दिवाळी फराळाच्या पाककृतींची यादी आणि नवीन 'जरा हटके' प्रकार

Submitted by लाजो on 16 October, 2010 - 23:50

श्रावण संपला, गणपती झाले. नवरात्र झाले, आज दसरा Happy आता वेध लागतिल ते दिवाळीचे Happy

दिवाळी म्हंटल की आठवतात दिवे, आकाशकंदिल, फटाके, रांगोळ्या अणि भरपुर फराळ आणि मिठाई Happy

दरवर्षी करंज्या, लाडु, शंकरपळे, चिरोटे, चकली, शेव, चिवडा असे फराळाचे पदार्थ आपण बनवतोच.
त्याच्या पाककृतीच्या लिंक्स ही इथे टाका. म्हणजे सगळे पदार्थ एकाच ठिकाणी पहायला मिळतिल. शोधाशोध वाचेल Happy

त्याव्यतिरीक्त, काहितरी नविन, जरा हटके असे फराळाचे पदार्थ किंवा मिठाई कुणी बनवत असेल, किंवा नेहमीचेच पदार्थ पण जरा वेगळ्या स्वरुपात कुणी बनवत असेल तर इथे सुचवा. पाककृती योग्य जागी टाकुन त्याची लिंक इथे द्या Happy

चला तर आज दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर दिवाळीची तयारी सुरु करु Happy

सर्वांना भरपुर शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त बाफ
गुलकंद वापरुन नारळाच्या वड्या मस्त होतात,
मी मागच्या आठवड्यात नाचणीच्या पीठाचे शंकर पाळे आणी नाचणीचे चॉकलेट लाडू केले होते (कोको पावडर घालून) ते पण एक वेगळा प्रकार म्हणून करयला हरकत नाही .
लाडू मुलांच्या लक्षात पण येत नाहीत नाचणीचे आहेत म्हणून

गुलकंद थोड्या दुधात मऊ, एकजीव करून मग खीरीत घातला तर अप्रतिम स्वाद येतो खीरीला. इतर कसलेही फ्लेवरिंग नाही घातले तरी चालते.

सिंडे, बेसन लाडू जसे करतो अगदी तसेच नाचणीचे लाडू करता येतात. मस्त लागतात. कृती तीच, फक्त बेसन ऐवजी नाचणी पीठ घे.

पौष्टिक फज: http://www.maayboli.com/node/2931 - मानुषी

काजुकतली: http://www.maayboli.com/node/2812 - अखी (या प्रकारात साय घातलीये)

लाडु: http://www.maayboli.com/node/9507 - मृगनयनी (यात खारीक, बदाम, पिस्ते इ आहे )

खोबर्‍याचे अनरसे (जुन्या माबोवरुन): http://www.maayboli.com/node/10718 - दिनेशदा (बेक केलेल अनरसे Happy )

अंजिर बर्फी: http://www.maayboli.com/node/5774 - पौर्णिमा (फ्रेश अंजिर वापरुन)

मूगडाळीच्या चकल्या: http://www.maayboli.com/node/11450 - डॅफोडिल्स

बालुशाही: http://www.maayboli.com/node/11474 - प्रिती

सोपा चिवडा: http://www.maayboli.com/node/11458 - दिनेशदा

बेसन आणि कणकेचे चुर्मा लाडु: http://www.maayboli.com/node/11395 - मनु:स्विनी

इंद्रधनुषी करंज्या: http://www.maayboli.com/node/11357 - गीतांजली

नारळीपाकाचे लाडू: http://www.maayboli.com/node/11361 - गीतांजली

----------------------------------------------------------------------

या पान २५ (शेवटुन) पर्यंत च्या पाकृ. याच्या पुढच्या दुपारी शोधते Happy

@ सिंडे आणि कोकोपावडर किंवा चॉकलेट चिप्स घातले करताना तरी चॉकलेटस्वाद मस्त येतो, नाचणीचा कलर साधारण तसा असल्यामुळे मुलांना (लहान) चॉकलेट सारख वाटत. बादवे फराळा प्रकारात येत नसला तरी नाचणी चा केक हे अतिशय मस्त लागतो आणि शिवाय पौष्टीक ही.

मनःस्विनी तुमची झटपट रवा लाडू ची रेसीपी छान आहे पण जर त्यात ओलं खोबर घातल तर ते लाडु २-३ दिवस टिकतील का?
मी त्याच पध्दतीनी लाडु करायचा विचार करते आहे.

मी करुन पाहिलेत मनुच्या रेसिपिने (ओल खोबर वापरुनच) मस्त होतात. कंडेस मिल्क असल्याने टिकवण्यासाठी फ्रिज मधे ठेवा.

हटके प्रकारात, बटाटा, कच्ची केळी, रताळी, गोराडू इत्यादी कंदमूळांचा चिवडा करता येईल. हे सर्व किसून भर तेलात तळून घ्यायचे आणि वर तिखट मिठ टाकायचे. किसण्यासाठी व्ही स्लाईसर वापरले तर तूकडे नेमके होतात.
बटाट्याच्या सूकवलेला किस बाजारात मिळतो. तो, नायलॉन साबूदाणा (किंचीत पारदर्शक असतो, बाजारात याच नावाने मिळतो. ) वगैरे तळून पण चांगला चिवडा होतो.

रचु,

कंडेन्स्ड मिल्क टाकले ना की अगदी मंद गॅसवर ढवळायचे. जर ओले खोबरे टाकायचे'च' असेल ना तर नॉनस्टिक पॅनवर जरासे परतायचे, लाल करायचे नाही. मग दोन एक मिनीटाने शुद्ध तूप टाकून गरकन चमचा फिरवून गॅस बंद करून खाली वेगळे काढायचे. हाच प्रकार मावे(मायक्रोवेव) मध्ये करू शकतो. ह्याने पाणी उडते.
व लाडू टिकण्यास मदत होते. पण "तरीही" लाडून बाहेर ३- ४ दिवसच रहातील. म्हणून एकतर आधी संपवून तरी टाका नाहीतर थंड झाल्यावर लगेच आत ठेवा. आत बाहेर नको. Happy

प्राजक्ता, थँक्स. Happy

हे मिनोतीचे डिंक बेसन लाडू

अशाच पद्धतीने अगदी कणकेचे लाडू होतात. कणीक भाजून घेतली की डिंक अवन मध्ये काहीही न टाकता फुलवून घेवून पीठात मिक्स करायचे व गूळ नाहीतर साखर टाकून बांधायचे. बांधले की जराश्या तूपात परतलेली खसखस मध्ये घोळावायचे. खसखस तूपात परतल्याने जराशी वाटून फिरवली की चिकटते लाडवाला.

तुम्हाला भरपूर वेळ नी पेशन्स असतील तर हे करून पहा,

सोनपापडी

एक वेगळा प्रकार पण गुज्जुंचा दिवाळी मधला फेमस मोहनथाळ

हि नानकटाई,
http://www.maayboli.com/node/11418

लाजो शीर्षकात यादी शब्द घालणार का?
दिवाळी फराळ पाककृती आणि 'जरा हटके' प्रकारांची यादी.
तसेच शब्दखुणांमध्ये "दिवळी" झालय ते प्लीज "दिवाळी" कर. तसेच तिथे "यादी" ही शब्दखुण पण घाल.

फुलपाखरू, धन्यवाद. बेक्ड चकलीची रेसिपी पाहुन मी हापीसात बसल्य बसल्या उड्या मारतीय Happy

या दिवाळीला बेक्ड चकल्याच!!

Pages