इथे मी क्रिकेट बद्दल काही टेक्निकल बोलणार नाहीये. मॅचेसबद्दल पण नाही. फक्त आम्ही अनुभवलेला तो एक "वेडा महिना" इतरांच्या नजरेतून लिहितेय.
मार्च मधली गोष्ट -
नवरा आणि मी : " घ्यायचेय का विलो चे पॅकेज?" " हो घ्यायचेच" " गेल्या वेळेसारखे पहिल्या फेरीत बाहेर गेले तर??" "असू दे, घेऊयाच"
....
.....
मुलांना 'एज्युकेट' करण्याचे प्रयत्न चालू, "अरे आर्यक- सानिका, या इकडे बघायला."
"अजून चालूच आहे का गेम?!!"
"सो हू इज द बेस्ट प्लेयर?"
"अजून किती इनिंग्ज आहेत?"
"अरे दोनच इनिंग असतात."
"वो ! लुक अॅट द क्राउड!"
..
..
ऑफिसच्या किचन मधे मी, दीपा, श्यामची हिरिरीने चर्चा चालू. धोनीने हे कसं बरोबर नाही केले, सेहवागने अमूकतमूक वर वर्क करायला हवे, सचिन ची १०० वी सेन्चुरी होणार का? फिक्सिंग आहे की नाही?
मार्क आणि स्टीव : हे गाइज! कुठल्या गेम बद्दल बोलताय?
'क्रिकेट वर्ल्ड कप'
'ओह'
...
....
काही दिवसांनी... तोवर आपण सुपर ८ मधे.
मार्क - 'हे वास्सप, क्रिकेट संपले का? कोण जिंकले?
'नाही रे मार्क. स्टिल गोइन्ग ऑन. वी आर इन ... अम्म प्लेऑफ्स'
'गुड फॉर यू!!'
...
"आssई! मला माझा प्रोग्राम बघायचाय."
"वरच्या रूम मधे पहा, इथे क्रिकेट पहायचंय आम्हाला."
"अग्गेन?!!"
...
...
परत एकदा ऑफिस मधे चर्चा, ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर...
'बुधवारी काय करणार?'
'म्हणजे काय, येणार नाही ऑफिस ला!! मॅच संपल्याशिवाय..'
'जॉनी, माझा हाफ डे उद्या.'
'माझा पण!'
'मिशेल, आय विल बी लेट टुमारो.'
'वॉट्स गोइंग ऑन???!!! अर्धे ऑफिस उद्या नाहिये ??'
आमच्या ऑफिस मधे ३-४ देसी आहेत फक्त. पण सगळेच उद्या नाहीत म्हटल्यावर पुरेशी उत्सुकता जागी होते सगळ्यांची.
'लुक्स लाइक यू गाइज आर हॅविंग फन हं! '
' डिड्न्ट नो यु आर सो मच इन्टु स्पोर्ट्स!'
'तुम्ही सगळे अर्धा दिवस लीव्ह वेस्ट करताय गेम साठी? माहीत नव्हते हां इतके क्रेझी असाल तुम्ही.'
' स्टीव, यु हॅव नो आयडिया ... इट्स इंडिया - पाकिस्तान गेम!!'
' सो, इज इट लाइक यान्की - रेड सॉक्स फेस ऑफ?'
'नो वे, इट्स मच मच मोर दॅन दॅट!!'
मग भारत वि. पाकिस्तान या विषयावर त्यांच्या जनरल नॉलेजला झेपेल इतके बौद्धिक घेणे!!
'सो, हा गेम जिंकला तर तुम्ही सिझन जिंकणार का?'
'हा गेम जिंकला तर फायनल मधे जाणार, अर्थात त्यानंतर कप नाही जिंकले तरी धिस विन इज इनफ फॉर अस.'
' सीझन कसला, हा वर्ल्ड कप आहे रे बाबा. यु अन्डरस्टँन्ड ? "व र्ल्ड क प"!! '
अमेरिकेतल्या अमेरिकेत होणार्या बेसबॉल सिरीजला वर्ल्ड सिरीज म्हणणारे हे लोक!!
' ओह म्हणजे सॉकर वर्ल्ड कप सारखा वर्ल्ड कप!'
'हो. रियल वर्ल्ड कप!!'
' कूल !! बघायला पाहिजे एकदा... कुठल्या चॅनेल वर बघता येते?''
'आम्ही पण चिअर करणार, गो इंडिया !!'
...
....
बुधवारी आमच्या गावातून न्यू यॉर्क ला जाणार्या, एरव्ही सकाळी ऑफिस च्या वेळी फुल पॅक्ड बस आणि ट्रेन स्टेशन्स वर सुनसान शांतता !!
पहाटे पासून आमचा आरडा ओरडा, फोन, फेसबुक अपडेट्स्, मायबोली इ. मुळे घरी फुल्ल कल्ला !! मुलं तोवर सरावलेली असली तरी दर वेळी वाढत जाणार्या आमच्या वेडाने चकित!! "वो! यु गाइज आर गोइन्ग टोटली क्रेझी!"
त्या दिवशी त्यांना शाळा असल्यामुळे एकदाची त्यांची रवानगी. मग बॅक टु टेन्शन!!
यावेळी जिंकल्याचा आनंद काय वर्णावा !! ऑफिस मधे उशीरा आत येणारा प्रत्येक जण ओरडत, टाळ्या देत आत येणार !! यावेळी जॉनीनेच इन्टरकॉम वरून अनाउन्स केले 'इंडिया हॅज वन द क्रुशियल गेम !! कॉन्ग्रॅट्स !!'
सगळे लोक आता आपापल्या केबिन्स मधून बाहेर येऊन चिअर करायला लागले!! धम्माल नुस्ती !!
संध्याकाळी तर मार्क अन स्टीव्ह कुठूनशी लिंक मिळवून हायलाइट्स बघून आले उत्सुकतेपायी!! "कूल" " ग्रेट गेम!!"
त्याच दिवशी नविन जॉइन झालेल्या 'जॉश'शी माझी ओळख करून देताना "बिग्गेस्ट इंडियन क्रिकेट फॅन" अशी केली गेली !! हाइट म्हणजे त्यावर जॉश, "आय नो, यु हॅव सम बिग गेम कमिंग अप धिस सॅटर्डे राइट? आय नो, ऑल माय नेबर्स आर टॉकिंग अबाउट इट" सगळे देसी नेबरहुड दिसत होते याचे!! आता मार्क, स्टीव्ह, जॉश, सगळे अति उत्सुक !!
"सॅम, (श्याम) डु यु माइन्ड इफ वी ड्रॉप बाय टु वॉच द फायनल गेम अॅट युअर हाउस?!"
...
...
इथल्या लोकल देशी रेडिओ वर लोक फोन करून आपापल्या भावना सांगत होते. ऑफिसला जाता येता रेडिओ फक्त मॅच बद्दल बोलत होता !! काही अतिउत्साही लोक पाक बद्दल भडक कमेन्ट्स करणारे फोन करत होते!
मधेच एक फोन "मै पाकिस्तान से हूं. वी आर हॅपी फॉर इन्डिया, अॅन्ड गुड लक फॉर द फायनल. लेकिन, प्लीज सेलिब्रेशन करते वक्त जरा हमारेभी फीलिन्ग्ज का ध्यान रखिये, ऐसी हर्ट्फुल बाते न करे तो ... ...!!"
आता फायनल !! लंकेचे एकेक सामने बघताना धास्तावायला झाले होते. "टफ आहे फायनल" "असू दे, पाक बरोबर जिंकलो ना"
यावेळी आम्ही , शेजारी पाजारी, त्यांची मुले असे बरेच जण एकत्र मॅच पहात होतो. पहाटेपासून चहाच्या राउंड्स, स्नॅक्स, आणि गरमागरम चर्चा.
एकूण दंग्यावर या एबिसिडी मुलांच्या कमेन्ट्स ऐकण्यासारख्या होत्या.
मॅच चालू असताना डीजेचे फोन येत होते, एकदा आर्यक ने घेतला,
"aai, pichi called"
"what is she saying"
"nothing! she was just screaming her head off. I told her nevermind, you guys are doing the same here and hung up"
इतर काही गुणी पोरं :
"Our folks going crazy!"
"I know right? you should see my mom , she is banging pots and pans!! "
"Oh and you know my mom , she was dancing like crazy with a broom in her hand whole time, says that broom in hand is lucky for her!! crazzyyy!!"
एक एबिसिडी कन्या तिच्या आईला - इथे टिपिकल प्रि-टीनेज मुलींचे अॅक्सेन्ट्ची कल्पना करा : " MOsssM look here ... there is this man in the other team, with real ugly highlights , and I dont even know who he is, but Dad is saying some real bad curse words for him !!"
(ही काँप्लिमेन्ट मलिंगाला )
यानंतर एन्डलेस सेलिब्रेशन !! आम्ही आजू बाजूच्या देशी लोकांनी तर मोठी पार्टी केली. आवाज बसेपर्यंत दंगा.
पार्टीनंतर हवा मस्त असल्यामुळे सगळे बाहेर गप्पा मारताना क्रिकेट खेळायची आयडिया निघाली, आणि काय विचारता! ही खवचट रिमार्क मारणारी सगळी मुले उत्साहाने खेळायला पुढे झाली!!
काही वेळानंतर ... :
....
"Hey !! I wanted to bat first"
"Dad , he is out !!"
"You idiot , you dropped the catch!!"
बास !! आम्ही इकडे पुढच्या जनरेशन ला क्रिकेटचे वेड पोहोचवल्याच्या आनंदात कृतकृत्य होऊन घरी निघालो !!
--मैत्रेयी
मस्त लिहिलंस मैत्रेयी!
मस्त लिहिलंस मैत्रेयी!
छान
छान लिहिलाय...............पण.... जरा मिक्सिंग जास्त झाल्याचे जाणवते...........
(No subject)
कसलं मिक्सिंग? मस्तच. आर्यकचा
कसलं मिक्सिंग?
मस्तच. आर्यकचा डायलॉग लिहिलेलास तू.
मस्तंय...
मस्तंय...
हे भारीये... मस्त खुसखुशीत
हे भारीये...
मस्त खुसखुशीत लिखाण...
मस्त ... आवडेश
मस्त ... आवडेश
धमाल
धमाल
जबरी मैत्रेयी !! बर्याच
जबरी मैत्रेयी !!
बर्याच गोष्टींना सेम पिंच.
(No subject)
मस्तच एकदम!
मस्तच एकदम!
धमाल
धमाल
(No subject)
मस्त खुसखुशीत लिखाण. खूप
मस्त खुसखुशीत लिखाण. खूप आवडले!!!
अमेरिकेतल्या अमेरिकेत
अमेरिकेतल्या अमेरिकेत होणार्या बेसबॉल सिरीजला वर्ल्ड सिरीज म्हणणारे हे लोक!! >>>
सहीये
सहीये
भारी आहे.
भारी आहे.
इतके अवतरण असूनही मुळीच रटाळ
इतके अवतरण असूनही मुळीच रटाळ नाही वाटला. मैत्रेयीच्या बोलक्या शैलीमुळे वाचायला खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊप मज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज आली.
मस्तय..!! बी, लाझा लेख पण
मस्तय..!!
बी,
लाझा लेख पण साधारण याच विषयावर झाला असता म्हणून नाही पाठवला, मैत्रेयीचा लेख पाहिला होता न्युजर्सीला असताना, तिने पोचवल्या भावना ऑलरेडी म्हणून पुन्हा त्याच विषयावर नाही लिहिलं :).
मस्त!
मस्त!
प्रचंड म्हंजे प्रचंड
प्रचंड म्हंजे प्रचंड आवडला!!!
says that broom in hand is lucky for her!! crazzyyy!!">>>>
लै भारी.
लै भारी.
डीजे, कोई बात नही दिवाळी
डीजे, कोई बात नही दिवाळी अंकात लिहि आता
विकवि मधला मला सगळ्यात
विकवि मधला मला सगळ्यात आवडलेला लेख. म्हणजे क्रिकेटच्या इतर तांत्रिक आणि जी के बद्दल मला जरा कमीच रस आहे म्हणून..
डिजे, आता पिचीच्या नजरेतून असा लेख लिही.. हा का ना का...
मस्त
मस्त
जबराट.. शेवट खासच.. आणि ABCD
जबराट.. शेवट खासच.. आणि ABCD मुलांच्या कॉमेंट्स भन्नाट..
खुप धम्माल
खुप धम्माल
मैत्रेयी, मस्त लिहिलंय.
मैत्रेयी,
मस्त लिहिलंय. आवडलं.
छान लिहीली आहे.........भावना
छान लिहीली आहे.........भावना पोहचल्यात...........
मस्त
मस्त
Pages