राज पिछले जनम का!

Submitted by राजे on 17 December, 2009 - 06:11

राज पिछले जनम का नावाचा एक नविन कार्यक्रम NDTV Imagine वाहिनिवर सुरु झाला. कालचा एपिसोड बघुन मी तर बुचकाड्यातच पडलो. आता पुनरजन्माबद्द्ल कुतुहल वाढलय.

डॉ. गायकवाड नावाची एक व्यक्ती मुळ गाव नांदेळ जवल कुठे तरी. मागील १० वर्षापासुन कावळे त्यांचा जातील तिथे गाठुन फार त्रास देतात अशी त्यांची तक्रार होती. या कावळा प्रकरणाचा मागच्या जन्माशी काही संबंध आहे का, हे जाणुन घेण्यासाठी काल ते तिथे आले होते.

डॉ. तृप्ती जैन ( पुनरजन्म प्रवास तज्ञा / ज्ञ ) ह्या, गायकवाडाना या घटनेचे मुळ शोधण्यासाठी मागील जन्माच्या प्रवासावर घेऊन जातात, व घटनेचे मुळ सापडते ते सन १२४८ या वर्षी.

हे गायकवाड नावाचे इसम १२४८ साली मँगलुरु नावाच्या शहरात एक देविच्या मंदिरात पुजारी म्हणुन कामाला असतात. व त्याची एक प्रेयसी हि असते, पण ती बहुतेक खालच्या जातीची असते. त्याच मंदिरात एक माथेफिरु सिनिअर "धुत" नावाचा पुजारी ( की कोणी राजाचा कर्मचारी, हे निट कळले नाही) राहतो. अमुक अमुक दिवशी तलवारिने कावळयाचा बळि दिल्यास ती तलवार सोन्याची होते या अंधश्रद्धेमुळे तो कावळ्यांचा बळि देतो. हे सगळं गायकवडच्या देखत होतं, पण गायकवाड त्याचा विरोध करायला समर्थ नसतो म्हणुन तो विरोध करत नाही. व एक दिवस हा माथेफिरु गायकवाडच्या प्रेयसिला मंदिरात प्रसादाला हात लावताना बघतो व तिची कत्तल करतो, हे सर्व त्या गायकवाडच्या पुढे घडते पण तो तिचा बचाव करायला पुढे सरसावत नाही. म्हणुन जीव जाताना ती गायकावाडला शाप देते की तुला पुढच्या कित्येक जन्मांत प्रेयसी लाभणार नाही. ती मेल्यावर व्याकूळ होऊन गायकवाड त्या धुताला शाप देतो, की तु कावळा होऊन जन्माला येशील. ही घटना आहे १३ व्या शतकातील. तेंव्हा त्या राज्याचा राजा विक्रमादित्य असतो.

म्हणजे या जन्मात कावळ्याच्या रुपात श्रीमान पुजारी धुत साहेब गायकवाडांचा पिछा करुन त्रास देतात हे गवसलं. दुसरं असं की गायकवाडचं ह्या जन्मात कुठल्याहि मुलिशी पटत नाही, ह्याचं कारण त्याच्या प्रेयसीची आत्मा हे सगळं घडवुन आणत असते. तो जेंव्हा केंव्हा चांगलं करायला जातो व प्रेम जुळायला स्कोप असतो तेंव्हा तेंव्हा त्याच्या प्रेयसीची आत्मा सगळा खेळ बिघडवित असते. आणि या सगळयातुन आता गायकवाडाना मुक्ततता मिळाली असं पुनरजन्म प्रवासतज्ञा जाहिर करतात व कारक्रम संपन्न होतो.

मानो या ना मानो स्टोरी मे दम है

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुध्द थोतांड आहे... कारण अजुन पर्यंत जेवढे आले आहेत त्यांचे सर्वांचे जन्म १२ वे शतक, १७वे शतक, १३ शतक इ. आहेत..... का सांगा?.............. अहो पुरावा शोधणार कोण? म्ह़णजे सगळं माफ.....हे बघा त्या निसर्गाने मानवाला भरभरुन दिले आहे, पण काही गोष्टी त्याने स्वता: कडेच ठेवल्या आहेत. त्या मुळे मानव एका ठराविक मर्यादा ओलांडु शकत नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

अहो या चॅनल वाल्यांना आपण आजच ओळखतो का? तरिही आपण कसे फसतो तेच मला कळत नाही,
.....'स्वर्गात जाणारी शिडी मिळाली सांगणारे,'.... 'हनुमान दिसला सांगणारे'.....ज्या वेळी शास्त्रज्ञ बिग बँग करणार होते तेव्हा पृथ्वीची कशी शकलं होणार हे (अगदी अ‍ॅनिमेशनसह) दाव्याने सांगणारे हेच ना ते?....
प्रसिध्दी साठी हे कोणतीही पातळी हे गाठु शकतात,.....
'सच का सामना' मोठा गाजावाजा करित सुरुवात झाला . काहि दिवस लोकांचे मनोरंजन देखिल झाले, पण काय झाले? नंतर नंतर लोकांना छक्के- पंजे कळायला लागले.

कालचा एपिसोड,

एक मुलगी कुठे तरी उत्तर भारतात जन्माला येते, मोठं कुटूंब असतं लग्न पण होतो व नवराही चांगला मिळतो. तरी तिच्या आयुष्यात एक अडचण असते. तीला होळीची फार भीती वाटत असते, होळिच्या दोन दिवसा आधिपासुनच भीती वाटायला सुरुवात होते. ती स्वतःला घरात डांबून ठेवते, तरी कोणीतरी तिला मारायला येतात की काय या भीतीने ती फार व्याकुळ होऊन बंद खोलितच खाटेखाली जाउन लपणे, कपाटामागे दडुन बसणे वैगरे करते. हा सगळा प्रकार ती वयाच्या ५ वर्षापासुन करत आलेली आहे, आज तीच वय २६ वर्ष आहे.

पुप्रत (पुनरजन्म प्रवास तज्ञा) त्याना मागच्या जन्माच्या प्रवासावर नेतात. ती मागच्या जन्मी आपल्या महाराष्ट्रातील बेलापुर या गावची मुलगी असते. होळिच्या दिवशी रंग खेळून घरी जाताना काही तरुण तिचा पाठलाग करतात, सगळे रंगानी भरलेले असतात, तिचा पाठलाग करत करत हे सगळे कुठल्यातरी डोंगराजवळ जाऊन पोहचतात, आता वाचण्याचा कुठलाच पर्याय उरलेला नाही हे समल्यावर बलात्कार होण्या आधीच ती स्वतःला डोंगरावरुन झोकुन जीव देते, ते वर्ष होतं १९८०. या मागच्या जन्माच्या घटनेमुळे तीला या जन्मात रंगाची भीती वाटत असते. हि भीती घालविण्यासाठी आपल्या पुप्रत चांगलं काऊन्सेलींग करतात.

कालचा एपिसोड बघताना असे वाटले की हा कार्यक्रम म्हणजे मानसिक आजारावर काऊन्सेलींगचा प्रकार आहे.

कालचा एपिसोड बघताना असे वाटले की हा कार्यक्रम म्हणजे मानसिक आजारावर काऊन्सेलींगचा प्रकार आहे.

हे मात्र खरे असावे. काही कारणाने का होऊन, मानसिक दुर्बलता दुर होणं केव्हाही चांगलंच...

काही कारणाने का होऊन, मानसिक दुर्बलता दुर होणं केव्हाही चांगलंच...>>>>>>>>>>>>>साधना बरोबर, असं काही असेल तर सोन्याहुन पिवळं.
पण उगाच खेळ करु नका हे आपलं माझं वैयक्तिक मत. Happy

मी काल ह्या मालिकेचा एक भाग पाहिला ... पारेख नावाच्या जादुगरणीचा... बराच पेशंस लागतो हि मालिका पहायला ... हळुहळु लोक मागे मागे जातात मग बोलतात ... मला कंटाळा आला बघतांना Happy

अहो, हे असले अमेरिकेत पाठवा. इथल्या टीव्ही वर काय वाट्टेल त्या सिरियल्स चालतात. एका बाईला भूत दिसत असते, नि भुताशी बोलून ती निरनिराळे गुन्हे सोडवते! स्कॉट बकुला नावाचा माणूस, अचानक कुठल्यातरी माणसाचा/बाईचा वेष घेऊन कुठल्या तरी पूर्वीच्या काळात जातो!

स्पायडर मॅन, सुपरमॅन, वंडर वूमन, इन्क्रेडिबल हल्क, फँटॅस्टिक फोर हे सगळे काय खरे असते काय? पण असले सगळे इथे प्रचंड जोरात चालते! !

एम नाईट श्यामलानच्या सिक्स्थ सेन्स मधे एका मुलाला म्हणे मेलेली माणसे दिसत असत!
स्टार ट्रेक, हॅरी पॉटर या सारखे सिनेमे खरे असतात का? पण चालतात ना! पैसे मिळतात ना, मग आनंद आहे.

हिंदी सिनेमात तरी सगळे घडणारे विश्वास ठेवण्याजोगे असते का? पण बघतोच ना आपण करमणूकी साठी. तेव्हढेच.

एम नाईट श्यामलानच्या सिक्स्थ सेन्स मधे एका मुलाला म्हणे मेलेली माणसे दिसत असत!

एक चित्रपट म्हणुन द सिक्स्थ सेन्स चांगला होता Happy

बाकी हे सगळे तिकडे अमेरिकेत पाठवायची काही गरज नाही.. हे सगळे तिकडुनच इकडे आयात होते. जितका लोकांचा पेशन्स तितके दिवस चालते मग बंद..... ते सच का सामना का मुकाबला काही होते ते असेच थोड्याच दिवसात बंद पडले....... Happy

आता काही दिवसांनी आम्हालाही भुताशी बोलुन गुन्हे सोडवणारी बाई दिसेल तर टिवीवर...

काल संभावना सेठ्चा एपिसोड पाहिला.
मागच्या जन्मी ती मुस्लिम होती म्हणे, फार कंटाळा आला ती अंधश्रद्धा बघुन, पुढचं बघितलं नाही.
सगळं स्क्रिप्टेड वाटत होतं, हि विद्या वैगरे नसुन पोट भरण्याचे उपाय आहेत.

ती संभावना सेठ पण येणार होती ना या सगळ्यात? Uhoh गेली का येऊन?
आणि त्या सिरियल मध्ये प्रवेश मिळवायला काहीतर प्रॉब्लेम असावा लागतो म्हणे, खरं का ते?

दक्षिणा,
चुक दुरुस्त केली. मी संभावना सेठ ऐवजी चुकुन दुसरं नाव लिहलं होतं.( आज काल डोक ठिकाण्यावर नाही माझं.)

दीपु थॅंकु रे.. माझा आजचा दिवस सत्कारणी लागला.. एकाला तरी मी गडाबडा लोळवलं हसता हसता..
तुला हसताना बघुन मी लोळतेय.... Proud

विषय भरकटतोय हो........................... मुददयावर या नाहीतर गुददयावर याल.

तो तेरे नाम मधला भुमीका चावलाचा मंगेदर,
बिग बॉस १ मध्ये पण होता, त्याचं नाव आहे " रविकिशन".

तो भोजपुरी सिनेम्यातील अमिताभ आहे म्हणे.

फालतु प्रोग्राम आहे..

प्रत्येक व्यक्ती पुर्व जन्मी भारतातच जन्मली होती.
बरे गेल्या जन्मी सुद्धा ते मनुष्यच होते. पुन्हा लिंगबदलही नाही. (म्हणजे स्त्री तर या जन्मी स्त्रीच आणि पुरुष तर या जन्मी पुरुषच). त्यात प्रत्येक जण अनैसर्गिक कारणाने मेलाय... कुणाचाही वयपरत्वे म्रूत्यू नाही. प्रत्येकजण जाणत्या वयातच मेलाय... कोणि बालपणि मेले नाही.

या गोष्टिं वरूनच या कार्यक्रमाचा फोलपणा लक्षात येतो.

ती जी डॉ. तृप्ती जैन आहे ती त्या लोकांना हिप्नोटाईझ करते. त्या लोकांना Halusinations येऊ लागतात. ती त्या कल्पनांना वाट देत जाते. नीट लक्ष दिले तर लक्षात येईल की तीच त्यांना घटनाक्रमात क्लू देत असते. उदा. एका पंजाबी मुलीच्या कथेत तिच्या पुर्वजन्मातील सासूचा काहिही उल्लेख मुलीने केला नसताना हिने तिला विचारले की तुझ्या साआसुबरोबर तुझे संबंध कसे होते? त्यातून स्टोरी सासूवर घसरली.

Pages