इस्त्राईल पॅल्स्टाईन वाद काय आहे?

Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17

इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.

धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तितकेच नाही, तर LOC LAC मधल्या नागरिकांना दुय्यम नागरिक म्हणून ठेवण्याचा हक्क आहे असे सुद्धा त्यातून प्रतीत होते.

Harvard वाल्यानी हमासचाच सपोर्ट केला आहे पण नावं लपवून.
इस्त्राईलमध्ये २० टक्के लोक अरब आहेत. त्याना सिटीझनशीपचे सेम हक्क आहेत. ज्यू लोकांना काही स्पेशल आरक्षण वगैरे नाही. याउलट पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोक असे आरामात जाऊन राहू शकत नाहीत. They will be killed.

Harvard वाल्यानी हमासचाच सपोर्ट केला आहे पण नावं लपवून. >> हमास चा सपोर्ट करणे हे भारतात गद्दारीचं लक्षण ठरवलं गेलंय का ? असल्यास का ? भारतावर इस्त्रायलचं राज्य आहे का ?

ज्यू लोकांना काही स्पेशल आरक्षण वगैरे नाही. >>> त्यांना आरक्षणाची काय गरज ? आरक्षणाचे तत्त्व काय ?

भारतात हमासचा सपोर्ट चालू आहे की वामपंथी लोकांकडून. तिथे नियम काय आहे माहीत नाही.
तुम्ही मायबोलीवर हमासच्या सपोर्टचे किरण पसरवून बघू शकता वेबसाईटच्या नियमात बसतं का ते.

इस्त्राईल मधल्या अरबांना, म्हणजे गाझा वगळले तर, बऱ्यापैकी समान हक्क आहेत. गाझा मध्ये अजिबात नाही.

पॅलेस्टाईन वेस्ट बँक मध्ये २८-३०% ज्यू राहतात. तिथे सुद्धा अँटी सेमिटजम असणार काही प्रमाणात, पण माझ्या माहिती प्रमाणे तिथे ज्यू राहू शकतात. गाझा मध्ये हमास सत्तेत आहे त्यामुळे तुम्ही म्हणता तसे तिथे ज्यू राहू शकणार नाहीत. पण अँटी सेमिटिक आहेत म्हणून त्यांच्या जमिनी बळकावणे योग्य म्हणायचे काय ?

भारतात हमासचा सपोर्ट चालू आहे की वामपंथी लोकांकडून. >> हे सनईचे सूर कुठून ऐकू आले ? संघी लोक सांगतील ती बाजू देशप्रेमी आणि त्यांचा विरोध असेल ती गद्दारीची हे सूत्र आहे का ? थोडं तर्काला धरून बोलत असाल तर ठीक. नाहीतर गुड नाईट.

अमेरिकेत सामान्य जनते मधे भरपूर पॅलस्टाइन सपोर्ट मधे रॅलीज चालु आहेत, इन फॅक्ट जास्तं सपोर्ट दिसतोय सोशल मिडिया वर !
आता नवीन काय मुद्दा काढलाय कि हमासच्या हल्ल्यात लहान मुलं, बेबीज वगैरे हर्ट केलेच नाहीयेत, ती फेक न्युज इस्राइल आणि अमेरिकन मिडियानी पसरवली असा Uhoh चोराच्या उलट्या बोंबा, व्हिक्टिम कार्ड इ.
गाझा मधल्याही सामान्य जनतेचे हाल, लहान मुले हर्ट झालेली बघवत नाहीत पण चहु बाजुंनी अरब शत्रुंचा सतत धोका असल्यामुळे इस्राइल कायम अस्तित्त्वा साठी अ‍ॅग्रेसिवच रहाणार आहे, त्यांचा ठाम विश्वास आहे कि फ्री पॅलेस्टाइन = एन्ड ऑफ इस्राइल , हजारो वर्षांचा इतिहास बघता इस्राइली ज्यु लोकांची लढाई अगदीच बरोबर आहे त्यांच्या जागी !

डिजे+१
हमास चा सपोर्ट करणे हे भारतात गद्दारीचं लक्षण ठरवलं गेलंय का ? असल्यास का ? >>> दहशतवादी सघटनाना नेहमीच भारताने आणी इतर
लोकशाही असण्यार्‍या देशानी विरोध केलाय...गद्दारी वैगरेच काही माहिती नाही.

ज्यू लोक बीफ म्हणजे आपली गोमाता मारून खातात. हलाल सारखं त्यांचंही कोशर फूड असतं. ते मूर्तिपूजा मोठं पाप समजतात. म्हणजेच त्यांच्या नजरेत हिंदू काफिर. ते सुंता धार्मिक विधी म्हणून करतात. म्हणजे भारताच्या संसदेत वापरलेला शब्द वापरून सांगायचं तर कxआ.
हे असं असताना हिंदू लोकांनी ज्यू आणि मुस्लिम कोणाचीही बाजू घेऊ नये.

दहशतवादी सघटनाना नेहमीच भारताने आणी इतर
लोकशाही असण्यार्‍या देशानी विरोध केलाय...गद्दारी वैगरेच काही माहिती नाही. >>>> मोसाद ने इतर देशात जाऊन त्यांच्या शत्रूच्या हत्या केल्या आहेत. कॅनडातल्या खलिस्तानी संघटनेच्या प्रमुखाची हत्या भारताने केली म्हणून अमेरिकेने कॅनडाला त्याचे पुरावे दिले आहेत. याच अमेरिकेचा सपोर्ट इस्त्राएलला आहे. तुम्हाला इस्त्राएलची बाजू का घ्यायची आहे ? कोण दहशतवादी हे कोण ठरवणार ?

कॅनडाच्या नजरेत खलिस्तानी दह्शतवादी हे दहशतवादी नाहीत. अमेरिकेच्या नजरेत सुद्धा नाहीत. तुम्हाला हे माहिती नाही का ?

हे असं असताना हिंदू लोकांनी ज्यू आणि मुस्लिम कोणाचीही बाजू घेऊ नये.
ज्यू लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात ह्याच्याशी काहीही देणंघेणं नाही, जो पर्यंत आपल्या देशाला त्याच्या वागणुकीचा नुकसान होत नाही. ज्यू धर्मात काफिर ही संकल्पना खरच आहे का?

ज्यू लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात ह्याच्याशी काहीही देणंघेणं नाही, जो पर्यंत आपल्या देशाला त्याच्या वागणुकीचा नुकसान होत नाही. >> हे हमास / पॅलेस्तिनींना ला लागू होत नाही का ?

पाकड्या नी कारगिल मध्ये कागाळी केली तेंव्हा सगळे मुस्लिम देश भारताच्या विरोधात होते , फक्त एकटा इस्रायल भारताच्या बाजूने होता!
दुसरी गोष्ट भारतातील असंख्य लोकांनी इस्रायल ला पाठींबा दिला तर त्यांनी दोस्ती , प्रेम , India is great , वैगरे प्रतिक्रिया देवून धन्यवाद दिले .
या उलट ज्या भारतीयांनी हमास ला समर्थन दिले त्यांची लायकी काढली गेली , त्या मध्ये स्वरा , शाम मिरा , रवीश सारखे दिग्गज होते .

अमेरिकेने बांग्ला देश युद्धात भारताच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांचे सेव्हन्थ फ्लीट हिंदी महासागरात पाठवले. त्या वेळी इस्त्राएलने विरोध केला नाही. रशियाने त्या वेळी अमेरिकेला धमकी दिल्याने सातवे आरमार परत गेले.

मुद्दा इतकाच आहे कि इस्त्राएल आणि गाझा पट्टी वादात कुठली तरी बाजू घेतल्याने गद्दार / देशप्रेमी कसे काय होते ? ही अडाणचोट भूमिका न घेता पण हा वाद काय आहे यावर चर्चा होऊ शकते की.

हे हमास / पॅलेस्तिनींना ला लागू होत नाही का ?
होतय की, ते सुंता करो की मूर्ती पूजा करो आपल्याला काही त्रास होत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही.

मग मी काय केलं? अग्निविर यांनी सुंता, गोमास हे मुद्दे मांडले आणि मला ते पटले नाहीत ते मी वर मांडले.

ती अग्निवीर वाली पोस्ट उपरोधिक होती बहुधा. तमाम पुरोगामी लिबरल सेक्युलर जमात ही इस्त्राईलविरोधी आहे. अनेकांनी हमासचं समर्थन केलेलं आहे.
एक बेसिक प्रश्न. समजा तुम्ही एक तरुण सुन्दर स्त्री आहात किंवा तुमच्या सोबत तुमची तरुण मुलगी/पत्नी/बहीण /मैत्रीण आहे आणि तुम्ही तिकडे वाळवंटात अडकले आहात. तुम्हाला मदतीसाठी ऑप्शन एक- पॅलेस्टाईनी लोक, हमास, हिजबुल्ला, सेव्ह गाझा पोस्टर्स धरलेले लोक किंवा ऑप्शन दोन- ज्यू लोक, इस्त्राईल डिफेन्स फोर्सेसचे सैनिक यांच्यापैकी एकाकडे जायचं असेल तर तुम्ही कुठे जाल? तुम्हाला कुठे सेफ वाटेल?

तुम्हाला कुठे सेफ वाटेल? >>> सनई ही सनई सारखी वाजवायची असते. तिचा डग्गा म्हणून वापर करायचा नसतो. अर्थात तुम्ही तसे करायला स्वतंत्र आहात.

समजा तुम्ही एक तरुण सुन्दर स्त्री आहात किंवा तुमच्या सोबत तुमची तरुण मुलगी/पत्नी/बहीण /मैत्रीण आहे आणि तुम्ही तिकडे वाळवंटात अडकले आहात. तुम्हाला मदतीसाठी ऑप्शन एक- पॅलेस्टाईनी लोक, हमास, हिजबुल्ला, सेव्ह गाझा पोस्टर्स धरलेले लोक किंवा ऑप्शन दोन- ज्यू लोक, इस्त्राईल डिफेन्स फोर्सेसचे सैनिक यांच्यापैकी एकाकडे जायचं असेल तर तुम्ही कुठे जाल? तुम्हाला कुठे
<<<<
इथे तरुण सुंदर स्त्री संदर्भ तरी कशाला ?
एक माणुस /लहान मुल /वयोवृद्ध कोणीही नॉन मुस्लिम असाल तर कुठे सेफ वाटेल असा प्रश्नं विचारा !
अर्थात गाझा मधल्या सामान्य इनोसन्ट मुस्लिम जनतेशीही हमासला काहीही देणंघेणं नाहीये , ते मेले तर मेले, जन्मालाच येतात कुर्बान होण्यासाठी हे त्यांच्या लिडर्सचे (स्वतः सेफ राहून) म्हणणे आहे !
तरीही जगभर पॅलेस्टाइनला सपोर्ट करणारे कुठेही कोणीही हमासच्या हल्ल्यामुळे गाझाची ही दशा आहे असं म्हणत नाहीये, सगळा दोष इस्राइलच्या अ‍ॅटॅक्सना, व्हेरी कनव्हिनियन्ट !

सनई ताईंना असे म्हणायचे आहे कि इ स्त्रायली लोक बलात्कार करत नाहीत, हमास वाले १०० टक्के लोक बलात्कारी आहेत. हा पुन्हा चर्चेला फाटा फोडलाच आहे. त्यांना इस्त्रायली लोकांवर विश्वास ठेवण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांच्या या लोकशाही अधिकारावर गदा आणण्याचे कारण नाही.
पण जे सर्टिफिकेट ते सुचवू इच्छितात त्यासाठी जरा हा पेपर बघा.
https://www.ojp.gov/ncjrs/virtual-library/abstracts/response-justice-sys...

आता हे असे फाटे न फोडता विषयावर चर्चा करा बघू.

अजून काही शंका असेल तर हा ही रिपोर्ट बघा आणि ज्युंना सर्टिफिकेट वाटत बसा.
https://www.1202.org.il/en/union/info/statistics/arcci-statistics#:~:tex....)-,General%20Statistics,assaults%20of%20men%20or%20boys.

याउप्पर तरूण स्त्रिया, मुले, वृद्ध सुरक्षित आहेत कि नाहीत हा क्रायटेरिया वादात बाजू घेण्यासाठी असेल तर तो सगळीकडेच लावला पाहीजे. मग जिथे जिथे अशी असुरक्षितता असेल तिथे हल्ले समर्थनीय ठरतात असा या प्रमेयाचा अर्थ निघतो. चूक असेल तर सांगा.

हे पटत असेल तर शीर्षकात आणि धाग्याच्या हेडर मधल्या विषयाशी संबंधित बोला.

एक बेसिक प्रश्न. समजा तुम्ही एक तरुण सुन्दर स्त्री आहात किंवा तुमच्या सोबत तुमची तरुण मुलगी/पत्नी/बहीण /मैत्रीण आहे आणि तुम्ही तिकडे वाळवंटात अडकले आहात. तुम्हाला मदतीसाठी ऑप्शन एक- पॅलेस्टाईनी लोक, हमास, हिजबुल्ला, सेव्ह गाझा पोस्टर्स धरलेले लोक किंवा ऑप्शन दोन- ज्यू लोक, इस्त्राईल डिफेन्स फोर्सेसचे सैनिक यांच्यापैकी एकाकडे जायचं असेल तर तुम्ही कुठे जाल? तुम्हाला कुठे सेफ वाटेल>>>>>>>>
हा एकदम बिनतोड युक्तिवाद !

अजब घटना.
इस्राईलचा उल्लेख इस्त्राईल असा केल्याबद्दल ग्रामर नाझी लोकांची ज्यूंना प्रथमच सहानुभूती! ग्रामर नाझी - ज्यू भाई भाई.

यावर तिखटजाळ उत्तर मघाशीच सुचले होते, पण आवरले ते. असो.

आता विषयांतरात यशस्वी झालाच आहात तर ज्युं कडून गाझा पट्टीत झालेल्या लैंगिक function at() { [native code] }याचाराच्या रिपोर्ट्सची माहिती घ्या.

Catharine MacKinnon यांनी २०१४ मधे इस्त्रायल मधे दिलेल्या एका लेक्चर मधे इस्त्रायली सैनिक लैंगिक function at() { [native code] }याचार करत नाहीत असा दावा केला होता. नेहमी जेते असे दावे करतात आणि त्याची शहानिशा होत नाही. युद्धात प्रतिस्पर्ध्यांवर फक्त लढाईतला विजय अपेक्षित नसतो. शत्रूची बाजू अनैतिक आहे हे सुद्धा आटापिटा करून दाखवले जाते. त्यासाठी प्रचारयंत्रणा ताब्यात घेतल्या जातात. शत्रूच्या प्रचारयंत्रणांची मुस्कटदाबी केली जाते आणि आपलीच बाजू जगासमोर आली पाहीजे असे डावपेच खेळले जातात.

अमेरिका यात सर्वात आघाडीवर आहे.. इस्त्रायलच्या पाठीशी अमेरिका आहे. अमेरिका किती क्लीन आहे हे सर्वांना ठाऊक आहे. याचा अर्थ रशिया किंवा जर्मनी साधू संत आहेत असा नाही. पण त्ते पुरते बदनाम आहेत.

इस्त्रायली सैनिक साधू संत आहेत असे मानणे आणि आसाराम बापू हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत असे समजून त्यांच्या सेवेसाठी आपल्या मुली बाळी बायका सोडून येणारे लोकांचे मानणे हे एकाच पात़ळीवरचे आहे.

https://www.cair.com/cair_in_the_news/israeli-guards-rape-palestinian-wo...

अकरा वर्षांच्या मुलीवर सतरा इस्त्रायली सैनिक आणि पाच इस्त्रायली नागरिकांकडून बलात्कार
https://www.theguardian.com/world/2006/may/02/israel

म्हणजे भारतासारखं पण नाहीये की काश्मीर दिलं तर जिहादी लोक गप बसतील
>>>>> माफ करा पण असं वाटणं हेच मुळात चुकीचे आणि बाळबोध गृहीतक नाहीये का? ‘हसके लिया पाकिस्तान, लढ के लेंगे हिंदूस्तान’ ही मानसिकता अस्तित्वात आहे तोपर्यंत काश्मिरवर भागणार नाही. आणि जिथे एखाद्या धर्मियांचीं संख्या जास्त होते तो प्रदेश त्यांना देऊन टाकायचा का? या न्यायाने उद्या न्युजर्सी व कॅलिफोर्नियावर हिंदू/भारतियांनी हक्क सांगितला तर चालेल का?

सर्व पॅलेस्टीनी लोकांनी जमिनी विकल्या नाहीत. इझ्राएलचे धोरणही विस्तारवादी आहे. परंतु आत्तापर्यंत समेटाची बोलणी झाली त्यावेळी इझ्राएलने तत्वतः काही मागण्या मान्य केल्या परंतु पॅलेस्टाईन जोपर्यंत इझ्राएलचे अस्तित्व मान्य करत नाही तोपर्यंत कुठलीही बोलणी सफल होणार नाहीत.

ते मूर्तिपूजा मोठं पाप समजतात. म्हणजेच त्यांच्या नजरेत हिंदू काफिर.
>>> हे खरं आहे. तिथेही बिलीव्हर/नॉन बिलीव्हर अशी धर्मग्रंथांची शिकवण आहे. पण प्रत्यक्षात ज्यूंचे हिंदू धर्मियांशी काय वर्तन आहे ते लक्षात नाही का घ्यायचे? आत्तापर्यंत हिंदू आहेत म्हणून किती ज्यूंनी आपल्यावर हल्ला चढवला?

परंतु पॅलेस्टाईन जोपर्यंत इझ्राएलचे अस्तित्व मान्य करत नाही >> भारताने चीन व्याप्त प्रदेश, पाकव्याप्त प्रदेश ला आणि दलाई लामांनी तिबेटवरच्या चीनच्या हक्काला मान्यता दिलेली नाही.

पॅलेस्टाईन जोपर्यंत इझ्राएलचे अस्तित्व मान्य करत नाही तोपर्यंत कुठलीही बोलणी सफल होणार नाहीत.>>>

इथे पॅलेस्टाईनची तुलना पाक/चीनव्याप्त प्रदेशाशी करणे गैरलागू आहे. पाकिस्तानबरोबर करणे उचित. आणि भारताने पाकिस्तानला मान्यता दिली आहे. भारताचा वाद नंतर इल्लिगली ऑक्युपाय केलेल्या प्रदेशाबद्दल आहे. पण पॅलेस्टाईनचा संघर्ष गाझा पट्टी किंवा गोलन हाईटस्बद्दल नाही. अखंड इझ्राएलबद्दल आहे.

परंतु पॅलेस्टाईन जोपर्यंत इझ्राएलचे अस्तित्व मान्य करत नाही >> भारताने चीन व्याप्त प्रदेश, पाकव्याप्त प्रदेश ला आणि दलाई लामांनी तिबेटवरच्या चीनच्या हक्काला मान्यता दिलेली नाही. >> भारताने पाकिस्तान आणि चीन चे अस्तित्व मान्य केले आहे. त्यामुळे मागच्या ७५ वर्षात कित्येक वेळा बोलणी झाली

परंतु पॅलेस्टाईन जोपर्यंत इझ्राएलचे अस्तित्व मान्य करत नाही तोपर्यंत कुठलीही बोलणी सफल होणार नाहीत. > +१ पण त्याच बरोबर इझ्राएलने पण पॅलेस्टाईन चे अस्तित्व मान्य केले पाहिजे मगच बोलणी होऊ शकेल.

भारताने पाकिस्तान आणि चीन चे अस्तित्व मान्य केले आहे. >>> Lol
थोडक्यात चीन हा देशच भारतात निर्माण झाला. चालू द्या.

"व्हाईटहॅट- वाळवंट टेस्ट" - मानवी हक्कांची नावीन्यपूर्ण चाचणी !
तुम्ही वाळवंटात कोणाची मदत घ्याल ह्यावरून त्यांचे मानवी हक्क ठरवावेत. तुम्ही समजा एक सुंदर स्त्री आहात. वाळवंटात तुमच्यासमोर दोन पैलवान पुरुष आणि एक स्त्री आली, आणि तुम्ही मुलीची मदत घेतली, ह्याचा अर्थ पुरुषजात दुष्ट आहे आणि त्यांना मानवी हक्क नाहीत.

चीन नाही झाला पण पाकिस्तान तरी भारतातूनच झाला ना? आणि भारताने पाकिस्तान ला मान्यता दिली आहे.

पॅलेस्टाइनला सपोर्ट करणारे कुठेही कोणीही हमासच्या हल्ल्यामुळे गाझाची ही दशा आहे असं म्हणत नाहीये, सगळा दोष इस्राइलच्या अ‍ॅटॅक्सना, व्हेरी कनव्हिनियन्ट !

>>> त्यांचे म्हणणे हे असे साधे आहे. हामासचा हल्ला नक्कीच वाईट आहे. पण वर्षानुवर्षे अनेक पॅलेस्टिनी नागरिक तुरुंगात टाकले जातात, त्यांच्या जमिनी हिस्कावल्या जातात, पाण्याचे स्त्रोत बंद केले जातात, चिंचोळ्या गाझा मधून बाहेर जाण्याचे सर्व मार्ग ब्लॉक करून गाझा पट्टीला तुरुंग बनवले जाते आणि त्या लहानशा भागात ११ लाख लोकांना कोंबून रहावे लागते , पॅलेस्टिनी नागरिक मरतात, वेस्ट बँक मधून लोकांना राहत्या घरातून हाकलून दिले जाते तेव्हा कुणालाही इजरायल पॅलेस्टाईन विषयाबद्दल फारसा रस वाटला नाही. असे का ? इजरेली लोकांची आयुष्य पॅलेस्टिनी लोकांपेक्षा जास्त मौल्यवान आहेत का ? आपल्याकडे तर "आपला एक मारला की इजरायल त्यांचे १० मारतात!" असे कौतुकाने सांगणारे रक्तपिपासू "राष्ट्रवादी" लोक आहेत.

मुळात ह्यात एक रेसिस्ट अंदरतोन आहे. पॅलेस्टाईन मधले लोकं मुळात हिंसक आणि काही कारण नसताना इजरायल सोबत भांडतात, हल्ला करतात हा तो अंडरटोन. हा हल्ला चुकीचा आहे, निषेधार्ह आहे पण अनप्रोव्होकड आजिबात नाहीये. आज इजरायल मध्ये कॅबिनेट मध्ये थेट पॅलेस्टाईन जेनोसईड करण्याची भाषा करणारे लोक आहेत. IMG_20231015_102838.jpg

गंमत म्हणजे जे लोक नाझी आणि हिटलरचे फॅन असतात आणि त्या वेळी ज्यूं बद्दलची त्याची मते डोक्यावर घेतात तेच लोक ज्युं नी मुस्लिमांवर हल्ले केले की त्यांचे फॅन होतात. एक पे कायम रहो ना बाबा.

चिंचोळ्या गाझा पट्टी जवळच इजिप्त असून शरणार्थीना आश्रय द्यायला का बर तयार होत नसावा ? आणि पॅलेस्टाइन ला सगळे मुस्लिम देश मदत करायला तयार आहेत ते फक्त पॅलेस्टाइनच्या भूमीवर !
पण या उलट १९७१ मध्ये बांगलादेशी शरणार्थीना भारताने आश्रय दिला होता .

इजिप्त पॅलेस्टिनी नागरिकांना मदत करणार नाही ह्याची अनेक करणे आहेत.
१. हमास सपोर्ट करणारे लोक त्यांना नको आहेत.
२. दोन्ही भिन्न देश आहेत. असे लाख लाख लोकांना घेऊन आणखी समस्या उद्भवतात.
३. आपल्या जमिनी सोडून जर गाझन लोक इजिप्त मध्ये गेले तर ती जागा इजरायल बळकावेल ही भीती.

कंटाळा आला कपडे बदलून बदलून सुद्धा तेच इल्लॉजिकल वाद चालू ठेवण्याचा. मुळात एखाद्याला आपण इल्लॉजिकल आहोत हे कसे समजणार ?

कॉमी, सहमत, इस्रायल काही स्वच्छ नाही, मुळात अराबांवर अन्याय करूनच हा स्थापन झाला आहे.
पण अत्ता दोन्ही बाजूंनी प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे. याबाबतीत भारताचे धोरण योग्य वाटत आहे. हमासच्या दहशतवादी हलल्याचा निषेधही. आणि पॅलेस्टाईन chya देशाच्या मागणी पाठिंबाही.
तैवान संपूर्ण चीन ला आपला देश मानतो पण त्यांनी कधी दहशतवादी हल्ले केले नाही चीनवर.
आचार्य तुम्ही तुमचे मुद्दे मांडा

मुळात एखाद्याला आपण इल्लॉजिकल आहोत हे कसे समजणार ?
कदाचित इथल्या प्रत्येकालाच आपण निपक्ष असं वाटत असेल आणि दुसरे म्हणजे पक्षपती

याच धाग्यावर एका पुस्तकाबद्दल लिहीले होते. नवभारत टाईम्सची लिंक सुद्दा दिली होती. मोसादचे ज्यांना आकर्षण आहे त्यांनी मोसादची आंतरराष्टीय ढवळाढवळ पाहिलेली नसावी. त्या पुस्तकात जरी नाट्यमयता असली तरी त्यात संदभसूची दिलेली आहे. त्यामुळे पडताळणी करता येते.

श्रीलंकन आर्मी आणि लिट्टे या दोघांनाही मोसादच्या दोन ग्रुप्सने ट्रेन केले होते. लिट्टे ची निर्मिती इंदिरा गांधींच्या पुढाकाराने झाली असे बोलले जाते.
https://en.wikipedia.org/wiki/Mossad#:~:text=Mossad%20had%20helped%20bot....

लिट्टेनेच राजीव गांधींची हत्या केली.

कदाचित इथल्या प्रत्येकालाच आपण निपक्ष असं वाटत असेल आणि दुसरे म्हणजे पक्षपती >>> नि:ष्पक्ष (असा शब्द आहे नाहीतर हपा आएगा ) असणे आणि function at() { [native code] }आर्किक असणे वेगळे. हे मान्य असेल तर....

वर राजीव गांधी हत्येचा उल्लेख केला आहे. त्यातल्या मोसाद कनेक्शन बद्दल या हत्येची चौकशी करणार्‍या जैन आयोगाने उल्लेख केला आहे.
https://www.indiatimes.com/lifestyle/self/subramanian-swamy-the-mossad-s...

आउट्लुक
https://www.outlookindia.com/magazine/story/finally-all-fingers-point-to...

भारताच्या पंतप्रधानपदी राहिलेल्या नेत्याची हत्या करणार्‍या देशाला हिरो मानणे अजूनही योग्य वाटते का ?
कि त्या हत्येमुळेच हा देश काहींचा आवडता झाला असेल ?

वर दहशतवादाची व्याख्या करणार्‍यांचं या हत्येबाबत काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

Pages