हे नियम पाळायचा ठेका घेतला आहे का? असा युक्तीवाद करु शकतात...पण त्यां देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि सन्मानच मुळात ते या नियमांना बांधील होऊन विश्वसमुदाया बरोबर आले म्हणून आहे हे विसरुन चालणार नाही.

कॉमि,

पॅलेस्टाईनमधील निरपराध लोक suffer करतात हे तुमचं म्हणणं मान्य आहे. पण हे war आहे.
अमेरिकेत एखाद्या न्यू यॉर्क/एले/शिकागो शहरात 500 टेरेरिस्ट घुसले तर ते अमेरिकन लोक आपलंच एक शहर nuclear option वापरून बेचिराख करणार नाहीत हे मान्य. त्याच अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले होते. इंग्लंडने जर्मनीवर बॉम्बहल्ले केले होते कारण हिटलरनेही अनेक निरपराध इंग्रज नागरिक बॉम्बहल्ले करून मारले होते.
युक्रेन युद्धात रशियावर जी sanction लागली त्याचा त्रास तिथल्या सामान्य जनतेला होतो. सो हे असं युद्धात होतंच. Doesn't mean it's ever fair, but it is inevitable.

इस्त्राईलने हे केलं नाही तर ते मरतील. ते मेले तर तुम्हाला चालणार आहे का? म्हणजे पॅलेस्टाईनच्या लोकांना मारायचं नाही, त्याऐवजी ज्यू लहान बाळं मारलेली चालतील, असं आहे का?
अजिबात collaternal damage न करता हमासचे लोक वेचून पकडून मारायची full proof किंवा इव्हन 90 परसेन्ट effective strategy तुमच्याकडे आहे का? तर ती द्या मग मोसादला. त्यांच्याकडे असं सोल्युशन असतं तर त्यांनी ते वापरलं असतं पण समोरून human shield tactic वापरली जाणं आणि जगभरातील पॅलेस्टाईन समर्थक हमासवर दबाव न आणता इस्त्राईललाच शिव्या घालणं यात दुसरा पर्याय काय उरतो? कोणताही निरपराध व्यक्ती मारला जाणं हे चूकच आहे पण दोन्ही बाजू युद्धाचे नियम पाळत असतील तरच युद्ध फक्त मिलिटरीजमध्ये होतं आणि सिव्हीलीयन्सना spare करता येतं. हे लोक ना स्वतःची सिव्हिल व मिलिटरी टार्गेट वेगळी ठेवतात, ना इस्त्राईलच्या सिव्हीलीयन्सना spare करतात.

अमेरिकेत काल squad मधल्या रशिदा बाईने from river to sea अशी व्हिडियो पोस्ट शेअर केली आहे. यातली रिव्हर म्हणजे जॉर्डन रिव्हर, आणि sea म्हणजे Mediterranean Sea. थोडक्यात इस्राईल ज्या भूमीवर आहे ती पण यांनाच देऊन टाकायची आणि ज्यू लोकांचा सर्वनाश करायचा.

Doesn't mean it's ever fair, but it is inevitable.>>>True, but If it is unfair then condemn it...on whoever committing wrong in present situation.

अमेरिकेत काल squad मधल्या रशिदा बाईने from river to sea अशी व्हिडियो पोस्ट शेअर केली आहे. यातली रिव्हर म्हणजे जॉर्डन रिव्हर, आणि sea म्हणजे Mediterranean Sea. थोडक्यात इस्राईल ज्या भूमीवर आहे ती पण यांनाच देऊन टाकायची आणि ज्यू लोकांचा सर्वनाश करायचा.>>> हे विष दोन्हीकडे समप्रमाणातच आहे.

https://www.businesstoday.in/amp/latest/world/story/israeli-minister-says-dropping-atomic-bomb-on-gaza-an-option-netanyahu-reacts-404624-2023-11-05

Eliyahu, who heads the country's heritage ministry, There are no non-combatants in Gaza," he said during the interview, adding that providing humanitarian aid to the besieged region would be a “failure".We wouldn’t hand the Nazis humanitarian aid… there is no such thing as uninvolved civilians in Gaza,"
On being asked whether the Israeli Defence Force (IDF) would consider using the atomic weapon as – in his view – there were “no non-combatants" in the region, the minister replied that it was "one of the possibilities", reports said.

अमेरिका आपल्या लोकांवर न्युक्लियर बाँब टाकणार नाही पण जपानवर टाकतो, युकेनमध्ये रशियाला विरोध करतो आणि पॅलेस्टिनमध्ये कार्पेट बाँबिंग हा इस्रायलचा सेल्फ डिफेन्स मानतो हा शुद्ध रेसिझम आहे.

Whitehat, हे वाचा.
https://www.haaretz.com/israel-news/2023-10-11/ty-article/.premium/netan...
This is solidly documented. Between 2012 and 2018, Netanyahu gave Qatar approval to transfer a cumulative sum of about a billion dollars to Gaza, at least half of which reached Hamas, including its military wing. According to the Jerusalem Post, in a private meeting with members of his Likud party on March 11, 2019, Netanyahu explained the reckless step as follows: The money transfer is part of the strategy to divide the Palestinians in Gaza and the West Bank. Anyone who opposes the establishment of a Palestinian state needs to support the transfer of the money from Qatar to Hamas. In that way, we will foil the establishment of a Palestinian state (as reported in former cabinet member Haim Ramon’s Hebrew-language book “Neged Haruach”, p. 417).

Collateral damage ?! २०० निरपराध लोकांमध्ये एक हमास कमांडर मेला तो collateral damage म्हणायला पाहिजे ! इजरायल ने आपले जेनोसाईडल इंटेन्ट अनेक नेत्यांच्या तोंडातून अनेकवेळा बोलून दाखवले आहे. २०१८ च्या पिसफुल प्रॉटेस्ट मध्ये शेकडो लोकांना मारले आणि हजारो लोकांना जन्मभरासाठी अपंग केले ! वेस्ट बँक मध्ये हमास आहे ? नाही. तरी तिथे ७ ऑक्टोबर पासून हल्ले का होत आहेत ? ह्या आधी सुध्दा हमास नसलेल्या वेस्ट बँक मधून शासकीय बडगा वापरून लोकांना घरातून का काढण्यात येत आहे ? त्या काढल्या गेलेल्या लोकांनी इजरायल सारखा "सेल्फ डिफेन्स" केला तर तुम्ही त्यांना इस्लामी अँटी सेमिटिक आतंकवादी म्हणाल.

आणि मी नाही, जगातले सगळे देश गाझा मध्ये हल्ले कमी करावे असे सांगत आहे, हमास विरुद्ध डायरेक्ट सर्जिकल ऑपरेशन वापरावेत असे सगळेच म्हणत आहेत ! जे इजरायल ने चालवले आहे ते कोणत्याही अंगलने स्व संरक्षण नाहीये.

रशियाला निर्बंधांमुळे अन्न आणि पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडला असता तर ते सुद्धा इन्ह्युमन आणि निषेधार्ह असतेच.

अश्या indiscriminate bombing आणि निरपराधांचे शिरकाण करून हमास संपणार आहे ? आजिबात नाही. हजारो तरुण मुलं (लक्षात आहे ना ? गाझापट्टीत ५०% लोक लहान - तरुण मुलं आहेत.) आपल्या निरपराध प्रियजनांना मरताना बघून हमास मध्ये भरती होतील. आज वर इजरायल कत्तल करतच आले आहे. काय उपयोग झाला ? Indiscrininate कत्तल म्हणजे सेल्फ डिफेन्स आहे हे पूर्णपणे अमान्य आहे. इजरायल ने केलेल्या स्त्राईक चे एक थर्ड पार्टी ऑडिट झाल्याशिवाय मी त्यांनी नागरी वस्तीवर केलेल्या सगळ्या स्ट्राईक खरोखर हमास बेस टार्गेट करणाऱ्या असतात हे कदापि मान्य करणार नाही.
फ्रॉम रिव्हर टू द सी, पॅलेस्टाईन विल बी फ्री ह्याचा अर्थ एक पॅलेस्टाईन असा आहे. काही लोक जेनोसाईडल स्लोगन म्हणून वापरतात, हे खरे आहे. पण त्याचा मूळ अर्थ कत्तल किंवा शिरकाण नाही, राष्ट्रीयत्वाचा हक्क मागणे आहे.

Rashida Tlaib
@RashidaTlaib
From the river to the sea is an aspirational call for freedom, human rights, and peaceful coexistence, not death, destruction, or hate. My work and advocacy is always centered in justice and dignity for all people no matter faith or ethnicity.

Hadas Thier
@HadasThier
I am a Jew who has chanted “from the river to the sea Palestine will be free” many many times.

Please never tell me how “Jews view” this or that. We are not a homogenous block, and you @JeremyAllenMoss
, have never met me, you don’t speak on my behalf.

हमासने दहशतवादी हल्ला केला, हमासला संपवायचंय म्हणून इस्रायल गाझावर हल्ला करतोय् या शुद्ध थापा आहेत. खुद्द इस्रायल असं म्हणत नाही. त्यांचे इथले बेगानी शादी में दीवाने समर्थक का म्हणतात? आम्हांला संपूर्ण प्रदेश आमच्या ताब्यात हवा, त्यात दुसरं कोणी नको , गाझा मध्ये माणसांना राहताच येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण् करू ही इस्रायली नेत्यांची व लष्करी अधिकार्‍यांची वक्तव्य आहेत. या धाग्यावर त्याच्या लिंक्स आहेत. यातली काही वक्तव्ये ७ ऑक्टोबर पूर्वीची आहेत.

वेस्ट बँकमध्ये हमास नाही. तिथे इस्रायल बाँबिंग का करतोय?

हिंदुत्ववादी लोकांचा हा जुना पॅटर्न आहे. आपण त्यांचा एक मुद्दा खोडला की काही वेळाने त्यांच्यातलाच दुसरा आयडी जणून नवा असल्यासारखा तोच मुद्दा मांडतो. मग तिसरा. मग काही दिवसांनी पुन्हा पहिला आयडी.

वेस्ट बँकमध्ये हमास नाही. तिथे इस्रायल बाँबिंग का करतोय?>>> वेस्ट बॅंक मधे इस्राएली नागरीकांना वसवण्याचा इस्राएल सरकारचा ट्रेंड चार्ट वर दिला आहे...मला वाटते इस्राएल काय इच्छिते आहे त्यावर तो पुरेसं भाष्य करतो.

फॅक्ट्सकडे डोळेझाक करून पोस्ट ट्रुथ उगाळत राहायचं हा हिंदुत्ववादी आयडींचा जुना खेळ. हे हिंदुत्वात बिलीव्ह करतात म्हणजे कर्मफलातही करतच असतील. इस्रायलच्या वॉर क्राइम्सचं समर्थन करताना यांच्याही हाताला त्या पॅलेस्टिनींचं रक्त लागलं आहे.

https://www.cbsnews.com/news/protesters-capitol-hill-israel-gaza-ceasefire/ अमेरिकेतला ज्यूंचा एक गट युद्धबंदीची मागणी करतो, नॉट इन अवर नेम म्हणतो आणि हिंदुत्ववादी आणखी पॅलेस्टिनींचे मुडदे पाडा म्हणतात.

Pakistan मधील दहशत वादी संघटना ज्या मुस्लिम हिताचे गाजर दाखवत होत्या त्या पाकिस्तान सरकार वर च ulatlya.

ही उदाहरण आहेत.
हमास चे समर्थन करू नका .
हमास पॅलेस्टाईन लोकांचे हित पण धोक्यात आणेल

पाकिस्तानी हिंदू आणि चीन मधील उगिर बद्दल अशीच आत्मीयता ठेवली तरच पॅलेस्टिनी बद्दल च्या भंपक आपुलकीला अर्थ आहे .
चला हिंदू बद्दल द्वेष असल्यामुळे लिब्बुज गँग पाकिस्तानी हिंदू बद्दल आत्मीयता ठेवणार नाहीत हे समजू शकतो , पण त्या चीनी उगिरी नी काय पाप केले की त्यांच्या बद्दल व्यक्त व्हायला , कोणत्याही धाग्यावर एक शब्दही लिहायला
लिब्बुज ना वेळ नसतो ?
असं तर नाही ना की जो पर्यंत ला इलाहि इलाल्ला ऐकू येत नाही तो पर्यंत लेखण्या सळसळत नाही ?

इस्रायली PM म्हणत्यात, There will be no casefire without the return of the hostages. सौदी, इराण,आणि कतार सारख्या देशाने हमासवर दबाव टाकून ओलिसांची सुटका करायला पाहिजे. होणारी हिंसा तरी थांबेल.

इस्रायली पी एम ना ओलिसांच्या सुटकेत अजिबात रस नाही. असं त्या ओलिसांचे इस्रायलमधले नातेवाईकच म्हणताहेत. ते सरकार विरुद्ध निदर्शने करतात. Bibi is a murdere अशा घोषणा देतात.

इराण आणि कतार हळूहळू अफगाणिस्तान च्या मार्गाने जाताना दिसत आहे , त्यामुळे फक्त त्यांचेच हमास शी लागेबांधे असणार . हाच इराण सौदी च्या डोळ्यात खुपत होता तर कतार च्या डोळ्यात सौदी !
पण हजारो मुस्लिम पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यू नंतर हे मुस्लीम देश आपल्या कौम् साठी एकत्र येत आहेत.
युद्ध भडकले की क्रूड आकाशाला भिडणार , मग कतार इराण आणि सौदी पॅलेस्टिनी ना वाचवण्याचा खरेच प्रयत्न करतील असे वाटते तुम्हाला ?

हिंदुत्ववादी लोकांचा हा जुना पॅटर्न आहे. आपण त्यांचा एक मुद्दा खोडला की काही वेळाने त्यांच्यातलाच दुसरा आयडी जणून नवा असल्यासारखा तोच मुद्दा मांडतो. मग तिसरा. मग काही दिवसांनी पुन्हा पहिला आयडी.

यात जोड. काही आयडींचे ठरलेले मुद्दे असतात. त्या मुद्द्यांचा विषयाशी संबंध असतोच असे नाही. थोड्या थोड्या दिवसांनी तो तेच तेच मुद्दे लिहीत असतात.

कॉमि, two state solution ब्रिटिशांनी 1947 मध्येच ऑफर केलं होतं. अरबांनी ते नाकारलं कारण त्यांना इस्त्राईलचं अस्तित्व मान्यच नव्हतं. गाझा जॉर्डनच्या आणि वेस्ट बँक इजिप्तच्या ताब्यात असेपर्यंत स्वतंत्र पॅलेस्टाईनचा काही विषय नव्हता. 1967 मध्ये अस्तित्वाच्या लढाईत हे भाग इस्त्राईलने जिंकले. त्याच सुमाराला स्वतंत्र पॅलेस्टाईनची आयडिया निघाली. PLO च्या ओरिजिनल चार्टरनुसार इस्राईलचं अस्तित्व मिटवणे हेच goal आहे. रिव्हर टू सी हे त्या चार्टरनुसारच आहे.

या lofty goal ला जगभरात फार काही traction व पाठिंबा मिळेना तेव्हा 1988 मध्ये मग coexistence बद्दल ते लोक बोलू लागले. पण त्यांच्यावर विश्वास ठेवावा इतकी विश्वासार्हता हिस्टोरीकली नाही आणि 1988 नंतर या विचारधारेने जगभर इतके क्रूर दहशतवादी हल्ले केले आहेत की आता त्यांच्याबद्दल लोकांना भीतीच वाटते. शिवाय ते तकीया वगैरे आयडियाज आहेतच. असं काही हिंदू धर्मात सापडत नाही. वेगळंच कल्चर रे बाबा.
So they will have to earn trust by opposing their own terrorists and acting civilized.
बाकी ते 50 टक्के लोकसंख्या लहान मुलांची आहे याचा भयानक अर्थ असा की तिथे प्रत्येक बाईला 6-7 मुलं आहेत व तिला प्रजनन यंत्र म्हणुन वापरतात. मे बी आधी सामाजिक सुधारणा करा मग स्वातंत्र्याचं बघू असं सांगणारे गोखले आगरकर त्यांच्याकडे व्हायला हवेत. तरी आपले सशस्त्र क्रांतिकारी कधी इंग्रज बायका, म्हातारे, लहान मुलांचे शिरच्छेद ,त्यांच्या म्युझिक फेस्टिवलला जाऊन छान गाणी ऐकणाऱ्या लोकांना मारून टाकणे असे विकृत प्रकार करत नव्हते.

बाकी ते 50 टक्के लोकसंख्या लहान मुलांची आहे याचा भयानक अर्थ असा की तिथे प्रत्येक बाईला 6-7 मुलं आहेत व तिला प्रजनन यंत्र म्हणुन वापरतात. मे बी आधी सामाजिक सुधारणा करा मग स्वातंत्र्याचं बघू असं सांगणारे गोखले आगरकर त्यांच्याकडे व्हायला हवेत. तरी आपले सशस्त्र क्रांतिकारी कधी इंग्रज बायका, म्हातारे, लहान मुलांचे शिरच्छेद ,त्यांच्या म्युझिक फेस्टिवलला जाऊन छान गाणी ऐकणाऱ्या लोकांना मारून टाकणे असे विकृत प्रकार करत नव्हते.

वरील परिच्चेदातील विखार व विकृती इतकी टोकाची आहे की प्रतिवाद करणेही किळसवाणे आहे.

यासर अराफत had said on record - "The Palestinian womb is our best weapon against Israel."

लोकसंख्या इतकी वाढवायची की संख्या बळाच्या जोरावर आपण शत्रूचा पराभव करु शकू हा कन्सेप्ट अराफतचा आहे. जितनी आबादी उतना हक हे काँग्रेसने इथून उचललं की काय.

पुढच्या जन्मी कुलकर्णी व तमाम पुरोगाम्यांना बाईचा जन्म मिळावा व तो अशाच धर्मात आणि देशात मिळावा जिथे बाईचं गर्भाशय म्हणजे weapon असं मानणारा राष्ट्रपुरुष व बाई म्हणजे केवळ तिचं शरीर असं मानणारा समाज असेल.

<< Collateral damage ?! २०० निरपराध लोकांमध्ये एक हमास कमांडर मेला तो collateral damage म्हणायला पाहिजे ! >>

----- एक कमांडर होता, असे इस्रायल म्हणते. याला काहीच पुरावा नसतो. पुरावा काय तर इस्रायल म्हणत आहे.
नंतर जोडतात, त्या कमांडरच्या सोबत ५ कट्टर अतिरेकी पण होते.

भरत - जयशंकर यांचे स्टेटमेंट तुम्ही डकवले ते वाचले.

अगदी अशाच शब्दांत जॉर्डनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमधे मांडलेल्या प्रस्तावाच्या वेळी भारत गैरहजर राहिला होता. प्रस्तावांत हमासने केलेल्या हिंसाचाराचा निषेध नव्हता तसेच इस्रायलच्या हिंसाचाराचा पण निषेध नव्हता.
दोनशे इस्रायल नागरिकांना हमासने ओलिस ठेवले आहे तर इस्रायलने ६००० निरपराध पॅलेस्टिनी नागरिकांना अनेक वर्षे ओलिस ठेवले आहे.

काहीतरी कारण काढून मानवतावादी भुमिकेतून मांडलेल्या प्रस्तावाच्या वेळी गैरहजर रहायचे आणि आता बाहेर अगदी वेगळी भुमिका.

सनव, भारतातही चार मुलांना जन्म द्या... दोन देशाला, दोन तुम्हाला ठेवा असे कोण म्हणाले होते ?

दहा मुलांना जन्म द्या असे सांगणारे आहेत, पण एकतो कोण?
https://timesofindia.indiatimes.com/india/have-10-kids-god-will-take-car...

त्यामानाने साध्वी प्राची यांचे विचार चांगले आहेत,
https://indianexpress.com/article/india/india-others/only-asked-hindu-wo...

बर्लिन मधील इराणी लोकांनी इराण सरकार विरोधात भूमिका घेवून इस्रायल ला पाठिंबा दिला
https://twitter.com/sarahraviani/status/1721272263649952167?s=19
इराण ने बुरखा घातला नाही म्हणून शेकडो स्रीयांना यमसदनी धाडले , कदाचित त्याचाही राग ही इरानियान पब्लिक काढत असेल..

पुढच्या जन्मी कुलकर्णी व तमाम पुरोगाम्यांना बाईचा जन्म मिळावा व तो अशाच धर्मात आणि देशात मिळावा जिथे बाईचं गर्भाशय म्हणजे weapon असं मानणारा राष्ट्रपुरुष व बाई म्हणजे केवळ तिचं शरीर असं मानणारा समाज असेल.>>> नुसतं बोलून काय होतं?? बोलतात तर मोदीही छान छान (भले टेलीप्रॉम्प्टर बिघडल्यावर थोडी तारांबळ उडत असेलही) पण करणीचे काय??
इस्राएल पॅलेस्टाईनच्या फर्टीलीटी रेट डेमोग्राफिक चा तक्ता सोईसाठी खाली डकवत आहे. असं दिसतंय अराफत च बोलणं इस्राएलनेच जास्त मनावर घेतलयं....आता ते त्यांना कोणत्या मशिन्स मानतात याचा उहापोह होउन जाउद्यात.
Screenshot_20231106-074130.jpg

टू स्टेट सोल्युषन नाकारले हे प्रॅक्टीकली आणि pragmatically चुकले. तात्विक दृष्ट्या एक स्टेट असणे आणि त्यात पॅलेस्टाईन आणि इजरायल सर्वांना समान हक्क असणे हे fair solution आहे. कोलिनियल पॉवर ने मुस्कटदाबी करून ग्लोबल इमिग्रेशन करवून, तुम्हाला तुमच्या घरांमधून हाकलून, मग टू स्टेट सोल्यूषनच्या बाता करणे हे कोणत्याही अंगाने फेअर नाही. केवळ ज्यू घर नाही तर ज्यू बहुल घर, असलेल्या लोकांना बाजूला सारून ज्यू बहुसंख्य असणारे घर बनवण्याचा इजरायलचा हट्ट आहे. आम्ही आमची बहुसंख्या घालवणार नाहीच, ह्या हट्टापायी कधीही वन स्टेट होऊ शकत नाही. त्यामुळे निराशेने किमान टू स्टेट द्या असे म्हणतो. वन स्टेट हे फेअर सोल्युशन आहे जे इजरायल बळी तो कान पिळी ह्या नात्याने टेबल वर येऊच देत नाही.

नेहमीप्रमाणे ,सामान्य नागरिकांना पॉप्युलेशन बॉम्ब वैगेरे लेबल लावण्याची घृणास्पद प्रवृत्ती दिसली. हिंदुत्ववादी ही जगातली एकुलती एक जमात आहे जी मुले बाळे असणे म्हणजे आपल्यावर हल्ला समजते, कायदे करून थांबवा.. त्यांचे. आपले वाढवा, त्यांचे थांबवा. आणि, जबरदस्तीने त्या भागात इमिग्रेट होऊन तिथल्याच लोकांना पॉप्युलेशन बॉम्ब म्हणणे म्हणजे बोलणे खुंटले माझे तरी.

चीन ने तिबेट मध्ये हेच केलंय आणि सध्या करतोय पण. माझ्या माहितीप्राणे सिक्कीम मध्ये पण थोड्या प्रमाण हेच झालंय. काश्मीर मध्येही मुस्लिम बहुसंख्य आहेत म्हणूनच दहशतवादी जास्त आहेत.
कधी काळी सध्याच्या पाकिस्तान आणि बांग्लादेशात हिंदू बहुसंख्य असतील. मुस्लिम वाढले आणि देश तोडला गेला. त्यामुळें पॉप्युलेशन बॉम्बचा वापर केला जातोच आहे. इस्राईल ने पण हेच केलं आहे. संपूर्ण जगातून ज्यू शोधून शोधून आणून बसवले आहेत.

इस्रायल आणि बाहेरचे सुद्धा सगळे ज्यु नेत्यानाहूच्या बाजूने नाहीत. सेक्युलर ज्युज आणि ज्यूंमधल्या काही पंथांचा Zionism ला विरोध आहे. पण आमचे हिंदुत्ववादी केवळ आपल्या मुस्लिम द्वेषाला वारा मिळतोय म्हणून इस्रायलच्या बाजूने नाचतात. त्या यति नरसिंगानंदने मी इस्रायलच्या बाजूने लढायला तिथे जाऊन राहायला तयार आहे , असं म्हटलंय. त्याच्यासोबत इथल्या हिंदुत्ववाद्यांनी जाऊन इस्रायलला कृतीतून पाठिंबा द्यावा.

युरोपिय देशांमधला आयर्लंड तेवढा इस्रायलच्या विरोधात आहे, कोणी दांडगा गुंड आपल्या उरावर बसलेला असण्याचा अनुभव त्यांना आहे. आयर्लंडच्या स्वातंत्र्याचा इतिहासही रक्तरंजित आहे.

Increased birth rates in armed conflict zones, violent surroundings is a universal phenomenon. High mortality , sense of insecurity, unavailability, unaffordability of measures of contraception are some of the reasons. Development economics studies population growth and fertility, mortality rates.

फर्टिलिटी रेटबद्दल बोलणार नाही असे ठरवले होते पण इथे दिलेला चार्ट पाहून राहवत नाही. इझ्राएलच्या लाईन मध्ये फार डेव्हिएशन दिसत नाही. 2 ते 3 च्या दरम्यान कंसिस्टन्ट आहे. पॅलेस्टाईनची लाईन उतरती आहे, चांगलेच आहे. आता इतर देशांप्रमाणे कंसिस्टन्ट राहील अशी अपेक्षा आहे.
युद्धजन्य परिस्थितीत वावरणाऱ्या लोकांनी किमान काही तरी मुले वाचावी म्हणून जास्त मुलांना जन्म देणे आणि काय वाट्टेल ते होवो मातृभूमी सोडणार नाही असे ठरवणे कि मोजक्याच मुलांच्या भवितव्याचा आणि सुरक्षेचा विचार करून दुसरीकडे जाणे यात जास्त चांगले काय हे ठरवणारे आपण कोण? फक्त हा निर्णय प्रत्येक जोडप्याचा असावा आणि किमान त्यात तरी कोणाची सक्ती/भीती/सामाजिक दबाव नसावा एवढीच अपेक्षा.

वन स्टेट हे फेअर सोल्युशन आहे जे इजरायल बळी तो कान पिळी ह्या नात्याने टेबल वर येऊच देत नाही.
>>> वन स्टेट सोल्युशन ज्यात सर्वांना समान अधिकार असतील हे सोल्युशन पॅलेस्टाईनने कधी प्रपोज केले? त्यांचे वन स्टेट सोल्युशन म्हणजे ज्यूंची हकालपट्टी आहे. इझ्राएलमध्ये आत्ताही अरब राहतात आणि जे राहतात त्यांना समान अधिकार आहेत. त्यांच्या मिलिटरी सर्विसेस मध्येही अरब आहेत. हे हक्क अरब राष्ट्रात इतर धर्मियांना आहेत का? जर नसतील तर इझ्राएलमध्ये पूर्वापार जे अरब राहिले त्यांना समान अधिकारासहित राहू देणे व इतरांसाठी सेपरेट पॅलेस्टाईन हे धोरण चुकीचे कसे?
इझ्राएल-पॅलेस्टाईनच्या सीमा ठरवल्या गेल्या पाहिजेत आणि दोन्ही बाजूंनी त्याचा सन्मान केला पाहिजे याला पूर्ण सपोर्ट.

त्यांना समान अधिकार आहेत.>>> यावर जरा फॅक्ट चेक करा....नेट वर खुप रिसोर्स आहेत...जरी ऑन पेपर हमान अधिकार दाखवले असले, तरी प्रॅक्टिस मधे तसं‌ नाही आहे, ही गोष्ट अरब बहुल शहरांच्या स्थिती वर नजर टाकली तर लक्षात येईल...ग्राउंड रिॲलिटी वेगळी आहे.

इझ्राएल-पॅलेस्टाईनच्या सीमा ठरवल्या गेल्या पाहिजेत आणि दोन्ही बाजूंनी त्याचा सन्मान केला पाहिजे>>> अगदी...त्यावर आणखी इस्राएल सोबत मित्र राष्ट्र म्हणून अमेरिका ब्रिटन ने लष्करी करार करावेत तर पॅलेस्टाईनसोबत रशिया आणि चिन‌ने लष्करी मित्र राष्ट्र म्हणून करार करावेत आणि हमास ला डिझॉल्व्ह करण्यासाठी पॅलेस्टाईनवर दबाव बनवावा.

माझे मन, हा तुमचा आक्षेप मान्य. पॅलेस्टाईन ने वन स्टेट सोल्यूषन मध्ये इमिग्रंट (ज्यू) ना दुय्यम दर्जाचे नागरिक ठेवले आहे, त्यामुळे तो पर्याय योग्य नाही. मी म्हणत होतो की optimum स्थिती मध्ये सर्वांना समान हक्क असणारे एक राज्य हवे. अरब देशांमध्ये मुस्लिमेतर लोकांना कमी हक्क असतात हे खरेच आहे.

इजरायल मध्ये अरबांना पूर्ण समान हक्क आहेत असे नाही.
https://www.reuters.com/world/middle-east/arabs-israel-stay-sidelines-ra...

हिंदुत्ववाद्यांनी पॅलेस्टिनींच्या बर्थ रेटचे दाखले द्यावेत हे विनोदीच आहे. वर मी नरसिं गानंदचा उल्लेख केला. हा हिंदुत्ववाद्यांच्या आणि त्यांच्या सरकारांच्या गळ्यातला ताईत आहे.
त्याचा हिंदू स्त्रियांसाठी संदेश That woman who produces only one child is not a woman but a naagin (serpent)," Narsinghanand says provocatively, asking women to stand in defence of their religion by ensuring the longevity and quantity of progeny, according to the viral clip. "Ghar mein kam se kam 5-6 baal gopal ho... Aur bachhe paida karein," he proclaims, adding that it is better not to have kids than have only one.

The priest, surrounded by his associates cheering his ideas on, further urges for families to live in joint setups to preserve culture.

तिकडे इस्रायल जिनोसाइड करत असताना ही तात्त्विक चर्चा म्हणजे चितेला कँपफायर समजणं.

इस्रायल हॉस्पिटलसवर सातत्याने बाँबहल्ले करतो आहे. आता लहान मुलांच्याच हॉस्पिटलवर केला.

Official statement from Hamas calling on the UN Secretary-General to form an international committee to visit hospitals to verify Israel’s claims that Hamas uses them as sites for resistance

मेहदी हसनने इस्रायली अधिकारी नेत्यांच्या वंशसंहार सूचक विधानांचं संकलन केलं आहे.
https://twitter.com/mehdirhasan/status/1720215711925043260

ह्युमन शील्ड
च्या प्रचाराला छेद
https://twitter.com/AbbyMartin/status/1721206099301543990

लोक अनेक वर्षांपासून इस्रायल गाझापट्टीला माणसांना राहताच येणार नाही अशा स्थितीला आणेल असं भाकीत वर्तवीत आहेत.
This is Noam Chomsky in 2018 https://twitter.com/NthngMtrs/status/1719207690591768880

the hypocrisy of Israel, as described by Noam Chomsky himself.

आणखी एक https://twitter.com/RobertMiRey_/status/1720428552418390071

हाताशी वेळ असता तर यातला मजकूर इथे लिहून काढला असता.

Pages