|
Ajai
| |
| Wednesday, November 28, 2007 - 9:58 am: |
|
|
रिक्षांच्या गर्दीतुन शिवाची कार कुर्मगतीने पुढे जात होती. शिवाला ऑफिसला जायला उशीर होत होता.सकाळी लवकर निघुनही त्याला नेहमीप्रमाणे उशीर व्हायचा तो झालाच. मुंबईच्या ट्रफिकवर उपाय एकच, येकतर रिक्षा बंद करा नाहीतर त्यांच्यासाठी वेगळी लेन तरी ठेवा, शिवाने मनात दोनचार शिव्या देत विचार केला. १० चे ऑफिस आणि साडेदहा झाले तरी तो अजुन रस्त्यातच होता.तसा त्याच्या उशिरा जाण्याने काही फरक पडणार नव्हता पण IT इन्फ़्रास्ट्रक्चर डिपार्ट्मेंट हेड म्हणुन काही जबाबदारी होतीच. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. नंबर लिंडाचा. MD ची सेक्रेटरी.बहुतेक हिच्या मेल मधे प्रॉब्लेम असेल. हज्जारदा सांगीतलं तरी ती हेल्पडेस्क ऐवजी शीवालाच फोन करणार. धन्यापेक्षा गण्याला म्हणतात ना त्यातला प्रकार. चरफडत त्याने फोन घेतला. "बॉस वॉन्ट्स टू टॉल्क टू यु" लिंडाने MD ला फोन ट्रान्सफर केला "शिवा, हव यु सीन अवर वेबसाईट टुडे?" MD पलिकडुन जवळ्जवळ किंचाळत होता. "नो सर, एनिथिंग व्रॉंग, ईज ईट डाऊन ?" शीवाने कंपनी वेबसाईट आजच काय कित्येक महीने पाहीली नव्हती. त्या static पेजेस मधे काय बघणार. " xxxxxxx इट्स प्ल्याशिंग न्युज ऑफ माय रेसिग्नेशन एन्ड मी जॉईनींग रायवल कंपनी" शिवा कारच्या सीटवर दोन फुट उडाला
|
Akhi
| |
| Wednesday, November 28, 2007 - 10:10 am: |
|
|
सुरवात तर छान आहे पण जरा मोठे post टाकावेत.
|
अजय, सुरुवात छान झालीयं,पुढचा भाग लवकर पोस्ट करा. आणि शिवाचे नाव बर्याच ठिकाणी शीवा झाले आहे,प्लीज ते correct कराल का? सल्ला दिल्यबद्दल राग मानू नका
|
Ajai
| |
| Wednesday, November 28, 2007 - 12:31 pm: |
|
|
कंपनी वेबसाईट hack झाली होती. शिवाने कार बाजुला पुल केली आणि सिक्युरिटी एड्मीन NOC ऑपेरेशन हेड बरोबर कॉन्फरन्स केली. वेबसाईट सर्विस डाऊन केली. जे होस्ट कॉम्प्रोमाईज झाले असण्याची शक्यता वाटत होती ते पुल आऊट करुन घेतले. ऑफिसला पोचल्यावर शक्य त्या सर्व करेक्टिव actions घेतल्या तासा दोन तासात वेब साईट चालु केली. पण व्हायचे ते नुकसान झालेच होते. रोज वर जाणारा कंपनी शेअर MD च्या रेसिग्नेशन न्युजने गडगडला होता. वेबसाईट hack झालेय हे जाहिरपणे मान्य करणे ही शक्य नव्हते. संध्याकाळी कम्युनिकेशन्स डिपार्ट्मेंटने प्रेस रिलिझ ने थातुर मातुर कारण देवुन सारवा सारव केली. शिवाच्या आयुष्यातला हा मोठा धक्का होता. जरी छोटिमोठी डाऊनटाईम आणि फायर फायटिंग्ची सवय असली तरी ही परिस्थीती तो पहिल्यांदाच हाताळत होता. त्याची आख्खी टीम त्याने कामाला जुंपली. सिक्युरीटी सिस्टम चा रिव्ह्यु केला. फायरवॉल, डीएम्झी हार्डनिंग,डीएनएस प्लेसमेंट सगळ पुन्हा पुन्हा चेक केले. सगळ्या access list , फायरवॉल रुल्स पुन्हा पुन्हा बघितले. कुठेच काही सापडत नव्हते. गेल्याच महिन्यात त्याने बजेट मंजुर करवुन Intrusion डिटेक्शन सिस्ट्म बसवुन घेतली होती. तीनेही कोणताच आलर्म दिला नव्हता म्हणजे सगळ traffic सिग्नेचर प्रमाणेच होत. hacker ने व्यवस्थीत सगळे लॉग्ज साफ केले होते. हनिप्Pऑट व्यवस्थीत टाळले होते र्आत्री उशिरापर्यंत काम करुन हाती काहीच सुगावा लागला नव्हता. शिवाने जरी मनेजमेंटला खात्री दिलि असली तरी त्याला मनोमन माहिती होते कि हा हल्ला परत कधिही होऊ शकतो. तो हतबल होता. नोकरि जाण्याची शक्यता होतिच त्यातुन नामुष्कीही झालि असती. इतक्या वर्षात कमवलेले नाव आणि पोझिशन तो hacker कधिही धुळिला मिळवु शकत होता. ऑपरेशन्ची येक खास टीम त्याने वेबसाईट मॉनिटरिंग ला लावली.तो सगळ्याना दोळ्यात तेल घालुन कामं कर्ण्याची सुचना देऊन घरी निघाला
|
Meggi
| |
| Wednesday, November 28, 2007 - 1:02 pm: |
|
|
एकदम वेगळी कथा आहे... मोठे भाग टाक म्हणजे मजा येइल.
|
Vrushs
| |
| Wednesday, November 28, 2007 - 2:25 pm: |
|
|
विषय चांगला आणि वेगळा आहे.पण शुध्दलेखनाकडे बघितलं तर अजून मजा येईल.
|
Apurv
| |
| Wednesday, November 28, 2007 - 3:28 pm: |
|
|
अजय, मजा येत आहे वाचायला!
|
Akhi
| |
| Thursday, November 29, 2007 - 5:56 am: |
|
|
विज्ञान कथा मिळनार तर वाचायाला? थोडे मोठे भाग अपेक्शित
|
Ajai
| |
| Thursday, November 29, 2007 - 6:05 am: |
|
|
प्रोत्साहनासाठी धन्यवाद. मी कथा इथेच टाय्पुन पोस्ट करतोय त्यामुळे शुद्ध्लेखनाच्या बर्याच चुका झाल्यात त्याबद्दल माफी.. आज आणखी थोडे भाग टाकुन संपवेन
|
Ajai
| |
| Thursday, November 29, 2007 - 6:56 am: |
|
|
मोगलांच्या घोड्याना जसे संताजी धनाजी पाण्यात दिसत तसे शिवाला सगळेच hackers दिसत होते. नक्की क्ल्यु मात्र काहिच सापडत नव्हता. त्याचा hands on टच तसा कधिच सुटला होता पण खुप लॉगिकली विचार करुनही धुसर असा उद्धा रस्ता दिसत नव्हता,आठवडाभरात त्याच्या तब्येतीची पार वाट लागली होती. झोपेतुन मधेच जागा होऊन तो वेबसाईट चेक करायचा.थोडा चिडचिडा झाला होता तो. त्याने हा प्रॉब्लेम नेटवर बर्याच फोरम्वर पोस्ट केला पण बहुतेक सल्ले उंटावरुन शेळ्या हाकणार्यांचे. काहीतरी चुकत होते हे नक्की. शेवटी त्याने सगळी ऑपरेटिंग प्रोस्युजर्स पुन्हा वाचुन काढली. त्यानेच टिम बरोबर डेव्हलप केलेली प्रोस्युजर्स, चेंज म्यानेजमेंट, इन्सिडन्ट म्यानेजमेंट सगळे व्यवस्थीत होते. डेली एक्सेप्शन रीपोर्ट त्याला वेळेवर मिळत होता. आत्तापर्यंत झालेले हल्ले त्याच्या सिक्युरिटि सिस्टमने समर्थपणे हाताळले होते. त्याने मागच्या वर्षीचा सिक्युरिटी ऑडिट्चा रिपोर्ट काढुन पाहिला. काही विशेष फायन्डिंग्ज नव्हतीच.खर म्हणजे इतका चांगला रिपोर्ट ऑडिटर कुणाला क्वचीतच देत असतील. एकच महत्वाचा मुद्दा त्यात मांडला होता तो होता वायरलेस नेटवर्क सिक्युरीटी बद्दल. जरी शिवाने Wired Equivalent Privacy WEP प्रोटोकॉल अमलात आणला होता तरी त्या WEP keys वेळोवेळी बदलल्या गेल्या पाहिजेत असे ऑडिटरने सुचवले होते. ती सुचना नक्किच महत्वाची होती. शिवाने लगेच येक स्क्रिप्ट लिहुन घेतले होते. त्या स्क्रिप्टने wep keys आपोआप प्र्यत्येक आठवड्यात बदलल्या जात होत्या. वायरलेस क्लायंट्चे प्रोफाईल सुद्धा आपोआपच बदलले जाई. त्यामुळे या key कुठे लिहण्याचा वा लिक होण्याचा प्रश्नच नव्हता. ऑडिटर्सनी हे प्रोस्युजर स्विकारुन तो मुद्दा सुद्धा निकाली काढला होता. शिवाचे डोकं पार कामातुन गेले होते. सगळे administrative passwords तो स्वत्: समोर बदलुन घ्यायचा. सगळे सिक्युरीटी अपडेट्स टेस्ट करुन राबऊन घ्यायचा. खर म्हणजे how to maintain security baseline या विषयावर कॉम्प्युटर सोसायटीत मागच्याच महिन्यात त्याचे व्याख्यान झाले होते. Somebody was challenging his expertise आणि त्यातच त्याचा ईगो दुखावला जात होता. तो सिक्युरीटि म्यानुअल डोळ्याखाली घालत होता तेव्हढ्यात त्याला NOC मधुन फोन आला "सर कुणितरी आपल्या वेबसर्वरचा ताबा मिळवतोय" "आधि ते सेशन उडव मी आलोच" म्हणुन तो नॉक रुम कडे धावला.
|
Akhi
| |
| Thursday, November 29, 2007 - 6:59 am: |
|
|
कथा मस्त पकड घेतेय आणि आजच संपवणार? अजुनच छान.......
|
Ajai
| |
| Thursday, November 29, 2007 - 7:47 am: |
|
|
NOC ने फटाफट damage controll केला. ते सेशन बंद केलं. सेशन ट्रेस केले तर ते NOC रूम मधुनच लॉंच केले होते. म्हणजे त्या hacker ला ऑपरेशन रूमचा ताबा मिळवता येत होता. शिवाने एक सणसणित शिवि घातली पण त्यापलिकडे काय करु शकत होता तो. नशिबाचा भाग येव्हढाच कि या वेळेला काही नुकसान व्हायच्या आत पावलं उचलता आली होती. पण प्रत्येकवेळी तो तीतकाच सुदैवी ठरेल याची त्यालाच खात्रि नव्हती. this guy has to be someone insider पण संसयाची सुई कुणाकडेच वळत नव्हती.त्याचि सगळि टिम चांगली आणि विश्वासु होती. वेळोवेळी टिमबिल्डींग, प्रमोशन्स देऊन त्याने टिम चांगलीच उभी केली होती. त्याने टिम मिटिंग बोलवली. " आजची बातमी या रूम च्या बाहेर न जाईल याची काळजी प्रत्येक जण घेईल याची मला खात्री आहे" त्याने सुरुवात केली. " situation is critical and we have to fight as team " त्याने नेहमिचेच वाक्य फेकले पण त्यात दम नव्हता सगळेजन आपापल्या परिने काहितरी सुचवत होते पण काहि रामबाण उपाय सापडत नव्हता. मिटींग चालु असतानाच त्याला blackberry वर ई-मेल मेसेज आला from: IMtechy@hotmail.com to: Shiva@xxxxxxxx.com Sub: bossy, think will survive for long. nahh, takecare I am around. I can bring dwn all ur tall claims in min. protect ur systems if u can takecare I am around. त्याची टीम सगळि बरोबरच होती मिटिंगमधे मग हा नक्कि कोण? त्याने त्याच्या मेल administrator ला बाजुला घेतल. " you guys continue with meeting, we need to work on something urgent" पटापट त्याने मेल हेडर examine करुन घेतले. त्या हेडर मधला अनावश्यक भाग उडवला आणि X-Originating-IP शोधला. " 204.225.44.10 oh thats our global gateway router interface IP so this guy is definitely insider "शिवाला आता खात्रि होती. त्याने NAT translations चेक करुन घेतले. त्या मेलच्या टाईम स्ट्याम्प प्रमाणे तो IP वायरलेस DHCP पुल मधला होता. आता त्याला पकडणे शक्य होते.
|
Meggi
| |
| Thursday, November 29, 2007 - 8:29 am: |
|
|
अरे व्वा, आज कथा संपवणार... वाट बघतेय तुझ्या पुढच्या भागांची...
|
Akhi
| |
| Thursday, November 29, 2007 - 8:41 am: |
|
|
non tech लोकांसाठी terms थोड्या सोप्या करुन सांगाल का? IP DHCP नाही कळल.... आनि गोस्ति मधले terms जर कळले नाही तर मजा येणार नाही.
|
Ajai
| |
| Thursday, November 29, 2007 - 9:10 am: |
|
|
शिवाने टिम्मधल्या पोराना कामला लावले. त्या मेल मधली भाषा ओळखिची वाटत होती पण त्याची ट्युब पेटत नव्हतीपंधरा मिनटात सगळी wi-fi sessions चेक करुन झाली. सगळे top बॉसेस. काहीही गडबड दिसत नव्हती. मेल ज्या IP वरुन आले होते ते सेशनही disconnect झले होते पण त्याचा युजर कुठे बसला होता ते सापडत नव्हते. ज्या access point शी तो युजर असोशियेट झाला होता त्याच्या आसपास शिवा स्वत जाऊन आला. कुणिच दिसत नव्हते त्याला. सिगरेट फुंकायला म्हणुन तो ऑफिस बाहेर पडला. ऑफिस लगतच्या चहाच्या टपरीवर त्याने कटिंगची ऑर्डर दिली आणि गोल्ड्फ़्लेक शिलगावली.धुर सोडता सोडता तो hacker बद्दलच विचार करत होता. त्याला माहीती होते की तो त्याच्या अगदी जवळ आहे पण मेंदुचा भुगा झाला तरी त्यचा चेहरा काही नजरे समोर येत नव्हता. तेव्हढ्यात कुणितरि त्याच्या पाठिवर थाप मारली. मागे रंजीव केसवानी उभा होता. " bossy , whats up?" शिवाच्या हातुन सिगरेट घेत रंजीवने विचारले. "me going great" शिवा bossy- हे संबोधन रंजीतच वापरायचा त्याला. आता शिवाच्या डोक्यात साफ प्रकाश पडला हे काम रंजीवचेच. रंजीव शिवाच्याच टिम मधला. कामात उत्तम पण कामा पेक्षा जास्त वेळ stock trading मधे जायचा त्याचा. शिवाने त्याला दोनचार वेळा समजवले पण रंजीवमधे काही फरक पडला नाही. शिवालाही असा चांगला रिसोर्स गमवायचा नव्हता. शेवटी रंजीतनेच ती नोकरी ६ - ७ महीन्यांपुर्वी सोडली. "रंजीव क्या चल रहा है आजकल" शिवाने आडवळणाने विषयाला हात घातला. "बाप का स्टॉक ब्रोकिंग का बिझनेस संभाल रहा हु और क्या" बराच वेळ ईकडचा तिकडच्या बाता झाल्या तरी रंजीव बधत नव्हता शेवटी शिवा मुद्द्यावर आला " रंजीव व्ह्याय आर यु hacking इनटू माय सिस्टम्स?" "मी, व्हाय शुड आय?"रंजीवने ऊडवुन लावले "बता नही तो सायबर सेल के पास जाना पडेगा" शिवाने धमकावले " if thats the case proove it, n I know Indian cyber laws can't do much in this case " रंजीवच्या बोलण्यात येक मग्रुरी होती "बता यार I have lost it " शिवाने आपली हार मान्य केली. "चल शामको बियर पिला, तभी बताऊंगा O2 मे ८ बजे मिलते है" शिवाला संधी न देताच रंजीवने ठिकाण आणी वेळ ठरऊन टाकली.
|
Ajai
| |
| Thursday, November 29, 2007 - 9:43 am: |
|
|
"चीयर्स फॉर हेल्थ एन्ड वेल्थ " रंजीत ने बीयरचा मग उंचावला "चीअरो" शिवानेही नाईलाजास्तव मग उंचावला. "यार अभी तो बता तुने कैसे hack किया" "चल बताता हु तु भी क्या याद करेगा" "यार नाऊ आय अम टोटली इनटु स्टॉक मार्केट पण कधी कधी computer society ची सेमिनार अटेंड करतो. त्या दिवशी तुज्या प्रेझेंटेशनला ही मी होतो" "तुझ प्रेझेन्टेशन मस्तच होते पण त्याला थोडा घमेंडिचा वास येत होता म्हणुन मी माझे हात साफ करायच ठरवले"-रंजीत "पण तु नेटवर्क मधे प्रवेश कसा मिळवलास? यु नो हाऊ स्ट्रॉन्ग अवर सिक्युरिटि इज"शिवाने अविश्वासने मान हलवली. " देअर इस वीक लिंक, तुझ वायरलेस नेटवर्क"- रंजीतने सिगरेट्चा धुर शिवाच्या तोंडावरच सोडला. "यु बिलिव्ह टु मच इन ऑटोमेशन. WEP keys चेन्ज़ करायचे स्क्रिप्ट तुच माझ्याकडुन लिहुन घेतले होते. I could run that script and guess the keys वायरलेस सिग्नल तर अगदी रस्त्यावर सुद्धा पोचतयत तुझ्या नेटवर्कचे. थोडा गेन कमी करुन घे "रंजीत ने न मागताच सल्ला दिला. "XXXXXXXXX, पण त्याच्या पुढे सिस्टम पासवर्ड्स? ते तर मी माझ्याच PC वरुन चेंज करुन घेतो" शिवाचे डोळे अजुन विस्फारलेले होते "तुझ्या PC वर किस्ट्रोक लॉगर आणि स्पायवेअर आहे. मी मागच्या महीन्यात दिवाळित ग्रीटिन्ग्स मेल बरोबर येक exucutable पण पाठवली होती. तुझ्या स्रीनवर फायरवर्क दाखवत त्या exucutable ने काम चोख केले होते" शिवाला आणखी explanation ची गरज नव्हती.त्याने रंजीतला कोपरापासुन हात जोडले. "चल अब बिल भी मैन ही दे देता हु यार. तुम लोग जब server अप कर रहे थे उस दिन मैन तुम्हारा शेअर शॉर्ट कर रहा था. उस दीन बहोत माल बनाया" रंजीतने शेवटचा बॉन्ब टाकला. -समाप्त
|
Akhi
| |
| Thursday, November 29, 2007 - 9:50 am: |
|
|
मस्त खुप छान आहे
|
Arc
| |
| Thursday, November 29, 2007 - 9:50 am: |
|
|
आज वाचकान्ची मजा आहे!!आधि "त्रयस्थ" आता insider
|
सॉरी, माझ्या डोक्यावरून गेली. खूपच तांत्रिक भाषा वापरल्यामुळे असेल कदाचित. आणि बाकी कथा खूपच प्रेडिक्टेबल वाटली.
|
Namrata4u
| |
| Thursday, November 29, 2007 - 10:01 am: |
|
|
khupch aavadali story... technical asalyane jast maja aali vachayala aani ho, jast wel na lawata pata-pat posts takalet so khuuuuuup sare dhanyavad !!!
|
|
|