Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17
इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.
धन्यवाद !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<. हमासचे एव्हढे मोठे नेटवर्क
<. हमासचे एव्हढे मोठे नेटवर्क , आर्थिक व्यावहार मोसाद/ अमेरिकेच्या नजरेतून निसटणे अशक्य गोष्ट आहे.>
होय उदय.
हमासला इस्रायलनेच खाऊ पिऊ घालून मोठे केले. असे अनेक रिपोर्ट्स आहेत. काल एक एन डीटीव्हीवर पाहिला.
हमासकडून दहशतवादी हल्ले करवून घेत राहायचं, त्याचा फायदा घेऊन पॅलेस्टिनी लोकांचे हाल करायचे आणि त्यांच्या स्वतंत्र स्टेटच्या मागणीला जोर मिळू द्यायचा नाही, अशी योजना आहे. यात नेत्यान्याहूचं मोठं योगदान आहे.
खुद्द इस्रायलमध्ये नेत्यानाहू विरोधात निदर्शने होत आहेत. एकतर तिथे स्पष्ट बहुमत असलेलं सरकार बराच काळ नाही. आणि नेत्यानाहूने केलेल्या ज्युडिशियल रिफॉर्म्समुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे. आता झालेले अभूतपूर्व दहशतवादी हल्ले मोसादला कळले नाहीत हे
निव्वळ आश्चर्यकारक आहे.
मी सत्तेत येताच दोन मिनिटांत
बापरे!
माझे मन, माहितीपूर्ण पोस्ट्
माझे मन, माहितीपूर्ण पोस्ट् साठी धन्यवाद.
आज इंडीआ टुडेच्या चॅनलवर फरीद झकेरीया यांची मुलाखत बघितली. https://www.youtube.com/watch?v=5ndumk6RBCw
आज एक ट्वीट वाचले. हा वाद
आज एक ट्वीट वाचले. हा वाद मिटण्यासाठी अरबांनी काय केले पाहिजे हे नीट मांडलेय. दोन्ही बाजूच्या सामंजस्यवादी लोकांना पाठिंबा मिळून तोडगा निघायला सुरूवात व्हावी ही इच्छा….
अॅडमिनः मुळ लेखकाची परवानगी न घेता ट्वीट डायरेक्ट पोस्ट करणे माबोच्या नियमात बसते का नाही माहित नाही. नसेल तर प्लीज उडवून टाका.
Hussain Abdul-Hussain
@hahussain
As Arabs, our message to the world cannot be restricted to eliciting global sympathy for the children of Gaza. We cannot depict ourselves as helpless children, behind whom we hide our failure to control our Hamas thugs who massacred 1300 non-combatant Israelis. This is a moral failure that the world sees but that we try to hide behind the “rights of the Palestinian people,” rights that none of us are willing to articulate. Free Palestine can mean anything, from an Arab Palestinian state living in peace next to Jewish Israel to an Arab Palestinian state instead of Jewish Israel.
For Arab Israeli peace to happen, and since Palestinians are either children, or Hamas thugs, or useless corrupt Mahmud Silicon-Face Abbas, non-Palestinian Arabs should step up to save the Palestinians from themselves and save the region ongoing sorrow. We, Arabs, have to show the world that we are at peace with the idea of a Jewish state, that we are willing to concede what we believe – rightly or wrongly -- is ours (1948 territory), that we genuinely want bygones to be bygones, without secretly holding grudges and passing them to our children. We must seek a better future for ourselves and our kids, as well as for Israelis and their kids.
The Palestine disaster (nakba) is not a disaster of land loss or military defeat. It is a disaster of absence of leadership that can articulate the Arab alternative to war and death. We ask the world to stop the Israeli war on Hamas, but what do we offer as an alternative to stopping the war? Just let those Hamas thugs who massacred 1300 Israelis get away with their crime (because there is a history of dispute)? Ask Israel to go back to October 6? Knowing that Hamas can break out of the Gaza fence and repeat its massacre any minute? Hamas must go. We Arabs must help get rid of it, and most importantly, we must show that we have a plan for the day after Hamas.
Let’s learn from the mistake of Iraq and Arab Spring countries, that once what we have is gone, what comes next looks worse. Let’s preempt the worse by offering the better.
As long as we, the Arabs, do not have answers to all these questions, the world will manage things without us. It does not matter if all of us, 1.3 billion Muslims, think that Israel is at fault. What matters is global perception, which clearly thinks that Islamist terrorism is the problem, not Israelis dancing at a music festival. And we, the Arabs, are not even talking to the world. We are talking to each other, patting ourselves on the back for being utopian and principled on Palestine, while we are in fact idiotically out of touch with reality. We insist on our backward message, then act surprised why many of our states are failing and why we are migrating in droves.
Please stop treating Palestine like religion, like we have to stick to our principles to win credit in the afterlife and to garner social acceptance among each other (Arabs and/or Muslims). Please think of Palestine like a problem that requires troubleshooting, compromise, pragmatism, and most importantly, looking toward the future, not the past.
गाझा आणि इस्त्राएल मधे कोण
गाझा आणि इस्त्राएल मधे कोण function at() { [native code] }इरेकी आहे, कोण कुठल्या धर्माचे आहे हे बाजूला ठेवा.
गाझा पट्टी ही सहा ते आठ किमी रूंदीची चिंचोळी पट्टी आहे. एव्हढ्याशा जागेत २० लाख लोक राहतात. इस्त्राएलने गेल्या काही वर्षात तारेचे कुंपण, मग आता पक्के बांधकाम, वीजेचा प्रवाह, सेन्सर्स लावून प्रवेश बंद केला आहे. पाठी मागे समुद्रात गस्ती नौका आहेत. त्यामुळे हा तुरूंग झाला आहे. इथे जन्मलेल्या बालकाचे नाव इस्त्राएली सैन्याकडे नोंदवले तरच त्या बाळाला ओळख मिळते. तुरूंग असल्याने अन्न्धान्य मिळत नाही. त्यासाठी इस्त्राएलच्या मंजुरीवर अवलंबून रहावे लागते. शिक्षणाची सोय नावालाच आहे. युवकांना रोजगार नाही.
प्यायचे पाणी असलेल्या जागा इस्त्राएलमधे गेल्याने पाण्यासाठी दाही दिशा हाल आहेत. आठवड्यातून एकदा इस्त्राएली सैन्याकडून पाणी येते. यामुळे त्यांच्या बळकावलेल्या जमिनीपैकी काही जमीन पॅलिस्तिनींना मिळावी यासाठी कित्येक वर्षे बोलणी चालू आहेत. पण त्याला इस्त्राएल दाद देत नाही. काही वर्षांपूर्वी गाझा पट्टीचं अस्तित्व मिटवून टाकण्यासाठी केलेल्या हल्ल्यानंतर तिथे कडवट ग्रुप्स निर्माण झाले, त्यातला एक हमास. गाझा वरच्या हल्ल्यानंतर इस्त्राएलचा जगभरात निषेध झाला होता. त्यानंतर भारताने इस्त्राएलला (जाहीर) पाठिंबा न देण्याचे धोरण स्विकारले होते. हमासने गाझा पट्टीत बस्तान बसवले आहे.
ही बाजू समोर येत नाही म्हणून इथे दिली. इथे लिहील्याने अरब इस्त्राएल संघर्षात तोडगा निघणार नाही याची कल्पना आहे. पारावर बसलेल्या लोकांनी पानाच्या पिंका मारत्ता मारता माहिती एक्स्चेंज करावी तशी ही बाजू इथे दिली. आता तंबाखू चुना मळून घरला जाऊ.
ही बाजू दिली मग ती का नाही असे विचारणार्याला तंबाखूही नाही मिळणार आणि ..................चुना मात्र मिळेल...
( खालचा उपहासात्मक प्रतिसाद का उडवला देव जाणे ! अवघड आहे).
५७ देश पैकी एकही देश
५७ देश पैकी एकही देश पॅलेस्टाइन निर्वासितांना आश्रय द्यायला तयार नाही , हा पण त्यांच्या त्यांच्या देशात हमास/ पॅलेस्टाईन समर्थन साठी हे विराट मोर्चे निघत आहेत आणि तेथील दुध्खुळी जनता इस्रायल ला शिव्या घालत मोर्चामध्ये सामील होत आहे .
पॅलेस्टाईन ला सर्वात जवळ असलेल्या इजिप्त ने केंव्हाच बॉर्डर बंद करून ठेवल्या आणि आज जॉर्डन च्या किंग ने कॅमेरा समोर छाती ठोकून सांगितले की आम्ही एकाही पॅलेस्टाईन नागरिकाला प्रवेश देणार नाही .
शो रूम मध्ये ठेवण्याच्या लायकीचा कळवळा दिसतोय ना मुस्लिम देशांचा ?
आपल्या भारतातील ठराविक मानवतावादी मंडळी मात्र सतत अश्रू ढाळत बसले आहेत !
युट्युब व्हिडियोच्या खालच्या
युट्युब व्हिडियोच्या खालच्या कमेंट्समध्येही मुस्लिम लोक हेच लिहीत आहेत की ज्यू लोकांनी अरबस्तान सोडून दुसरीकडे निघून जावं.त्यांना तडजोड मान्य नाही. त्यांच्या चार्टरनुसार dismantle israel हाच एकमेव पर्याय आहे.
इस्राईलने खरोखर त्या दृष्टीने विचार करावा आणि आपल्या लोकांना हळूहळू इतर civilized देशात सेटल करावं. अरबांची भूमी त्यांना परत करावी. अन्यथा ते सुखाने जगू देणार नाहीत. हा जमिनीचा वाद नाहीये. हा धार्मिक वाद आहे.
हमास ने इस्रायल वर सोडलेले
हमास ने इस्रायल वर सोडलेले रॉकेट मिस फायर होऊन गाझा मधील हॉस्पिटल वर पडले असे अल जाझिरा न्युज चॅनेल वर दिसतंय !
या घटनेत हॉस्पिटल मधील चार पाचशे लोकं मारली गेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पण हमास समर्थक मात्र नेटाने ते रॉकेट इस्रायल ने सोडल्याचे सांगत आहेत .
चार पाचशे मुस्लिम माणसं मेली
चार पाचशे मुस्लिम माणसं मेली त्याचा आनंद झाला असेल नै??
इस्राईल पॅलेस्टाइन वादाबद्दल
इस्राईल पॅलेस्टाइन वादाबद्दल माबोकरांना अतिशय रुची आहे. माबोवरच अस नाही पण इतरत्रही टनाने लेख पाडले जात आहेत.
पण आपल्या ईशान्य भारतात किती राज्य आहेत अस विचारलं तर...
“उत्तर पूर्वेत” - ईशान्य
“उत्तर पूर्वेत” - ईशान्य
<< इस्राईल पॅलेस्टाइन
<< इस्राईल पॅलेस्टाइन वादाबद्दल माबोकरांना अतिशय रुची आहे. माबोवरच अस नाही पण इतरत्रही टनाने लेख पाडले जात आहेत.
पण आपल्या उत्तर पूर्वेत किती राज्य आहेत अस विचारलं तर... >>
------- NE म्हणजे मणिपूर सुचवायचे आहे का?
<मास ने इस्रायल वर सोडलेले
<मास ने इस्रायल वर सोडलेले रॉकेट मिस फायर होऊन गाझा मधील हॉस्पिटल वर पडले असे अल जाझिरा न्युज चॅनेल वर दिसतंय !>
so many lies in one sentence
हे अल जझिराचं ट्वीट
https://twitter.com/AJEnglish/status/1714430279157440934
अल जझिराशी संबंधित आहे असं सांगून एका फेक हँडलने हे वरचं खोटं सांगितलं.
Disclaimer: The X / Twitter account @_Faridakhan
falsely claims Al Jazeera affiliation. We want to clarify: This account has no ties to Al Jazeera, its views, or content. Exercise caution, verify information prior to publishing.
याशिवाय , वेस्टर्न मीडियाने हॉस्पिटलखाली हमासचं भुयार असल्याची सोडलेली पुडी ( WMD आठवतंय ना?) , इस्रायलने आधी इस्पितळाला दिलेल्या वॉर्निंग्ज , हल्ला झाल्यावर इस्रायल समर्थकांनी प्रथम घेतलेले श्रेय आणि हे आमचे काम नाही असं सांगताना इस्रायलच्या अधिकृत प्रवक्त्यांनी शेअर केलेला असंबद्ध व्हिडियो यामुळे इस्रायलचं खोटं उघड झालं आहे.
In war , first causalty is truth.
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Northeast_India
अर्थात मणिपूर. पण अजूनही बरीच राज्ये आहेत. मला जुन्या काळाचा Angami Zapu Phizo नेता आठवतो. नंतर आसाम गणतंत्र परिषद. त्या काळी माझा मित्र हांदिकोई (हंदिक) त्याच्या घरी आसाम मधून पळून आलेले त्याचे मित्र भेटायचे. त्यांच्या मते ते अहोम जातीचे लोक थायलंड मधून भारतात आलेले.
आणि आता मणिपूर.
फेफ आभार !
अग्निवीर
अग्निवीर
तुम्ही त्या सरांना सिरीअसली घेता कि काय?
ते जरी "सूर्य पूर्वेला उगवतो" असे म्हणाले तरी मी विश्वास ठेवणार नाय.
ते जरी "सूर्य पूर्वेला उगवतो"
ते जरी "सूर्य पूर्वेला उगवतो" असे म्हणाले तरी मी विश्वास ठेवणार नाय. >>> आँ???????
अग्नीविर जरा पुलवामा बद्दल
अग्नीविर जरा पुलवामा बद्दल चार शब्द येवू द्या ना !
https://twitter.com/magedbik
https://twitter.com/magedbik/status/1714396454230405298
This is a hard hitting interview.
फुरोगामी, काल अॅडमिननी इथले काही प्रतिसाद उडवले हे लक्षात आलंय का तुमच्या? मागे जाऊन वाचा. अर्थात आपण काल काय लिहिलं हे लक्षात असेल तर उपयोग.
हा जमिनीचा वाद नाहीये
हा जमिनीचा वाद नाहीये
>>>> Utterly deluded.
इस्रायलच्या जन्माची कथा :
दोन दिवसापुर्वीच्या लोकसत्तेला हा लेख आला आहे तो जसाच्या तसा इथे पेस्ट करत आहे. कारण यात बायबलमधील संदर्भ ते आजवरच्या तिथल्या इतिहासाचा थोडक्यात मागोवा घेतला आहे.
लेखाची लिंक:
https://www.loksatta.com/explained/the-story-of-the-birth-of-israel-why-...
------- इथून पुढे लोकसत्तेतील लेख जसाच्या तसा -------
इस्रायलच्या जन्माची कथा : ‘ज्यू’ पॅलेस्टाईनच्या भूमीत का आले?
सध्या जागतिक स्तरावर इस्रायल-हमास युद्ध हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. इस्रायलचं लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेमध्ये संघर्ष होत असून विविध धर्मीयांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात आहे. धार्मिक आणि सामाजिक मुद्दे या हल्ल्यांच्या पाठीमागे असल्याचे दिसून येतात. या पार्श्वभूमीवर युद्धाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या इस्रायलची निर्मिती कशी झाली आणि ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतर का केले होते, हे जाऊन घेणे महत्त्वाचे ठरेल.
इस्रायलच्या निर्मितीची अधिकृत घोषणा १९४८ मध्ये झाली. परंतु, इस्रायलची निर्मिती होण्याआधीच ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनमधून इस्रायलमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. स्थलांतरित होणारे ज्यू अल्पसंख्याक होते, तरीही त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. ज्यू लोकांच्या स्थलांतराची कारणे काय होती आणि या स्थलांतरास ब्रिटिश आणि अरब लोक कारणीभूत होते का, हे समजून घेणे उचित ठरेल.
सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये होणाऱ्या संघर्षात जागेच्या मालकीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पॅलेस्टाईनमधील लोकांच्या मते, इस्रायची स्थापना त्यांच्या मातृभूमीवर बळजबरीने करण्यात आली. तर इस्रायचं मत आहे की, ही त्यांची जमीन असून बायबलमध्ये त्याचे संदर्भ आढळतात.
झिओनिझम चळवळीचा उदय
हिब्रू लोकांच्या बायबलनुसार, ‘इस्राएल’ हे नाव देवाने अब्राहमचा नातू जेकब याला दिलेले आहे. जेकब हा यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन ‘अब्राहमिक’ धर्मांचा मुख्य अधिपती होता. या अब्राहमचे वंशज कनानमध्ये स्थायिक झाले. हा कनान म्हणजे आजचा इस्रायलचा प्रदेश आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ही जमीन अनेक साम्राज्यांच्या अधिपत्याखाली होती. ग्रीक, रोमन, पर्शियन, क्रुसेडर, इस्लामवादी लोकांनी या भूमीवर राज्य केलं. ज्यू लोक ही विविध राज्यांमध्ये, देशांमध्ये राहत होते. अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकजूट नव्हती. युरोपमध्ये ज्यू लोकांचा मोठ्याप्रमाणावर छळ करण्यात आला. रशियामध्येही १८८० च्या दशकात ज्यू लोकांना लक्ष्य करण्यात आले. १८९४ मध्ये झालेल्या ड्रेफस प्रकरणामुळे ज्यू लोकांचा आत्यंतिक छळ करण्यात आला. या प्रकरणात एका ज्यू सैनिकाने जर्मनीला गोपनीय माहिती पुरवल्याचा खोटा आरोप करण्यात आला होता. याचे परिणाम संपूर्ण ज्यू समुदायाला भोगावे लागले. या सर्व घटनांमुळे ज्यू लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, जी आपले स्वतंत्र राष्ट्र असावे या कल्पनेत परावर्तित झाली. ज्यू लोकांनी स्वतःची मातृभूमी मिळवण्यासाठी चळवळ सुरू केली तिला झिओनिझम म्हणून ओळखले जाते.
या चळवळीचा जनक थिओडोर हर्झलला मानले जाते. याने १८९६ मध्ये ज्यू लोकांच्या नवीन राष्ट्राचे वर्णन करणारे, त्यांच्या हक्कांची जाणीव करणारे ‘डेर जुडेनस्टाट’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक मोठ्या प्रमाणात लोकप्रियही झाले. सुरुवातीच्या काळात युगांडा आणि अर्जेंटिना हे देश ज्यू लोकांच्या राष्ट्रासाठी निवडण्यात येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांची अनेक पवित्रस्थळे असल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतर केले.
पॅलेस्टाईनमधील वास्तव्याच्या कथा…
१८८१ ते १९०३ या काळात ज्यू लोक मोठ्या प्रमाणात पॅलेस्टाईनमध्ये आले. तिथे त्यांनी जमिनी विकत घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. अर्थात ही स्थलांतराची प्रक्रिया सोपी नव्हती. कारण, पॅलेस्टाईनमधील मूळ रहिवाशांना हे स्थलांतर मान्य नव्हते. त्यामुळे स्थलांतरित आणि मूळ रहिवासी यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
पॅलेस्टाईन हा ओटोमान राजाच्या वर्चस्वाखाली असणारा संपन्न प्रदेश होता. अरब, मुस्लीम असे विविध समूह तिथे राहत होते. तेथील मूळ रहिवासी हे गरीब, फारसे साक्षर नसणारे होते. पारंपरिकरित्या शेती करून उदरनिर्वाह करणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. परंतु, ज्यू हे उद्यमी होते. त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. तेथील गरीब-होतकरू अरब लोकांना आपल्या शेतात कामासाठी ठेवले. अधिक पैसे देऊन जमिनी विकत घेतल्या आणि अरब लोकांनाच तेथे भाड्याने ठेवले. थोडक्यात पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित होऊन ज्यू लोकांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यामुळे स्थानिकांचा रोष अधिकच वाढला. ओटोमान राजाने ज्यू लोकांना जमिनी विकायच्या नाहीत, असे फर्मान काढले. परंतु, त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी झाली नाही. १९०८ मध्ये यंग तुर्क क्रांतीमुळे ओटोमान राजाचा पराभव झाला, याचा फायदा स्थलांतरित ज्यू लोकांना झाला. ज्यूंनी आपले राष्ट्र स्थापन करण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळवण्यास सुरुवात केली.
बाल्फोरची घोषणा
पश्चिम आशियाचा चेहरा कायमचा बदलून टाकण्याची ताकद १९१७ च्या बाल्फोर घोषणेमध्ये होती. ब्रिटिश अधिकाऱ्याने एका ज्यू अधिकाऱ्याला पत्र लिहून पहिल्या महायुद्धात ज्यू लोकांचा पाठिंबा मागितला होता. या पाठिंब्याच्या बदल्यात ब्रिटिश सरकार ज्यू लोकांना सुरक्षा देणार होते. ज्यूंना त्यांचे स्वतःचे राष्ट्र स्थापन करायचे होते. त्यासाठी त्यांनी अनेक मार्गांचा अवलंब केला. त्यातील महत्त्वाची पायरी म्हणजे तेल अवीवची स्थापना होय. इस्रायलमधील अनेक कंपन्यांना रॉथस्चाइल्ड सारख्या श्रीमंत ज्यू लोकांकडून निधी पुरवण्यात येऊ लागला.
परराष्ट्र सचिव आर्थर जेम्स बालफोर यांनी या पत्राद्वारे ज्यूंच्या झिओनिस्ट चळवळीचे समर्थनही केले.
ब्रिटिश जरी ज्यू लोकांना सुरक्षा पुरवणार असले तरी पॅलेस्टाईनमध्ये राष्ट्रवाद मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला होता. ज्यू लोकांच्या विरोधात अनेक स्थानिक गट, संघटना उभ्या राहिल्या होत्या. या संघर्षामुळे ज्यू आणि मूळ रहिवासी यांच्यामधील संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली.
दुसऱ्या महायुद्धाचा ज्यू लोकांवर झालेला परिणाम
पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी ओटोमान राजाचा पराभव करून पॅलेस्टाईन चा प्रदेश हस्तगत केला. पॅलेस्टाईनचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. स्थानिक रहिवासी, राज्यकर्ते आणि स्थलांतरित यांच्यामध्ये झालेला हा वाद होता. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.तीन दशके ब्रिटिशांनी समित्या स्थापन केल्या, आयोग स्थापन केले, परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे हा प्रश्न युनायटेड नेशन्सकडे गेला.
पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना ज्यूंनी सहकार्य केले खरे, परंतु, अरब लोकांवर अन्याय होण्यास ब्रिटिशांच्या ऐवजी ज्यूच कारणीभूत आहेत, असा समज अरब लोकांनी करून घेतला होता. परिणामी ज्यू वस्त्यांवर, नागरिकांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला पॅलेस्टाईन ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आल्यामुळे मूळ प्रश्न असणाऱ्या झिओनिस्ट समस्येचे निराकरण होणार नव्हते. आपले स्वतंत्र राज्य असण्यासाठी ब्रिटिशांपासून वेगळे होण्याची गरज निर्माण झाली.
ज्यू आणि अरब यांच्यामध्ये चर्चेचे निष्फळ प्रयत्नही झाले. १९१९ मध्ये करारही करण्यात आला. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. ब्रिटिश, ज्यू आणि अरब यांच्यामध्येच अंर्तगत हल्ले होत होते. १९३६ ते १९३८ या काळात पॅलेस्टिनी लोकांनी ज्यू आणि ब्रिटिशांवर हल्ले केले. याचा विपरीत परिणाम होऊन ब्रिटिशांनी ज्यू आणि अरब दोघांनाही शिक्षा केल्या. पॅलेस्टिनी लोक या कालावधीला ‘अल-थवरा अल-कुबरा’ किंवा महान बंड म्हणतात. याच सुमारास ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या पील कमिशनने या समस्येवर एकमेव उपाय म्हणून विभाजनाचा प्रस्ताव ठेवला. परंतु, त्यात ज्यूंच्या बाजूने झुकते माप दिल्यामुळे पॅलेस्टिनी स्थानिकांनी बहिष्कार टाकला.मे १९३९ मध्ये मूळ पॅलेस्टिनी लोकांना अनुकूल श्वेतपत्रिका काढली. परंतु, तिचेही उपयोजन झाले नाही. अविश्वास, मोठ्या प्रमाणात वाढलेले हिंसाचार यामुळे ब्रिटिशांनी पॅलेस्टाईनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि यूएनद्वारे या समस्येचे निराकरण केले जाईल, असे सांगितले. ज्यूंनी त्याच्या गुप्तचर संघटना प्रशिक्षित केल्या.
इस्रायलची निर्मिती
असंघटित ज्यूंचा संघटित होण्यापर्यंत प्रवास झाला होता. त्यांचा लढण्याचा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा निश्चय पक्का होता. जेव्हा जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा तेव्हा त्यांनीच वर्चस्व प्रस्थापित केले.ब्रिटीश पत्रकार इयान ब्लॅक यांनी आपल्या ‘Enemies and Neighbours’ या पुस्तकात झिओनिस्ट लष्करी गटाचे हागानाहचे वाक्य उद्धृत केले आहे, जिथे ज्यू लोकांचे रक्त सांडले आहेत, त्या प्रदेशात स्वतःचे स्थान निर्माण केल्याशिवाय ज्यू शांत बसणार नाहीत.
२९ नोव्हेंबर, १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने पॅलेस्टाईनमधील स्थलांतरित ज्यू आणि अरब राष्ट्रांमध्ये विभाजन करण्यासाठी मतदान केले. ब्लॅक या पत्रकाराने सांगितल्यानुसार, या प्रस्तावित राष्ट्रामध्ये नेगेव वाळवंटासह देशातील ५५ टक्के भागाचा समावेश करण्यात आला होता. येथे ५ लाख ज्यू (५00,000) तर चार लाख(४००,०००) अरब लोक असतील. म्हणजेच अरबांकडे ४४ टक्के जमीन शिल्लक होती, ज्यामध्ये वेस्ट बँक आणि गाझा यांचा समावेश होता. संतप्त पॅलेस्टिनी लोकांनी हा ठराव फेटाळला.
दुसरीकडे, इस्रायलला १४ मे, १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य मिळवतानाच्या काळात इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. इस्रायलमध्ये असणाऱ्या पॅलेस्टाईन लोकांना लष्कराने हुसकावून लावले. इस्रायलच्या निर्मितीला पॅलेस्टिनी लोक नकबा म्हणतात. त्यांच्या मतानुसार, आम्ही आमची मातृभूमी या युद्धात गमावली आहे. त्यामुळे इस्रायलचा स्वातंत्र्य दिवस पॅलेस्टिनी मातृभूमी गमावल्याचा दिवस म्हणून साजरा करतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही इजिप्त, जॉर्डन, इराक, सीरिया आणि लेबनॉनने इस्रायलवर आक्रमण केले होते. परंतु, अमेरिकेने पुरवलेल्या लष्करी सामर्थ्यामुळे इस्रायलने यशस्वी लढा दिला. परंतु, पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यामध्ये सतत युद्धे होतच राहिली.
संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य राष्ट्रांपैकी १३९ पॅलेस्टाईनला मान्यता देतात, तर १६५ इस्रायलला मान्यता देतात, तसेच आज गाझा आणि वेस्ट बँक हा भाग इस्त्रायली सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे.
https://youtu.be/wZBE5j2kIgY
https://youtu.be/wZBE5j2kIgY?feature=shared
https://youtu.be/53Z7e0C1NMI?feature=shared
दुसऱ्या व्हिडिओतील शेवटी डिस्कस केलेली थिअरी विचार करायला लावणारी आहे.
In war , first causalty is
In war , first causalty is truth.>> १००%
इस्राएल च्या तोडीचा एकच
इस्राएल च्या तोडीचा एकच अडेलतट्टू देश आहे तो म्हणजे नॉर्थ कोरिया....किम जॉंगच इस्राएल ला शिंगावर घेउ शकतो.
PM Modi expresses outrage at
PM Modi expresses outrage at hospital bombing in Gaza Strip
https://www.thehindu.com/news/national/pm-modi-shocked-at-gaza-hospital-...
Read more at:
PM Modi condemns Gaza hospital attack as Arab countries rall ..
https://timesofindia.indiatimes.com/india/pm-modi-condemns-gaza-hospital...
काही मुस्लिम देशांनी इस्रायल
काही मुस्लिम देशांनी इस्रायल वर बहिष्काराचे अस्र उपसले आहे . या केरळ मधील कंपनीतील १५०० कामगारांनी देखील इस्रायल चे गणवेश शिवण्यास नकार दिला पाहिजे
!
युट्युबनं सजेस्ट केलं म्हणून
युट्युबनं सजेस्ट केलं म्हणून हे चॅनल बघितलं. इस्त्राईलमधे राहणारा हे मराठीतून चॅनेल चालवत आहे. तो आणि त्याची आई असे इस्त्राईलमध्ये राहतात. तिथल्या त्यांच्या आयुष्यावर साधे, सोपे व्हिडिओ साधारण वर्षभरापासून सुरू केलेले दिसतायत.
सध्याच्या त्याच्या व्हिडिओजमधून युद्धामुळे बदललेल्या इस्त्राईलमधील परिस्थितीची थोडीशी झलक मिळते.
आपला शामू -Apla Shamu : https://www.youtube.com/@AplaShamu/streams
संयुक्त राष्ट्राच्या १९३
संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य राष्ट्रांपैकी १३९ पॅलेस्टाईनला मान्यता देतात, तर १६५ इस्रायलला मान्यता देतात, तसेच आज गाझा आणि वेस्ट बँक हा भाग इस्त्रायली सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. >>>>>>>
तो वेस्ट बँक चा भाग इस्रायल ने अरब राष्ट्रविरोधात झालेल्या लढाईत जिंकून घेतलेला होता .
पण थोडे अजून पूर्वीच्या घटना उलगडल्या तर वेगळाच इतिहास समोर येतो .
१९४८ मध्ये ब्रिटिशांनी पॅलेस्टाईन मधून माघार घेतल्या नंतर वेस्ट बँक मधील लोकांनी जॉर्डन च्या राजाची सत्ता मान्य केली , थोडक्यात वेस्ट बँक वर जॉर्डन च्या राजाचे नियंत्रण सुरू झाले . पॅलेस्टाइन लोकांना जॉर्डन मधील सर्व हक्क दिले गेले ,संसदेतील निम्म्या जागा देखील दिल्या गेल्या होत्या.
पण कालांतराने पॅलेस्टाइन लोकांनी जॉर्डन मध्ये उपद्रव सुरू केले , सार्वजनिक नियम पायदळी तुडवले गेले .
स्थानिक जॉर्डन चे नागरिक आणि समाविष्ट करून घेतलेले पॅलेस्टाइन मध्ये संघर्ष सुरू झाला होता .
त्यांना बाहेर काढायचे तर समस्त अरब जगताची नाराजी वाट्याला येण्याची भीतीमुळे राजा कारवाई करायचे टाळत होता . जॉर्डन च्या पंतप्रधान ची हत्या देखील याच पॅलेस्टाईन ग्रुप ने केली होती . कालांतराने पॅलेस्टाईन ग्रुप ने सीरिया च्या मदतीने जॉर्डन मध्ये हल्ले चालू केले.
जॉर्डन किंग ने मदत मागितली असताना पॅलेस्टाईन बंडखोरांना संपविण्यात पाकिस्तानी लष्कराने मोलाची भूमिका बजावली होती .
त्या नंतर १९६७ मध्ये झालेल्या जॉर्डन आणि इतर अरब राष्ट्रांबरोबर झालेल्या संघर्षात गोलान हाईट्स , वेस्ट बँक आणि गाझा वर इस्रायल चे नियंत्रण स्थापित झाले .
वरील माहितीतील दुरुस्ती स्वागतार्ह !
एकंदरीत पॅलेस्टाईन बंडोखरांचा ईतिहास जरा जास्तच रक्तरंजित दिसतोय , १९७० च्या अगोदर जॉर्डन बरोबर संघर्ष आणि त्या नंतर इस्रायल बरोबर चालूच आहे !
संयुक्त राष्ट्रांच्या
संयुक्त राष्ट्रांच्या संकेतस्थळावरील पॅलेस्टाइन प्रश्नाबद्दलची माहिती
हे थोडक्यात सांगणारा ४+ मिनिटांचा एक व्हिडियोही तिथे आहे.
१९४८ मध्ये ब्रिटिशांनी
१९४८ मध्ये ब्रिटिशांनी पॅलेस्टाईन मधून माघार घेतल्या नंतर वेस्ट बँक मधील लोकांनी जॉर्डन च्या राजाची सत्ता मान्य केली>>> ही माहीती चुकीची आहे, युद्धामध्ये जाॉर्डन- इजिप्त आणि इतर अरब राष्ट्रे पॅलेस्टाईन अरबांना मदत करत होती कारण त्यांच्याकडे स्वतःचे असे सैन्य-राज्यव्यवस्था नव्हते, एकूणच सर्व अरब राष्ट्रांना इस्राएलचे अस्तित्व त्यांच्या भूमीवर नको होते...आणि पॅलेस्टाईन त्यांच्याकडे राज्यशकट हाकण्यासाठी असणाऱ्या सर्व गोष्टींचा अभाव असतानाही ब्रिटीशांनी अन्यायाने ज्यूं ना आपल्या भुमीवर आणून वसवले या रागातून सर्व अरब राष्ट्रांच्या कुबड्या घेऊन ज्यूं ना हाकलून लावायच्या विचारात होती... जॉर्डन ईजिप्तमध्ये आधीपासूनच राज्यव्यवस्था होती. १९४८ च्या युद्धात इस्राएल ने पॅलेस्टाईनच्या वाटणीला आलेला आणखी भूभाग बळकावला तरी वेस्ट बॅंक वर ताबा ठेवण्यात जॉर्डन तर गाझा पट्टी सुरक्षित ठेवण्यात इजिप्त यशस्वी ठरले...पण हे सर्व ते पॅलेस्टाईन या देशातर्फे करत होते..म्हणजे पॅलेस्टाईनचे चे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व त्यांनी मान्य केले होते...या सर्व भुमिकांच्या विपरीत जाऊन १९५० ला जॉर्डनने वेस्ट बॅंकचा त्यांच्या सैन्याने सुरक्षित केलेला प्रदेश जॉर्डन मधे समाविष्ट करून घेत आहे असे जाहीर केले(याला फक्त ब्रिटन आणि पाकिस्तानने मान्यता दिली होती) म्हणजे एकप्रकारे पॅलेस्टाईनचे वेगळे राष्ट्र हे अस्तित्व पुसून टाकले नी त्याचा परिणाम म्हणजे जॉर्डन च्या राजा अब्दुल्लाह ची हत्या करण्यात आली, आणि त्यानंतर जॉर्डन पॅलेस्टाईनमधे यादवी मजली.
https://twitter.com
.
https://x.com/zoo_bear/status
https://x.com/zoo_bear/status/1715749547987943579?s=46&t=VmW_4Lk9u8aAqJf...
चीन नी ह्या विषयात काहीच
चीन नी ह्या विषयात काहीच कॉमेंट केली नाही.
चिनी जनते ला तर माहीत पण नसेल.
गाझा मध्ये काय चालले आहे.
भारतीय जनता रिकाम टेकडी आहे.
त्यांना नको ते उद्योग सुचतात.
अमेरिकेची entry झाल्यावर भारताच्या भूमिकेला कोण विचारतो
त्यातील दोन फोटो युक्रेन
..... या केरळ मधील कंपनीतील १५०० कामगारांनी देखील इस्रायल चे गणवेश शिवण्यास नकार दिला पाहिजे>>>>>>>>
केरळ मधील त्या कंपनी ने इस्रायल ची गणवेश शिवून देण्याची ऑर्डर कॅन्सल केली , अशी एन डी टीव्ही ने बातमी दिली.
नुकसान कोणाचे झाले ?इस्रायल की त्या कंपनीचे ?
इस्रायलने इस्पितळावर आणि
इस्रायलने इस्पितळावर आणि सामान्य नागरिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरात जनमत इस्रायलविरोधात जाऊ लागले आहे.
आता ह्यासाठी लेझर गाइडेड
आता ह्यासाठी लेझर गाइडेड मिसाइल सारखं फक्त अतिरेकी एकत्र वेचुन त्यां सर्वाना मिसाइल आणि बॉम्बची झळ एकाच वेळी पोचेल आणि त्याच बरोबरीने तिकडच्या परिसरातील इतर सामान्य नागरिक सुरक्षित राहतील अशी टेक्नोलॉजी शोधली पाहिजे ना !!
नक्कीच , सर्वसामान्य लोकांचे
नक्कीच , सर्वसामान्य लोक आणि लहान मुले देखील इस्रायल च्या बॉम्ब हल्यात बळी पडले आहेत .
पण पुवी इस्रायल सैनिकांच्या विरोधात पॅलेस्टाईन लोकांनी निदर्शने करताना लहान मुलांना पुढे केल्याचे ढिगाने व्हिडिओ पडले आहेत.
त्यावेळी त्या लहान मुलांची काळजी जगभरातील जनमताला कशी वाटत नव्हती ?
मोठ्ठा प्रश्न पडला आहे .
ज्यांना पॅलेस्टाईनला पाठिंबा
ज्यांना पॅलेस्टाईनला पाठिंबा द्यायचाच आहे त्यासाठी हॉस्पिटल वर झालेला हल्ला हे फक्त निमित्त आहे.
जगभरात इस्रायल च्या विरोधात
जगभरात इस्रायल च्या विरोधात जी निदर्शने चालू आहेत त्यात खिदळत सेल्फी काढणारे देखील असतात .
पण आपल्या भारतातील आणि बऱ्याचशा मुस्लिम देशातील निदर्शने मात्र सच्चे दिल से झाली आहेत ...
महत्वाची न्युज म्हणजे अमेरिकन मायलेकिना हमास च्या ताब्यातून सोडवण्यात बायडेन सरकार वाटाघाटी मध्ये यशस्वी झाले .
कदाचित अमेरिकेचा रोष नको म्हणून ही सोडले असेल .
अमेरिकेने जेव्हा सो कोल्ड
अमेरिकेने जेव्हा सो कोल्ड दहशत वाद विरोधी युद्धात प्रथमच क्लस्टर बॉम्ब वापरला तेव्हा सुद्धा अनेक निरपराध सामान्य नागरिक मारले गेलेच ना ! युद्धात हे सर्व क्षम्य नसले तरी करावे तर लागतेच... मग आताच एवढी प्रश्न चिन्ह का ?
अजून हल्ले नको आणि मदत या
अजून हल्ले नको आणि मदत या बोलीवर हमासने कैद्यांना सोडून द्यावे. अर्थात इस्रायल ऐकण्याची शक्यता कमीच आहे. एकदा ही deal झाली की हमासला नवीन फॉर्म्युला सापडल्या सारखे होईल. हल्ले करा आणि आपल्या मागण्या पूर्ण करा.
नुकसान कोणाचे झाले ?इस्रायल
नुकसान कोणाचे झाले ?इस्रायल की त्या कंपनीचे ?## बॉयकॉट सारुक सारखे हॅशटॅग चालवताना भक्तांची बुद्धी पेंड खायला जात असावी
दोन हमास अतिरेक्यांमधलं त्या
दोन हमास अतिरेक्यांमधलं त्या हॉस्पिटल बॉम्बिंग बद्दलचंम्हणून एक टेलिफोन संभाषण इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेने पकडलं म्हणे.
पण हमास आपल्यावर एवढा मोठा हल्ला करणार आहे, हे त्याच गुप्तचर यंत्रणेला कळलं नाही?
मोठ्ठा प्रश्न पडला आहे .
गेल्या काही आठव्ड्यांत,
गेल्या काही आठव्ड्यांत, इस्रायल मधे हजारोंच्या संख्येने लोक एकत्र आली होती, निषेध व्यक्त करायला.
अनेक कारणांनी नेत्यानाहू अडचणीत आले होते. हमासच्या हल्ल्यानंतर चित्र बदलत आहे.
https://www.haaretz.com/israel-news/2023-09-02/ty-article-live/israelis-...
<< चीन नी ह्या विषयात काहीच
<< चीन नी ह्या विषयात काहीच कॉमेंट केली नाही.
चिनी जनते ला तर माहीत पण नसेल.
गाझा मध्ये काय चालले आहे.
भारतीय जनता रिकाम टेकडी आहे.
त्यांना नको ते उद्योग सुचतात.
अमेरिकेची entry झाल्यावर भारताच्या भूमिकेला कोण विचारतो
Submitted by Hemant 333 on 21 October, 2023 - 12:25. >>
------ चीन कडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली आहे. चीन तसेच रशिया यांनी दोन्ही बाजूंना शांततेसाठी आवाहन केले आहे.
https://www.cnn.com/2023/10/19/china/china-xi-israel-hamas-ceasefire-com...
पॅलेस्टाईन नागरिकांच्या
पॅलेस्टाईन नागरिकांच्या समर्थनार्थ जगभरात मोर्चे निघत आहेत , त्यात हमास चे समर्थन करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे . ती लोकं टीव्ही चॅनेल वर ओपनली सांगत आहेत हमास टेररिस्ट संघटना नाही !
मामी ते आपला शामु मी बघायचे
मामी ते आपला शामु मी बघायचे आधी, मग बोअर व्हायला लागलं, त्याची आई मला फार आवडते. सध्याच्या परीस्थितीत ते दोघे कसे आहेत, ठीक आहेत ना बघायला परत बघितलं. सुखरुप आहेत बघून बरं वाटलं, सध्या परत त्याचे बघतेय.
मानवतावादी दृष्टीकोनातून,
मानवतावादी दृष्टीकोनातून, पॅलेस्टाईन साठी भारताची एक छोटी मदत...
https://www.rediff.com/news/report/india-sends-medical-aid-among-385-ton...
हा वाद अजून चिघळायला नको अशी मनोमन प्रार्थना करुयांत.
मानवता वादी भूमिका वेगळी असते
मानवता वादी भूमिका वेगळी असते.देश सोडा अगदी खासगी आयुष्यात पण ज्या व्यक्ती शी तीव्र मतभेद असतात.
अशी व्यक्ती विकलांग झाली झाली, मजबूर झाली तर त्या व्यक्ती ल जगण्यासाठी मदत करण्याची पद्धत भारतीय लोकात आहे .
हा विषय पूर्ण वेगळा आहे.
हमास ही दहशत वादी संघटना आहे हे डाव्यांना ना मान्य आहे की नाही हा प्रश्न आहे.
दहशतवादी संघटना म्हणजे मानवी मूल्य पायदळी तुटवणारे हैवान असणार्या लोकांनी बनवलेली संघटना.
व्याख्या पण दिली आहे.
कोणत्याच देशाची अधिकृत सत्तेत असलेली सरकार ही दहशतवादी संघटना नसतात. ( भारतीय प्रशासन भारत सरकार च्या धोरण विरुद्ध वागते त्या मुळे खूप लोकांस प्रशासन म्हणजे दहशत वादी असा समज होतो.ती गोष्ट वेगळी .
त्याचे कारण घटनेने विनाकारण त्यांना दीलेलेल संरक्षण पण बाकी देशात अशी फालतुगिरी चालत नाही जे सरकार चे धोरण तेच प्रशासन चे पण अशी योग्य स्थिती असते)
ते नियमाला बांधील असतात.
त्या मुळे इस्त्रायल सरकार दहशत वादी ह्या व्ह्याखेत बसत नाही.
हमास जर दहशत वादी संघटना असेल तर तिचा पूर्ण विनाश करणे हे जगातील सर्व देशांचे आद्य कर्तव्य आहे.
भारताचे पण तेच कर्तव्य आहे.
हमास जर दहशत वादी संघटना असेल
हमास जर दहशत वादी संघटना असेल तर तिचा पूर्ण विनाश करणे हे जगातील सर्व देशांचे आद्य कर्तव्य आहे.
भारताचे पण तेच कर्तव्य आहे.>>>नक्कीच पुर्णपणे मान्य, पण पॅलेस्टाईन देशाचे सार्वभौमत्व, त्यांची भूमी त्यांना परत मिळण्याविषयी तुमची भूमिका काय आहे? कारण त्याबाबत इस्राएलने १९४८ नंतर नेहमीच हटवादी पवित्रा घेतलायं , अगदी वेळप्रसंगी युनो लाही भीक घातली नाही आहे.
कोणत्याच देशाची अधिकृत सत्तेत
कोणत्याच देशाची अधिकृत सत्तेत असलेली सरकार ही दहशतवादी संघटना नसतात. >> अनमोल ठेवा आहे ही माहिती. मायबोलीच्या इतिहासात इतकी मूलगामी व अमूल्य माहिती आजवर कुणीही देऊ शकलेले नाही.
अफगाणिस्तानातील तालिबान आणि इराकच्या काही भागातील आयसिस सरकारांकडून सरांना अनु. तालिबानी रत्न व आयसिस रत्न पुरस्काराने लवकरच सन्मानित करण्यात येणार आहे.
किम जोंग यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे.
आदरणीय सर इदी आमिन जर आज असते तर सरांचा
लचकामुकाच घेतला असता.Pages