वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक्स्प्रेस हायवेवरून तीन लाख सदतीस हजार एकशे चौसष्ट वाहने???
<<
बेफी!
अहो टोलनाक्यावर पैकं किती जमा होत्याल? त्या साबां मंत्र्याची खादी उतरवायला हा एकच आकडा पुरे आहे. एका दिवसात इतके??
खरं का?

बेफिकीर, कशाबद्दल बोलणे अपेक्षीत आहे ते मी लिहीलं.
पण त्यानंतर कुणालाही 'असं का लिहीलं' वगैरे विचारलं नाही.
या बाफचा विषय नसूनही लोकांना त्याबद्दल लिहायचं असेल तर मी त्याबद्दल काही करु शकत नाही.

एकुण नूर असा आहे की मनस्वास्थ्यासाठी असेल तर काही अंध्श्रद्धासुद्धा चालवून घ्यायला हव्या. पण त्यामुळे काळ सोकावतो हे लोकांच्या लक्षात येत नाही. त्यापेक्षा मन स्ट्राँग करून वागता आलं तर किती बरं होईल! अर्थात हे बोलणं जास्त सोपं आहे. बरेच अपघात स्टॅटिस्टीकल असतात - आपली नसली तर पुढच्याची चूक असते. गाऊसियन डिस्ट्रीब्युशन प्रमाणे काही लोक लवकर मरतात, काहींना जन्मतः या ना त्या व्याधी असतात वगैरे - त्यात संचीतासारखा काही प्रकार नसतो.

पण पून्हा मूळ विषयावर यायला हवं ...

बेफिकीर, कशाबद्दल बोलणे अपेक्षीत आहे ते मी लिहीलं.<<<

तेच तर मी म्हणत आहे. समजा मी एक धागा काढून म्हणालो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेले महान कार्य इतक्याच विषयावरच्या पोस्ट्स अपेक्षित आहेत, तर ह्या फोरमवर माझ्या त्या म्हणण्याला काही अर्थ आहे का?

पण त्यानंतर कुणालाही 'असं का लिहीलं' वगैरे विचारलं नाही.<<<

हा तुमचा ग्रेटनेस, पण हे तुम्ही मला इथे सांगताय तेही सांगायला नकोत ना खरे तर? Happy (कृपया गैरसमज नसावा, माझे हे विधान पर्सनली तुम्हाला नव्हे तर तुमच्या त्या प्रातिनिधिल्क विधानाला उद्देशून आहे).

या बाफचा विषय नसूनही लोकांना त्याबद्दल लिहायचं असेल तर मी त्याबद्दल काही करु शकत नाही.<<<

होय!

ही जर वेदना असेल तर लिहिणार्‍याची जागा चुकली म्हणावे लागेल आणि ही जर तक्रार असेल तर दॅट इज द रीझन व्हाय मायबोली इज सो पॉप्युलर Happy

त्याचं काये बेफि,
इथे याच धाग्यावर केदार जोशी, (अन त्या एक स्त्री आयडी - नांव विसरलो) 'मी कुणालाच काही शिकवायला जात नाही', इ. म्हणत, मला अन इतर अश्रद्ध लोकांना, आम्ही कसे वागायला हवे, हे शहाणपण शिकवत आहेतच की!
इट्स नॉर्मल कोर्स ऑफ इव्हेंट्स ऑन मायबोली लोड कशाला घेताहात?
तुम्ही त्या गीतेवर प्रतिसाद डकवायचं काय केलंत?

इब्लिस,

तुम्ही जे लिहीत आहात ते अस्चिग ह्यांना अपेक्षित नाही आणि अस्चिग ह्यांना अपेक्षित नसलेलेही मी लिहीन असे तुम्ही म्हंटलेले दिसत नाही. (जे मी म्हंटलेले आहे). त्यामुळे तुमच्या प्रतिसादांना तूर्त 'घरका ना घाटका' ही ट्रीटमेंट देण्यात येत आहे. क्षमस्व!

<<<<२) आज आपण शिवछत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो. तो एक अत्यंत थोर राजा होऊन गेला हे आपल्याला ठावूक आहे. पण आणखी हजार दोन हजार वर्षांनी तेव्हाची जनता शिवाजी राजे ही एक काल्पनिक व्यक्ती आहे असे म्हणतील. >>>>>>
आसे म्हननार नाहित कारन त्याचा जल्म जिजाऊपोटि मन्युष्य म्ह्नुन झाला ज्याला दोन हात होते दोन पाय होते
एक डोक होत त्यांचे फोटो असेच आहेत मन्युष्य सारखे त्यांचा इतिहास आहे.इतिहासाला जरि बदलाय चा प्रयत्न
झाला तरि छवि बदलता येनार नाहि. आणखी हजार दोन हजार वर्षांनी तेव्हाची जनता शिवाजी राजे चि छवि आनि इतिहास वाचुन प्रेरना घेतिल. आपल्या सारखा मन्युष्य इतका पराक्रमि होउ शकतो तर आपन का नाहि?

काल्पनिक प्रतिकाकडून अशि प्रेरना घेता येइल का?

>>> आज आपण शिवछत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो. तो एक अत्यंत थोर राजा होऊन गेला हे आपल्याला ठावूक आहे. पण आणखी हजार दोन हजार वर्षांनी तेव्हाची जनता शिवाजी राजे ही एक काल्पनिक व्यक्ती आहे असे म्हणतील. >>>>

असेच काही नाही. जर शिवाजी महाराजांना एक मनुष्य म्हणूनच चित्रित करण्यात आले तर अविश्वास दाखविण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्या जोडीला अनेक शिवकालीन पुरावे (पत्रे, मुद्रा, त्यांचे काढलेले चित्र, ब्रिटीश वर्तमानपत्रात त्यांच्यावर लिहिलेला मजकूर, ई.) दाखवले जातीलच.
पण जर कोणी अवास्तव (विशेषतः पुराव्याविना ) चित्रण केले (त्यांना ८ हाथ होते; त्यांच्या एका दृष्टीक्षेपाने हजारो सैनिक मृत होत असत) तर मात्र ते लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत.

>>>>>त्यावेळी तसे लीन होऊन जे मानसिक बळ मिळते ते कुणाला दाखवता येणार नाही.>>>>
पण या बळावर आक्षेप नाहीच आहे. बळ मिळते हे मान्य आहे. पण ते बळ देवाचे अस्तित्व सिध्द करू शकत नाही.

Webmaster, Admin - ek id varamvar pratyek dhagyavar vishayavar na lihita Admin asalyapramane aav anat kon kay lihit aahe fakt tyabaddal mallinathi karat ahet. Tyana ase kahi adhikar ahet ka ?

Tyana post lihilyala kuni adkathi kelee ahe ka ? Tyanche swathache track record kay ahe ?

इथे याच धाग्यावर केदार जोशी, (अन त्या एक स्त्री आयडी - नांव विसरलो) 'मी कुणालाच काही शिकवायला जात नाही', इ. म्हणत, मला अन इतर अश्रद्ध लोकांना, आम्ही कसे वागायला हवे, हे शहाणपण शिकवत आहेतच की! >>

हा हा हा ! तुम्ही नीट वाचत जा हो. मी लिहिले आहे मी इतरांना मूर्खात काढून शिकवायला जात नाही, जनरल टोन मध्ये सांगतो, त्याने ऐकले नाही तर ओके. तुम्ही तसेच करा असे कुठे लिहिलेले नाही.

उलट दोन तीनदा शहाणे करून सोडावे सकळ जन वर मी या विषयात विश्वास ठेवत नाही असे लिहिले आहे.

विनाकारण माझ्या नावावर नको ते बिल फाडत आहात म्हणून लिहितो. आणि इतर अश्रद्ध लोकंही काही अपवाद सोडता, माझ्या त्या मताशी सहमत झाले होते.

बायदवे

तुमच्या दवाखान्यात अजूनही सकाळी रोज देवाच्या फोटो खाली उदबत्ती लागते का हो? तुम्ही अश्रद्ध असल्यामुळे तुमच्या दवाखान्यात एकही फोटो, मूर्ती नसायला हवी. शेवटी आपण जो विचार करतो, तो निदान आपण तरी अंमलात आणावा, नाही का?

तर आजचे शिकवणे - आधी स्वतःपासून सुरूवात करावी आणि मग इतरांना सांगावे. Happy

एकही फोटो, मूर्ती नाही.
उदबत्तीचा संबंधच नाही.

आधी न शिकवण्याची सुरुवात स्वतःपासून करा.

सर्वात महत्वाचे, मूर्खपणाबद्दल बोलायला सुरुवात कुणी व काय केली ते बघा. इतरांच्या नावावर बिलं फाडायची सवय तुमची आहे. माझी नव्हे.

गोलगोल फिरवून आपण जे निरर्थक बोलता, त्या हुशारीबद्दल अभिनंदन

एकही फोटो, मूर्ती नाही.
उदबत्तीचा संबंधच नाही. >>

ग्रेट मला आवडले.

सर्वात महत्वाचे, मूर्खपणाबद्दल बोलायला सुरुवात कुणी व काय केली ते बघा. इतरांच्या नावावर बिलं फाडायची सवय तुमची आहे. माझी नव्हे. >> Lol

तुम्ही चिडता फा बॉ. मग त्या कर्कश टोन मध्ये लिहिणे. त्यामुळे मजा येत नाही.

त्या हुशारीबद्दल अभिनंदन >> वा वा. म्हणजे मी ह्या बाबतीत हुशार आहे असे म्हणता. धन्यवाद !

टोन व कण्टेण्ट यात फरक असतो. नाही का? Happy

बाकी मूर्खात काढणे प्रकरण धाग्यावर कुणी व कसे आणले व ते माझ्या नावावर कसे खपवले गेले हे रियलाईज झाले की नाही अजून? की फक्त स्मायली पाहून जे समजायचे ते समजू? Proud

<<<<<<<जेंव्हा आपले कठिण प्रश्न मिटता मिटत नाही तेंव्हा आपण ईश्वरापुढे लीन होतो. आपल्याला तेन्व्हा कळते की आता आपल्या यातना इतर कुणीच समजू शकणार नाही.>>>>
कठिण प्रश्न, प्रसंग प्रतेक जल्म झालेल्या मानसाच्या जिवनात येतच असतात मग तो राजा असो कि भिकारि.आपल्या पेक्षा वाइट परिस्थितीतुन गेलेल्या लोकांकडे पहावे वाइट परिस्थितीवर मात करुन जिवनात पुढे गेलेल्या लोकांकडे पाहुन प्रेरना घ्यावि.
कारन आहे तिथे परिनाम आहे.प्रश्न तिथे ऊत्तर आहे डोक शांत ठेऊन प्रसंग हाताळावा कुठलिहि अवस्था आनादिकाळा टिकनारि नसते.त्यातपरिर्वतन हे होतच असते हा निसर्ग नियम आहे. आपल्या आगतिगतेचा फायदा घेऊन फसवनारेच जास्त असतात.

सुरेख तुम्ही खरच सुरेख लिहिताय, प्रॅक्टीकल रोख आहे तुमचा. फक्त थोडसं शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे हि विनंती.

सुरेख यांचे प्रतिसाद मोठे आणि हिंदी मधे असल्याने स्किप झाले होते. वेळ काढून वाचायचे आहेत. ते इतके मोठे आहेत की स्वतंत्र लेखच आहेत. (पण कुठून कॉपी पेस्ट केले असतील तर फक्त लिंक देणं योग्य होईल).

@ आश्चिग
लेखाचे सुरुवातीचे स्वरूप आवडले होते. मृत्यूपत्रामुळे त्या अनुषंगाने चर्चा झाली. पुढे मुद्यावरून मुद्दे या न्यायाने चर्चा वळणं वळणं घेत गेली तरी विषय अंधश्रद्धेचा आणि चर्चा गोडसे, गांधी, सावरकर असा काही प्रकार झालेला नाही. चर्चेच्या वळणातले मुद्दे हेडर मधे घेतल्याने चर्चा प्रस्ताव मर्यादीत करण्याचा तुमचा निर्णय हे तुमचं स्वातंत्र्य असल्याने त्याबद्दल काही म्हणणे योग्य नाही.

असेच काही नाही. जर शिवाजी महाराजांना एक मनुष्य म्हणूनच चित्रित करण्यात आले तर अविश्वास दाखविण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्या जोडीला अनेक शिवकालीन पुरावे (पत्रे, मुद्रा, त्यांचे काढलेले चित्र, ब्रिटीश वर्तमानपत्रात त्यांच्यावर लिहिलेला मजकूर, ई.) दाखवले जातीलच.
पण जर कोणी अवास्तव (विशेषतः पुराव्याविना ) चित्रण केले (त्यांना ८ हाथ होते; त्यांच्या एका दृष्टीक्षेपाने हजारो सैनिक मृत होत असत) तर मात्र ते लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत. >>>>>>>>

आपल्याकडील काही बखरी आहेत ज्या मधे महाराजांना चेटूक येत होते, म्हणून ते औरंगजेबाच्या पहार्‍यातून निसटले, त्यांना काळी जादू येत होती असे उल्लेख आहेत. मोगल कालीन, ब्रिटिश आणि आपल्याकडील सभासदाची बखर यामूळे आपल्याला नीट ईतिहास ठावूक आहे. त्या बखरी नसत्या तर महाराजांना विष्णुचा कितवा तरी अवतार म्हणून मानले गेले असते कदाचित.

बाकी चालू दे

आज आपण शिवछत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो. तो एक अत्यंत थोर राजा होऊन गेला हे आपल्याला ठावूक आहे. पण आणखी हजार दोन हजार वर्षांनी तेव्हाची जनता शिवाजी राजे ही एक काल्पनिक व्यक्ती आहे असे म्हणतील.>>>>>>>

अहो बी, काल्पनिक व्यक्ती म्हणले तर फार काही नुकसान नाही, पण शिवाजी महाराज विमानाने ह्या गडावरुन त्या गडावर जात होते किंवा एक बाण सोडुन डोंगर कापुन काढला किंवा राजगडावरुन रायगडावर जायला पूल बांधला अश्या कल्पना जोडल्या की प्रॉब्लेम चालू होतो

स्वप्नांची राणी मला अजिबात लिहायचि सवय नाहि.कितितरि शब्द टाइप करता येत नाहित पन शुद्धलेखनाकडे
लक्ष देइन.

पत्रिकेत मंगळ असण्याविषयी,

माझा प्रेम विवाह आहे. माझ्या बायकोला मंगळ आहे. आमचे लग्न झाल्यास मला सहा महिन्यामधे मृत्युयोग आहे असे सांगण्यात आले होते. बरेच जण आमच्या लग्नाच्या विरोधात होते. मी सगळ्यांना फाट्यावर मारुन साखरपुड्यासाठी कार्यालय बूक केले. काही झाले तरी हे लग्न होणारच अशी भूमिका ठेवली. शेवटी लग्न झालेच. भविष्य सांगणार्‍याने मंगळाची शांती या नावाखाली दहा हजार लाट्ले. लग्नाला आता तीन वर्षे झाली. अजून तरी मी ठणठणीत आहे.

आता त्या लोकांचे दोन दावे आहेत.

१. मृत्युयोग असतो म्हणजे मृत्यु येतोच असे काही नाही, शक्यता असते.

२. गुरुजींनी शांती केली, म्हणून सगळं व्यवस्थित चालू आहे.

लोकांची खरेच किव येते कधी कधी.

सुधारीत चर्चाप्रस्तावाप्रमाणे प्रतिसाद

ज्या लोकांना आपण बदलावे अशी इच्छा नाही, त्यांनी कृपया येथे लिहु नये. वाचु तर मुळीच नये. नुसता मनस्ताप होईल. केवळ मनोरंजन होईल म्हणुन वाचायचे असेल तर तुमची मर्जी. >>> हो बदल करण्याची इच्छा आहे. त्या दृष्टीने आपलं काही चुकतंय का हे पाहण्यासाठी अशा चर्चा उपयुक्त ठरतात.

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल. >>>>

माझ्या वैयक्तिक जीवनात मी कुणालाच शिकवायला जात नाही. माझ्या सवयी, विचारसरणी हे मी जपतो. तसंच त्याप्रमाणे कुणी वागावं हे मी ठरवत नाही.

पण...

हा प्रतिसाद राखून ठेवत आहे

श्रद्धांचं अंधश्रद्धांत कधी रुपांतर होईल हे सांगता येत नाही. शेजारचा सतीची प्रथा पाळतो म्हणून मला काय त्याचं अशी भूमिका मला घेता येणार नाही. पलिकडच्या गल्लीत नरबळीचा प्रयत्न झाला, मला काय त्याचं हा पवित्रा मला घेता येणार नाही. इथे वैयक्तिक श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वैयक्तिक लढा या कल्पनेला काहीच अर्थ राहत नाही.

एखाद्या प्रथेची सुरुवात जरी निरुपद्रवी वाटत असेल तरी पुढे तिचं अनिष्ट प्रथेत रुपांतर तर होणार नाही ना हे भारताचा इतिहास माहीत असणारा कोणताही सजग मनुष्य डोळ्यात तेल घालून पाहील तर त्याला आपण चूक ठरवायचे का ?

सध्या इतकंच. आणखी बरेच मुद्दे उपस्थित होऊ शकतात. ते जमेल तसे.

गण्या भाऊ
<<<<< सुरेख यांचे प्रतिसाद मोठे आणि हिंदी मधे असल्याने स्किप झाले होते. वेळ काढून वाचायचे आहेत. ते इतके मोठे आहेत की स्वतंत्र लेखच आहेत. (पण कुठून कॉपी पेस्ट केले असतील तर फक्त लिंक देणं योग्य होईल).
लिंक देत आहे.महाराष्ट्र बाहेर जास्त राह्ने झाल्यामुळे हिन्दि चि सवय आहे.
www.hindisamay.com/contentDetail.aspx?id=849&pageno=17

कॉलेजला असताना कसलेच विचार नव्हते. असं म्हणण्यापेक्षा सगळ्याच विचारांची थोडी थोडी भेळ होती आणि त्याचं विश्लेषण करता येण्याची कुवत नसतानाचा हा एक वैयक्तिक अनुभव. वैयक्तिक अनुभव इथं देणे म्हणजे रिकामटेकड्यांना आपली हजेरी घेण्याचा परवाना देणं होय याची कल्पना असतानाही रिस्क घेतोय.

त्या अडनिड्या वयात एका मुस्लीम मुलीशी मैत्री झाली. तिचं घर माझ्या दुकानाशेजारी होतं आणि कॉलेज एकच होतं. माझ्याच वर्गात होती. तिच्या घरी येणं जाणं होतं. दुपारी तिची अम्मी माझ्यासाठी दुकानावर डबा पाठवायची. हे कुटुंब अतिशय प्रागतिक विचारांचं होतं. एक दोनदा तिच्या अब्बांसोबत जेवायला बोलावलं असताना त्यांनी माझी वैचारीक तपासणी सुद्धा केली. माणूस अतिशय प्रेमळ होता. मुद्दे समजावून सांगण्याची पद्धत, हातोटी यामुळे खूपच प्रभावित झालो होतो. त्याच वेळी मुस्लिमांबद्दल बाहेर कमालीचा कडवट प्रचार सुरू झालेला होता. त्याची थोडीसुद्धा कडवट झाक कुणाच्याच बोलण्यात कधी दिसली नाही. माझं दुकान ज्या ठिकाणी होतं तिथे मुस्लीमविरोधी वातावरण असतानाही या कुटुंबाला कुणीच त्रास दिल्याचं आठवत नाही. आत एक बाहेर एक असा प्रकार नव्हता. पण त्यांच्याशी संबंध जोडू नयेत अशा प्रेमळ सूचना कम धमक्या काही संघटनांकडून मिळाल्या होत्या. काहींनी आमच्या घरी जाऊन आग लावण्याचे उद्योग केले. एक तर बाहेर दंगली त्यातून हा मुलगा काही पाऊल उचलतो का या भीतीने घरच्यांनी ते दुकानच विकून टाकलं. पण अब्बांचे सुधारक संस्कार आजही मनावर आहेत. ते फक्त सुधारक होते, नास्तिक नव्हते. सुधारकाने नास्तिक असायलाच हवं असं नाही. त्याने धार्मिक असू नये असंही नाही. आहे त्या धर्मात कुठल्या प्रथा अनिष्ट आहेत याचं ज्ञान त्याला असायला हवं. अब्बा जरी सुधारक असले तरी ते वैयक्तिक पातळीवर. त्यांच्या समाजाशी त्यांचा संबंध नव्हता. पुढे असे बरेच मुस्लीम पाहण्यात आले जे वैयक्तिक जीवनात सुधारक विचारांचे आहेत पण आपल्या समाजाशी फटकून आहेत.

याचा तोटा असा की त्या धर्मात सुधारणा करू शकणारा बुद्धीजीवी वर्ग त्या समाजाला लाभला नाही. याला एक प्रकारे ब्रेन ड्रेन म्हणता येईल. याउलट दलवाई कुटुंबाने आपल्या विचाराप्रमाणे सुधारणा केल्या, संघटना वाढवली. असे संघटीत प्रयत्न झाल्याखेरीज समाज सुधारत नाही.

> श्रद्धांचं अंधश्रद्धांत कधी रुपांतर होईल हे सांगता येत नाही. शेजारचा सतीची प्रथा पाळतो म्हणून मला काय त्याचं अशी भूमिका मला घेता येणार नाही. पलिकडच्या गल्लीत नरबळीचा प्रयत्न झाला, मला काय त्याचं हा पवित्रा मला घेता येणार नाही. इथे वैयक्तिक श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वैयक्तिक लढा या कल्पनेला काहीच अर्थ राहत नाही.

वैयक्तिक म्हणजे स्वतःपुरतं असं न म्हणता इतर बरोबर नसतांना ( कोटी अभिप्रेत नाही) दिलेला लढा.

> सुधारकाने नास्तिक असायलाच हवं असं नाही.

सुधारकांचा आणि आ/नास्तिकतेचा संबंध नाहीच (ज्याप्रमाणे नैतिकतेचा आणि आ/नास्तिकतेचा नाही). पण तिथेही अशी अंधश्रद्धा दृढ आहे की नास्तिक म्हणजे अनैतिक.

वैयक्तिक म्हणजे स्वतःपुरतं असं न म्हणता इतर बरोबर नसतांना >>> ओके

बदललेल्या चर्चाप्रस्तावामधे हा अर्थ तितका स्पष्ट होत नाहीये.

अहो हल्ली तर माबोवर नास्तिक म्हणजे अनैतिक म्हणजे हिंदुविरोधी, संघविरोधी, मोदीवुरोधी, काँग्रेससमर्थक(?),
बुप्रावादी, भावनाशून्य, इ. इ. अशी विचारधारा जोरात आहे.

इतर एका संस्थळावर 'नास्तिक आणि विकृती' अशीही चर्चा वाचली. (खरं तर पाहिली)

http://www.aisiakshare.com/node/3228

ओशोंबद्द्ल लोक काहीही म्हणोत, त्यांची काही प्रवचनं, काही पुस्तकं तुम्हाला विचार करायला लावतात. भारतीय समाजजीवनाची दर्शने हा त्यांचा शिकवण्याचा विषय. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. प्राध्यापक या बुरुदावलीने जर त्यांनी देशभर व्याख्याने दिली असती तर देश ढवळून काढण्याची क्षमता त्यांच्यात होती.

त्यांनी भारतीय तत्वज्ञानातील नास्तिक दर्शनांबद्दल दिलेली प्रवचने ऐकण्यासारखी आहेत. शक्य झाले तर संदर्भ देईन.

त्या धर्मात सुधारणा करू शकणारा बुद्धीजीवी वर्ग त्या समाजाला लाभला नाही.>>>>

ह्याचा अर्थ असा की त्या समाजाला सुधारायची काय सुधारणे बद्दल चर्चा करायची पण इच्छा नाही.

Pages