Submitted by तुषार जोशी on 12 November, 2009 - 13:53
.
रंगीबेरंगी फुलपाखराचे
पंख मिळाले तर?
कित्ती कित्ती मज्जा येईल
अस्से झाले तर!
उडून मग मी शाळेत जाईन
फुलांमधला मध मी खाईन
मज्जे मध्ये उडत राहीन
या शहराच्या वर
कित्ती कित्ती मज्जा येईल
अस्से झाले तर!
एका आथवड्यात तीन तीन
रवीवार आले तर
कित्ती कित्ती मज्जा येईल
अस्से झाले तर!
टॉम एन्ड जेरी तिनदा पाहीन
दिवस भर मी खेळत राहीन
पतंग भोवरे मज्जा घेऊन
घरच्या गच्चीवर
कित्ती कित्ती मज्जा येईल
अस्से झाले तर!
माझ्या डोक्यात अचानक
दोन मेंदू आले तर
कित्ती कित्ती मज्जा येईल
अस्से झाले तर!
दोन दोन कॉलेज डिगर्या घेईन
इंजिनियर आणि डॉक्टर होईन
देशासाठी डब्बल कामे
करीन आयुष्यभर
कित्ती कित्ती मज्जा येईल
अस्से झाले तर!
तुषार जोशी, नागपूर
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख. बालकवितांमध्ये असायला
सुरेख. बालकवितांमध्ये असायला हवी तशी लय आहे कवितेला. आवडली.
दोन दोन कॉलेज डिगर्या
दोन दोन कॉलेज डिगर्या घेईन
इंजिनियर आणि डॉक्टर होईन
देशासाठी डब्बल कामे
करीन आयुष्यभर
व्वा छानच आहे कल्पना