एका इ-पत्रातुन खालिल माहिती आली.
"
मित्रांनो एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.
माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि खंर बघाल तर पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.
हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.
तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही. जेवढी जमत असेल तेवढी गम्मत म्हणून का होईना वापरा जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा (हा ई-मेल त्यांना सुद्धा पाठवा )
"
हे कितपत खरे आहे? म्हणजे अवगत असलेल्या भाषांमध्ये एखादी भाषा नसेल तर ती मृत घोषित केली जाते काय? आपली मते जाणुन घ्यायला आवडेल.
पॉटर.. धन्यवाद. त्या
पॉटर.. धन्यवाद.
त्या दुव्याशेजारीच हा एक दुवा सापडला. सगळे संस्कृतात बोलतायत ते. त्यामुळे संस्कृत मृत घोषित झालीच तर ती केवळ राजकीय दृष्ट्या होईल. संस्कृत शिकणारे शिकत राहणारच. आणि भारतापेक्षा आणि भारतीयांपेक्षा इतरदेशीय (मुख्यत्वे जर्मन लोक) संस्कृत टिकवतील यात शंका नाही.
अवांतरः
कोल्हापुरात संस्कृतभारतीचे एक कार्यकर्र्ते आहेत, त्यांचं संपूर्ण घर संस्कृतात बोलतं.
यात त्यांचा ५-६ वर्षांचा मुलगाही आहे. संस्कृतमधून बोलायला शिकायचे असेल, तर संस्कृतभारतीच्या संस्कृतसम्भाषण शिबिरात भाग घेता येऊ शकेल.
या वर्षी पुण्यातच आहे म्हणे शिबीर. कुणाला अधिक माहिती हवी असेल तर
मोदी गणपतीच्या मागे जी अपार्टमेंट आहे, तिथे श्री. माधव केळकर यांच्याशी संपर्क साधा.
चैतन्य, चांगली माहिती.
चैतन्य, चांगली माहिती. धन्यवाद.
आकाशवाणी पुणे वर सकाळी
आकाशवाणी पुणे वर सकाळी संस्कृत बातम्या पण छान वाटतात ऐकायला .
जनगणना झाली, संस्कृत येत नाही
जनगणना झाली, संस्कृत येत नाही त्यामुळे सांगितले नाही. माझ्यासारख्या लोकांमुळे आता संस्कृत संपणार, मग त्यामुळे हिंदू संपणार, सगळे ख्रिस्ती होणार, परचक्र येणार.... अरेरे.....अरेरे.....अरेरे......
आमची जनगणना १९ तारखेला झाली.
आमची जनगणना १९ तारखेला झाली. मा़झ्या वडिलाना संस्कृत येते म्हणुन सागितले त्यानि लिहुन घेतले. पण जेव्हा मी सन्गितले संस्कृत येते तर त्त्यानि सरल आम्हाल फक्त दोन भाषा लिहायच्या आहेत असे सान्गित्ले आणी हिन्दि व ईन्ग्लिश लिहुन टाकले.
>>>> माझ्यासारख्या लोकांमुळे
>>>> माझ्यासारख्या लोकांमुळे आता संस्कृत संपणार, मग त्यामुळे हिंदू संपणार, >>>>
हो हो, अगदी अगदी.
तुझ्यामाझ्यासारख्या लोकान्मुळेच, पूर्वी जसे धोतर/बन्डि/उपरणे/पागोटे/फेटे जाऊन त्या ठिकाणी पाटलोणी आल्या, तितक्याच सहजपणे तुझ्यामाझ्यासारख्यान्मुळेच संस्कृत जाऊन (मराठी नव्हे तर) इन्ग्रजी आलय, जोडीला भेसळीसाठी फारसी/उर्दू मिश्रित हिन्दी पण घुसतय!
पण लई झ्याक वाट्ट नै? नौवारी जाऊन तिथे लो वेस्ट हापचड्डी आल्यावर काय, तुझ्यामाझ्यासारख्यान्ना आनन्दाच्या उकळ्याच फुटणारच! नै का?
आम्ही संस्क्रुत चांदोबा
आम्ही संस्क्रुत चांदोबा वाचायचो वर्गात दहावीत. इथे मिळेल
http://www.chandamama.com/archive/SAN/storyArchive.htm
निलिमा, लिन्क मस्त आहे
निलिमा, लिन्क मस्त आहे
धन्यवाद
नौवारी, हाफ चड्ड्या....
नौवारी, हाफ चड्ड्या....
संस्कृत परत आल्यावर कंचुकी आणि वल्कलं आली तरी आम्हाला चालेल की!!
(No subject)
आमच्याकडे काल जनगणना झाली. हा
आमच्याकडे काल जनगणना झाली. हा बाफ वाचून मी संस्कृत येते असे लिहिले खरे पण दोनच भाषा लिहायच्या असल्याने दुसरी इंग्रजी लिहिली. पण आपल्याला बोलता-वाचता येत असूनही हिंदी लिहिली नाही हे मला जरा खुपत राहिलं. ('खुपते तिथे गुप्ते' मधे जावं का?:फिदी:)
तर सांगायच हे की आपण चुकीची माहिती दिलीये असं वाटत राहिलं.
>>>> तर सांगायच हे की आपण
>>>> तर सांगायच हे की आपण चुकीची माहिती दिलीये असं वाटत राहिलं. <<<
अस का वाटाव? खर तर चूकीची/अर्धवट माहिती विचारली आहे. अन्य दोनच भाषा का? पाच वा दहा का नाहीत?
शिवाय हेही नक्की नाही की केवळ कुटुम्बप्रमुखाला(?) येणार्या भाषा विचारल्यात की सर्व कुटुम्बसदस्यान्ना! मी सगळ्यान्च्या लिहील्या, पण डाटाबेस मधे भरताना ते काय घोळ घालतील तो घालतीलच.
तेव्हा तुम्ही तस वाटून घ्यायची गरज नाही
या भाषेसाठी आमचा एक पुढाकार
या भाषेसाठी आमचा एक पुढाकार (initiative)
मला माझ्या लग्नाची पत्रिका संस्कृत मधुन छापायची आहे. कोणी मदत करु शकेल का ? मराठी मधुन संस्कृत मधे भाषांतर करुन देउ शकतं का ? free download सारखं free translation etc
संस्कृत सुभाषित वाचताना
संस्कृत सुभाषित वाचताना चित्रकाव्य एक प्रकार वाचण्यात आला. ( नेट वर )
https://who.rocq.inria.fr/Ramakrishna.Upadrasta/Sanskrit/14339015-The-wo...
भुरिभिर्भारिभिर्भीराभूभारैरभिरेभिरे
भेरीरेभिभिरभ्राभैरभिरुभिरिभैरिभा:
दोनच व्यंजने वापरून वरील काव्य तयार केले आहे. ( भा आणि र) त्याचा अर्थ असा दिलेला आहे.
The fearless elephant who was like a burden to the earth because of its heavy weight,
whose sound was like a kettle- drum and, who was like a dark cloud,
attacked the enemy elephant.
अर्थ तिथे लिहलेला आहे पण हत्तीला/ नेमका कोणता शब्द वापरला आहे अणि शब्द विग्रह कसा करावा
ते समजत नाही.तरी संस्कृतच्या अभ्यासकानी कृपया या श्लोकाचा अर्थ, अणि शब्द, व्याकरण यांवर
लिहावे .
नविन असल्याने योग्य धाग्यावर लिहले की नाही याची कल्पना नाही. संस्कृत संभाषण मध्ये लिहले पण प्रतिसाद आला नाही
तेंव्हा या धाग्यावर टाकले
डोकं भिरभिरलं. तुमच्या
डोकं भिरभिरलं.
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणे मुष्किल आहे.. लोक १०० मार्काचं संस्कृत घेऊन ९९ मार्क मिळवतात.. पण सोप्या सोप्या सुभाषिताचे अर्थ लावणे नाहीतर पंचतंत्रातल्या कोल्ह्या कुत्र्याच्या पाच ओळींचे भाषांतर एवढेच स्कील त्याना मिळते. संस्कृत घडाघडाघडाघडा बोलावे किंवा या तुमच्या भग भुगे भागोदरीचे अन्वय लावून भाषांतर करता यावे असे ज्ञान बहुदा कुणाकडे नसावे.
मुळात हे लोक संस्कृत घेतात, कारण पेपर सोपा असतो आणि ९८-९९ मार्क पडतात म्हणून. संस्कृत्मध्ये दीर्घोत्तरी प्रश्न, संदर्भासह स्पष्टीकरण, २५० शब्दांचा निबंध सगळे संस्कृतातच लिहायचे अशी जर प्रश्न पत्रिका असती, तर संस्कृतीच्या नावाने टिमकी बडवणार्या एकानेही संस्कृत घेतले नसते.
.. पण सोप्या सोप्या
.. पण सोप्या सोप्या सुभाषिताचे अर्थ लावणे नाहीतर पंचतंत्रातल्या कोल्ह्या कुत्र्याच्या पाच ओळींचे भाषांतर एवढेच स्कील त्याना मिळते.>> अगदी खरय.मध्यंतरी जनगणनेच्यावेळी अवगत भाषांमध्ये संस्कृत भाषा येते असे सांगा, असा घोषा काही मंडळींनी लावला होता . माझ्या एका मित्राने जनगणना अधिकार्यास संस्कृत येते असे सांगितल्यावर दोन वाक्यं संस्कृतमधुन बोला असे अधिकार्याने सांगितले, तेव्हा त्याची बोबडी वळली होती
संस्कृत म्हटल्यावर चेष्टा
संस्कृत म्हटल्यावर चेष्टा सुचते. दोन वाक्य बोला असं कुठलाही अधिकारी सांगणार नाही. कैच्याकै फेकू नका.
संस्कृत म्टल्यावर
संस्कृत म्टल्यावर चेष्टासुचते. दोन वाक्य बोला असं कुठलाही अधिकारी सांगणार नाही. कैच्याकै फेकू नका. भिंतीला तुंबड्या लावणं बंद करा आता. येडपट.>>>तुमचे खरे आहे ,जनरली अधिकारी असले काही विचारत नाहीत. पण त्याला अनपेक्षितरीत्या विचारले होते. एकतर त्याला संस्कृत येत नव्हते आणि अनपेक्षीतरीत्या विचारल्याने तो हडबडला इतकेच.
इथे इभ या हा हत्तीला
इथे इभ या हा हत्तीला समानार्थी शब्द मिळाला.
भूरी = खूप, भार : वजन भूरिभि: भारिभि: हे तृतियेचे रूप वाटतेय.
(५०-५० मार्कांचे संस्कृत तीन वर्षे शिकल्याला आता २९ वर्षे झालीत).
अरे वा भर-त लाच ही
अरे वा भर-त लाच ही भुर्भुर सोडवता येणार असे दिसते .
fearless : अभीरु elephant :
fearless : अभीरु elephant : इभ burden : भार earth : भू heavy भूरि: weight : भार
whose sound : रु kettle- drum : भेरी
enemy अरि elephant.
dark, colud , attacked हे नाही मिळाले.
भिरभिरणं थांबलं तर संधी/समास कळतात का ते बघतो.
हे क्लुलेससारखा एक वेगळा धागा काढून विचारा. लोक डोकी लढवतील.
आयतं उत्तर हवं असेल तर चैतन्य दीक्षित यांना विचारा.
वेब यांनी दिलेल्या दुव्याचा
वेब यांनी दिलेल्या दुव्याचा योग्य जालनिर्देश येणेप्रमाणे :
https://who.rocq.inria.fr/Ramakrishna.Upadrasta/Sanskrit/14339015-The-wo...
-गा.पै.
संस्कृत ही अभिजात भाषा आहे.
संस्कृत ही अभिजात भाषा आहे. अभिजात याचा अर्थ ज्या भाषेत विपुल वांगमय उपलब्ध आहे आणि भारतीय शासनाच्या नियमानुसार ही भाषा किमान २००० वर्षे जुनी आहे.. संस्कृत ही अट पूर्ण करते म्हणून ती अभिजात. पण अभिजात भाषा ही जिवंत असू शकते किंवा मृतही असू शकते.
http://en.wikipedia.org/wiki/Classical_language
सरकारने काही भाषा ऑफिशियल भाषा मानल्या आहेत. ( ऑफिशियल म्हणजे मराठीत काय ? ) त्यातही संस्कृत आहे.
प्रत्येक राज्यानेही काही भाषा आपल्या राज्याच्या ऑफिशियल भाषा मानल्या आहेत.. http://en.wikipedia.org/wiki/Languages_with_official_status_in_India ही यादी किअतपत अद्यावत आहे माहीत नाही. पण संस्कृत ही कोणत्याच राज्याची नसून कुठल्याच एका राज्याची असे तिला स्टेटस नाही. शिवाय ऑफिशियल भाषा आहे म्हणजे ती जिवंत आहे, मृत नाही, हे आलेच. लोकानी कुणी बोलत नाही असे म्हटले तरी ती काही मृत म्हणून जाहीर होणार नाही.
संस्कृत बोलणारे लोकांची संख्या १०००० अशी दिली आहे. ती अशीच ई मेली आव्हाने/ आवाहने करुन केली असण्याची शक्यता आहे.
ही संख्या शून्य असली काय किंवा १०० कोटी झाली काय संस्कृतच्या स्टेटसला काही फरक पडणार नाही . कारण अभिजात भाषा जिवंत असली काय आणि मृत असली काय, तिचे अभिजात स्टेटस अबाधीतच रहाते. त्यामुळे लोकानी कुणी संस्कृत बोलत नाही, असे ( खरे) जरी सांगिअतले तरी संस्कृत बंद वगैरे काही होणार नाही. या भाशांचे संवर्धन करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
धन्यवाद . वेळ मिळेल तसा
धन्यवाद .
वेळ मिळेल तसा संस्कृतचा अभ्यास करायचा असे ठरविले आहे. त्यामुले मदत अपेक्षित आहे.
या जलावर बरेच काव्य दिलेले आहे. त्यांचा विग्रह करता आला नाही तरी नविन
शब्द , धातु , माहिती होइल असे वाटते.
कृपया , वेळ मिळेल तसे संस्कृत या नावाचा धागा काढून त्यात शब्द, धातु, व्याकरण
यांची चर्चा करावी म्हणजे आमच्या सारख्या नवशिक्यांची सोय होइल
वेब इथे असलेल्या बर्याच
वेब इथे असलेल्या बर्याच संस्कृताभिमानींपेक्षा तुमचाच संस्कृतचा अभ्यास जास्त आहे.
तुम्हाला त्या पंक्तींची फोड करता आली असेल तेवढी तरी लिहा की.
मलाही संस्कृतचा अभ्यास पुन्हा करावासा वाटतोय.
भरत मयेकर, cloud = अभ्र भा =
भरत मयेकर,
cloud = अभ्र
भा = तेज म्हणून darkness = अभा...? (आभा नव्हे)
attacked = झाकोळून टाकणे = अभ्रति...?
पण एकच भ्र दिसतो श्लोकात.
आ.न.,
-गा.पै.
भारत मयेकर , गामा पैलावन परत
भारत मयेकर , गामा पैलावन
परत एकदा धन्यवाद.
प्रश्न : येथे fearless चा नेमका अर्थ मदांध कि निर्भय. माझेही संस्कृत यथातथाच आहे.
फोड़ करायला थोड़े दिवस लागतील कारण पेन अणि वही यांचा सबंध कमीच येतो . ( संसाराला प्राधान्य )
Math पदवीधर झाल्यावर संस्कृत मध्ये ( additional B.A.) केले. आई श्री वर्णेकर यांची
विद्यार्थिनी होती पण मी मात्र टवाळ्या करता करता संस्कृत शिकले त्याची हि फलश्रुती
कि धड संस्कृत येत नाही . आईचे आता बरेच वय झाले आहे सारखे फोन करून त्रास
द्यायला नकोसा वाटतो. आईजवळ सतत लघु सिद्धांत कौमुदी असे. मला बरेच
शब्द, धातू , पाठ आहे पण धड अभ्यास होत नाही . मनात सतत एक सल असतो
कि संस्कृत यायला हवे. ह्या खजिन्यातील मुठभर जरी मिळाले तर समाधान मिळेल .
तेंव्हा आपण सगळ्यांनी मिळून चर्चा केली तर पुढे जायला मदत होईल. सुभाषित जास्त आवडतात
कारण ते दासबोधाप्रमाणे नेमक्या शब्दात मार्गदर्शन करतात
अभ्रकरिता धन्यवाद गापै. वेब,
अभ्रकरिता धन्यवाद गापै. वेब, अभीरु = fearless दिलंय मी वर. तसा शब्दही दिसतोय तुम्ही दिलेल्या ओळींत.
भूभार असाही शब्द दिसतोय.
जनगणना होणार आहे. आपल्याला
जनगणना होणार आहे. आपल्याला अवगत असलेली भाषा म्हणून संस्कृत सांगा , असे व्हाट्सपवर फिरत आहे. आपल्याला संस्कृत स्तोत्रे , मंगलाष्टके येतात, श्लोक येतात. म्हणून संस्कृत सांगावे, संस्कृत नाही सांगितले तर सरकारी फंड कमी येतील इ इ इ इ
---
प्रत्येक भारतीयाला जनगनमनपण येते. मग प्रत्येकाने अवगत असलेली भाषा म्हणून बंगाली सांगायची का ?
----
हा मेसेज 2010 पासून फिरत आहे. इथेही आहे
https://www.maayboli.com/node/23369
पण वरच लिहिले आहे की जनगणनेत
पण वरच लिहिले आहे की जनगणनेत फक्त दोनच भाषा लिहिता येतात!
सरकार खरेच संस्कृत भाषेचा अभ्यास करायला पैसे देते का?
जो सरकारवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
आता खाजगी रीत्या संस्था थापून, देणग्या मिळवूनच काही करता आले ते बघावे. नि हे फक्त संस्कृत भाषेबद्दलच नाही तर इतर कुठल्याहि कार्यक्रमांबद्दल.
Pages