Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सोबत

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » कथा कादंबरी » सोबत « Previous Next »

Supermom
Sunday, December 02, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'उमा, ए उमा...उठ बरं जरा... अग सात वाजून गेले...'

कोणीतरी खूप दुरून हाका मारतंय असं वाटत होतं उमाला. डोळ्यावरचा झोपेचा पडदा प्रयत्न करूनही बाजूला होत नव्हता. नानींच्या खोकल्यानं रात्री एक पर्यंत झोपच लागली नव्हती तिला. मोठ्या कष्टानं तिनं डोळे उघडले. कमरेवार हात ठेवून, कशीबशी सरळ होत दोन पावलं टाकली मात्र.. अन डाव्या गुढग्यात आलेल्या जीवघेण्या कळेनं तिचा श्वास क्षणभर कोंडलाच.

'आलीस का ग... उमा, ए उमा... कसल्या गाढ झोपा बाई यांच्या...'

नानींच्या हाका सुरूच होत्या.
'आले आले....'
प्रयत्नपूर्वक आवाजावर ताबा ठेवत, मनातला वैताग सुरात उमटू न द्यायचा आटोकाट प्रयत्न करत उमानं पलंगाजवळच्या सपाता पायात सरकवल्या.. नि नानींच्या खोलीचं अर्धवट लोटलेलं दार उघडून ती आत डोकावली.

'डोकं फ़ार दुखतंय ग मघापासून... जर तेवढं व्हिक्स दे लावून असलं तर....'

'चहा घेता का आधी? थंडीनं दुखत असेल डोकं...'

'नको ग बाई.. आधी डोकंच दे जरा चेपून.. एकदा कामात गुंतलीस की म्हातार्‍या नणंदेकडे बघायला वेळ कुठे असतो तुला?....'

त्यांच्या आवाजातल्या कडवटपणानं क्षणभर डोक्यात सणक गेल्यासारखंच वाटलं उमाला. पण वरकरणी काहीच न दर्शवता तिनं कपाटातून व्हिक्स ची बाटली काढली. त्यांच्या डोक्याला ते नीट चोळून देऊन ती निघाली तोच त्यांनी तिला पुन्हा हाक मारली...

'अन हो, आज जरा वांगी कर मसाल्याची. केव्हाची इच्छा होतेय खायची. पण तुला कामातून वेळ मिळेल तर ना... तरी बरं झाडाय पुसायला, धुण्याभांड्याला बाई आहे.....'
पुढचं सारं उमाला पाठ होतं. गळ्यात आलेल्या आवंढ्याबरोबर मनातला राग गिळून टाकत ती बाहेर आली.

बाथरूममधे येऊन तिनं सकाळची आन्हिकं उरकली. केसांची सैलसर पोनीटेल बांधून तोंडावर पाण्याचा हबका मारला. चेहरा पुसतच ती बेडरूममधे आली. बेडरूमच्या मोठ्या आरशासमोर उभं राहून स्वतःला न्याहळू लागली.
'अजून चांगलं मेन्टेन केलंय आपण स्वतःला.. श्रीकरसारख्या कॉलेजमधे जाणार्‍या मुलाची आई आहोत हे वाटतच नाही कुणाला...'
त्या विचारानं उमाला खुदकन हसू आलं. 'कित्येकदा त्याचे घरी आलेले मित्र आपल्याला त्याची मोठी विवाहित बहीण समजतात...' त्या प्रसंगांची आठवण येऊन तिला मनावर कोणीतरी हळूवार मोरपीस फ़िरवल्यासारखं वाटलं.

तोच बेडरूमचं दार ढकलून सदानंद आत आला.

'उठलीस का उमा? थोडं झोपायचं असतं ग अजून. काही घाई नव्हती उठायची...'

गर्द निळ्या रंगाचा सूट घातलेल्या, पायात चकाकते बूट नि हातात ब्रीफ़केस घेतलेल्या देखण्या नवर्‍याकडे उमा क्षणभर बघतच राहिली.

'आपल्यापेक्षाही तरूण दिसतो हा.... लहान वयातच मोठ्या पदाला चढल्याचा रुबाब अगदी शोभून दिसतो याला...'

अंगावरच्या चुरगळलेल्या गाऊनची नि प्रसाधन विरहित चेहर्‍याची अचानक लाजच वाटायला लागली उमाला.

आपण जेमतेम अडतीस नि सदानंद एक्केचाळीस. पण गेल्या काही वर्षात मनानं पार म्हातार्‍या झालोत आपण. औषधांच्या नि व्हिक्सच्या वासात पार हरवून गेलोत. जरासुद्धा लक्ष देता येत नाहीय स्वतकडे...'

'ओके उमा... निघतो मी. उशीर होईल आज.. मिटिंग आहे.. जेवून घे तू.. वाट नको बघूस...'
तिच्याशी बोलत बोलतच सदानंदनं पोर्चचा दरवाजा उघडून बाहेर पाऊल टाकलं.

'सगळे मोकळ्या हवेत श्वास घेताहेत नि मी ही अशी घरात जखडून पडलेय.. नानींची सतत येणारी दुखणी नि इतर उस्तवार करण्यातच आयुष्य संपतंय आपलं...'

या विचारानं तिला अजूनच चिडचिडल्यासारखं झालं.


अपूर्ण.


Peacelily2025
Sunday, December 02, 2007 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येऊ दे पुढचे भाग, मी वाचतेय, वाट पहातेय.

Anaghavn
Monday, December 03, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉम,
येऊ देत लवकर वाचतेयं.
अनघा


Dhoomshaan
Tuesday, December 04, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Supermom, please, we are waiting...........




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators