पाव किलो धने
सुके खोबरे १ अर्धुक किंवा १ वाटी सुक्या खोबर्याचा कीस
१ वाटी जिरे
१ वाटी पांढरे तीळ
८-१० सुक्या लाल मिरच्या
८-१० लवंगा
८-१० मिरीदाणे
८-१० दालचिनीचे तुकडे
८-१० तमालपत्रे
५० ग्रॅम दगडफूल
१ टीस्पून भरून (heaped) हिंग
अर्धा टीस्पून मेथी
१०-१२ नागकेशर
५-६ चक्रीफुले
१ टीस्पून शहाजिरे
चवीपुरते मीठ
खोबरे किसून घ्यावे.
जिरे, किसलेले खोबरे आणि तीळ प्रत्येकी कोरडे भाजून घ्यावे.
कढईत अगदी थोडे तेल घेऊन त्यावर एक एक करून बाकीचे जिन्नस परतून घ्यावेत. धने सर्वांत शेवटी परतावेत.
भाजलेले जिन्नस गार झाले की मिक्सरवर वाटून घ्यावेत.
चवीनुसार मीठ मिसळावे.
१. ही पारंपारीक कृती. मी तेल अजिबात वापरत नाही. सगळे जिन्नस कोरडेच भाजून दळते. न्यू जर्सीच्या कोरड्या हवेला फ्रीजबाहेरही महिनोन्महिने उत्तम टिकतो मसाला.
२. सगळे जिन्न्स सगळीकडे मिळतात असे नाही. नाही मिळणार ते (दगडफूल, नागकेशर इ.) ऑप्शनल समजावेत.
धन्यवाद ऑर्किड आणि राजसी.
धन्यवाद ऑर्किड आणि राजसी.
आमच्याकडे गोडा मसाला जवळजवळ
आमच्याकडे गोडा मसाला जवळजवळ सगळ्या मराठी स्टाईल भाज्या, आमट्यांमध्ये घातला जातो. जोडीला गूळही मस्टच आहे.
मी जेव्हा घरी करते तेव्हा याच
मी जेव्हा घरी करते तेव्हा याच रेसिपीने करते. जर वेळ नाही मिळाला घरी करायला तर केप्रचा आणते. त्याचीच चव जराशीच या रेसिपी सारखी आहे.
प्रकाशचा पण चान्गला आहे पण
प्रकाशचा पण चान्गला आहे पण केप्र नतर
गोडा मसाला केला पहिल्यांदा
गोडा मसाला केला पहिल्यांदा एवढ्या प्रमाणात
वाह! खूप मस्त.
वाह! खूप मस्त.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
Pages