Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
माझे सायकलीचे प्रयोग ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » ललित » माझे सायकलीचे प्रयोग « Previous Next »

Kedarjoshi
Tuesday, December 04, 2007 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज जेवताना माझा गोरा मित्र मला म्हणाला की संध्याकाळी त्याचा जिम मध्ये येनार का. सायकलींगचा क्लास आहे. अन तो जबरी असतो म्हणे. ट्रेनर अचानक उठुन सायकल करायला सांगतात तेव्हा अर्धे लोक बसुनच असतात का तर झेपत नाही. तु येनार का गेस्ट म्हणुन. मी म्हणालो चालेल मी येतो. पण जेवता जेवता त्याला माझे सायकल प्रेम सांगीतले. भारतात बहुतेक सर्व जण शाळेत सायकल वर (माझ्या काळी) जातात असे सांगीतल्यावर तो हैरानच झाला. खरच तेव्हा सायकल नसती तर काय झाल असत.

तशी माझी अन सायकलची ओळ्ख फार जुनी आहे. बाहेर जाताना माझे वडील मला सायकल वर पुढे बसायला सांगत अन स्वत ती चालवत. (आता मला पुढे म्हणल्यावर आई ला मागे असे दॄष्य डोळ्यासमोर आनु नका). तेव्हा माझी सायकल ची ओळख झाली. मला स्वतला मात्र तिसरी पर्यंत सायकल येत न्हवती. तिसरीत असताना माझ्या बरोबरीच्या चुलत भावांनी अन मी मि़ळुन २५ पैसे एका तासाचे अशा भाडेतत्वावर लहान सायकली आनुन शिकन्याचा प्रयत्न केला तो साधारण दोन तिन महीने चालला व अस्मादिकांना सायकल येऊ लागली. याच सर्वात मोठ श्रेय जात ते माझ्या पेक्षा ३ वर्षाने मोठे असलेल्या मित्राला. ( आई वा वडिलांनी मला कधी सायकल चालवायला शिकवली हे ल्क्षात नाही अर्थात पैसे मात्र त्यांचेच होते).
मला सायकल आल्यावर एकाद दुसर्या वर्षानी माझ्या मोठ्या काकांनी उदार मनाने त्यांची हर्क्युलस माझ्या नावावर केली. सायकल मिळाल्याचा आनंद झाला पण ती चालवनार कशी कारण माझी उंची त्या मोठ्या सायकलवर बसुन चालविन्या ऐवढी न्हवती. मग वडिलांनी कैची कशी मारायची हे एकदा प्रात्यक्षिक करुन दाखवीले व तोल जाउन पडले कारण उंची जास्त असताना कैची निट मारता येत नाही. पण मला कैंची मारायची कशी हे कळाले होते त्यामुले त्या हर्क्युलस वर मी कैंची ची जोरात प्रॅक्टीस चालवली. होता होता ६ वि वा ७ वि आली व तेव्हा पासुन शा़ळेत सायकल नेन्याला परवानगी मिळाली. तेव्हा तर दादरा ( नांदेड चा प्लायओव्हर) रस्तात नसताना उगीच रोज त्यावर दंडी मारायला मिळते म्हणौन जात होतो. ( दंडी मारने म्हणजे उभ्याने सायकल चालविने). माझी शाळा घरा पासुन साधारण दोन किलोमिटर वर होती. तो रस्ता वाहतुकीचा होता म्हणुन दुसरे काका एक दोनदा सोडायला आले होते. रस्ता माहीतीचा होताच आता त्या रस्त्यावर आपण स्वत सायकल चालवु शकतो हे कळल्यावर स्वांतत्र्य स्वांतत्र्य म्हणतात ते हेच हे कळाले. कधीही उठा, सायकल काढा अन सुटा. तो पर्यंत वडिलांची सायकल जाउन त्यांचाकडे तेव्हा लुना आली होती व त्यांची जुनी सायकल त्यांनी दुसर्या एका होतकरु शिकावु चुलत भावाला दिली होती. रोज शा़ळेत, शिकवनीला अन नंतर क्रिकेट ला सायकल चा उपयोग व्हायचा. तशी काकांनी दिलेली हर्क्युलस नविनच होती पण तो काळ होता बि ऐस ऐ ऐस ऐल आर चा. त्या ऐटीबी वैगरे पाहुन मला माझी सायकल जुनी झाल्याचा साक्षात्कार झाला व मि वडील सोडुन काकांचा पाठीमागे नविन सायकल घेउन देन्याचा घोषा लावला. सायकल काही मिळाली नाही. जुन्या सायकल वर मी अनेक गांवानां गेलो आहे. त्यातली एक आठवन.
एकदा मिल्या, रव्या, शिन्या, दुसरा रव्या, रघ्या असे आम्ही १०,१२ जन मिळुन नांदेड हुन सुरु करुन शिकार घाट, माता साहेब, त्रिकुट, केदारगुडा, अन परत नांदेड अशी नांदेडची परिक्रमा करायचा निर्धार आम्ही केला. आम्हा सर्वाना आधी निदान ५० किलोमिटर सायकल चालवायची सवय होती त्यामुळे फार काही अवघड होईल असे वाटले नाही. त्यातले केदारगुडा हे बेट वाटेवर बिलकुल न्हवते ते त्रिकुट च्या विरुध्द होते तरीही रव्याने चलता है बे म्हणुन तिकडे जायचे पक्के केले. जाताना आधी शिकारघाट ला जाउन दर्शन घेउन नंतर माता साहेब व त्या नंतर त्रिकूट ला आम्ही पोचलो. त्रिकुट ला गणपतीचे मंदीत गोदावरी नदीत आहे. पुर आला की मंदीर बुडते. तेव्हा पाणी साधारण होते.दर्शन घेउन आता त्रिकुट हुन परत राज्य महामार्गाला लागता येइल का याची विचारना केल्यावर नदी पार पाडायला एकतर सात आठ किमी दुर असनार्या पुलाकडे जा, वा होडीतुन नदी पार करा वा सायकली डोक्यावर घेउन पायी चालुन नदी पार करा हे पर्याय होते. पहीला दुर असल्यामुळे , दुसरा नावड्याला देन्या ऐवढे पैसे नसल्यामुळे असे दोन्ही पर्याय गेले. तिसरा उरला त्यात आम्ही चोघे जन न पोहनारे मग कसे हा प्रश्न उरला. मी अन मिल्या दोघे बाकी पब्लीक पेक्षा उंच त्यामुळे आम्ही आधी जायचे असे ठरले. साधारन कंबरे ऐवढे पाणी होते. मी अन मिल्याने आप आपल्या प्यांटी काढुन त्यांची व्यवस्तिथ घडी करुन सायकली च्या कॅरीयर ला लावल्या. सायकली डोक्यावर घेतल्या अन पाण्यातुन चालायला सुरु केले. मी आधी अन मिल्या नंतर. साधारण अर्धे चालुन झाल्यावर बाकींच्याचा घिर चेपला व तेही पाण्यात उतरु लागले. इतक्यात रघ्याची सायकल शिन्याच्या डोक्यावर असलेल्या सायकलीला लागली व तोल जाउन ते दोघेही पाण्यात पडले. रघ्या न पोहनार्यांचात होता. नेमका तो खाली व सायकल वर असे प्रकरन असल्यामुळे तो जोर जोरात अबे केद्या, अबे मिल्या मेलो रे मेलो असे ओरडु लागला. शिन्या लगेच उठला व त्याने रघ्याच्या अंगावरची सायकल बाजुला केली मी अन मिल्या सायकल पान्यात टाकुन अबाऊट टर्न, आम्ही तिघांनी रघ्याला उचलले पण त्याची भिती काही जात न्हवती मेलो रे मेलो. भडवे हो तुम्ही मला आनलेच का म्हणुन तिथे भांडायला लागला. रघ्याला मी अन मिल्याने उचलले व तसेच जोरात पाण्यात टाकले. परत एकदा मेलो मेलो चा गजर झाला. शिन्या त्याचावर खेकसुन म्हणला अबे रघ्या गुडघाभर पाण्यात कसा मरशिल ते रघ्या ला पटले अन आम्ही सर्वांनी परत एकदा सायकली डोक्यावर घेउन ती नदी पार केली. कपडे घालताना लक्षात आले की पाण्यात सायकली पडल्यामुळे आम्हा तिघांचे कपडे ओले झाले. मग काय ट्रिप तशीच गुंडाळुन तेथुन ३० किलोमिटर वर असनार्या आमच्या नांदेड कडे आम्ही वापस आलो.
आजही ही ट्रिप आम्ही सर्व भेटलो की आठवते. नंतर अनेक ट्रिप सायकली वरनं केल्या. पण ही मस्तच.

दुसरी आठवन लै भारी आहे. झाल काय की दहावित असताना मला वाटल की जर आपण हात् क्रॉस करुन सायकल चालविली तर काय होईल. मग काय विचार आल्या बरोबर प्रात्यक्षिक करायचे ठरविले. शाळा सुटल्या वर सायकल जरा वेगात आली की प्रयोग करायचा ठरविले. आधी उजवा हात डाव्या हाताचा जागी लावला, काही झाले नाही सायकल थोडी उजवी कडे वळते असे वाटले म्हणल डावा हात उजव्या हाताच्या जागेवर ठेवुन बघुयात बॅलेन्स होईल असे वाटले अन काय आश्चर्य एक मिनीटभर सायकल चालली अन धाडकन जोरात पडली. मी ही रस्त्यावर. बाजुचे शाळासोबती मस्त हसु लागले. फक मिल्या हासला नाही तो एकाचा अंगावर धावुन गेला. माझा मात्र घुडघा फुटला. नंतर क्रॉस हाताने सायकल चालविली नाही.
पुढच्या वर्षी माझी प्रगती होउन (११ वित) मला लुना मिळाली, फ्स्ट इअर ला ऐल ऐम ऐल व्हेस्पा अन नंतर लगेच सुझुकी फियारो अशी प्रगती झाली पण सायकल प्रेम तसेच राहीले.

अमेरिकेत आल्यावर सायकल चालविने पहीले तिन चार वर्ष सुटले होते मात्र परत नव्या उत्साहाने मी एक बाईक (हो ईकडे सायकल म्हणल की उगीच अपमान व्हायचा) घेतली. ही पण हायब्रिड आहे. ( लगेच तिकडे सायकल ला पेट्रोल लागत का हा विचार करु नका). हायब्रिड म्हणजे रोड बाइ़क व माउन्टेन बाईक यांचे मिश्रन तसे ही सायकल घडवायला जे मेटल वापरल जात ते पण लाईट वेट असत. गेल्या उन्हाळ्यात रोज ६ ते १० मैल चालवायचो. आता हिवाळा आहे. हे लिहीतात सायकल चालवायची उर्मी होत आहे पण अजुन चार पाच महीन वाट पाहावी लागनार आहे. तो पर्यंत आहेच मायबोली सायकल ह्या विषयावर लिहायला.

सहज जाताजाता, माझी मुलगी ५ वर्षांची आहे पण ति एकटी व्यवस्तिथ सायकल ( विदाउट ट्रेनींग व्हील्स) चालवते. आम्ही गेल्या उन्हाळ्यात अर्ध्या ते पाउन मैलांचा फेर्या दोघांनी मिळुन मारल्या.


Ajai
Wednesday, December 05, 2007 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार्- छान लिहलय. माझी ८ वी ला असतानाच मोटरसायकल पर्यंत प्रगती झाली होती.तेव्हा आमच्या कडे राजदुत होती. दहावीची परिक्षा झाल्यावर तू म्हणतोस तशी दंडी मारायला गेलो आणि बाईक सकट फरफट्त गेलो. त्यामुळे कॉलेजात कधी मोटरसायकल मिळाली नाही. चालवली ती चोरुन मित्रांची. त्यानंतर लवकरच कार आली आणि अजुन तरी स्वतची दुचाकी असण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. नाही म्हणायला कधीतरी बायकोची स्कुटरेट चालवतो. माझे अजुन येक अधुरे स्वप्न्- येझदी किन्वा तत्सम बाईकवर महाराष्ट्र पालथा घालायचा. मुंबईत येक येझदि जावा बायकर्स चा ग्रुप आहे जो अगदी लडाख़ पर्यंत जाऊन आलाय.





Meggi
Wednesday, December 05, 2007 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, मस्त लिहिलयं.. रघ्याचा किस्सा तर मस्तच.. :-)

Psg
Wednesday, December 05, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलं आहेस केदार.. :-)

Manogat
Wednesday, December 05, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,
सुरेख लिहिल आहेस. मला पण माझे सायकलचे किस्से आठवले.. मि ६वित असतांना माझ्या दादाने मला सायकल शिकवायचा पवित्रा घेतला अजोबांचि मोठि Atlas घेउन. मि छोटि अणि ती सायकल मोठि, घराजवळच्या उतारावरुन या पठ्ठ्याने हात दिल सोडुन अणि मग काय रस्त्याच्या कडेला असलेल्या गिट्टी वर जाउन मी कोसळले.. त्याला मार बसला अणि मला जखम..पण म्हणतात ना पडल्यावरच सायकल शिकता येते..त्यानंतर त्याला कधी शिकवायचि गरजच नाहि पडलि.


Manjud
Wednesday, December 05, 2007 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, मस्त लिहिलं आहेस. रघ्याचा किस्सा तर ह. ह. पु. व. मी पण तूफान सायकल चालवली. अजूनही उर्मी येते चालवायची....

बरं बाकी कोणी विचारायच्या आधी मीच विचारते, मिल्या म्हणजे मिलिंद छत्रे का रे?


Bee
Wednesday, December 05, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी Amsterdam मधे असताना तिथे जेवढ्या सायकली ३ दिवसात पाहिल्यात तेवढ्या अजून कुठेच पाहिल्या नाहीत. भारतीय सायकलींची त्रिंग त्रिंग घंटी मला इतरत्र कुठेच आढळली नाही. परत समोर carrier असे जिची मदत भाजीपाला पाव वगैरे ठेवायला होई. आमच्याकडे एकून ४ सायकली होत्या. रोज रोज हवा भरून घ्यायला प्रत्येकाचे पैसे जात मग आम्ही हवा भरण्याचा पंप घरीत विकत आणला. मी सायकल चालवायला माझ्या बहिणींकडून शिकलो आणि एक कम्मो नावाची उर्दु बोलणारी मुलगी होती तिनेही मला पायडल कसे मारायचे ज्ञान दिले. आमच्यावेळी १ तासाची भाड्याची सायकल ६० पैशाला मिळे. माझा सर्वात मोठा प्रश्न हा होता की माझी सायकल वारंवार पंक्चर होत असे. असे वाटे घरीच पंक्चर कसे काढावे ते शिकून घ्यावे. घाईची वेळ आणि सायकल पंक्चर त्यात जिथे ते काढून मिळे तो वेळखाऊ प्रकार होता.

Varsha11
Wednesday, December 05, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार मस्तच लिहिले आहे. मला माझ्या मावस बहिणींनी सायकल चालवायला शिकवले. नंतर मी माझ्या मामे भावाला शिकवत होते तर हा गेला रस्त्याने चालणार्‍या बाईच्या अंगावर, मी मागुन अरे ब्रेक दाब म्हणुन ओरडत होते पण त्या बाईने दिले ह्याला ढकलुन, हे साहेब रस्त्यावर आणि त्यच्या अंगावर सायकल. हे सगळे आठवले की अजुन हसु येते.

मी सहावीत असल्यापासुन माझ्याकडे हिरो सायकल होती पण तेव्हा बि.एस.ए. नविनच आली होती मला हवी होती पण नाही मिळाली त्यामुळे आता लेकीला बि.एस.ए. लेडी बर्ड घेउन दिली तेव्हा बरे वाटले. (माझी लेक पण पाच वर्षाची असल्यापासुन
(without side wheels) सायकल चालवते आहे आता ती नौ वर्षाची आहे व मोठी regular size सायकल व्यवस्थित चालवते.)

Ajai
Wednesday, December 05, 2007 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी भरपुर सायकली चिन मधे (शांघायला) बघितल्या. तिथे सायकल साठि काहि भागात वेगळि लेन पण होती.

Kedarjoshi
Wednesday, December 05, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना धन्यवाद.

मंजू मिल्या म्हणजे मिलींद पण छत्रे नाही तर देशपांडे. (छत्रेंना भेटायचे आहे अजुन, बघु कधी योग येतो ते).

बी ती ट्रिंग ट्रिंग घंटी अमेरिकेत मिळते. (ऐक्सेसरी म्हणुन).
अजय मी माझ्या LML व फियारो बर अर्ध्याच्या वर महाराष्ट्र फिरलो आहे. यार बाईक नाही म्हणजे काय. घेउन टाक एखादी. अन हो राजदुत माझ्या मित्राकडे होती पण मला दुसर्या मित्राची यामाहा १०० च आवडायची. त्यावेळी आम्हा सर्वांकडे वेगवेगळ्या बाईक्स होत्या अन ज्या मित्रा कडे स्प्लेंडर होती त्याला बिलकुलच भाव न्हवता.
वर्षा ती बिसए नंतर माझ्या लहान भावा साठी घेतली होती.


Tiu
Wednesday, December 05, 2007 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसर्‍या किस्स्यावरुन एक जोक आठवला...

दोन मित्र सायकलवरुन जात असतात. एक मित्र जरा अवली असतो! चालवता चालवता तो पाय पायडलवरुन सोडुन देतो आणि म्हणतो 'राजु, देख मेरे पैर नही है'. पाय सोडल्यावर त्याला जरा confidence येतो. थोड्यावेळानी हात पण हॅडलवरुन काढुन घेतो आणी म्हणतो 'राजु राजु देख मेरे हात भी नही है'. हात पाय सोडल्यावर धडपडतो आणि मग म्हणतो,
'राजु देख मेरे दात भी नही है!'


Lopamudraa
Wednesday, December 05, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचल्यावर अगदी हाच जोक आठवला मला.... :-)

मस्त केदार, सायकल म्हटल्या की किती आठव्णी येतात बापरे
इकडे लोक आता go green म्हणत प्रदुषण कमी करण्यासाठी सयकलींचा उपयोग मोठ्या प्रमाणवर करतात. चिन मध्ये सायकलींचा जगात सगळ्यात जस्त वापर आहे.
मी सुध्दा गाडी ठेवुन सायकल च वापरते पण summer मध्ये :-)आम्ही सग्ळे सुट्टीच्या दिवशी सय्कल घेउन ८..१० mile तरी जातो.मजा येते खुप.


Farend
Wednesday, December 05, 2007 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार एकदम झकास. बर्‍याच आठवणी आल्या वाचून. सायकल बाबत च्या गोष्टींसाठी एक वेगळा बीबीच उघडावा लगेल. मी ही एवढ्यात एक सायकल घेतली येथे आणि तेव्हाही अशा गोष्टी आठवल्या.

केदार, येथे ब्रेक उलटे (म्हणजे डावा पुढच्या चाकाचा) असतात त्याची सवय झाली का? :-)

कैची म्हणजे एका पायडल वर उभे राहून सीटवरून 'टांग' मारून बसणे का? पुण्यात आम्ही वापरलेले शब्द म्हणजे (बहुधा हेच शब्द होते, नीट आठवत नाही) 'मधल्या पायाने' म्हणजे नळीच्या खालून पाय घालून दुसर्‍या पायडल वर ठेऊन आधी अर्धेच व नंतर जमू लागल्यावर पूर्ण गोल पायडल मारत चालवणे.
दुसरा प्रकार...म्हणजे नळी वरून पाय टाकून पण सीट वर न बसता चालवणे हे पहिले दोन्ही प्रकार फक्त 'जेन्ट्स' सायकल लाच करावे लागत.
तिसरा म्हणजे सीट वर बसून. (आणि चौथा म्हणजे मागच्या कॅरियर वर बसून पण तो गंमत म्हणूनच करत असावेत) त्यातही पाय पोहोचत नसतील किंवा सीट खूप उंच असेल तर एकदा इकडे व एकदा तिकडे कलून फार मजेशीर दिसायचे कोणीही तसे चालवताना. तसेच सीट वरून पाय पोहोचू लागे पर्यंत सायकल थांबवली की नळीवर उतरून उभे रहावे लागे.
'दहावी फ' मधे यातील काही गोष्टी अगदी सहज दाखवल्या आहेत.
तेव्हा काही आमच्या दृष्टीने 'खडकी दापोडी' लोक दोन्ही पाय साधारण सायकल हॅन्डल च्या जवळ गुढघे येतील असे न ठेवता अगदी काटकोनात ठेऊन चालवायचे ते फारच विनोदी दिसायचे :-)


Kedarjoshi
Thursday, December 06, 2007 - 12:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो सवय झाली. खरतर इकडे सगळेच उलटे त्यामुळे अगदी सहजतेन उजव्या हाताने ब्रेक मारला.
कैची म्हनजे त्या दांडीच्या खालुन दुसरा पाय घालायचा, एका हाताने दांडी व डाव्या हाताने डावी बाजू पकडायची अन सायकल चालवायची.
अरे ते सर्व प्रकार मी ही करायचो. तशातच नुक्क्डच्या हरिश चा फार प्रभाव पडला होता. त्याचे बघुन नांदेड ला एका मुलाने सलग सात दिवस सायकल चालविली होती.
मलाही त्या काळी सायकल ला चालवतानाच जमिनीवर पाडुन पायडलवर उभी करता येत होते. आता जमेल की नाही माहीत नाही.


Daad
Thursday, December 06, 2007 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायकल सायकल..... कसल्या मस्त आठवणी रे केदार. झकास लिहिलयस. मित्रांबरोबर कानात वारं शिरल्यासारखी नुसती झाम झाम पिटाळायची (मैत्रिणींबरोबर.... माझ्यावेळी).
माझी (किंवा सगळ्यांचीच, त्या काळात) सायकल बहुतेक वाढत्या मापाचीच असायची :-). हॉप्पिंग करता येत नव्हतं.... हे कैची-बियची काय नाहीच. म्हणजे एकदा सीटवर प्रतिष्ठापणा केली की परत घरी येईपर्यंत उतरायचं नाही वाटेत कुठेही.

वाण्याच्या दुकाना समोर मी बॅले डांसर सारखी नुसती पायाची बोटं टेकवून सायकलवर उभी आहे. तिथूनच, आईने सांगितलेली मालाची यादी जोरात ओरडून दिलिये. वर आणखिन सूचना (आईच्याच)... साबूदाणे आणि लसणाचं तिखट वेगळ्या पिशवीत द्या, वाणीकाका.... असलं.
मग ते सामान हॅन्डलला लावलं की दात ओठ खाऊन एका बाजूने जड झालेली आणि गटाराच्या दिशेला परत परत जाण्याची यडच्याप खूळ लागलेल्या सायकलचं पॅडल मारायचं... का दुसरं येऊन सटाककन दुसर्‍या पायाच्या नडगीवर बसलच म्हणून समजा....
....काय नव्हेच.... तरी सायकल चालवायचीच.....
(आईशप्पथ किती मोठी झालीये पोस्ट!... सॉरी रे केदार!)


Zakasrao
Thursday, December 06, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार मस्त आठवणी रे :-)
मी खुप उशीरा शिकलो सायकल.
अगदी आठवीत असेपर्यंत मला येत नव्हती. मग ५० पैसे तास अशा भाड्याने सायकल आणत होतो. आणि जरा जास्त आनंद घेण्यासाठी म्हणुन मुद्दामच १०-१५ मिनट उशीरा परत करत होतो. :-)
त्यावेळी आमच्या इथे जे दुकान होते त्यात फ़क्त दोनच छोट्या सायकली होत्या. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आणि रविवारी त्या सायकलीना वेटिंग असायच. :-)
पहिली सायकल मी कॉलेजला जायला लागल्यावर घेतली. ती होती जुनी. अगदीच डबडा झालेली. तिला दुरुस्त करुन घेतली. :-)
सायकलच्या खरेदी किमतीपेक्षा दुरुस्ती किम्मत अडीच पट झाली होती :-)
पण मस्त केली होती ते सायकल. साधीच आणि खुप जुन्या अशा रॅली कं ची होती ती.
खुप साथ दिली तिने कॉलेज संपेपर्यंत.
नन्तर ती मावसभावु घेवुन गेला आणि त्याचा दोस्ताने फ़िरायला गेल्यावर त्या सायकलीची वाट लावली एका ट्रकला धडकुन :-(
आता ती नाहिये. तिला बहुतेक भंगारात विकलि भावाने. :-(
मस्त जुन्या आठवणी जाग्या झाल्या लेख वाचुन :-)


Marathi_manoos
Friday, December 07, 2007 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सायकल शिकलो पहिली/दुसरी मधे असताना ....१ रुपया तास अशी मिळायाची.
मधे एकदा SFo ला गेलो होतो तेव्हा १०/१२ मैल चालवली.
खूप मजा आली.
Thanks Kedar....you revived my memories....sceen already धूसर होत्त आहे त्या memories मुळे

Gsumit
Friday, December 07, 2007 - 9:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही केदार, मस्तच... सायकलबरोबर माझ्या लहानपणीच्या इतक्या आठवणी आहेत की सांगायला लागलो तर मायबोलीची इ-पाने संपुन जातील... (घाबरु नका, सगळ्याच नाही सांगणार... )

मी पाचवीला असतानी सायकल शिकलो... आधी नळीमधुन अन नंतर थोडा मोठा झाल्यावर मागच्या सिटवर बसुन मारायला खुप आवडायची... पडलो तर इतक्या वेळेस की माझ्या पायांना जखम नसेल असा एक दिवस गेला नसेल शिकताना... :-)

आठवी-नववीत असतानी खुप फ़िरलो सायकलवर... त्यात, वाळुत जागेवरच चाक फ़िरवायचे, स्पीड ब्रेकर आला की फुल स्पीड मधे जायचे अन पुढचे चाक हवेत उचलायचे.... भरपुर उद्योग केले असले... :-)


Ashbaby
Saturday, December 08, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला माहित आहे हे वाचुन लोक हसतिल म्हणून तरीही सांगते, मी सायकल माझ्या ३६ साव्या वर्षी शिकले, आता कायनेटीक नोव्हा व्यवस्थित चालवण्यापर्यंत प्रगती केलीय. सकाळीच उठुन सायकल घेऊन फ़ेरी अजुनही मारते.
मुलिला मात्र ७ व्या वर्षीपासून ट्रेनिंग दिले. ती अगदी कैची, दंडी वगेरे सगळं आरामात करते. (हे शब्द आता वाचून कळ्ले.) ती नोव्हा पण व्यवस्थित चालवते. फ़क्त कॉलनीबाहेर जायला अजुन परमिशन नाही दिलिय तिला. फ़क्त बाराचीच आहे म्हणुन.
साधना





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators